वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १२/१ पृ. २८-३०
  • “खऱ्‍या देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “खऱ्‍या देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “व्यर्थ हो व्यर्थ!”
  • प्रत्येक गोष्टीसाठी वेळ
  • खरी उपासना समाधान देते
  • सूज्ञानाची वचने
  • जीवनातील संभाव्यता
  • युवक व जीवनाचा उद्देश
  • उपदेशक पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • देवाप्रती तुम्ही तुमचे पूर्ण कर्तव्यकर्म पार पाडत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • “मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुमचे जीवन—त्याचा काय उद्देश आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १२/१ पृ. २८-३०

पवित्र शास्त्रीय ठळक मुद्दे उपदेशक १:१—१२:१४

“खऱ्‍या देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ”

आजच्या युगात देवाचे भय धरणे व त्याच्या आज्ञा पाळणे हे सर्वसाधारणपणे अव्यवहारिक समजले जाते. तथापि, साधारण ३,००० वर्षाआधी शलमोन राजाकरवी लिखित करण्यात आलेले (१:१) उपदेशक (इब्री, कोहे’लथ, संयोजक) हे पुस्तक देवाच्या उद्देशास नजरेआड करून मानवी प्रयत्नांची साध्यता करीत राहणे किती व्यर्थतेचे आहे त्याचे वर्णन करते.

या पुस्तकाचा लेखक विविध विषयांची हाताळणी ज्या सुबक पद्धतीने करून आहे त्यामुळेच ते पुस्तक इतके मोहक ठरते. ते विविध विषय आहेतः मानवी ज्ञान व आधिपत्य, भौतिक धनसंपदा व सुखविलास, शिष्टाचाराचे धर्म, इत्यादि. या सर्व गोष्टी टिकाऊ नसल्यामुळे व्यर्थ आहेत. उलटपक्षी त्यावर विचार करीत राहणे समंजस मनास एकच निर्वाळा देते: “खऱ्‍या देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.

“व्यर्थ हो व्यर्थ!”

अध्याय १ व २ कृपया वाचा. निसर्गाचे अक्षय चालणारे चक्र लक्षात घेता सर्व मानवी पाठलाग क्षणभंगुर व तात्कालिक वाटतात. (१:४–७) संयोजकाने साध्य केलेली भव्य साध्यतासुद्धा कोणा अल्पश्रेष्ठ व्यक्‍तिला वारसा म्हणून हाती पडू शकते. (२:१८, १९) “व्यर्थ” याकरता असणारा इब्री शब्दाचा अर्थ “वाफ” किंवा “श्‍वास” असा होतो.

◆ १:९—“भूतलावर नवे म्हणून काहीच नाही”, याचा काय अर्थ आहे?

ज्यावर सूर्य चकाकतो त्या दैनंदिनीच्या नैसर्गिक चक्रामध्ये नवे असे काहीच नाही. “नवी” वाटणारी संशोधने सुद्धा, यहोवाने आपल्या निर्मिती कार्यात जी तत्वे लावून दिली आहेत त्याचा अवलंब असतो. तरीपण “सूर्याखालती” किंवा “भूतलावर” यहोवाने मानवजातीस परिणामित करणाऱ्‍या नव्या आध्यात्मिक घडामोडी घडवून आणल्या आहेत.—पहा दी वॉचटावर, मार्च १, १९८७, पृष्ठ २७–९.

◆ २:२—चांगला वेळ घालविणे चुकीचे आहे का?

नाही, तसे नाही. हास्य किंवा चांगला वेळ एखाद्याला समस्यांपासून थोडा वेळ विरंगुळा देत असतो. पण त्यामुळे समस्या नाहीशा होत नाहीत. याच कारणास्तव मनोरंजनाद्वारे खरा सौख्यानंद शोधणे हे “व्यर्थ”तेचे आहे; त्याला कसलाही अर्थ नाही. याचप्रमाणे “विनोद” करण्यामुळेही समस्या सुटल्या जात नाहीत. या कारणास्तव सुखविलास व आनंदात वेळ घालविणे या गोष्टी यहोवा देव एखाद्याच्या कार्यावर जो आशीर्वाद पाठवितो त्यामुळे मिळणाऱ्‍या सौख्यानंदाच्या तुलनेत अगदीच भिन्‍न ठरतात.—२:२४.

आमच्यासाठी धडा: आम्ही शलमोनाचा सल्ला ऐकावा व भौतिक लाभ आणि नवनव्या थरारक गोष्टींना आपल्या जीवनाचे मुख्य लक्ष्य बनवू नये. उलटपक्षी, आम्ही ‘यहोवाच्या दृष्टीने चांगले’ असण्यास हवे व त्याच्या आज्ञा पाळाव्यात. याद्वारे तो आम्हास “बुद्धी, ज्ञान व सुख” देऊन आम्हास आशीर्वादित करील.—२:२६.

प्रत्येक गोष्टीसाठी वेळ

अध्याय ३ व ४ वाचा. येथे शलमोन जीवनाविषयी नशीबवादी दृष्टीकोण जोपासण्याविषयी सांगत नव्हता. (३:१–९) उलटपक्षी तो हे दाखवू इच्छित होता की देवाने ज्याची हालचाल आधीच लावून दिली आहे त्याचा क्रम मानवाला बदलता येणार नाही. (३:१४) याबाबतीत मानव पशुपेक्षा श्रेष्ठ नाहीत (३:१९–२१). या कारणास्तव स्पर्धक वृत्तीपेक्षा (४:४) सहकाराची वृत्ति (४:९–१२) मोठी प्रतिफळदायक ठरते.

◆ ३:११—देवाने प्रत्येक गोष्ट “आपआपल्या समयी [कशी] सुंदर बनविली” आहे?

“सुंदर” या शब्दाचा अर्थ, “चांगला, योग्य, उचित” असा आहे. देवाच्या उद्देशात बसणारे व योग्य जागी असणारे प्रत्येक काम आपल्या समयी प्रकट होईल. देवाने सर्व गोष्टी मानवजातीसाठी “सुंदर” बनविल्या आहेत. उदाहरणार्थ, देवाने मानवाला एदेनात परिपूर्ण सुरुवात करून दिली. मानव पापात पडला तेव्हा त्याने मुक्‍ति देणाऱ्‍या संतानाचे भाकित केले. योग्य वेळी देवाने हे संतान पाठविले, आणि सर्वात “सुंदर” गोष्ट म्हणजे याच संतानाला देवाने त्याच्या राज्याचा राजा बनविले आहे.

◆ ४:६—शलमोन आरामशीर जीवनाचे समर्थन करीत होता का?

नाही. पण शलमोनाने हे अवलोकिले की नफ्यासाठी घेतलेले कष्ट व नैपुण्यता ही बहुधा स्पर्धा व इर्ष्या यांना निर्मिते (४:४) यामुळे समस्या उद्‌भवून अकाली मृत्युही ओढवतो. (१ तिमथ्यी ६:९, १०) तर मग समतोल दृष्टीकोण कोणता आहे? दुप्पट प्राप्तीसोबत निरर्थकता व झगडा मिळवून घेण्याऐवजी कमी प्राप्ती झाली तरी त्यात शांतीसह समाधानी असा.

आमच्यासाठी धडा: महत्वाकांक्षी अशी ध्येये जोपासण्यापेक्षा देवाच्या राज्याविषयीची खटपट करण्याची सध्याची वेळ आहे (३:१). एकाकी राहण्यापेक्षा आमच्या सह ख्रिश्‍चनांसोबत मिळून सहकार्याने आम्ही कार्य करण्यास हवे (४:९–१२). यामुळे, आम्हास त्रास व विरोध असला तरी त्यात टिकून राहण्यासाठी आवश्‍यक असणारी मदत व प्रोत्साहन आम्हाला मिळू शकते.

खरी उपासना समाधान देते

अध्याय ५ व ६ वाचा. यहोवा हा सर्वसमर्थ देव असल्यामुळे आम्ही त्याच्यासोबतचे आमचे नाते गंभीरतेने घेतले पाहिजे. आम्ही मूर्खतेने वागून देवाने आमचे “बलिहवन” स्विकारावे अशी अपेक्षा आम्हाला करता येणार नाही (५:१, २). देवाचे भय धरणाऱ्‍या माणसाला त्याच्याकडिल भौतिक धनसंपदेचा वापर करण्यामध्ये समाधान मिळते पण जो ती अप्रामाणिकपणाने साठवून ठेवतो त्याला ते मिळत नाही.—पडताळा ५:१८–२०, ६:२, ३ बरोबर.

◆ ५:२—हा सल्ला कसा लागू होतो?

आम्ही देवासमोर आपले अंत:करण ओतण्यास हवे. पण त्याचे वैभव व थोरवी यापुढे आम्ही अधीरतेने अविचारी शब्द बोलत नाही याची खबरदारी बाळगण्यास हवी. (स्तोत्रसंहिता ६२:८) कंटाळवाणी प्रार्थना करण्याऐवजी आम्ही साधे व अंतःकरणपूर्वक बोल बोलले पाहिजे. (मत्तय ६:७) मोशाने मिर्यामकरता केवळ पाच छोट्या शब्दात देवाकडे याचना केली व त्याला कृपायुक्‍त उत्तर मिळाले.—गणना १२:१३

◆ ६:९—“मन इकडेतिकडे धावू देणे” हे काय आहे?

“मन” याचा येथे, “मनातल्या इच्छा” असा अर्थ आहे. यामुळेच तो शब्दप्रयोग तृप्त होऊ न शकणाऱ्‍या इच्छेची तृप्ति करण्यासाठी अविरत शोध घेत राहणे याला अनुलक्षून आहे. याचा फरक “दृष्टीने पाहणे” म्हणजे प्रत्यक्षतेला बघणे याजमुळे स्पष्ट होतो. तद्वत, खरा बदल हा केवळ देवाचे राज्यच घडवून आणू शकते हे आपल्याला माहीत असल्यामुळे आम्ही समाधानी असले पाहिजे; अव्यवहार्य किंवा प्राप्त होऊ न शकणाऱ्‍या इच्छेला आपली शांती हिरावू देता कामा नये.

आमच्या साठी धडा: आमच्या उपासनेच्या जागी आम्ही आपला पवित्रा योग्य राखला पाहिजे व लक्ष लावले पाहिजे (५:१). यहोवासमोर असणारी आमची सर्व बंधने आम्ही पूर्णपणे पाळली पाहिजेत, आम्ही विवाहीत असलो तर आमचे वैवाहिक बंधन संपूर्णपणे राखले पाहिजे.—५:४.

सूज्ञानाची वचने

अध्याय ७ व ८ वाचा. संयोजक येथे मृत्युविषयीचा सुन्‍न करणारा परिणाम (७:१–४) आणि सूज्ञानाचे महत्व (७:११, १२, १६–१९) याविषयीचा विचार करतो. तो वाईट चालीच्या स्त्रीविषयीही ताकीद देतो (७:२६). अधिपतींसोबत सूज्ञतेने वागावे (८:२–४) आणि अन्यायाबद्दल जळफळू नये याविषयीचा सल्ला दिला गेला आहे.—८:११–१४.

◆ ७:२८—हे शब्द स्त्री वर्गास नीच बनवितात का?

असे दिसते की तेव्हाचा नैतिक दर्जा बराच खालावला होता. या कारणामुळे शलमोनाने त्या काळच्या धार्मिक स्त्री पुरुषांबद्दलच्या उणीवेविषयीची बोलणी केली होती. हजार पुरुषात एक नीतीमान पुरुष आढळणे दुर्लभ झाले होते तर एक नीतीमान स्त्री आढळणे त्याहूनही अधिक कठीण झाले होते. तथापि, पवित्र शास्त्र “अत्यंत चांगली स्त्रीं” व “सद्‌र्गिणी स्त्री” विषयीचे भाष्य करते. (रूथ ३:११; नीतीसूत्रे ३१:१०) या वचनाचा भविष्यवादित अर्थही होऊ शकतो कारण कोणाही स्त्रीने यहोवाला पूर्ण तऱ्‍हेची आज्ञाधारकता दाखवली नाही, परंतु एक असा मनुष्य होता—येशू ख्रिस्त—त्याने तशी आज्ञाधारकता दाखवली.

◆ ८:८—येथे संयोजक कशाविषयी बोलत आहे?

येथे तो मृत्युविषयीची बोलणी करीत आहे. आपल्या मृत्युचा दिवस पुढे ढकलण्यासाठी कोणालाही आपल्या पेशीतील जीवनी शक्‍तीला रोखून धरता येऊ शकत नाही. आमचा सर्वसाधारण शत्रु मृत्यु याजबरोबरच्या युद्धात आम्हापैकी कोणालाही तोडगा सापडला नाही किंवा पुरविता आला नाही. (स्तोत्रसंहिता ४९:७–९) दुर्जन आपले दुष्कर्म आचरीत असले तरी त्यांना मृत्यु चुकत नाही.

आमच्यासाठी धडा: भौतिक धनसंपदा ही आज पुष्कळांचे जीवनध्येय बनली असली तर केवळ इश्‍वरी ज्ञानच सार्वकालिक जीवनाप्रत निरविते. (७:१२; लूक १२:१५) “पूर्वीचे दिवस बरे” ही नुसती आकांक्षा सर्व काही व्यवस्थित करू शकणार नाही (७:१०). या ऐवजी आपण देवाचे भय मानीत राहिलो तर आपले “कल्याणच होईल.”—८:५, १२.

जीवनातील संभाव्यता

अध्याय ९ व १० वाचा. जीवन बहुमोल आहे व आपण त्याचा आनंद घ्यावा अशी देवाची इच्छा आहे (९:४, ७) जीवनातील निष्पत्तीवर आपल्याला ताबा ठेवता येत नसल्यामुळे (९:११, १२) आपण इश्‍वरी ज्ञानाकडे लक्ष देणे हे बरे, जरी बहुतेक लोकांना त्याची रसिकता वाटत नसली तरी सुद्धा (९:१७). जीवनाच्या अनिश्‍चितपणामुळे आम्ही आपले अंतःकरण रक्षिले पाहिजे (१०:२), जे काही करतो त्यात दक्षता घेतली पाहिजे आणि व्यावहारिक ज्ञानानुरूप हालचाल केली पाहिजे.—१०:८–१०.

◆ ९:१—नीतीमानांची कृत्ये देवाच्या स्वाधीन कशी आहेत?

सूज्ञ व धार्मिक यांच्यावर जरी आपत्ती आली तरी ती देवाच्या अनुज्ञेमुळेच येते पण देव त्यांचा केव्हाही त्याग करणार नाही. देवाच्या “स्वाधीन”ते मुळे वा हातातील सामर्थ्याद्वारे धार्मिकाला एकतर त्या छळामधून सुटका मिळेल वा त्याला त्यात टिकून राहण्याचे सामर्थ्य दिले जाईल. (१ करिंथकर १०:१३) ही वस्तुस्थिती ध्यानात ठेवल्यामुळे यहोवाच्या सेवकांना कठीण परिस्थिती उद्‌भवली तेव्हा मोठे सांत्वन मिळते.

◆ १०:२—अंतःकरण उजवीकडे कसे असते?

“उजवी” बाजू ही नेहमी कृपापसंतीचे स्थान दर्शविते. (मत्तय २५:३३) याकारणास्तव सूज्ञ मनुष्याचे अंतःकरण “उजवीकडे” असते ही गोष्ट त्याला ते चांगला, कृपायुक्‍त मार्ग अनुसरण्याची चालना दर्शविते याचे सूचक आहे. पण मूर्ख मनुष्याठायी चांगला हेतू नसतो व तो मूर्खपणे वा अयोग्य रितीने कार्य करतो. त्याचे अंतःकरण “डावीकडे” असते ही गोष्ट त्याला चुकीचा मार्ग धरण्याची चालना मिळत असते हे सूचित करते.

आमच्यासाठी धडा: आम्हा कोणावरही मृत्यु हा आकस्मिकरित्या ओढवू शकत असल्यामुळे (९:१२), आणि मृत्यु सर्व गोष्टींना स्तब्ध करीत बसतो (९:१०) त्यामुळे आम्ही आमचे जीवन यहोवाच्या सेवेत वापरले पाहिजे. याशिवाय आम्ही आमच्या सेवेत कुशल असण्यास हवे कारण अकुशलता ही खड्डा खणणे वा लाकूड तोडणे यासारख्या साध्या गोष्टीत सुद्धा आमची व इतरांची हानि करू शकते.—१०:८, ९.

युवक व जीवनाचा उद्देश

अध्याय ११ व १२ वाचा. आम्ही सर्वांनी उदारशीलता आचरली पाहिजे व निर्णायक हालचाल केली पाहिजे (११:१–६). निर्माणकर्त्याच्या सेवेत आपला वेळ व शक्‍ती चांगल्या रितीने वापरणाऱ्‍या युवकांना जीवनात नंतर पस्तावण्याची पाळी येणार नाही (११:९, १०). उलटपक्षी, आपले आरोग्य व जोम कमी होण्याआधी आपण देवाला संतुष्ट केले आहे याचे समाधान त्यांना सातत्याने जाणवत राहील.—१२:१–७; पहा दी वॉचटावर डिसेंबर १५, १९७७, पृष्ठ ७४६.

◆ ११:१—“अन्‍न सोडण्या”चा काय अर्थ होतो?

अन्‍न हे जीवनाची काठी आहे. तिला “पाण्यावर” सोडणे याचा अर्थ महत्वाचे ते सोडून देणे असा आहे. तरीपण ते “तुझ्या हाती [परत]येईल.” कारण उदारशील माणसाला अनपेक्षितरित्या लाभ घडत राहतो.—लूक ६:३८.

◆ १२:१२—पुस्तकांविषयी एवढा नकारात्मक दृष्टीकोण का?

यहोवाच्या वचनासोबत “अंत नसणाऱ्‍या” जगातील ग्रंथांची तुलना केल्यास यात नुसते मानवी ज्ञान दिसते. यापैकीची बरीच विचारधारा सैतानाची मनोवृत्ती दाखविते. (२ करिंथकर ४:४) यामुळेच अशा या साहित्याचे केलेले “पठण” खूपच अल्प मोल देते.

आमच्यासाठी धडा: जीवनाबद्दल देवाचे वचन काय म्हणते त्याबद्दल आम्ही शलमोनाप्रमाणेच चिंतन करावे. यामुळे देवाचे भय धरण्याचा व त्याची आज्ञा पाळण्याचा आमचा निर्धार बळकट होईल. यहोवा देव आमची अगदी जिवलगपणे काळजी राखून आहे ही जाणीव राखल्यामुळे (१२:१३, १४) आम्ही त्याच्या अगदी समीप येतो.

या कारणास्तव आपण ‘खऱ्‍या देवाचे भय धरू व त्याची आज्ञा पाळू.’ हेच आमचे कर्तव्य आहे व हे आम्हाला दीर्घकालीन सौख्यानंद आणील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा