वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ९/१ पृ. २७
  • “खूपच मोठी घटना”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “खूपच मोठी घटना”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य सभागृहाबद्दल आदर दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ९/१ पृ. २७

“खूपच मोठी घटना”

१९८४च्या उन्हाळ्यात फ्रान्समधील एक युवक जेराल्ड हा आपल्या सायकलीवरुन अमेरिका व कॅनडाच्या सहा महिन्याच्या प्रवासाला निघाला. उत्तुंग अशा खडकाळ पर्वतांनी तो शहारला. शांत उद्यानांनी त्याला शांती दिली. पण कॅनडातील क्युबेकच्या मोन्टमॅग्नी येथील एका दृश्‍यामुळे त्याजवर मोठी छाप पडली. त्यामुळे त्याचे जीवनच बदलले गेले.

सप्टेंबर १६ रोजी रविवारी जेराल्ड मोन्टमॅग्नी येथून सायकलीने जात असता त्याला रस्त्याच्या कडेला मोटार कारची भली मोठी रांग दिसली. पुढे त्याला एका बांधकामाच्या जागी शेकडो लोक काम करीत असल्याचे दिसले. “हे काय चालले आहे?” असे त्याने रहदारीवर नियंत्रण राखणाऱ्‍या एका कामगाराला विचारले. हा माणूस कामात होता तरी त्याने वेळ काढून जेराल्डला ही माहिती दिली की हे सर्व कामकरी यहोवाचे साक्षीदार आहेत, व ते शनिवार-रविवार येथे येऊन आपल्या धार्मिक सभांसाठी सभागृह बांधीत आहेत. जेराल्डला याची कल्पना नव्हती पण तो त्या दोन दिवसांच्या राज्य सभागृह प्रकल्पाच्या शेवटच्या कामकाजाच्या वेळी आला होता. त्याने जे पाहिले व ऐकले त्यामुळे तो भारावून गेला. त्या रात्री त्याने आपल्या रोजनिशीत लिहिलेः “आज सांयकाळी मी यहोवाच्या साक्षीदारांना भेटलो. त्यांनी ते घर दोन दिवसात बांधून काढले. ते सुमारे हजार लोक तरी होते. खूपच मोठी घटना!”

लवकरच जेराल्ड फ्रान्सला परतला. दोन वर्षांनी म्हणजे जुलै २६, १९८६ रोजी त्याने मोन्टमॅग्नी येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहास एक पत्र पाठविले. त्यात त्याने लिहिलेः

‘तुमच्या राज्य सभागृह इमारत बांधणी कामाच्या दुसऱ्‍या दिवशी आलेल्या जेराल्ड या सायकलपटुची अद्याप तुम्हास आठवण आहे का? त्या दिवशी रहदारीचे नियंत्रण करणाऱ्‍या माणसाने बी पेरले. काही महिन्यांनी फ्रान्समध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी माझी भेट घेतली, आणि मी त्यांच्याकडून पवित्र शास्त्राभ्यास घेण्याचे निमंत्रण पत्करले. मी कर्मठ कॅथोलिक कुटुंबातून असल्यामुळे हा अभ्यास करणे तितके सोपे नव्हते. परंतु यहोवाने त्या बीजास वाढविले. दोन आठवड्याआधी माझा नॅन्टेस येथील अधिवेशनात बाप्तिस्मा झाला. मला सत्य प्राप्त होऊ दिले म्हणून मी यहोवाचे आभार मानतो. शिवाय सप्टेंबर १६, १९८४ रोजी रविवारी त्या बंधूने मला जे काही शिकविले त्याविषयीही मी आपली कृतज्ञता व्यक्‍त करतो. धाडसी प्रवास करणाऱ्‍या पण सत्याकडे परावर्तित झालेल्या मजकडून तुम्हा सर्वांना बंधूप्रेमाच्या सदिच्छा.”

जेराल्डचे हे पत्र मोन्टमॅग्नी राज्य सभागृहात जमलेल्या बांधवांना वाचून दाखविले गेले तेव्हा त्यांना किती आनंद झाला बरे! ज्या सर्वांनी या राज्यसभागृहाच्या बांधणी कामात भाग घेतला होता त्यांना शलमोनाच्या या वचनाची सत्यता कळाली होतीः “आपले अन्‍न जलाशयावर सोड. ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल.” (उपदेशक ११:१) होय, राज्य सभागृहाच्या प्रकल्पाचे परिणाम दीर्घकाळ आहेत व ते दुरवर जातात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा