येशूचे जीवन व उपाध्यपण
शब्बाथ दिवशी चांगले कामे करणे
हा इ.स. ३१च्या वसंत ऋतु आहे, आणि यहुदीया पासून गालीलात जाताना शोमरोनातील विहीरीजवळ येशू एका स्त्रीसोबत बोलत होता त्या घटनेला काही महिने लोटली आहेत.
आता गालीलमधील विस्तृत प्रमाणाचे शिक्षण कार्य संपवून येशू परत यहुदीयास जाण्यास निघतो, तेथे तो सभास्थानात प्रचार करतो. त्याच्या गालीलातील सेवेची तुलना पाहता, यहुदीयातील या भेटीचा आणि पूर्वीच्या वल्हांडणाच्या काही महिन्यातील हालचालीची थोडी माहिती पवित्रशास्त्र सांगते. प्रत्यक्षात त्याच्या कार्याला जसा गालीलमध्ये प्रतिसाद मिळाला तसा यहुदीयात मिळाला नाही.
आता लवकरच इ.स. ३१च्या वल्हांडणासाठी येशू यहुदीयाच्या प्रमुख शहरात, यरूशलेमेत आलेला आहे. येथे शहराच्या मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. त्याला बेथसेदा म्हणतात. येथे रोगी, अंधळे, लंगडे-लुळे यांचा मोठा लोकसमुदाय असे. त्या तळ्यातील पाणी हलल्यानंतर जो प्रथम त्या पाण्यात उतरेल त्याचा रोग बरा होई असा त्या लोकांचा विश्वास होता.
हा शब्बाथ आहे, आणि ३८ वर्षे आजारी असलेल्या कोणा एका माणसास त्या तळ्याजवळ येशू पाहतो. तो त्या आजारात बराच काळ पडून आहे हे ओळखून येशू त्यास म्हणतो—“तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”
“महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही.” तो म्हणतो. “मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो.”
येशू त्याला म्हणतो. “उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” आणि लागलीच तो माणून बरा होतो व आपली बाज घेऊन चालू लागतो!
पण यहुदी त्या माणसास पाहतात व म्हणतात: “आज शब्बाथ आहे, आणि बाज उचलणे तुला योग्य नाही.”
तो मनुष्य त्यांना उत्तर देतो: “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, ‘आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.’”
“‘आपली बाज उचलून चाल,’ असे ज्याने तुला सांगितले तो माणूस कोण आहे?” असे ते विचारतात. त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू तेथून निसटतो. आणि त्या बऱ्या झालेल्या माणसास येशूचे नाव माहीत नसते. नंतर, येशू व तो माणूस मंदिरात भेटतात व आपणास कोणी बरे केले आहे हे त्यास समजते.
तो बरा झालेला माणूस जाऊन यहुद्यांना सांगतो की ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे. हे समजल्यावर यहुदी येशूकडे जातात. कोणत्या कारणासाठी बरे? कोणत्या अर्थाने तो अशी चांगली कामे करीत होता हे समजून घेण्यासाठी ते गेले का? नाही. तर त्याच्या चुका दाखविण्यासाठी, कारण त्याने ही कामे शब्बाथ दिवशी केली होती. आणि ते त्याचा छळ करावयास पाहू लागले! लूक ४:४४; योहान ५:१-१६.
◆ येशूची यहुदीयास शेवटची भेट होऊन किती काळ लोटला होता?
◆ बेथसेदा हे तळे इतके प्रसिद्ध का होते?
◆ त्या तळ्याजवळ येशूने कोणता चमत्कार केला, आणि यहुद्यांचा प्रतिसाद कोणता होता?