वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १२/१ पृ. २२-२७
  • कुशल सल्लागार—आपल्या बंधुंसाठी आशीर्वाद

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कुशल सल्लागार—आपल्या बंधुंसाठी आशीर्वाद
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सल्ला—कोणाकरवी?
  • ख्रिस्ती सल्ल्यामागे असणारी ध्येये
  • पौल—कुशल सल्लागार
  • सौम्यता व लीनता
  • परूश्‍यांचा सल्ला
  • तुम्ही दिलेला सल्ला इतरांना स्वीकारायला सोपा जातो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • “बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • “मिठाने रूचकर” असणारा सल्ला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • तुम्हाला नेहमी मुद्दा कळतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १२/१ पृ. २२-२७

कुशल सल्लागार—आपल्या बंधुंसाठी आशीर्वाद

“मी तुझ्यावर पूर्वीप्रमाणे न्यायाधीश व आरंभीच्या प्रमाणे सल्लागार पुनः नेमीन.”—यशया १:२६.

१, २. (अ) नीतीसूत्रे १२:१५ व १९:२० सल्ल्याचे महत्व कसे दाखवितात? (ब) सल्ला स्विकारावयाचा आहे तर कशाची प्रथम गरज आहे व कोणता अनुभव ते चित्रित करतो?

टेरी ही ख्रिस्ती पालकांची मुलगी होती. तिच्या शाळेत तिची एक मैत्रीण होती व तीसुद्धा “सत्यात” होती. तरीपण टेरीने हे पाहिले की प्राथमिक शाळेच्या समाप्तीला तिच्या या मैत्रिणीचा सत्याविषयीचा उत्साह कमी झाला आहे. माध्यमिक शाळेच्या शिक्षणकाळात ही मैत्रीण ख्रिस्ती सभांना अनियमित झाली व वॉचटावर संस्था आणि मंडळीविषयी दोष दाखवू लागली. तरीपण टेरीने तिच्यासाठी देवाकडे खूप कळकळीने प्रार्थना केली आणि तिला ख्रिस्ती या नात्याने खंबीर राहण्याचा सल्ला दिला. ओघाओघाने टेरीच्या प्रयत्नांना यश आले. दहाव्या इयत्तेत येईपर्यंत तिची मैत्रीण सभांना पुनः नियमित येऊ लागली आणि तिचा बाप्तिस्मा झाला. टेरीला केवढा आशीर्वाद मिळाला व तिच्या विश्‍वासू मैत्रिणीला सुद्धा किती मोठे प्रतिफळ मिळाले!

२ हा अनुभव लक्षात घेता ख्रिश्‍चनांनी एकमेकांना प्रेमळपणे सल्ला वेळोवेळी देण्याच्या गरजेसंबंधाने काही शंका धरता येईल का? पवित्र शास्त्र आपल्याला उत्तेजन देते: “सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.” (नीतीसूत्रे १९:२०; १२:१५) टेरीच्या मैत्रिणीने तो सल्ला अनुसरला. पण तेच टेरीने ह्‍या सर्व वर्षात तिला मदत देण्याविषयी आपले प्रेम, चिकाटी व धैर्य राखले नसते तर काय? होय, आम्ही “सुबोध ऐका”वयाचा आहे तर कोणी सल्लागार असला पाहिजे. पण तो कोणी द्यावा?

सल्ला—कोणाकरवी?

३. ख्रिस्ती मंडळीत समयोचित सल्ला देण्यासाठी यहोवाने कोणाची तरतूद केली आहे?

३ यहोवा देवाने आमच्या काळी त्याच्या लोकांना सल्लागार पुरविण्याचे अभिचन दिले आहे. त्याने म्हटले: “मी तुझ्यावर . . . आरंभीच्या प्रमाणे सल्लागार पुनः नेमीन.” (यशया १:२६) या अभिवचनाची पूर्णता प्रामुख्यत्वे ख्रिस्ती मंडळीतील नियुक्‍त वडिलांमध्ये झाली आहे. सल्ला देणे हा शिक्षणाचा प्रकार आहे आणि वडील हे बहुधा “निपुण शिक्षक” असतात. (१ तिमथ्यी ३:२) कदाचित प्रेषित पौलाच्या मनात वडीलच असावेत जेव्हा त्याने असे म्हटले: “कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा.” (गलतीकर ६:१) पण केवळ वडीलच सल्ला देऊ शकतात का?

४, ५. (अ) वडीलच केवळ सल्ला देऊ शकत नाहीत हे दाखविणारी कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे आहेत? (ब) वडीलांशिवाय इतर ख्रिश्‍चनांना सल्ला देता येण्याजोगी आज कोणती आधुनिक परिस्थिती आहे?

४ नाही. टेरी काही वडील नव्हती, पण तिच्या सल्ल्यामुळे शेवटी चांगले परिणाम घडवले. अरामाचा सेनापती नामान याची आठवण करा. त्याने तरूण इस्राएली मुलीकडून प्राप्त झालेल्या सुंदर माहितीनुरूप व त्याच प्रमाणे आपल्या सेवकांच्या सल्ल्यानुरुप हालचाल केली. नाबालाची बायको अबीगईल हिच्या समयोचित सल्ल्यामुळेच दावीदाला रक्‍तपात करण्यापासून आवरले गेले. याचप्रमाणे अलिहू या तरूणाने इयोब व त्याच्या तीन “सांत्वनकर्त्यां”ना सूज्ञ सल्ला दिला.—१ शमुवेल २५:२३–३५; २ राजे ५:१–४, १३, १४; इयोब ३२:१–६.

५ याचप्रमाणे आज सल्ला देणे ही गोष्ट केवळ वडिलांच्या विशेष हक्काची नाही. पालक मुलांना नियमितपणे सल्ला देतात. टेरीसारखी तरूण मुले आपल्या वयाच्या मुलांना सल्ला देण्यात यशप्राप्ती मिळवितात. ख्रिस्ती मंडळीतील प्रौढ भगिनींनी खासपणे तरूण स्त्रियांना “सुशिक्षण” द्यावे असा पवित्र शास्त्र त्यांना सल्ला देते. (तीत २:३–५) वस्तुतः सर्वसाधारणपणे आम्हा सर्वांनाच या मार्गी एकमेकांची मदत करण्याचे बंधन आहे. प्रेषित पौलाने म्हटले: “तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्‍नति करा; असे तुम्ही करतच आहा.”—१ थेस्सलनीकाकर ५:११.

ख्रिस्ती सल्ल्यामागे असणारी ध्येये

६. ख्रिस्ती सल्लयाची काही ध्येये कोणती आहेत?

६ ख्रिस्ती सल्ल्यामागे कोणती ध्येये असतात? काहींची प्रगति साधावी, योग्य मार्गाने प्रगमन व्हावे, समस्या सोडवाव्या, अडचणींवर मात करावी व वाईट मार्ग सुधारावा ही ती ध्येये होत. “सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर” असे पौलाने तिमथ्याला आर्जविले त्या वेळी पौल त्यामागील सल्ल्याच्या प्रकारास अनुलक्षून लिहित असावा. (२ तिमथ्यी ४:१, २) सल्ला समजण्यास सोपा व कोणतीही इजा न होता देणे ही खरीच एक कला आहे.

७, ८. (अ) ख्रिस्ती मंडळीत सल्ला देण्याची गरज केव्हा पडते? (ब) कोणत्या प्रसंगी ख्रिश्‍चनाला सल्ल्याची अपेक्षा नसते पण जरूरी असते?

७ सल्ला केव्हा दिला जावा? पालक आपल्या मुलांना वेळोवेळी नियमितपणे सल्ला देतात व मुलेही तो बहुधा ऐकतात. (नीतीसूत्रे ६:२०; इफिसकर ६:४) मंडळीत इश्‍वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत भाषण दिल्यावर विद्यार्थ्याला सल्ला मिळतो. तसेच नवीन राज्य प्रचारक ख्रिस्ती उपाध्याय या नात्याने प्रौढतेप्रत प्रगति करतो तेव्हा त्याला वेळोवेळी मदत व सूचना मिळते. (१ तिमथ्यी ४:१५) कधी कधी काहीजण वडील किंवा मंडळीतील इतरांकडे मदत व सूचना मिळविण्यासाठी येतात.

८ तरीपण केव्हा केव्हा सल्ला हा ज्यांना त्याविषयीची जाणीव नसते वा जे तो इच्छित नाही अशांना द्यावा लागतो. कदाचित, टेरीच्या मैत्रिणीप्रमाणे काहीजण यहोवाच्या सेवेतील आपला आवेश मंदावत असतील किंवा ‘वाहवत जात’ असतील. (इब्रीयांस २:१) कदाचित कोणाला मंडळीतील एखाद्याच्या बाबतीत व्यक्‍तिगत असे गंभीर मतभेद निर्माण झाले असतील. (फिलिप्पैकर ४:२) किंवा कदाचित कोणाला केशभूषा, वेशभूषा वा मित्र किंवा संगीत याबाबतच्या निवडीसंबंधाने मदतीची गरज असेल.—१ करिंथकर १५:३३, १ तिमथ्यी २:९.

९, १०. (अ) ख्रिस्ती सल्ला देण्यासाठी धैर्य का लागते? (ब) सल्ला जरूरीचा आहे तेव्हा तो ख्रिश्‍चनांनी का दिलाच पाहिजे?

९ यहुदाचा राजा आसा याला हनानी संदेष्ट्याने सल्ला दिला तेव्हा तो इतका चिडला की त्याने संदेष्ट्याला “अटकेत ठेवले”! (२ इतिहास १६:७–१०) त्या काळी राजाला सल्ला देण्यासाठी मोठे धैर्यवान असावे लागत होते. आज सुद्धा, दिलेला सल्ला काही अंशी चीड निर्माण करतो त्यामुळे सल्लागाराने धैर्यवान असण्याची गरज आहे. एका अनुभवी ख्रिश्‍चनाने सहवास राखणाऱ्‍या तरूणाला आवश्‍यक असणारा सल्ला देण्यापासून स्वतःला आवरिले. कारण? त्याने म्हटले: “आता आमची चांगली मैत्री आहे व ती मला टिकवून ठेवायची आहे!” पण खरे पाहता, जरूर असणारी मदत देण्यापासून मागे ठेवणे हे चांगल्या मित्रत्वाचे चिन्ह नव्हे.—नीतीसूत्रे २७:६; पडताळा याकोब ४:१७.

१० वस्तुतः अनुभवाने हे सिद्ध झाले आहे की सल्लागार कुशल असला तर वाईट वाटण्याचे प्रमाणे कमी करता येईल आणि सल्ला देण्यामागील ध्येयाची पूर्ति करता येईल. पण कुशल सल्लागार होण्यासाठी काय लागते? याच्या उत्तरासाठी आपण दोन उदाहरणे, एक चांगले व एक वाईट, पडताळून बघू या.

पौल—कुशल सल्लागार

११. पौलाने करिंथकरांना अगदी स्पष्ट सल्ला दिला तो बहुतांनी का स्विकारला?

११ प्रेषित पौलाला सल्ला देण्याविषयीचे पुष्कळ प्रसंग लाभले व काही वेळा तर त्याला कडक गोष्टी सांगाव्या लागल्या. (१ करिंथकर १:१०–१३; ३:१–४; गलतीर १:६; ३:१) तरीसुद्धा त्याचा सल्ला परिणामी चांगला ठरला कारण ज्यांना त्याने तो दिला त्यांना, पौलाची आपणावर प्रीती आहे हे चांगले ठाऊक होते. त्याने करिंथकरांना म्हटलेच होते: “मी फार संकटात, मनस्तापात असताना अश्रु गाळीत तुम्हास लिहिले होते; तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे तर तुम्हावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हाला कळून यावी म्हणून लिहिले.” (२ करिंथकर २:४) बहुतेक करिंथकरांनी पौलाचा सल्ला मानला कारण त्यात कोणताहि स्वार्थी हेतू नव्हता हे त्यांना माहीत होते. वस्तुतः “प्रीती . . . स्वार्थ पाहत नाही.” याशिवाय तो चिडखोरपणामुळे बोलत नव्हता हेही त्यांना माहीत होते, कारण “प्रीती . . . चिडत नाही; अपकार स्मरत नाही.”—१ करिंथकर १३:४, ५.

१२. ख्रिस्ती सल्लागाराला कोणत्या गुणामुळे चांगले परिणाम प्राप्त करणे अधिक सोपे होईल? विवेचीत करा.

१२ याचप्रमाणे आजही, आपण हे जाणले की आपल्याला सल्ला देणारा आपणावर प्रीती करतो, चिडखोरपणामुळे सल्ला देत नाही आणि सल्ला देण्यात त्याचा कसलाही स्वार्थी हेतु नाही त्यावेळी कडक सल्ला सुद्धा स्विकारणे अधिक सोपे वाटेल. उदाहरणार्थ, मंडळीतील युवकांसोबत वडिलांचे बोलणे केवळ टिकेपुरतेच मर्यादित असेल तर या तरूणांना आपले दोष काढण्यासाठीच ते बोलतात हे सहजगत्या वाटेल. पण तेच वडिलांचे या युवकांबरोबर चांगले संबंध असतील तर काय? ते त्यांच्यासोबत क्षेत्र कार्य करीत असतील, राज्य सभागृहात बोलण्यास वेळ देत असतील, तसेच त्यांच्या समस्या, आशा, शंकानिरसण करीत असतील व वेळ प्रसंगी (युवकांच्या पालकांच्या अनुमतिने) युवकांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रित करीत असतील तर काय? तर त्यांना सल्ला देण्याची वेळ आली तरी युवक त्याचा सहसा स्विकार करतील कारण तो आपल्या मित्राकडील सल्ला आहे हे त्यांस माहीत असते.

सौम्यता व लीनता

१३. (अ) ख्रिस्ती सल्ला सर्वतोपरि कशावर आधारित असण्यास हवा? (ब) या कारणास्तव ख्रिस्ती मंडळीत सल्ला देणाऱ्‍यांनी काय टाळलेच पाहिजे?

१३ पौलाचा सल्ला यशस्वी का ठरू शकला त्याचे आणखी एक कारण आहे. तो स्वतःच्या मतावर नव्हे तर इश्‍वरी ज्ञानावर विसंबून होता. त्याने तिमथ्यी या सल्लागारास हे स्मरण दिले होतेच: “प्रत्येक इश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्वोध, दोष दाखविणे, सुधारणूक व नीतीशिक्षण याकरता उपयोगी आहे.” (२ तिमथ्यी ३:१६; पडताळा १ करिंथकर २:१, २.) याचप्रमाणे आजचे ख्रिस्ती सल्लागार आपले म्हणणे शास्त्रवचनाच्या आधारावर मांडतात. हे खरे की कुटुंबात मुलांना सल्ला देते वेळी पालक दरवेळेला पवित्रशास्त्र अवतरीत नाहीत. तरीपण ज्या ज्या वेळी ख्रिस्ती पालक आज्ञाधारकपणा, स्वच्छता, इतरांविषयीची काळजी, वक्‍तशीरपणा, किंवा इतर गोष्टी विषयीचे प्रोत्साहन देतात त्या वेळी त्यांच्या म्हणण्याला नेहमी शास्त्रवचनीय आधार असला पाहिजे. (इफिसकर ६:१; २ करिंथकर ७:१; मत्तय ७:१२; उपदेशक ३:१–८) मंडळीमध्ये आम्ही आपले व्यक्‍तिगत दृष्टीकोण वा आवडीनिवडी कोणावर लादण्याचा प्रयत्न न करण्याची खबरदारी घ्यावी. शिवाय वडिलांनी त्यांना जे मनोमन वाटते त्या कल्पनेला शास्त्रवचने आधार देत आहेत असे भासविण्यासाठी ती वळविण्याचा प्रयत्न करणे टाळले पाहिजे. (पडताळा मत्तय ४:५, ६) जो काही सल्ला देण्यात येतो त्याला खरे असे पवित्र शास्त्रीय कारण असलेच पाहिजे.—स्तोत्रसंहिता ११९:१०५.

१४, १५. (अ) सल्ला ग्रहण करण्यास सोपे करणाऱ्‍या आणखी एका गुणाचे नाव सांगा. (ब) सल्लागाराने या गुणवत्तेची वाढ करणे इतक्या महत्वाचे का आहे?

१४ सल्ला सौम्यतेच्या आत्म्याने देण्यात येतो तेव्हा तो अधिक प्रभावी ठरतो. पौलाला ते ठाऊक होते. या कारणास्तव, कोणी जाणीव नसता चुकीचे पाऊल उचलत आहे असे दिसते त्याच्याशी बोलताना पौलाने गुणवत्ता राखणाऱ्‍याना म्हटले की त्यांनी “अशाला सौम्य वृत्तीने ताळयावर आणा”वे. (गलतीकर ६:१) त्याने तीतला म्हटले की त्याने इतरांना याचे स्मरण द्यावे की, “कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे.”—तीत ३:१, २; १ तिमथ्यी ६:११.

१५ सौम्यतेची ही गरज का? कारण स्वैर सोडलेल्या भावना संसर्गित असतात. रागीत शब्द अधिक रागीट शब्दास उद्युक्‍त करतात आणि मग भडकलेल्या माथ्यांना चांगला विचार येत नाही. ज्याला सल्ला दिला जातो त्याने राग प्रदर्शित केला तरी सल्लागाराने सुद्धा रागीट बनण्याचे काहीच कारण नसते. उलटपक्षी, सल्लागाराची सौम्य मनोवृत्ती सर्व गोष्टी निवळविण्यास हातभार लावते. “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते.” (नीतीसूत्रे १५:१) ही गोष्ट सल्लागार पालक, वडील वा इतर कोणीही असला तरी खरी आहे.

१६. सल्ला देणाऱ्‍याने नेहमी आदरशील का असावे?

१६ शेवटी पौलाने तरूण वडील तिमथ्यी याला काय म्हटले त्याचा विचार करा: “वडील माणसाला टाकून बोलू नको. तर त्याला बापासमान समजून बोध कर. तरूणांस बंधुसमान मानून, वडील स्त्रियांस माता समान मानून, तरूण स्त्रियांस पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान मानून बोध कर.” (१ तिमथ्यी ५:१, २) केवढी उत्तम सूचना! विचार करा की एका वृद्ध स्त्रीला तिचा मुलगा शोभेल अशा तरूण वडिलाने खडसून किंवा अपमानकारक रित्या काही म्हटले तर तिला कसे वाटेल. सल्लागाराने अंमळ थांबून या गोष्टीचा विचार केला तर फारच बरे होईल की, ‘या व्यक्‍तीचे वय व व्यक्‍तीत्व लक्षात घेता ही सूचना व सल्ला सादर करण्याचा अत्यंत प्रेमळ व प्रभावी मार्ग कोणता असेल? मी जर याच्या किवा हिच्या दर्जावर असतो तर मला कसे वाटेल की सल्लागाराने कोणता पवित्र घ्यावा?’—लूक ६:३१; कलस्सैकर ४:६.

परूश्‍यांचा सल्ला

१७, १८. परूश्‍यांनी दिलेला सल्ला साहाय्यक का ठरू शकला नाही याचे एक कारण कोणते होते?

१७ पौलाच्या चांगल्या उदाहरणापासून आता वळा आणि येशूच्या काळातील यहुदी धर्मपुढाऱ्‍यांनी जे वाईट उदाहरण राखले ते विचारात घ्या. त्यांनीही सल्ला दिला पण याद्वारे त्यांच्या राष्ट्राला कसलाहि लाभ घडला नाही. हे असे का?

१८ याची पुष्कळ कारणे आहेत. यापैकीचे एक म्हणजे, जेव्हा येशूच्या शिष्यांनी जेवणाआधी हात धुतले नाहीत म्हणून परूश्‍यांनी त्यांना जे दटावले तेव्हाचा विचार करा. अर्थात बहुतेक माता आपल्या मुलांना जेवणाआधी हात धुण्यास सांगतात व हे आरोग्यदृष्ट्या चांगले आहे. तरीपण परूशी येथे आरोग्याचा विचार बाळगून नव्हते. त्यांना हात धुणे हा संप्रदाय होता व हा संप्रदाय येशूच्या शिष्यांनी पाळला नाही म्हणून त्यांना चीड वाटली. तथापि येशूने त्यांना दाखवून दिले त्याप्रमाणे इस्राएलामध्ये यापेक्षा आणखी मोठ्या समस्या होत्या ज्याकडे या परूश्‍यांनी वस्तुतः लक्ष द्यावयास हवे होते. उदाहरणार्थ, काही जन परूश्‍यांचा संप्रदाय, “आपल्या बापाचा व आईचा मान राख” या दहातील पाचव्या आज्ञेचा भंग करण्यासाठी आचरीत होते. (निर्गम २०:१२; मत्तय १५:१–११) खरे म्हणजे शास्त्री व परूश्‍यांनी बारीक सारीक तपशीलाचे इतके स्तोम माजविले होते की त्यांनी ‘नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्‍वासूपणा ह्‍या . . . सोडल्या” होत्या.—मत्तय २३:२३.

१९. आधुनिक काळचे ख्रिस्ती जन आपले स्वतःचेच मतप्रदर्शन करण्याच्या पाशास कसे टाळू शकतात?

१९ आजच्या सल्लागारांनी आपल्याकडून हीच चूक घडू नये म्हणून दक्ष राहिले पाहिजे. त्यांनी स्वतःचेच मतप्रदर्शन करण्याच्या पाशात पडू नये आणि बारीक सारीक तपशीलात गढून जाऊन “मुख्य गोष्टी” विसरता कामा नये. लहान सहान बाबतीत आम्हाला हे प्रोत्साहन आहे की, प्रेमाने “एकमेकांचे सहन करा.” (कलस्सैकर ३:१२, १३) एखाद्या गोष्टीचा गवगवा करण्याचे टाळणे याची तसेच सल्ला केव्हा जरूरीचा आहे याची चाणाक्षता असणे ही अशी एक गोष्ट आहे जी एखाद्याच्या “आध्यात्मिक मनोवृत्ती”ला हातभार लावणारी ठरते.—गलतीकर ६:१.

२०. सल्ला देण्याच्या बाबतीत आमचे व्यक्‍तिगत उदाहरण का महत्वाचे आहे?

२० त्या पहिल्या शतकातील धार्मिक सल्लागारांना आणखी एका गोष्टीमुळे निकामी केले गेले. त्यांनी, “मी सांगतो ते करा पण मी करतो ते करू नका” ही मतप्रणाली आचरली. येशूने त्यांच्याविषयी म्हटले: “तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दुशा होणार! कारण वहावयास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता, आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यांस लावीत नाही.” (लूक ११:४६) केवढी निष्ठुरता! आज पालक, वडील वा सल्ला देणाऱ्‍या इतर सर्वानी याची खात्री बाळगावी की ते इतरांना जे करायला सांगतात तीच गोष्ट ते स्वतः आचरीत आहे. आमचेच स्वतः क्षेत्रकार्याच्याबाबतीत योग्य उदाहरण नसेल तर इतरांना त्यात मग्न होण्याचे आम्ही काय उत्तेजन देणार? भौतिक गोष्टीच जर आमच्या जीवनावर प्रभुत्व राखून आहेत तर त्याच्या विरूद्धचा इशारा आम्हाला कसा वदविता येईल?—रोमकर २:२१, २२; इब्रीयांस १३:७.

२१. (अ) परूश्‍यांनी लोकांची कशी पिळवणूक केली? (ब) परूश्‍यांनी वापरलेल्या युक्त्या ख्रिस्ती सल्लागारास कसा इशारा ठरल्या पाहिजेत?

२१ यहुदी नेत्यांनी दमदाटीच्या युक्त्यांचा वापर केल्यामुळे त्यांना सल्ला देण्यात अपयश आले. एके प्रसंगी त्यांनी येशूला धरण्यासाठी माणसे पाठविली. हे लोक येशूच्या शिक्षणामुळे स्तंभित झाल्यामुळे रिक्‍तहस्तेच परत गेले. तेव्हा परूश्‍यांनी त्यांना खडसावून म्हटले: “तुम्हीही फसला आहा काय? अधिकाऱ्‍यांपैकी किंवा परूश्‍यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्‍वास ठेवला आहे काय? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.” (योहान ७:४५–४९) अधिकाराची जुलूमशाही व अपशब्द हा प्रकार दोष देण्यासाठी योग्य आधार ठरत होता का? अशाप्रकारचा सल्ला देण्याच्याबाबतीत ख्रिश्‍चनांनी कधीही दोषी होऊ नये. त्यांनी इतरांची पिळवणूक करण्याचे व ‘मी वडील आहे म्हणून माझे तुम्ही ऐकलेच पाहिजे!’ अशा अविर्भावाने इतरांना वागविण्याचे कटाक्षाने टाळावे. तसेच कोणा भगिनीसोबत बोलताना ‘मी बंधू आहे म्हणून तुम्ही माझे ऐकलेच पाहिजे’ असे त्यांनी बोलणे करू नये.

२२. (अ) ख्रिश्‍चनांनी सल्ला का व कसा द्यावा? (ब) आणखी कोणत्या प्रश्‍नाची चर्चा व्हावयाची आहे?

२२ होय, सल्ला देणे ही अशी प्रेमळ कृति आहे जिची कर्तव्यदक्षता वेळोवेळी आम्हाला सर्वांना पण खासपणे नियुक्‍त वडिलांना आपल्या सह ख्रिश्‍चनांच्याबाबतीत पूर्ण करावयाची आहे. काणत्याहि सबबीवर सल्ला देण्यात येऊ नये. पण तो देताना धैर्याने द्यावा. त्याला शास्त्रवचनीय आधार असला पाहिजे व तो सौम्य आत्म्याने दिला जावा. तसेच आम्हावर ज्यांची प्रीती आहे त्यांच्याकडून सल्ल्याचा स्विकार करणे खूपच सोपे जाते. तरीपण कधी कधी सल्ला देताना नेमके काय सांगावे ते जाणणे कठीण वाटते. तर मग आपल्याला प्रभावी ठरू शकणारा सल्ला कसा देता येईल? याचा विचार पुढील अंकात केला जाईल.

तुम्हाला विवेचीत करता येईल का?

◻ ख्रिस्ती सल्ला देण्याचा हक्क व जबाबदारी कोणास आहे?

◻ सल्ला देण्यासाठी धैर्य का जरूरीचे आहे?

◻ पौलाची करिंथकर ख्रिश्‍चनांवर प्रीती होती ही गोष्ट त्यांना सल्ला स्विकारण्याविषयी सोपी का झाली?

◻ ख्रिस्ती सल्लागाराने सौम्य व लीन का असले पाहिजे?

◻ आपला सल्ला जाचक आहे असे भासविण्याचे ख्रिश्‍चनाला कसे टाळता येईल?

[२५ पानांवरील चित्रं]

पौलाने तीताला इतरांना “सौम्य, सर्व माणसांबरोबर . . . नम्रतेने वागणारे असावे” असे स्मरण देण्यास सांगितले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा