देवाचे सूज्ञान तुम्ही ते पाहू शकता का?
प्राचीन काळातील राजदरबाराचे दृश्य नजरेसमोर आणा. पहा, सुशोभित अशा सिंहासनावर राजेशाही पोशाख परिधान करून सम्राट विराजमान झालेला आहे. तो, संपत्तीसाठी केवळ नव्हे तर त्याच्या सूज्ञतेविषयी विशेष नावाजलेला आहे. त्याच्या दरबारातील सेवक सुव्यवस्थीत रित्या संघटीत केलेले आहेत. हे अतिविलोभनिय दृश्य अचंबित करते. हा पहा: राजा शलमोन!—१ राजे १०:१–९, १८–२०.
आता, थोर शिक्षक म्हणून नावाजलेला मनुष्य येशू ख्रिस्त याचे ऐका: “वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील भूकमळापासून शिका; ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कांतीत नाहीत; तरी मी तुम्हास सांगतो, शलमोन देखील आपल्या वैभवात त्यातल्या एका सारखा सजला नव्हता.”—मत्तय ६:२८, २९.
येशूच्या असे म्हणण्याचा अर्थ काय होत होता? अर्थातच, तो भौतिकवादी होऊ नये असा सल्ला देत होता. तथापि शलमोनाच्या बाबतीत त्याने उद्गारिलेले शब्द शब्दशः खरे ठरू शकत होते का? येशूने जीवनातील वास्तव्यतेची उदाहरणे उपयोगात आणिली हे ध्यानात घ्या. शलमोनाचे कुशल कारागीर अति निपूण व कल्पक होते तरी मिश्रीत रंगाचे व उत्कृष्ट पद्धतीच्या “शेतातील उमललेल्या भूकमल” प्रतिकृती त्याच्या नैसर्गिक दृश्यतेत सादर करू शकले नाहीत.
यहोवाचे सूज्ञान प्रकट होते
फुलाचे सहजसुलभतेने केलेले परिक्षण तुम्हास येशूच्या शब्दासोबत सहमत होण्यास भाग पाडते. येशू कसल्या प्रकारच्या भूकमळाचे त्या वेळी वर्णन करीत होता हे आम्हास ज्ञात नाही. भूतलावर अनेक प्रकारची फुले आहेत. भूकमल, गुलाब व ऑर्चिड यापैकी कोणत्याही फुलाकडे काळजीपूर्वक पहा. पाकळ्यांची घडण, पाने व फुलांच्या इतर अवयवात किती उत्कृष्ट प्रकारच्या रंगाचे मिश्रण व गुंतागुतीची घडण तुम्हास पहावयास मिळते. अशाप्रकारच्या अतिसुंदर हस्तकृतिच्या मागे एक अतिसूज्ञ व कल्पक निर्माता असल्याचा स्पष्ट व भक्कम पुरावा तुम्हास दिसत नाही का? आमच्या नेत्रांना त्यांचे सौंदर्यच केवळ प्रकट होत नाही तर जो श्वास आम्ही घेतो त्यात त्यांचा सुगंधहि नाकपुड्यांना जाणवतो.
प्रेषित पौलाने निरिक्षण करताना लिहिले की, देवाचे “अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून स्पष्ट होतात.” (रोमकर १:२०) तथापि पृथ्वीस सुशोभित करण्यासाठी देवाने फुलापेक्षा इतरहि काही निर्माण केले, असंख्य झाडे झुडपे बनविली; ज्यांच्यापासून एक सुंदर हरित राज्य बनते. यु. एस. ए. तील कॅलीफोर्नियामधील हॅम्बोलट या, या राष्ट्रीय उद्यानाला तुम्ही भेट दिली तर तुम्हांस अति उंच असा रेडवुड नावाचा वृक्ष जो जगभरात सर्वात उंच मानला जातो तो दिसेल. त्याच्या बुंध्याजवळ उभे राहून त्याच्या ३६० फुटाहून (११० मीटर) अधिक असलेल्या उंचीचे परिक्षण कराल तर अशा प्रकारची झाडे कशी तयार करावयाची त्या निर्मात्याची शांत वृत्तीने स्तुती करणार नाही का?
प्राण्यांची उपजत सूज्ञता
भूपृष्ठावर व जलाशयात लहान मोठे प्राणी आहेत जे आम्हास देवाच्या सुज्ञतेने प्रभावीत करतात. प्रत्येक प्राणी देवाचा काही ना काही उद्देश सफल करतो हे उघड आहे. ज्ञानी राजा शलमोन सुचवितो की: “अरे आळश्या मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो.” (नीतीसूत्रे ६:६) मुंगीचे अवलोकन करणारे तिच्या साठा करण्याच्या क्षमतेचे कौतुक करतात. मुंग्या एकटेपणा पसंत करीत नाहीत; त्या संघटीतपणे राहतात. त्यापैकी कांही शेतकरी आहेत ज्या धान्याची जमवाजमव करतात. उष्ण प्रदेशात पानांचे तुकडे तुकडे करून ते वाहून नेणाऱ्या मुंग्या आढळून येतात. हे सर्व करण्याचे त्यांना कसे समजते? नीतीसूत्रे पुस्तकाचा एक लेखक अगुर याचे उत्तर पुरविताना म्हणतो की मुंग्या ह्या ‘उपजतच सुज्ञ’ असतात. त्यांना तसे कोणी बनविले? आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्त्या यहोवाने.—नीतीसूत्रे ३०:२४, २५.
हाये, प्राणीमात्रांची निर्मिती ही सूज्ञतेच्या उपजत गुणाने झालेली आहे. हे पक्षांच्या स्थलांतराबाबतीत स्पष्ट दिसते. कैपिस्टॉन स्वॅलेज पक्षाच्या स्थलांतराबाबत कदाचीत तुम्ही ऐकले असेल. प्रतिवर्षी ठराविक वेळेत, दक्षिण अमेरिकेतून थंडीच्या आगमन समयी यु. एस. ए च्या कॅलीफोर्निया मधील सॅन ज्युआन येथे हजारो मैलाच्या स्थलांतरीत प्रवासास सुरुवात करतात. अचूकपणे व उपजत सुज्ञतेने मार्च मध्ये ठराविक ठिकाणी विशिष्ट समयीच पोहंचतात.
अफाट जलाशयाबाबत स्तोत्रकर्ता लिहितो: ‘हे यहोवा, तुझी कृत्ये किती अगणित आहेत! ती सर्व तू चातुर्यांनी केली; तुझ्या निर्मितीने पृथ्वी परिपूर्ण आहे. तो पलीकडचा समुद्र पहा, तो अफाट व विस्तीर्ण आहे, त्यात लहान मोठे असंख्य जलचर विहार करतात.” (स्तोत्रसंहिता १०४:२४, २५) अति लहान मिनोज माश्यापासून ते मोठ्या व्हेल माशांच्या आकृतीत व हालचालीत इश्वरी सुज्ञता पहावयास मिळते.
भूतलावरील देवाच्या निर्मितीतील शिरोभूषण म्हणजे स्वतः मनुष्य होय, हाच तो प्राणी स्वयंभूपणे किंवा उपजत सुज्ञतेने हालचाल करीत नाही. देवासमान अनेकप्रकारे असण्याची त्याच्या जवळ क्षमता होती, तो आश्चर्यजनक व भयावह पद्धतीने बनविला गेला हे किती सत्य आहे! आम्ही वैद्यकिय क्षेत्रातील शास्त्रज्ञ नसलो तरी त्यांच्या निष्कर्षांचे वाचन करून त्यांचे निष्कर्ष प्रेरित लेखकाप्रमाणेच आहेत हे बघू शकतो. मनुष्याच्या शरीरातच देवाच्या निर्मिती कार्याचा पुरावा आश्चर्यजनक आहे.—स्तोत्र संहिता १३९:१४.
यहोवाची स्वर्गीय सुज्ञता
स्तोत्रसंहिता १९:१ वर्णिते की आकाश देवाचा महिमा वर्णिते. हे केवढे सत्य आहे! स्तोत्रकर्त्या दाविदाजवळ दुर टप्प्याच्या दुर्बिण नव्हत्या की इलेक्ट्रॉनिक साहित्य नव्हते, तरी तो जे पाहू शकत होता त्याजविषयी त्याला नितांत आदर होता. आज, तारागंण व ग्रहमा लिका, आकाशगंगेविषयी सर्वसाधारणपणे प्रत्येक मनुष्यास दाविदापेक्षा अधिक ज्ञान आहे. अमर्याद अशा अंतराळात अजूनही ज्ञात नाहीत अशा पुष्कळ आकाशगंगा आहेत हेही तो जाणून आहे. थोर व अतुलनिय अशा कारागीराची सुज्ञता पाहून व विचार करून तुम्हास कसे वाटते? तुम्ही नितांत आदराने हेच म्हणाल का: “तो अतर्क्य महत्कृत्ये, अगणित अद्र्भित कृत्य करतो”? तुम्ही म्हटले पाहिजे.—इयोब ९:१०.
वर्णन करता येणार नाही इतक्या फार पुरातन काळी यहोवाने त्याच्या निर्मितीची सुरुवात केली, प्रारंभी त्याचा एकुलता एक पुत्र, तद्नंतर त्याने आत्मिक निर्मिती केली, त्या पाठोपाठ भौतिक विश्व निर्मित केले. सर्वकांही शांततामय व सुसंघटीत होते. पृथ्वीचा पाया घातला गेला तेव्हा देवाच्या दूत पुत्रांनी मोठ्या रसिकपूर्णतेने जयजयकार केला! (इयोब ३८:४–७) पुरुष व स्त्री यांना निर्माण करून परिपूर्ण बागेत ठेवण्यात आले. परंतु एक धक्कादायक घटना घडून आली. अदृश्य क्षेत्रातून एका आवाजाने सर्पाद्वारा, थोर उत्पन्नकर्त्याची निंदा केली. यहोवा आपल्या सार्वभौमत्वाचा गैरवापर करीत असल्याचा त्याने आरोप केला, त्याने देवास लबाड म्हटले. यास्तव आवाजधाऱ्या त्या व्यक्तीस दुष्ट प्रवृती प्रदर्शित करणारी नावे दियाबल, सैतान, सर्प म्हणून देण्यात आली. आता सर्वसूज्ञ देव काय करणार? तो काय करू शकला असता? शलमोनाच्या वैभवास फिके करणाऱ्या कल्पकतेपेक्षा एका निराळ्या प्रकारच्या सुज्ञतेची आता आवश्यकता आहे.—उत्पत्ती ३:१–५.
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
सर्वात लहान मीनोस मासे ते व्हेल मासे यांच्या आकृतीमध्ये व हालचालीत इश्वरी सुज्ञता पहावयास मिळते.