देवापासून आणखी कोणते फायदे येतात?
तुम्हाला सुंदर फुले, गुलाबांचा सुवास, पक्ष्यांचे गाणे यांचा आनंद वाटतो का? तुमच्या लेकराच्या पहिल्याच स्मिताने तुम्हास शिरशिरी भरविली होती का? तोंडास पाणी सुटविणाऱ्या सुगंधाची आवड तुम्ही बाळगत नाही का? मेघधनुष्य, नेत्रदीपक सूर्यास्त, किंवा निरभ्र रात्रीच्या ताऱ्यांचे मोल कोण जाणत नाही? देवाच्या विलोभनीय तरतुदी अनंत आहेत, हो ना?
तथापि, बरीच शोचनीय स्थिति देसते. सर्वांसाठी पुष्कळ निपज देण्याची पृथ्वीत क्षमता असूनही लाखो लोक अपुऱ्या आहाराने राहतात. लाखो लोकांना प्रदुषणाने विषबाधीत केले आहे. करोडो सध्या गुन्हेगारी, अधाशीपणा, स्वार्थीपणा व भवितव्य कसे असेल याच्या भयाने दबलेले आहेत.
उत्पन्नकर्ता इतका समृद्ध आहे तर मग एवढे दुःख तरी का असावे? हा ग्रह विलोभनीय, आम्ही त्याचा आनंद लुटण्यास बनविला आहे. परंतु जग-मानवजात-दुखःद अवस्थेमध्ये आहे. पृथ्वीतलावरील बहुतेक रहिवाश्यांना भवितव्य अंधकारमय, भयभीत वाटते. ते का? काय चूक झाली? देवाने मानवास बनवून सोडून दिले का? या गोंधळात टाकणाऱ्या परिस्थीतीस समजण्यास काही मार्ग आहे का? आम्हाजवळ भवितव्याबाबत काही आशा आहे का?
प्रकाश व आशेचा एक उगम
सुमारे २,००० वर्षापूर्वी एक अतुलनीय मुलगा जन्मला होता—अतुलनीय, कारण त्याची आई मरीया ही मानव होती व त्याचा बाप देव स्वतः होता! ‘अशक्य!’ असे काही जण म्हणतात? नाही, ते गर्भधारणेचा जनक, सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या जीवन निर्मात्यास तसे नाही. तो लहान मुलगा पूर्ण “मनुष्य ख्रिस्त येशू” म्हणून वाढला.—१ तिमथ्यी २:५; मत्तय १:१८-२५.
तो फार महत्त्वाचा जन्म होता. वस्तुतः बहुतेक राष्ट्रांनी ह्याला त्याच्या दिवसापूर्वीच्या ऐतिहासीक घटनांना बी.सी.—ख्रिस्त शकपूर्व म्हणून मान्यता दिली. तथापि त्याची सुरुवातीची वर्षे अगदी शांतपणे सुताराचा मदतनीस म्हणून त्याचा पालक पिता योसेफ याचे नासेरथ मधील घरी गेली होती. तीस वर्षे निघून गेली. त्यानंतर यार्देन नदीजवळ येशूने स्वतःस देवाची इच्छा करण्यास सादर केले व त्याचा बाप्तीस्मा झाला व यहोवा देवाचा पवित्र आत्मा त्याजवर उतरला. (मत्तय ३:१३-१७) येशूने त्यानंतर प्रचार व शिक्षणकार्य याची जोरदार मोहीम सुरू केली. यशयाने भाकीत केल्यानुसार “अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला.”—मत्तय ४:१४-१७; यशया ९:२.
येशू सर्व काळचा सुविख्यात व आदरयुक्त शिक्षक बनला. इतर कोणत्याही मानवी शिक्षकाने मानवजातीवर एवढा प्रभाव टाकला नाही किंवा एवढा आध्यात्मिक प्रकाश व आशा पुरविली नाही. त्याचे पाठ्य पुस्तक कोणते होते? पवित्रशास्त्र, त्यावेळेस ते इब्री शास्त्रवचने, किंवा “जुना करार” हे होते. येशूने त्यास जीवित केले. पुष्कळ पुरातन भविष्यवाद त्याजमध्ये पूर्ण झाले. (मीखा ५:२ची मत्तय २:३-६ सोबत तुलना करा.) त्याने मानवाच्या उत्पत्तिच्या अहवालास मान्यता दिली. (उत्पत्ती २:२४, मत्तय १९: ३-६) येशूने पवित्र शास्त्राचा प्रमुख विषय—देवाच्या राज्याच्या द्वारे यहोवाचे गौरव हा दूर व विस्तृतपणे जाहीर केला. (मत्तय ४:२३; ६:१०) याहून अधिक येशू ख्रिस्ताचे जीवन व कार्य यांचा अहवाल ख्रिश्चन ग्रीक शास्त्रवचनांचा किंवा “नवीन करारा”चा प्रमुख भाग आहे. होय, पवित्रशास्त्र देवापासूनची विलोभनीय देणगी आहे जे या दुःखी व अंधूक जगात आशेचा किरण आहे.—स्तोत्रसंहिता ११९:१०५.
मावजात गोंधळात का आहे?
पवित्रशास्त्र या प्रश्नाचे उत्तर देते का? होय, ते दाखविते की देवाने मानवास नव्हे तर मानवाने देवास सोडले होते. तथापि, निवड करण्याचे मुलभूत तत्त्व यात गोवले होते. मानवास यंत्रमानव, आज्ञाधारकपणाचे दास म्हणून निर्माण केले नव्हते. आम्ही आज्ञाधारक किंवा अवज्ञाकारी होण्याचे निवडू शकतो.
देवाने पहिले मानवी जोडपे एदेनच्या सुंदर नंदनवनात निर्माण केले तेव्हा ते केवढे आनंदी अभय असावेत बरे! आजार, भय, चिंता नाही. आनंदी पक्षी व जनावरे होती, व रूचकर अन्न यथेच्छ होते. (उत्पत्ती १:२६; २:७-९) कालांतराने एक अदृश्य शत्रू दृश्यात आला. एक शक्तीमान आत्मिक प्राणी धोरणी, भावी मानवी कुटुंबावर नियंत्रण ठेवण्याच्या लोभाने जडला. पहिली लबाडी नोंदवून त्याने हव्वेस व आदामाला देवाची आज्ञा मना केलेले फळ खाऊ नये त्यास उल्लंघन करण्यास लावून फसविले. (उत्पत्ति ३:१-७) आजच्या पुष्कळ लोकांप्रमाणे पहिल्या मानवाने विचार केला की ‘ते त्यांच्या स्वतःच्या गोष्टी करू शकतात.’ परंतु असे करण्याने ते स्वतःस सैतान जो या युगाचा देव आहे त्याच्या नियंत्रणाखाली स्वतःस अक्षरशः आणतात.—२ करिंथकर ४:४.
याने प्रचंड व महत्त्वपूर्ण विवाद निर्माण केला: मानव देवाविना यशस्वीपणे स्वतः सत्ता गाजवू शकतो का? हा प्रश्न समाधानकारकपणे सोडविण्यासाठी वेळेची आवश्यकता लागणार होती. मध्यंतरीच्या काळात, आदाम व हव्वेस देवाने सांगितलेली शिक्षा—मृत्यु—भोगावी लागली. ते पापाची संतती बनल्यामुळे ते किंवा त्यांच्या संततीला देवापासून मुक्त राहून चिरकालीक जीवनाचे कोणतेच भवितव्य राहिले नव्हते.—रोमकर ५:१२; १ करिंथकर १५:२१, २२.
गौरवी भवितव्य
आदामाच्या दिवसापासून आतापर्यंत पुष्कळ पिढ्या आल्या व गेल्या. मानवाच्या बदलत्या घटनात, पुष्कळ मानवी सरकारांनी—एकसूत्री राजकारण, लोकशाही, समाजवाद, नास्तिकवाद व इतर प्रकारांनी प्रयत्न केला. परंतु सर्व निष्फळ ठरली. राजकीय सामाजिक व आंतरराष्ट्रीय समस्या द्विगुणीत होत आहेत, एकत्र नाशाची चित्तथरारक अस्रे जगाच्या आत्महत्येची धमकी देऊन आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान पाश्चिमात्य राजकारणी लोकांनी वचन दिले की विजयश्री उणीव व भयापासूनची मुक्तता आणवील पण दोन्हींची वाढ होत आहे.
पर्याय काय आहे? प्रचंड समस्येला अवाढव्य उपायाची गरज आहे—गोलार्धिक शुद्धी व नवीन जग आणणे यापेक्षा काही कमी नाही. कोण याची प्रस्थापना करू शकतो? निश्चितच, संयुक्त राष्ट्र संघ किंवा इतर कोणत्याही संमिश्र राजकीय सत्ता ज्या स्वाक्षऱ्या सुकण्यापूर्वीच शांती तह मोडतात त्या आणणार नाहीत! ते केवळ सैतानी सत्तेच्या खालील असाह्य प्यादे आहेत. (१ योहान ५:१९) केवळ सर्वसमर्थ यहोवा, सैतान व त्याच्या दुरात्म्यापासून मोकळीक देऊ शकतो, सध्याच्या दूषित जगाचा नाश व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, राज्यांचा राजा याच्या वर्चस्वाखालील स्वर्गिय राज्य गौरवयुक्त नविन ते आणू शकतो.—मत्त ६:९, १०; दानिएल २:४४; प्रकटीकरण २०:१-३.
हे राज्य काय सिध्दीस नेईल? नाशकारक गोलार्धीक शुद्धतेतून किंवा आर्मगिद्दोन मधून कोण बचावतील? चित्तवेधक वस्तुस्थीती ही आहे की अधीकाधीक लोक हे स्वर्गीय सरकार कार्यान्वित आहे व आर्मगिद्दोनातून बचावण्यासाठी लोकांची तयारी करीत आहे हे जाणण्याप्रत येत आहेत! (प्रकटीकरण १६:१४-१६) त्यांनी कोणत्या प्रकारचे लोक असावे? येशू ख्रिस्त म्हणाला होता: “सौम्य मनोवृत्तीचे [नम्र] ते धन्य, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.” (मत्तय ५:५) अशा रितीने त्याने ह्या पुरातन भविष्यवादाची खात्री दिली: “यहोवाचा क्रोधदिन तुम्हावर येण्यापूर्वी ताळ्यावर या; त्याच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो, पृथ्वीवरील सर्व नम्र जनांनो, यहोवाचा शोध करा. त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचीत यहोवाच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”—सफन्या २:२, ३.
देवास विश्वासू राहण्याद्वारे नम्रजनच केवळ आर्मगिद्दोनातून बचावतील असे नाही तर त्यांना सार्वकालीक जीवनाचे वतन मिळेल. ते कसे? अगोदरच निदर्शित केल्याप्रमाणे आदामाच्या विशाल कुटुंबाच्या वंशजानी त्याच्या पापी अवज्ञाकारीपणामुळे सार्वकालीक जीवनांचे भवितव्य गमावले. सर्व मानवजातीवर आदामाच्या द्वारे मृत्यु ओढावला. तो पूर्ण मनुष्य होता हे पहाता, खंडणीद्वारे म्हणून आदामाने जे गमावले ते पुन्हा विकत घेण्यासाठी अजून एका पूर्ण मनुष्याची गरज होती. येशू ख्रिस्ताने ती गरज भरून काढली व त्याचे जीवन दिले. “जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.
खंडणीची तरतूद ही देवाकडील मानवास महान देणगी आहे. जे बचावून नवीन जगात जातील त्यांनाच नव्हे तर मरणावस्थेतून मागे परततील त्यांनाही लागू होईल. हे खूपच विलोभनीय वाटते का? येशू म्हणाला: “ह्या विषयी आश्चर्य करू नका की स्मृती कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील. ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरूत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरूत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” ते केवढे शिरशिरी भरविणारे आहे! आर्मगिद्दोनातून बचावणाऱ्यासाठी हा केवढा हर्ष असेल की त्यांना त्यांच्या प्रियजनांना मरणातून परत येताना सहर्ष स्वागत करणे शक्य होईल!—योहान ५:२८, २९.
केवढे महान भवितव्य व आशा! हे सर्व काही प्रेमळ निर्माणकर्ता यहोवाने त्याचा प्रिय पुत्र येशू मार्फत पुरविले. सध्या भवितव्य फारच अंधकारमय व भयंकर असताही पवित्र शास्त्राचा अभ्यास करून व त्याच्या उत्साही संदेशानुरूप कृती करतात त्यांच्यासाठी भवितव्य फारच उज्वल व आशादायक आहे. आम्ही चित्तथरारक समयात जगत आहोत. देवाचे राज्य नजीक आहे. (मत्तय २४:३३, ३४) “प्रत्येक उत्तम देणगी व पूर्ण दान” देणाऱ्या यहोवाची स्तुती गा!—याकोब १:१७.
तुम्ही देवाच्या तरतुदी व उद्देशाकडून आम्हास मिळणाऱ्या पुष्कळ फायद्याच्या मार्गावर विचार कराल तसे तुम्हास कृतादायत्वाची अस्सल जाणीव कोणा ना कोणा मार्गी प्रदर्शित करण्याची इच्छा होईल. परंतु तुम्ही खरी आशा समजावून घेणारे व स्विकारणारे असाल तर तुम्हास अधिक खोलवर खणण्याच्या गरजेची जाणीव होईल. तेच करण्यास आम्ही तुम्हाला उत्तेजन देतो. देवाच्या वचनाचा या सारख्या प्रकाशनासोबत जे तुम्हास तुमचे ज्ञान व देवाच्या गौरवयुक्त उद्देशावरील रसिकता वाढविल त्याजसोबत अभ्यास करा.
ज्यांना स्पष्ट खात्री झाली आहे की देवाचे राज्यच केवळ मानवजातीच्या अनर्थाचा पर्याय आहे त्यांना प्रेरित स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटेल, जो म्हणाला: “यहोवाने मजवर केलेल्या उपकारांचा मी कसा उतराई होऊ?” (स्तेत्रसंहिता ११६:१२) अशा व्यक्तींना देवाने आम्हासाठी काय केले व जे त्याजवर प्रेम व त्याची सेवा करतात त्यांच्यासाठी त्याने कोणते भवितव्य राखले आहे त्याजविषयी इतरांना सांगणे त्यांना अस्सल समाधान व खरा आनंद वाटेल. का? कारण येशूने म्हटले त्याप्रमाणे: “घेण्यापेक्षा देणे ह्यात अधिक धन्यता आहे.”—प्रे. कृत्ये २०:३५.
[५ पानावरील चौकट]
येशू ख्रिस्त—
◆ पुष्कळ पुरातन भविष्यवादांची त्याने पूर्णता केली, उदाहरणासाठी मीखा ५:२; मत्तय २:३-६
◆ उत्पत्तीतील मानवाच्या मुळारंभीच्या आहवालास पुष्टी दिली—मत्तय १९:३-६
◆ पवित्रशास्त्राचा मुख्य विषय, राज्याच्या द्वारे यहोवाचे गौरव यांस जाहीर व घोषित केले—मत्तय ४:२३; ६:९, १०; लूक ८:९
◆ आदामाने गमावले त्याची भरपाई केली. अव्यंग मानवी जीवन ज्यामुळे त्याजवर विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालीक जीवन प्राप्त करणे शक्य झाले—योहान ३:१६
[७ पानांवरील चित्रं]
‘यहोवाने तुम्हावर केलेल्या उपकारांचे तुम्ही कसे उतराई व्हाल?’