वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ४/१ पृ. ३२
  • अनपेक्षित जागी आढळलेले सत्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनपेक्षित जागी आढळलेले सत्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ४/१ पृ. ३२

अनपेक्षित जागी आढळलेले सत्य

यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात हार्टफोर्ड, कोनेक्टीकट येथील एका माणसाकडून पुढील पत्र आले होते:

महोदय,

सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे छोटेसे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी छापले आहे का ते मला जाणून घ्यायचे आहे. हे पुस्तक कोणत्या पंथाचे आहे ते मला कृपया पत्राने लिहून कळवा. हे मला जाणण्याची उत्कट इच्छा याकरता झाली की, मी एके दिवशी हार्टफोर्डच्या रस्त्यावरून सकाळी जात होतो तेव्हा हे छोटेसे पुस्तक कचऱ्‍याच्या ढिगाऱ्‍यात पडलेले मला दिसले. त्याच्या शिर्षकाने माझे ध्यान खेचून घेतले . . .

मी कॅथोलिक आहे व हाच धर्म मला माझ्या पालकांनी शिकविला. पण प्रत्यक्षात माझा विवेक मला तशी संमति देत नाही. मला सापडलेल्या पुस्तकात जे आढळले त्यामुळे मी कितीतरी वर्षापासून ज्याच्या शोधात होतो ते म्हणजे सत्य मला मिळाले आहे असे मला वाटते. पण हे मला कचऱ्‍याच्या ढिगाऱ्‍यात सकाळी ९ वाजता आढळले. हे पुस्तक ज्या पंथाचे आहे त्याच्या हार्टफोर्ड येथील चर्चचा पत्ता मला कृपया पाठवावा. तुम्हाला नवे वर्ष सुखाचे जावो.

तुमचा,

ए. सी. जी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा