या जगाच्या आत्म्याचा, “हवेचा” श्वास घेणे प्राणघातक आहे!
“तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता तुम्हासहि त्याने (देवाने) जीवंत केले. त्यात तुम्ही पूर्वी चालत असा. तुमचे कृत्य . . . आत्म्याचा अधिपति ह्याच्या वहिवाटीप्रमाणे असे.”—इफिसकर २:१, २.
१. हवेतील प्रदुषण मानवाकरिता प्राणघातक कसे बनले?
ताज्या हवेचा एक श्वास! कोंदट खोलीतून बाहेर पडल्यावर केवढी हुशारी आणतो. तथापि, या अफाट अंतराळातहि आज प्रदूषण हा एक मोठा विकल्पविषय बनलेला आहे. अनेक राष्ट्रास भोवतालच्या वातावरणात विषारी पाझर आपले क्षितीज गाठत आहेत. विषमूलक धुर, क्षःकिरण विर्सजक धुराळा, रोगजन्यजंतू आणि काही विशिष्ठ जंतू, ही सर्व वाऱ्याने चोहोकडे फैलावत आहेत. जीवनास पोषक अशी जी हवा आमच्या सृष्टीकर्त्याने एवढ्या वात्सल्याने पुरविली आहे ती आज मनुष्याच्या अघोरी व हलगर्जीपणामुळे अधिकाधिक प्राणघातक बनत आहे.
२. आम्ही, कदाचित जी प्रदुषित हवा श्वसन करतो तिजपेक्षा अधीक धोकेदायक अमंगल “हवा” कोणती?
२ वायु प्रदुषणासारख्याच धोकेदायक किंबहूना त्याहूनहि अधिक प्राणघातक अशा “हवे”चे एक रूप आहे. ते, रशीयातील चेर्नोबायल येथे जी अणू शक्तिची गळती झाली ती किंवा अमेरिकेतील लॉस अँजेलस, कॅलिफोर्निया येथे जो विषारी वायुचा ढग एकाएकी बाहेर पडला तो, नव्हे. तर आम्ही त्याहिपेक्षा अनेकपटींनी अधिक प्राणघातक “हवा” श्वसन करण्याच्या धोक्यात आहोत. प्रेषित पौलाने तिचा, सोबतीच्या ख्रिस्तीजनासोबतच्या संभाषणात उल्लेख केलेला आहे: “तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता तुम्हासहि त्याने जीवंत केले त्यात तुम्ही पूर्वी चालत असा. हे तुमचे कृत्य जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपति, म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा (हवेचा) अधिपति, ह्याच्या वहिवाटीप्रमाणे असे.”—इफिसकर २:१, २.
३, ४. (अ) “अंतरिक्षाचा राज्याधिपति” कोण आहे? (ब) इफिसकर २:१, २ मध्ये उल्लेखित “हवा” दुरात्म्याचे वसतिस्थान नाही ते का?
३ ही “हवा” काय आहे? पौल हे स्पष्ट करतो की तिजवर ‘अधिकारी’ किवा सत्ता आहे, शिवाय तिचा “अधिपति” आहे. हा अधिपति कोण यात संशय नाही. तो दियाबल सैतान आहे. येशू ख्रिस्ताने त्याला “या जगाचा अधिकारी” संबोधिले होते. (योहान १२:३१) हे मूर्त स्वरूप जाणून काही पवित्रशास्त्र विद्वानांना वाटले की पौलास ही कल्पना कोणा यहुदी किंवा विदेशी उगमापासून सुचली असावी, आणि तो ही हवा, ज्यांच्यावर दियाबलाची सत्ता आहे, अशा दुरात्म्यांचे वसतीस्थान असल्याचे बोलत असावा. अनेक पवित्र शास्त्रीय भाषांतरे हाच दृष्टीकोन परावर्तित करतात. पण ही “हवा” स्वर्गातील ते स्थळ नव्हे जेथे एकेकाळी “आकाशांतला दुरात्मासमूह” वस्तीस होता.—इफिसकर ६:११, १२.
४ ज्या काळी पौलाने इफिसमधील ख्रिस्तीजनांना लिहिले हाते त्या काळी, सैतान आणि दुरात्मासमूह, जरी देवाच्या मर्जीबाहेर होते तरी अद्याप स्वर्गात होते. अद्यापि त्यांना पृथ्वीच्या आसमंतात टाकून देणे बाकी होते. (प्रकटीकरण १२:७–१०) शिवाय, ही हवा आत्मिक प्राण्यापेक्षा मानवी जीवनाशी अधीक निगडीत आहे. याच अनुरोधाने, जेव्हा देवाच्या क्रोधाची शेवटली वाटी “अंतराळांत” हवेवर ओतिली जाईल त्यावेळी तिचे परिणाम मानवी समाजास जाणवतील.—प्रकटीकरण १६:१७–२१.
५. येथे ज्या “हवे”ची चर्चा होते ती काय आहे, आणि तिचा लोकांवर कसला परिणाम हातो?
५ ह्या कारणास्तव, देवापासून दूर झालेल्या स्वार्थी व आज्ञाभंजकांठायीचा सर्वसाधारण आत्मा किंवा प्रबल चित्तवृति स्पष्ट करण्यात पौलाने खरोखरीच्या हवेचा किंवा वातावरणाचा उपयोग केलेला असल्याचे आढळते. हे “आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्या”समान तसेच “जगाचा आत्मा” यासारखे आहे. (इफिसकर २:२; १ करिंथकर २:१२) खरोखरीची हवा श्वासोच्छ्वास करण्यास जशी चोहोंकडे उपलब्ध असते, तसेच “जगाचा आत्मा” नेहमी उपस्थित असतो. बाळपणापासून ते कबरेपर्यत, आपल्या अपेक्षा, आशा आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात लोक ज्यामार्गी विचार व आचरण करीतात त्यावर तो व्याप्त प्रभाव ठेऊन त्याला आकार देत असतो.
६. (अ) या जगाच्या “हवे”ची प्रखरता कशी वाढलेली आहे, व ती आपला “अधिकार” कसा चालविते? (ब) कशाप्रकारे, या “हवे”चा श्वासोच्छ्वास करणे एखाद्याला दियाबलाचा बंडखोर मार्ग अनुसरण्याचे सुचविते?
६ हा पापमय आणि आज्ञाभंजक आत्मा अपूर्णत्वांतील मानवी समाजावर आपले प्रभूत्व राखतो. जसजशी ही “हवा” श्वासनलीकेतून खाली उतरते तसतसे तिजमधील प्राणघातक जोम कामुक सुखाविलासाचा दबाव आणि वाढती क्षुधा शमविण्यास प्रक्षुब्ध होत असतो. याप्रकारे त्याचा लोकांवर “अधिकार” असल्याचे संबोधिले आहे. (रोम. ६:१२–१४ पडताळा.) हे खरे की, जे सर्व अधर्मी, त्यांचा मुळ उत्पादक दियाबल आहे. (योहान ८:४४) यास्तव त्याचा स्वतःचा बंडखोर मार्ग अनुसरण्याचा तो मानवावर प्रभाव पाडीत असतो आणि त्याद्वारे हा सामाजिक आत्मा, किंवा “हवा” त्यांना प्रेरित करतो, रूप देतो व अधिकारात ठेवितो. या अमंगळ शक्तिचा किंवा “सत्तेचा,” “अधिपति” असता, सैतान त्याचा उपयोग लोकांच्या विचारावर ताबा ठेविण्याकरिता करतो. याच्या घटकावयांची सुत्रता अशाप्रकारे केली आहे की जे लोकांना शारीरीक लालसा पुऱ्या करण्यात आणि जगीक आकर्षणामागे धावत राहण्यात एवढे मग्न ठेवीत आहे की त्यांना देवाची ओळख करून घेण्यास व त्याचा पवित्र आत्मा जो “जीवंत करणारा” आत्मा, त्याच्या अधीन राहण्यास वेळ नाही. (योहान ६:६३) आध्यात्मिक अर्थाने म्हटले तर, ते सर्व मेले आहेत.
७. (अ) कशाप्रकारे ख्रिस्तीहि एकेकाळी “क्रोधाची प्रजा” होते? (ब) आम्ही ख्रिस्ती बनल्यानंतर कोणते रूपांतर घडले?
७ देववचनांतील सत्य शिकण्याआधी व त्याच्या नितिमान दर्जाशी जुळवून घेण्याआधी, ख्रिस्तीहि या “सत्तेच्या” किंवा या संमिश्रित “हवे”च्या वर्चस्वाखाली होते “त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनांस अनुरूपसे मागे वागलो. आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छाप्रमाणे करीत होतो व निसर्गतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.” पण तेच ख्रिस्ती बनल्यावर, या जगाचे प्राणघातक “हवा” श्वसन थांबविले. आम्ही ‘पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा त्याग केला आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण केला.”—इफिसकर २:३; ४:२२–२४.
८. आमची आजची परिस्थिती अरण्यावासांतील इस्राएल राष्ट्रासारखी आहे ती कशी?
८ आता धोका यात आहे की, या जगाच्या प्रदुषित वातावरणातून जरी स्वतंत्र असलो तरी त्यात परत गुरफटण्याचा मोह सतत भेडसावीत आहे. आम्ही आज, “अंत समयाच्या” अगदी खोलवर आणि नवीन जगाच्या अगदी उंबरठ्यावर पोहंचलो आहोत. (दानिएल १२:४) आम्ही, निश्चीतच, इस्राएल ज्या सापळयात सापडले होते त्यात पकडले जाऊ इच्छित नाही. त्यांची मिसरातून एवढ्या अद्र्भितरित्या सुटका केल्यानंतर व वचनयुक्त देशाच्या उंबरठ्यावर उभे असता हजारोंचा “रानात नाश झाला.” का बरे? कारण त्यांचेपैकी काही, मूर्तिपूजक बनले, इतरांनी जारकर्म केले आणि इतर काहींनी कुरकुर व तक्रार करून यहोवास कसास लाविले. पौल, असे विधान मांडण्यात एक जोरदार मुद्दा मांडतो: “या गोष्टी दाखल्याच्या रूपाने त्यांस घडल्या, आणि ज्या आपल्यावर युगांचा शेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.”—१ करिंथकर १०:१–११.
९. (अ) आम्ही, या जगात असलो तरी या जगाचे नाहीत ते कसे? (ब) जगाच्या प्राणघातक वातावरणाने परत शोषून घेण्यापासून बचावण्याकरिता आम्ही काय करावे?
९ येशूने, त्याच्या शिष्यांकरिता प्रार्थना केली: ‘जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत. तू त्यास जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यास वाईटापासून राखावे अशी विनंति करितो.” (योहान १७:१४, १५) यहोवा आमचे संरक्षण करणार, पण तो आम्हासभोवताली “कुंपण’ घालीत नाही, तसेच या जगाच्या “हवे” पासून कोणाचा अद्र्भितरित्या बचाव करीत नाही. (इयोब १:९, १०) यास्तव, आम्हास जरी या सैतानी जगात राहण्याचे आव्हान आहे तरी त्याचा कोणताहि भाग नसावे, जरी अमंगळपणाच्या प्रदुषित “हवेने” घेरिलेले असलो तरी तिचा श्वासोच्छ्वास करू नये. जेव्हा आम्ही प्रापंचिक प्रकाशने वाचतो, दूरदर्शनचे कार्यक्रम पाहतो किंवा मनोरंजन स्थळी जातो, अशावेळी जगाच्या “हवेत” गुरफटण्याचा संभव असतो. हे खरे की जगाच्या लोकांसोबतचे काही संपर्क चुकविता येणार नाहीत जसे, नौकरी स्थळी, शाळेत तसेच इतर आवश्यक गोष्टींच्या व्यवहारात, तरीहि आम्ही या जगाच्या प्राणघातक वातवरणात परत ओढिले जात नाही याबद्दल सावध असावे.—१ करिंथकर १५:३३, ३४
१०, ११. (अ) कशाप्रकारे आमचे यहोवाकडिल आध्यात्मिक नंदनवनात असणे याची तुलना “धुम्रपान निषेध” कक्षेत असण्यासमान आहे? (ब) जर या जगाच्या “हवेची” झुळूक येत असलेली दिसली तर कोणती पावले उचलावीत?
१० आम्ही आमच्या परिस्थितीची तुलना, जणू अशा एका विश्रांती गृहात बसल्यासमान करू, जेथे “धूम्रपान करण्याचा” आणि “धुम्रपान निषेध” असे दोन कक्ष आहेत. यहोवाच्या आध्यात्मिक नंदनवनातील ख्रिस्ती, या जगाच्या आत्म्यापासून दूरच्या “धुम्रपान निषेध” कक्षेत असणार. आम्ही जाणूनबुजून “धुम्रपान करण्याचा” कक्षेत बसणार नाही हे तितकेच निश्चित! कारण ते मूर्खपणाचे ठरेल. पण तेच आम्ही विश्रांतीगृहाच्या “धुम्रपान निषेध” कक्षेत बसलो असताहि वेळोवेळी काय घडण्याचा संभव असतो? धुराने संमिश्रित हवा चोहोकडे पसरलेली असते व आम्हालाहि त्याची झुळूक लागते! हे जेव्हा घडते त्यावेळी दुषित हवा मोहित करीत असल्याचे वाटते का? किंवा आम्हास, होईल तितक्या लवकर तेथून निघून जावेसे वाटते?
११ पण तेच या जगाच्या “हवेची” झुळक तुमच्या वाटेस आली तर अशा वेळी तुम्ही काय कराल? या अमंगळ प्रभावापासून दूर होण्याची तत्कालीन प्रतिक्रिया तुम्ही अनुसरता का? तुम्ही अंमळ तेथेच राहाल व श्वासोच्छ्वास कराल तर तुमच्या विचारावर विपरीत परिणाम होणार हे नक्की! जितका अधीक काळ तुम्ही या “हवेचा” श्वासोच्छ्वास करीत राहाल तितकी अधीक तिला सहन करण्याची क्षमता तुम्हाठायी वाढेल. कालांतराने तोच वास किळसवाणा वाटण्याऐवजी शरीराला मोहक, मादक आणि इष्ट वाटू लागेल. कदाचित, एकाद्या गुपित आकांक्षेवर एवढ्या काळ नियंत्रण ठेविण्याचा जो लढा देत होता तिला चेतविताल.
१२. या जगाच्या “हवे”चे जे गुण सहज ओळखता येत नाहीत त्यांचे प्रभाव चुकविण्याकरिता काय करावे?
१२ या जगाच्या “हवेतील” काही प्राणघातक भ्रष्ट प्रकार चटकन ओळखण्याजोगे नसतात, जसे खरोखरीच्या हवेतील कार्बन मोनाक्साईड वास तसेच चवविरहित असतात. अशावेळी “घातक धूरांचा” डोंब आम्हावर पसरेपर्यंत जर पुरेशी ओळख पटली नाही तर त्यात धोका आहे. यास्तव, या जगाच्या स्वैर विचारी वृतिमुळे किंवा देवाकडिल नीतिमान दर्जाविरूद्धच्या बंडखोरीमुळे हे जग ज्या नाशाच्या खाईत सापडले आहे त्याकडे आम्हालाहि बोळविले जात नाही ना याबबात आम्ही दक्ष असण्याची गरज आहे. पौलाने सोबतीच्या ख्रिस्तीजनांना उत्तेजन दिले: “एकमेकास तुम्ही प्रतिदिवशी बोध करा. यासाठी की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये.”—इब्रीकर ३:१३; रोमकर १२:२.
या जगाची “हवा” काय मिळून बनते?
१३. (अ) या जगाच्या ‘हवे’चे एक रूप कोणते ज्यापासून आम्ही सावध असावे? (ब) या “हवे”ने काही यहोवाच्या लोकांवरहि परिणाम केलेला आहे हे कसे उघड झाले आहे?
१३ या जगाच्या “हवे”च्या प्रबळ प्रभावामुळे, आमच्या ध्यानात येण्याआधी कोणती सर्वसाधारण चित्तवृति अनुसरण्यास आम्ही सुरवात करतो? एक ही आहे की अनीतिच्या गोष्टीत रमण्याच्या आवडीकडे कलणे. लैंगिक आणि नीतिबाबतच्या जगीक कल्पना आम्हासभोवताली आहेतच. अनेकांचे म्हणणे आहे: जारकर्म परशय्यागमन करणे, विवाहाआधीच पाळणा हलविणे, आणि समलिंग समागम ही सर्व ठीक आहेत, आम्ही, जे काही सर्वसाधारण, नैसर्गिक तेच करतो. मग या “हवे”चा किंवा जगीक आत्म्याचा यहोवाच्या लोकांवर काही परिणाम झालेला आहे का? ही खेदाची गोष्ट की १९८६च्या सेवा वर्षांत ३७,४२६ लोकांना ख्रिस्ती मंडळ्यातून सभा बहिष्कृत करण्यात आले. यांचेपैकी लैंगिक अनीतिमुळे बहिष्कृत झालेल्यांचा आकडा मोठा होता. शिवाय यात त्यांचा समावेश नाही ज्यांनी प्रांजळ पश्चाताप प्रदर्शित केल्यामुळे बहिष्कृत करण्यात आले नव्हते, तर अशांना वाग्दंड दिला होता.—नीतिसुत्रे २८:१३.
१४. काहीं ख्रिस्ती नैतिकतेत का बहकले, कोणत्या शास्त्रवचनीय उपदेशास नाकारून?
१४ जे लैंगिक अनीतिस बळी पडतात अशांचे बाबतीत काय होते? जेव्हा सर्व पुरावे उघड होतात, तोपर्यंत, वेळोवेळी हेच आढळून आले की त्यानी या जगाच्या “हवे”च्या श्वसनास आधीच सुरवात केलेली होती. त्यांनी जगाच्या चित्तवृतिस त्यांच्या दर्जास खालाविण्याची मुभा दिली. उदाहरणार्थ, त्यांनी असे चित्रपट पाहण्यास सुरवात केली ज्यांच्या प्रदर्शनातून काही समयापूर्वी ते चालते झाले असते. याही पेक्षा वाईट म्हणजे ख्रिस्तीजनांकरिता अयोग्य अशा चित्रपटांच्या टेप्स घरी व्हिडिओवर पाहू लागले. याप्रकारे अनीतिमान गोष्टीच्या खेळीने ते शास्त्रवचनीय आदेशांच्या अगदी विरुद्धतेत वागत की: “जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ, यांचा तुम्हामध्ये उच्चारहि न होवो; हे पवित्र जनांस शोभते. तसेच अमंगळपण, बाष्फळ गोष्टी व टवाळी यांचाहि न होवो. ती उचीत नाहीत.”—इफिसकर ५:३, ४.
१५. लैंगिक अनीतिच्या खेळीस सर्वसाधारणपणे सुरवात करण्याचा मोह कसा होतो?
१५ हे खरे की, जारकर्मात गुंतवून घेण्याच्या कोणाहि सूचनेस तुम्ही तत्काळ नकार द्याल. पण तेच कामावर किंवा शाळेत कोणी व्यक्ति तुम्हाशी लगट करण्याचे प्रयत्न करते, किंवा शारीरिक आकर्षणांच्या लयलूटींतील नजीकता साधते किवा एकटेपणात भेटण्याच्या संधीची आमंत्रणे देते अशावेळी तुमची प्रतिक्रिया काय असणार? जगाच्या, “हवे”च्या ओघात वाहून जाणार का? त्या कटाक्षाचा पूर्ण आनंद लुटावा म्हणून स्वतःस आकर्षित होऊ द्याल का? वडिलांकडून जे अहवाल प्राप्त होतात त्यानुसार स्वैराचरणास अशा आकस्मिक प्रसंगांनी सुरूवात होते. एकादा जगीक पुरूष कोणा एका ख्रिस्ती स्त्रीला कदाचित म्हणेल: “आज तुम्ही केवढ्या सुंदर दिसता.” ते ऐकण्यास केवढे सुखद वाटेल, खासकरून त्या स्त्रीला जर एकटेपणा भासत आहे. अधीक गंभीरतेत म्हटल्यास, काहीनी गैरवाजवी स्पर्शांना वेळीच सुज्ञ प्रतिक्रिया प्रदर्शित केली नाही. त्यांनी आक्षेपाचा वरपांगी अभिनय तर केला. पण तोहि अशा अर्धवट उद्वेगाने की त्यामुळे जणू त्या जगीक व्यक्तिस तो जे काही करीत होता ते करीत राहण्याचे उत्तेजन मिळाले. मग असे अनीतिमान प्रकार कोणा एका ख्रिश्चन स्त्रीवर, प्रदुषीत हवेची झळक अधीक तीव्रतेने तिच्या बाजूने वाहिल्यासमान, घडत राहिले तर काय? तिने अगदी दृढनिश्चयाने त्याला बजवावे की तिला त्याच्याबद्दल रस वाटत नाही व पुढे कधी वाटणारहि नाही. पण तेच, ती जर या “हवेचा” श्वासोच्छ्वास करू लागली व तो तसाच चालू ठेविला तर तिच्या विरोधाची तीव्रता कमी होत राहून ती नमेल. ती अनौतिकतेचे भक्ष्य नाहीतर अविचारी विवाहाचे लक्ष बनेल.—नीतिसूत्रे ५:३–१४; १ करिंथकर ७:३९ पडताळा.
१६. “ख्रिस्ताचा सुगंध” असण्याकरिता काय करण्याची गरज आहे?
१६ या जगाच्या प्राणघातक “हवे”च्या अनीतिमान हल्ल्याचा विरोध करण्यात शीघ्र असा. तिच्या मोहक, फसव्या सुंगधाच्या अधीन होऊन, यहोवाच्या नामास व संस्थेस कलंकित करण्याऐवजी, तुमच्या देवभिरू चित्तवृतिने व वागणूकीने देवाकरिता एक सुगंधित हव्य बना. पौल त्याबद्दल असे म्हणतो: “तारणप्राप्ति होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांमध्ये आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध असे आहो. एकाला मृत्युचा मारक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनदायक गंध आहो.” (२ करिंथकर २:१५, १६) अनेक जर ख्रिस्ती मार्गाकडे पाहून नाक मुरडतात तर त्याचे काय? (१ पेत्र ४:१–५) जगास त्यांच्या मार्गी वाटचाल करू द्या आणि विभक्त कुटुंबे, अनौरस संताने, लैंगिकतेत संसर्ग झालेले, एड्स् सारखे आजार आणि अगण्य भावनात्मक आणि दैहिक संकटे यांच्या रूपांतील फलप्राप्तिची कापणी करू द्या. तुमचा या असंख्य वेदनांपासून बचाव होईल, एवढेच नव्हे तर देवाची मर्जीहि संपादीता येईल. अधीक, म्हणजे काही लोकांवर तरी तुमच्या वागणूकीचा व तुम्ही प्रचार करता त्या देवराज्याच्या संदेशाचा प्रभाव पडेल व त्यांचे चित्त “जीवन दायक गंध” कडे आकर्षित होईल.
जगीक वेशभूषा पद्धतींची “हवा”
१७. वेश आणि केशभूषा पद्धती हे कसे प्रकट करतात की त्या व्यक्तिवर या जगाच्या आत्म्याचा प्रभाव झालेला आहे?
१७ या जगाच्या “हवेचा” दुसरा प्रकार, वेश आणि केशभूषा यांच्याबबातीत आहे. जगातील अनेक असे आहेत जे स्वतःस, शरीर सौंदर्याकडे लक्ष आकर्षित होईल. अशा कपड्यांनी सजवितात. एवढेच काय पण वयाने बरेच छोटे ते मोठे दिसावेत असे व सेक्स जाणतो असा आव आणितात. चोहोकडे पसरलेल्या या “हवे”चा किंवा चित्तवृतीचा तुम्हावर परिणाम झालेला आहे का? दुसऱ्याठायी शिरशिरी भरवावी, टर उडविण्या किंवा विरूद्ध लिंग व्यक्तिचे गैरवाजवीरित्या लक्ष आकर्षित करावे असे कपडे तुम्ही घालता का? तसे जर आहे तर तुम्ही आगीशी खेळत आहात. या “हवेचा” श्वासोच्छ्वास, तुम्हाठायीच्या विनयशीलतेच्या आत्म्यास व निष्कलंक, शुद्ध राहण्याच्या इच्छेस गुदमरून टाकेल. (मीखा ६:८) ज्यांच्याठायी जगीक आत्म्याची वस्ती आहे ते तुम्हाकडे आकर्षित होतील. तुमच्या हालचालीद्वारा त्यांना असे संकेत मिळतील की त्यांच्या अनीतीत सहभागी होण्यास तुम्ही तयार आहात. पण, अशाप्रकारच्या “हवे”स आपणास तिजमध्ये गुरफटण्याचा वाव देऊन देवाच्या दृष्टीने घृणित अशा गोष्टी करणाऱ्याच्या मार्गी त्यांचा साथ देण्यास सुरवात का करावी?
१८. आम्ही यहोवाचे प्रतिनिधित्व करीत आहोत याची सतत आठवण बाळगून असणे वेश आणि केशभूषा पद्धती अनुसरण्यात कसे सहाय्यक ठरते?
१८ आम्ही सभ्य असावे, याचा अर्थ आम्ही आपल्या वेश आणि केशभूषेत अगदीच गबाळे राहावे असा होत नाही. यहोवाच्या साक्षीदारांचा अवाढव्य समुदाय कशाप्रकारे कपडे व वेशभूषा करतो ते लक्षांत घ्या. ते या जगाच्या वेशभूषा पद्धतीतील अतिरेक टाळतात पण स्वतःस आकर्षिततेत सादर करितात. आम्ही सबंध विश्वाचा सार्वभौम सत्ताधारी यहोवा देव याचे प्रतिनिधित्व करतो हे ते सतत आठवणीत ठेवितात. त्यांच्या सभ्य वेशभूषा पद्धतीची या जुन्या जगास टीका करू द्या. या जगाच्या चितवृत्तीस अनुसरून त्यांनी कधीहि आपल्या ख्रिस्ती दर्जास खालावण्याची हिम्मत करू नये. “यास्तव मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो” असे प्रेषित पौलाने लिहिले: “की विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही इतःपर चालू नये . . . ते बधिर झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणाच्या स्वाधीन केले.” (इफिसकर ४:१७–१९) जो प्रौढ ख्रिस्ती आहे तो, जगाचे अनुकरण न करता, सभ्य, मर्यादशील वेशभूषा करील.—१ तिमथ्यी २:९, १०.
१९. या जगाच्या “हवे”च्या दोन मुख्य गोष्टी विचारात घेतल्यानंतर, तिच्या श्वसनात जे धोके आहेत त्यांचे बद्दल काय स्पष्टता झाली?
१९ आता पर्यंत आम्ही या जगाच्या “हवे”चे केवळ दोन प्रकार चर्चिले आहेत, जे आध्यात्मिक आरोग्यास फार हानिकारक आहेत. पुढील लेखांत आम्ही, दियाबल व त्याच्या पद्धती ख्रिस्तीजनांना वश करण्याच्या इराद्याने या प्राणघातक ‘हवे’चे जे इतर प्रकार सतत त्यांच्याप्रत वाहवत असतात ते विचारात घेऊ. अशा प्रकारातील ही दूषित “हवा” आम्ही टाळणे हे केवढ्या महत्वाचे आहे; कारण या जगाच्या आत्म्यात सामावून जाणे म्हणजेच मृत्युच्या वाफेचा श्वासोच्छ्वास करण्यासमान आहे.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ या जगाची “हवा” काय आहे, आणि कोण तिजवर अधिकार चालवितो?
◻ जगाची “हवा” लोकांवर कसला “अधिकार” गाजविते?
◻ ख्रिस्ती “धुम्रपान निषेध” कक्षेत आहेत असे का म्हणता येते?
◻ अनीतीच्या गोष्टीशी खेळी केल्याने या जगाची “हवा” यहोवाच्या लोकांवर कसा परिणाम करते?
◻ कशाप्रकारे समतोलपणा हा वेश आणि केशभूषा यांच्याबाबतीत या जगाच्या ‘हवेच्या’ प्रभावावर मात करण्यात सहाय्यक ठरतो?
[१० पानांवरील चित्रं]
या जगाच्या प्राणघातक “हवे”चा श्वासोच्छ्वास करण्याचे तुम्ही नाकारता का?
[१३ पानांवरील चित्रं]
या जगाच्या “हवे”चा धूर तुम्हापर्यंत दरवळत येतो तेव्हा तुम्ही काय करता?