वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ११/१ पृ. ४-७
  • देवाविषयीचे प्रेम सदाचाराचे बळ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाविषयीचे प्रेम सदाचाराचे बळ
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दहा आज्ञा—सदाचारासाठी बलवान
  • देवाविषयीच्या प्रेमाचा काय अर्थ होतो?
  • देवाविषयीची प्रीती—सदाचाराचे बळ
  • प्रीती कधी खचत नाही
  • “हीच देवावरची प्रीती आहे”
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • हृदयपटलावर लिहिलेले प्रीतीचे नियमशास्त्र
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ११/१ पृ. ४-७

देवाविषयीचे प्रेम सदाचाराचे बळ

समजदार व्यक्‍ती अनीतीला अटकाव घालण्याच्या गरजेस तत्परतेने स्विकारील. कॅनडातील युनायटेड चर्चच्या उपाध्यायाने म्हटल्याप्रमाणेः “व्यक्‍तीगत स्तरावर आणि सामाजिकदृष्ट्या नैतिक कायद्यांकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा युद्धे, चलनवाढ, वॉटरगेट व बेबंदशाही माजते.” हे अधिक भीतीदायक वाटते. या आधीच्या लेखात दाखविल्याप्रमाणे या जगाच्या सर्व प्रमुख धर्मांनी स्वतःला सदाचाराचे बळ असल्याचे शाबीत केले नाही. यास्तव, आम्ही वैयक्‍तितरित्या नैतिक जीवन जगू इच्छितो तर अशा प्रकारचे बळ देणाऱ्‍या आणखी एका अधिकाराकडे आम्ही पाहिलेच पाहिजे आणि त्या अधिकारास स्वेच्छेने बिलगून राहण्यास हवे.

अशा प्रकारच्या सर्वोच्च अधिकाराचा प्रभाव मिसरच्या राजदरबाऱ्‍यापाशी कारभाऱ्‍याचे काम पाहणाऱ्‍या योसेफ या इब्री तरुणाच्या जीवनातील एका घटनेत सुस्पष्ट दिसला. या अधिकाऱ्‍याच्या पत्नीने योसेफाला तिच्याबरोबर लैंगिक सलगी करण्यासाठी मोहित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा योसेफाने त्याचा प्रतिकार असे म्हणून केलाः “एवढे घोर कर्म करुन मी देवाचा अपराधी कसा होऊ?” (उत्पत्ती ३९:७-९) योसेफाने देवाचा अधिकार आणि त्याला संतुष्ट करण्याची इच्छा याविषयीची जाण राखल्यामुळेच त्याला तिच्या डावांना प्रतिकार करण्याचे नैतिक बळ मिळाले.

याच्या दोनशे वर्षांनंतर योसेफाचा पिता याकोब याच्या वंशजांना म्हणजे इस्त्राएल राष्ट्राला दहा आज्ञा मिळाल्या. त्या मोशेकरवी देण्यात आलेल्या नियमशास्त्राच्या भाग होत्या. अवज्ञाकारी वृत्तीने यहोवा देवाची नाराजी आणिली तर या कायद्यांस दाखविलेल्या आज्ञाधारकतेमुळे इश्‍वरी आशीर्वाद आणले गेले. अशाप्रकारे या आज्ञा त्या राष्ट्रास नैतिक मार्गदर्शन अशा ठरल्या.

दहा आज्ञा—सदाचारासाठी बलवान

त्या दहा आज्ञा केवढ्या बलशाली होत्या? त्यांचा प्रभाव या २०व्या शतकातही जाणवतो. १९६२ मध्ये न्यूझिलंडचे त्यावेळचे गव्हर्नर-जनरल म्हणालेः “मला वाटते की काही लोक दहा आज्ञा कालबाह्‌य झाल्या आहेत असे समजतात. आम्ही आजही त्या विश्‍वासूपणे आचरणात आणल्या तर देशाच्या सामान्य आज्ञा अनावश्‍यक ठरतील असे म्हणणे तितके अर्थहीन ठरणार नाही.”

तरीपण, एका तरुण यहुदी अधिकाऱ्‍याबरोबरच्या संभाषणात येशू ख्रिस्ताने दाखविले की दहा आज्ञा पाळण्यापेक्षा काहीतरी अधिकाची जरुरी होती. त्या तरुणाने विचारले होतेः “सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे?” येशूने त्याला त्या दहा आज्ञातील काही सांगून म्हटले की, “आज्ञा सातत्याने पाळ.” अधिकाऱ्‍याने उत्तर दिले की, “मी हे सर्व पाळिले आहे; माझ्या ठायी अजून काय उणे आहे?” येशूने उत्तर दिलेः “तुझे असेल नसेल ते सर्व विकून दारिद्र्‌यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्या मागे ये.” अहवाल पुढे म्हणतोः “ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्‍न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती.”—मत्तय १९:१६-२२.

या अहवालाची, लूक १०:२५-२८ मध्ये आढळणाऱ्‍या यासारख्याच अहवालाशी केलेली तुलना त्या तरुण अधिपतीची मुलभूत समस्या काय होती ते समजण्याची मदत आम्हास मिळते. आम्ही तेथे वाचतोः “एक शास्त्री उभा राहिला व त्याची [येशूची] परिक्षा पाहण्याकरता म्हणालाः ‘गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल’?” येशूने त्याला या गोष्टीवर विचार करण्यास सहाय्य दिले व यामुळे त्या मनुष्याला त्या प्रश्‍नाचे उत्तर देणे शक्य झाले. तो म्हणालाः ‘यहोवा देवावर संपूर्ण मनाने, जिवाने, शक्‍तीने, बुद्धीने प्रीती कर; तसेच आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर.” येशूने समाप्तीला म्हटलेः “हेच करीत राहा म्हणजे जीवन मिळविशील.”

तर मग अगोदर उल्लेखिलेल्या त्या तरुण अधिकाऱ्‍याची कोणती समस्या होती ते तुम्हाला दिसून आले का? त्याची देवावरील व शेजाऱ्‍यावरील प्रीती भौतिक प्रीतीने ग्रासली गेली होती. ही केवढी दुःखद गोष्ट होती! तो दहा आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करीत होता तरीसुद्धा सार्वकालिक जीवन गमाविण्याच्या धोक्यात होता.

देवाविषयीच्या प्रेमाचा काय अर्थ होतो?

आम्ही आज अशा काळात जीवन कंठीत आहोत जेव्हा की देवाविषयी व शेजाऱ्‍याविषयीच्या प्रेमाचे स्थान स्वप्रेम, मालमत्ता व लैंगिक प्रेमाने घेतले आहे. तसेच देवावर निर्माणकर्ता या विश्‍वासाची जागा पुष्कळांच्या बाबतीत, सिध्द न झालेल्या उत्क्रांतीवादाने घेतली आहे. या गोष्टीने कोणता परिणाम घडवला?

पुष्कळ शतकापासून ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मपुढाऱ्‍यांनी पवित्र शास्त्रात उल्लेखित नसणाऱ्‍या भयजनक नरकाग्नी तत्वाचा उपयोग लोकांच्या नैतिकपणावर प्रभुत्व करण्याच्या उद्देशास्तव केला. एनसायक्लोपिडिआ इन्टरनॅशनल म्हणतेः “मध्ययुगीन काळात, सर्वसाधारण लोकांना सदाचाराने जगण्याचे शक्‍तीशाली बल नरकाच्या भीतीमुळे वाटत होते. याने राजे व सत्ताधिशांना सुद्धा चर्चला अंकित राहण्यास लावले. हेच बहुधा त्यांच्या मोकाट वासनेवरील अंकुश होते.” तथापि, या नरकाग्नीच्या तत्वाने देव क्रुर, निष्ठुर व खूनशी असल्याची छाप उमटविली. या तत्वाने काही लोकांवर लगाम लावण्याचे काम केले तरीही त्याने इतरांस देवापासून दुरावले, त्यांना उत्क्रांतीवाद यासारख्या अशास्त्रीय शिकवण व सिद्धांत याचे सहज भक्ष्य होण्यास सोडले.

परंतु, पवित्रशास्त्र, देव जीवास नरकाग्नीत यातना देतो असे शिकवीत नाही. याऐवजी, प्रेषित योहान आम्हास सांगतोः “देव प्रीती आहे.” “आपल्या पापांची क्षमा करण्यास तो विश्‍वसनीय व न्यायी आहे.” मोशाने लिहिलेः “यहोवा देव दयाळू व कनवाळू, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे. (१ योहान ४:८; १:९; निर्गम ३४:६) हे केवळ देवाचे थोडके विलोभनीय गुण आहेत. हे गुण, विशेषतः प्रीती, आम्हास त्याच्यावर प्रीती करण्यास लावते. “त्याने आपणावर प्रथमतः प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो.” (१ योहान ४:१९) हीच ती देवाची प्रीती सदाचाराचे सर्वथोर बळ आहे; ती सार्वकालिक जीवनाकडे निरवू शकते!

देवासाठी असणारा हा गुण केवळ कल्पित स्वरुपाचा नाही. तो इतरांच्या कल्याणार्थ एखाद्याला योग्य ती हालचाल करण्यासाठी चेतवितो. प्रेषित पौलाने ही प्रीती दाखविली जाऊ शकते त्या अनेक मार्गाची यादी दिली. यापैकी काही सांगावयाचे झाल्यासः “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहात नाही, चिडत नाही.” (१ करिंथकर १३:४, ५) ही प्रीती प्रदर्शित करणे म्हणजे आमच्या स्वर्गीय पित्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणे होय. येशूने म्हटलेः “या दोन आज्ञा [देव व शेजाऱ्‍यावर प्रीती करणे] यात संपूर्ण नियमशास्त्र व संदेष्टे यांचा सारांश आहे.” (मत्तय २२:४०, ॲन अमेरिकन ट्रान्स्लेशन) दुसऱ्‍या शब्दात म्हणायचे तर आम्ही ही प्रीती जोपासल्यास आमच्या शेजाऱ्‍याचे काही चोरणार नाही, किंवा त्याचा खून करणार नाही वा त्याच्या बायकोसोबत जारकर्म आचरणार नाही. प्रेषित योहान असे म्हणत याविषयीचे सहमत दाखवितोः “देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.”—१ योहान ५:३.

देवाविषयीची प्रीती—सदाचाराचे बळ

दुसऱ्‍या शतकातील टर्टुलिनने दाखविल्यानुसार देवाच्या प्रीतीचा आरंभीच्या ख्रिस्तीजनांवर कसा परिणाम झाला होता त्याची दखल घ्या. त्याने त्याच्या विरोधकांना आव्हान केले की त्यांनी त्यांच्या गुन्हेगारात एक तरी ख्रिस्ती दाखवून द्यावा. ते असमर्थ ठरले तेव्हा त्याने पुष्टी जोडलीः “आम्हीच केवळ गुन्हा न करणारे लोक आहोत.” द ओल्ड रोमन वर्ल्ड हे पुस्तक या दृष्टीकोनास असे म्हणून पाठिंबा देतेः “आम्हाजवळ त्यांच्या निर्दोष जीवनाची, त्यांच्या निष्पाप नैतिकपणाची साक्ष आहे.” तसेच, ख्रिश्‍चॅनिटी टुडे, चर्च इतिहासकार रोलन्ड बेन्टन यांना अवतरित करतेः “नवीन कराराच्या काळापासून ते १७०-१८० दशकापर्यंत कोणीही ख्रिस्ती लष्करात होता याचा पुरावा नाही.” देवाविषयीच्या प्रीतीने त्यांना नैतिक जीवन कंठून त्याला आज्ञाधारक राहण्याची चालना दिली गेली. तुम्ही कदाचित आश्‍चर्य कराल की ‘या लाभदायक नैतिक बळाचा आज काही पुरावा आहे का?’

होय आहे! हेरल्ड ॲण्ड रिव्ह्‌यु यात वृत्तपत्र स्तंभलेखक माईक मॅकमानुस यांनी लिहिले की त्यांनी विवाहाआधीच्या लैंगिकतेविरुध्दचे प्रवचन कधीही ऐकले नाही. ही गोष्ट त्यांनी एका महिन्यानंतर त्यांना मिळालेल्या अनेक पत्रातील एक, १४वर्षे वयाच्या एका यहोवाच्या साक्षीदार मुलीने लिहिलेल्या पत्राविषयीची प्रतिक्रिया व्यक्‍त करताना सांगितली. त्यांनी लिहिलेः “या व्याधीस अंगिकारण्याचा विचारच बहुतांशी लोकांना [विवाहाआधीच्या लिंगाचाराबद्दल] मनात भीती भरविण्यास पुरेसा आहे. परतु, यहोवाचे साक्षीदार यापासून, यहोवा आम्हास आज्ञापितो की जारकर्मापासून पळ काढा, यामुळे दूर राहतात.” (तिरप्या वळणाचा प्रकार आमचा.) या पत्रावर अभिप्राय मांडताना मॅकमानुस यांनी विचारलेः “तुमच्या मंडळीतील १४ वर्षे वयाचे किती एवढ्या स्पष्टपणे संत पौलास अवतरित करु शकतील (१ करिंथ ६:१८)?”

त्या तरुण मुलीने अवतरित केलेल्या यहोवाच्या आज्ञांना अधीन राहण्याचे हे तत्व इतर भागातील यहोवाचे साक्षीदार लागू करतात. शास्त्रवचनात नमूद केलेल्या देवाच्या काही आज्ञांचा सारांश असा आहेः ‘सर्व गोष्टीत प्रामाणिक असा,’ ‘मुर्तिपूजा टाळा,’ ‘रक्‍त व जारकर्म यापासून दूर राहा.’ ‘सत्यवचनी असा,’ ‘देवाच्या मार्गाने तुमच्या मुलांना तालीम द्या.’ (इब्रीयांस १३:१८; १ योहान ५:२१; प्रे. कृत्ये १५:२९; इफिसकर ४:२५; ६:४) तुमच्या शेजारी असणारे किंवा कामावर असणारे यहोवाचे साक्षीदार या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करीत आहेत याची तुम्ही दखल घेतली आहे का? ते रक्‍तसंक्रमण का नाकारतात, युद्धावर जाण्याचे का नाकारतात, ते तुमच्या घरी का भेटी देतात याचे तुम्हाला कधी आश्‍चर्य वाटले का? थोडक्यात म्हणायचे तर ते वेगळेच लोक का आहेत? त्यांना देवाविषयी वाटणारी प्रीती हे ते उत्तर आहे.

प्रीती कधी खचत नाही

देवास संतुष्ट करण्याच्या इच्छेने यहोवाच्या साक्षीदारांनी ही सूचना अंतःकरणाला भिडवून घेतली आहेः “देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही समजून घेण्यासाठी . . . आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) त्यांच्यासाठी “देवाची इच्छा” काय आहे हे शिकून घेतल्यावर त्यांना ते करण्याची इच्छा उद्‌भवते. त्यांची देवावरची प्रीती ही त्या इच्छेमागील शक्‍ती आहे. आमच्या दिवसासाठी ही गोष्ट काल्पनिक व अव्यवहार्य आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग पुढील सत्य घटनांवर क्षणभर मनन करा.

मागे १९६३ मध्ये ब्राझिलमधील साओ पौलोच्या जोस ने जिचे लग्न झाले होते त्या युजेनियासोबत राहण्यास सुरुवात केली. दोन वर्षांनंतर त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्रशास्त्राचा अभ्यास आरंभिला. या अभ्यासापासून दांपत्याला हे कळाले की देव “विवाह सर्वांमध्ये आदरणीय असावा” अशी अपेक्षा धरतो. (इब्रीकर १३:४) आपण विवाहीत झालेच पाहिजे याची त्यांना जाणीव झाली. परंतु ब्राझिलमध्ये घटस्फोटाचा कायदा नव्हता की ज्यामुळे युजेनिया जोसबरोबर विवाह करण्यास मोकळी होऊ शकेल. तथापि, १९७७ मध्ये घटस्फोट कायदा अमलात आणला तेव्हा तिने घटस्फोटासाठी अर्ज केला व अशाप्रकारे १९८० मध्ये विवाहीत होऊन त्यांना देवाचा नियम पूर्ण करणे शक्य झाले. त्यांच्या देवाविषयीच्या प्रीतीचे त्यांना बक्षीस मिळाले.

इनायरने न्यूयॉर्कमध्ये सर्व प्रकारच्या मादक औषधांचा उपयोग केला. तो त्याच्या ॲन या मैत्रिणीसोबत राहात असे. पैशाच्या चणचणीमुळे त्याने तिचे स्वतःचे फोटो सु-विख्यात पुरुषांच्या मासिकास पाठविले. तिला फोटो विभागाकडून नग्नावस्थेतील फोटो देण्यासाठी मोठी रक्कम मिळण्याची ऑफर आली. मध्यंतरीच्या काळात इनायरने यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करण्यास सुरुवात केली व नंतर ॲनदेखील या अभ्यासात बसू लागली. इनायरने मादक औषधे घेणे सोडले. तीनच आठवड्यानंतर त्यांनी स्वतः विवाहीत होण्याचे ठरविले. त्यानंतर ख्रिश्‍चनांनी विनयशील पेहराव परिधान केला पाहिजे हे पवित्र शास्त्रातून शिकल्यानंतर ॲनने निश्‍चय केला की त्या फोटो विभागाने कितीही पैसे देऊ केले तरी, समजून उमजून ती तेथे कधीही जाणार नाही. (२ तीमथ्य २:९) यांना अशा परिवर्तनास कशाने चालना दिली असावी असे तुम्हास वाटते? ॲन म्हणते की, यहोवाचा साक्षीदार असणे याचा अर्थ आणखी एका धार्मिक गटात सामील होणे असा नसून देवास समर्पित जीवन कंठीत करणे आहे हे तिला समजले. तिला कळाले की तिने त्वरीत बदल केले पाहिजेत. खरेच, देवाविषयीची प्रीती सदाचाराचे खरे बळ आहे.

काहींना वाटेल की, ‘ही तर केवळ बोटावर मोजण्याजोगी प्रकरणे आहेत.’ पण ती तितकी नाहीत. अशाच प्रकारचे बदल यहोवाचे साक्षीदार क्रियाशील आहेत तेथे पुष्कळ वेळा घडले आहेत. यात आणखी का डोकावू नये? खऱ्‍या धर्मात व्यक्‍त केलेली देवाची प्रीती अजूनही सदाचारासाठी बळ आहे हे तुम्हाविषयी शाबीत करा.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

आरंभीच्या ख्रिश्‍चनांविषयी “द ओल्ड रोमन वर्ल्ड” हे पुस्तक म्हणतेः “आम्हाजवळ त्यांच्या निर्दोष जीवनाची, त्यांच्या निष्पाप नैतिकपणाची साक्ष आहे.” त्यांच्या या “निष्पाप नैतिकपणा”मागे कोणते बळ होते?

[७ पानांवरील चित्रं]

देवाविषयीची प्रीती तुम्हाला चुकीच्या मोहास प्रतिकार करण्यास मदत करु शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा