दैवी सुज्ञतेचा एक नवा पैलू
“देव मोशास म्हणाला: ‘मी जो असावयाचा तोच असणार’ त्याने पुष्टी जोडली: ‘तू इस्राएल लोकास जाऊन सांग की ‘मी असाणार त्याने मला तुम्हाकडे पाठविले आहे.’” (निर्गम ३:१४) यहोवाने मोशेस स्पष्ट केले की यापूर्वी त्याच्या सेवकांना त्याच्या नावाचे महत्व पूर्णपणे समजू शकले नाही. तो उद्देशपूर्ण व स्वतःच्या इच्छा पूर्ण करणारा देव आहे. परिस्थीतीच्या गरजेनुसार, उद्देश सफल करण्यासाठी तो आपल्या पद्धतीत फेरफार करवितो. एवढा तो सुज्ञ आहे!
देवाच्या नावाचा अर्थ काय ह्याविषयी सैतानाने स्वतः आस्था प्रदर्शित केली नाही. त्यास एदेन बागेतील जीवनी वृक्षाविषयी माहिती होती हे दिसते. त्याने आदाम व हव्वेस त्याप्रत निरविले असते तर कदाचित यहोवास अशावेळी, त्यांनी पाप याचा अर्थ मरण याबाबत त्याने स्वतःचा शब्द पाळावा की जीवनी वृक्षासंबंधीचा शब्द पाळावा अशा पेचात पकडण्यात आल्याचा भास निर्माण झाला असता. (उत्पत्ती २:९; ३:१–६) तरीपण प्रत्येक घटनेत, सैतानास घोर निराशाच मिळणार होती.
आता, देव त्याच्या आत्मिक पुत्रांना ज्ञात नसलेल्या व त्यांना प्रकट न केलेल्या सुज्ञतेचे प्रदर्शन घडवू लागला. (तुलना करा इफिसकर ३:१०.) ही पृथ्वी आनंदी व एकनिष्ठ मानवाने भरून कायम स्वरूपात नंदनवनात रहावी, हा सार्वकालीक उद्देश पूर्ण करण्याची क्षमता असलेली त्याची सुज्ञता कांही कालावधीनंतर प्रदर्शित केली जाईल अशा घोषणांची व घटनांची देवाने एक मालिका सुरु केली. (उत्पत्ती १:२७, २८) वेळोवेळी सैतानाच्या हस्तक्षेपास देव निरर्थक ठरविणार होता.
रहस्यमय पवित्रतेचे गुज स्पष्ट होते
त्या पहिल्याच बंडखोरीनंतर लागलेच, देवाने हालचाल केली. दोषी दांपत्यासाठी व त्यांच्यावर अवज्ञाकारीपणाबद्दल पूर्व घोषित मृत्युदंडाची शिक्षा बजावण्यासाठी देवाने सभा बोलावली. आता आदाम हव्वेने जीवनी वृक्षापासून खाण्याबाबत काय? “यहोवा देव पुढे म्हणाला: ‘पहा, मानवाला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातील एकासमान झाला आहे, तर तो आपला हात जीवनीवृक्षाला लावून त्याचेही फळ काढून कदाचीत खाईल व सर्वकाळ जिवंत राहील, म्हणून यहोवा देवाने त्यास एदेन बागेतून बाहेर काढून लाविले.”—उत्पत्ती ३:१७–२३.
याच समयी देवाने सुवार्तिकाची भूमिका पार पाडली. त्याने पहिला भविष्यवाद विदीत केला: “यहोवा देव सर्पास म्हणाला: . . . ‘तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील.” (उत्पत्ती ३:१४, १५) कैक शतकानंतर प्रेषित पौलाने स्पष्ट केले: “[मानवी] सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्या मुळे.”—रोमकर ८:२०.
होय, यानंतर आदामाच्या वारशामुळे मनुष्य निराधारपणे मृत्युच्या बंधनात जखडला जाणार होता, परंतु आदामाच्या आज्ञाधारक संततीच्या मुक्ततेची व पुनर्स्थापनेच्या उद्देशाची देव घोषणा करीत होता. तथापि, या ‘आशेचा आधार’ काय होता? तो मानवाची मुक्तता करून सुद्धा पापाचे शासन मृत्यु दंड याला कशाप्रकारे उचलून धरणार होता? हीच ती देवाची गुप्त सुज्ञता होय; ज्यात ‘युगानयुग पिढ्यानपिढ्या’ पासून गुप्त ठेवलेल्या रहस्यांचा समावेश होता. (कलसैकर १:२६; १ करिंथ. २:७, ८) प्राचीन काळातील विश्वासू जन ते रहस्य समजू शकले नाहीत तरी सुद्धा देव त्यांची सुटका कशी तरी करणार ही त्यांची आशा होती. एवढेच काय परंतु देवदूत सुद्धा यहोवा त्याचा उद्देश कसा सफल करणार हे जाणून घेण्यास उत्सुक होते! (१ पेत्र १:१०–१२) तुम्ही हे पवित्र गुज जाणले आहे का?
खंडणीद्वारा मुक्तता
क्रमाक्रमाने अनेक शतकापासून यहोवाने त्याच्या मूळ उद्देशास अनुसरून माहिती पुरविली. विश्वासू अब्राहामास त्याने अभिवचन दिले की त्याच्या एका संततीद्वारा सर्व विश्वासू मानवजातीस आशीर्वादीत केले जाईल. (उत्पत्ती २२:१५–१८) याकोबाद्वारे त्याने हे प्रकट केले की यहुदा वंशातून येणारे एक संतान राजा बनेल. (उत्पती ४९:१०) या वेळेपावेतो, देवभिरू लोकांनी मृतांच्या पुनरूत्थानावर ते कसे घडून येईल हे जाणून नव्हते तरी विश्वास ठेवला होता. (इयोब १४:१४; इब्रीकर ११:१९) सरतेशेवटी देवाने दाविदास अभिवचन देताना म्हटले की येणारा राजा मसिहा दाविदाच्या वंशज असून निरंतर राज्य चालवील.—२ शमुवेल ७:१६.
प्रत्येक संदेष्ट्याने या पवित्र गुजाच्या प्रकटीकरणात थोडा थोडा हातभार लाविला, तरी या लोकांना त्याचे पूर्ण चित्र समजू शकले नाही. अखेरीस मसिहा प्रकट होण्याची वेळ आली, आणि नंतर देवाची ही दिर्घकाळची आश्चर्यकारक सुज्ञता अगदीच स्पष्ट झाली. ती येशू ख्रिस्त व त्याचे मानवी जीवन मानवासाठी जुळत्या खंडणी दाखल दिले जाणार या भोवती केंद्रीत होती. याच मुलभूत आधारावर यहोवाचे उर्वरित उद्देश राज्याद्वारे पुढे सफल होतील. तुम्हाला ही खंडणी समजते का?
रोमकरच्या ५ व ६ अध्यायामध्ये पौल त्याचे उत्तम प्रकारे स्पष्टीकरण देतो. रोमकर ५:१२ मध्ये तो आमच्या अनुवंशिक पाप व मरणाची स्पष्टता देतो. तो पुढे असे दर्शवितो की परिपूर्ण आदामाकरवीच्या एका पापाचा त्याच्या संततीच्या जीवनाचे मोल घालविण्यात झालेला परिणाम दुसऱ्या परिपूर्ण मानवी जीवनाकरवी कसा समतोल होऊ शकतो. ते जीवन “येशू ख्रिस्त या मनुष्याचे” असल्याचे सिद्ध झाले. (वचने १५–२१; पहा १ तिमथ्यी २:५, ६) ही खंडणी येशू ख्रिस्तच का पुरवू शकला? कारण तो देवाचा पुत्र असल्यामुळे येशू “निर्दोष, निर्मळ, एकनिष्ठ व पापी जनापासून वेगळा होता.” (इब्रीकर ७:२६; लूक १:३२, ३३) येशूच्या जन्माची घटना कशी घडली याचे वर्णन करण्याची गरज नाही. गाब्रिएल देवदूताने येशूची आई मरिया व आम्हास खात्री पुरविली की देवास काहीच अशक्य नाही. (लूक १:३७) याकरता, येशू आदामाच्या वंशातील एका स्त्री पासून जन्मला असला तरी तो देवाचा पुत्र,—वास्तविकतेतील एक परिपूर्ण मनुष्य होता. त्याचे रक्त किंवा जीवन, इस्राएली अहरोनाच्या याजक परंपरेने यरूशलेमेतील मंदीरात अर्पिलेल्या असंख्य प्राणीमात्राच्या रक्तापेक्षा अति उच्च कोटीतील होते. तो “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” होता.—योहान १:२९, ३:१६.
येशूच्या द्वारे ही योजना करून देव स्वतः न्यायी ठरू शकला असता का? त्याने तिसऱ्या दिवशी आपल्या पुत्रास मृतातून जीवनात उठविले, तर दिलेल्या खंडणीचे काय होणार होते? पौल आम्हास हमी पुरवितो की देव न्यायी आहे. त्याचे तर्कशुद्ध विचार पहा: “देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चीत होण्यास देवाने त्याला पुढे ठेविले, ह्यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले न्यायत्व व्यक्त करावे (याच्या आधारावर देवाने मानवजातीची गत पापे काढून टाकली)—म्हणजे आपले न्यायत्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे.” (रोमकर ३:२४–२६, ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन) आता याचा अर्थ काय? येशू एक परिपूर्ण, रक्त मांसलमय मनुष्य, वास्तवकितेत मनुष्य यानाते अक्षरशः मेला व मनुष्य यानाते कायम स्वरूपात मृतवत्च राहीला. तो मेला “त्याने स्वतःस अर्पिले ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे.” (इब्रीकर ७:२७) यास्तव खंडणी नियमानुसार योग्य ठरली. येशू देहात मारला गेला पण तिसऱ्या दिवशी “आत्म्यात जिवंत” केला गेला—१ पेत्र ३:१८.
नवा करार व नवी उत्पत्ती
आता आम्ही गुप्त रहस्याच्या उच्चत्तम भागाकडे लक्ष देवू. येशूच्या मरणापावेतोच्या विश्वासूपणामुळे, तो यहोवाचा प्रमुख याजक व राजा बनण्यास पात्र ठरतो. त्याच्या सांडलेल्या रक्तामुळे, तो एक नविन करार प्रस्थापित करतो. या नव्या करारामुळे स्वर्गात त्याजबरोबर सहयाजक व सह वारिस म्हणून सहकारी उत्पादीत केले जातात. (प्रकटीकरण ५:९, १०; २०:४, ६) ते एक नवे राष्ट्र बनतात, “एक नवी उत्पत्ती” व हीच ती विशेष घटना होय!—गलतीकर ६:१५, १६.
विचार करा: ख्रिस्त येशूद्वारा देव मानवजातीतून पुरुष व स्त्री असे निवडक सदस्य निवडून घेतो. तो त्यांना अधिकृतपणे नीतिमान ठरवू शकतो व त्याचे आध्यात्मिक पुत्र बनण्याची हाक देतो. त्यांच्या मृत्युनंतर देवाच्या नेमस्त समयी, तो त्यांना पुनरूत्थीत करून येशूस दिल्याप्रमाणे त्यांनाही अमरत्व बहाल करतो. (१ पेत्र १:३, ४) त्याच्या नव्या उत्पत्तीवर व यांच्या एकनिष्ठेबाबत त्यास केवढा आत्मविश्वास आहे! यहोवासमोर त्यांचेवर खोटा आरोप करणाऱ्यास हे केवढे समर्पक उत्तर आहे! (प्रकटीकरण १२:१०) ख्रिस्त येशूप्रमाणे अमरत्व लाभलेले ते यहोवास कदापि बेइमान होणार नाहीत. परंतु हे एवढेच नाही.
नंदनवन रूपी पृथ्वी
ख्रिस्त येशू, त्याच्या स्वर्गिय सह–याजक व राजे यांचे सोबत मानव व पृथ्वीसंबंधीचा यहोवाचा उद्देश त्याच्या हजार वर्षिय राज्य कारकीर्दीत सफल केला जात आहे हे निक्षून पाहतील. खंडणीच्या मोलाचे फायदे उपयोगात आणून, येशू मृतांचे पुनरूत्थान करून त्यांचेतील विश्वासू जनास व सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंतास बचावून रहाणाऱ्यांना मानवी परिपूर्णतेस पोहंचवील. त्याचसमयी, या पृथ्वीस नंदनवन बनविले जाईल. त्यावेळी सैतानाच्या भ्रष्टावण्याच्या अंतिम प्रयत्नात जे बळी पडणार नाहीत त्यांना चिरकालीक स्वरूपाचे पूर्णत्वातील जीवन बहाल केले जाईल. सैतान व त्याच्या संपूर्ण दुष्ट समुहाचा पूर्णपणे नाश केला जाईल. शांतता व ऐक्यता सर्व निर्मितीत वर्चस्व प्राप्त करून यहोवाच्या सार्वभौमत्वास व त्याच्या प्रेमळ अधिपत्यास गौरवील. देवदूत व मानव दोहोंनी मिळून त्यांच्या निर्माणकर्त्या देवास एकनिष्ठ प्रीति प्रदर्शित केलेली असेल—प्रकटीकरण २०वा अध्याय.
आता आम्ही पवित्र गुजास चांगल्या प्रकारे समजू शकतो. आता आम्ही निर्मितीतील वनस्पती व प्राण्यांच्या जगतावर मात करते अशी यहोवाची सुज्ञता पाहू शकतो. यामुळेच आम्ही उल्हासाने उद्गारतो: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आहेत . . . कारण सर्व कांही त्याच्या पासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.”—रोमकर ११:३३–३६.
[७ पानांवरील चित्रं]
परिपूर्ण आदामाच्या एका पापाचा परिणाम व त्याने गमाविलेल्या जीवनाचे समतुल्य होऊ शकते. कसे? आणखीन एका परिपूर्ण मानवी जीवनाद्वारे ते म्हणजे येशूचे