जागतिक सुरक्षिततेआधी पृथ्वीवर घडलेला सर्वथोर पुत्रजन्म
“आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील.”—यशया ९:६.
१. जागतिक सुरक्षितता ही कोणाच्या वर्चस्वाधीन खात्रीची आहे व हे आम्ही कसे जाणतो?
जागतिक सुरक्षितता! “या जगाचा अधिपति” दियाबल सैतान याच्या वर्चस्वाखाली तर हे अशक्य स्वरूपाचे स्वप्न आहे. (योहान १२:३१) तथापि “शांतीचा अधिपति,” येशू ख्रिस्त याच्या वर्चस्वाखाली मात्र जागतिक सुरक्षितता ही निश्चितार्थाने साकार होऊ शकते. ही गोष्ट यहोवाने, “शांतीचा अधिपति” याचा जन्म व त्याचे कार्य याविषयीचा जो भविष्यवाद दिला त्यामध्ये खात्रीलायकरित्या सांगितली आहे. यशया ९:६, ७ मध्ये आम्ही वाचतो: “आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील; त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता शांतीचा अधिपति म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश यहोवाचा आवेश हे सिद्धीस नेईल.”
२. (अ) यशया ९:६, ७चा भविष्यवाद कोणत्या परिस्थितीत देण्यात आला होता? (ब) यहोवाने दावीदासोबत त्याच्या वंशासाठी सार्वकालीक राज्याचा जो करार केला होता तो अक्षयपणे दृढ धरून राहील हे आम्ही कसे जाणतो?
२ केवढा हा अद्भुत भविष्यवाद! पृथ्वीवरील सर्वथोर पुत्रजन्माविषयीच्या या भविष्यवादाचे परीक्षण करणे मोठे थरारक वाटेल. तरीपण याविषयीचे पूर्ण रसिकता जाणून घेण्याआधी, हा भविष्यवाद कोणत्या परिस्थितीत वदविण्यात आला त्याकडे आपले लक्ष केंद्रित करणे जरूरीचे आहे. आहाज राजाच्या वर्चस्वाखालील यहुदाच्या राज्याच्या दिवसात तो आंतरराष्ट्रीय कटाचा काळ होता. तो राजा यहोवास अविश्वासू होता तरी त्याला यहोवाच्या सिंहासनावर बसू देण्याची मुभा दिली गेली. त्याच्या विषयीची ही सहनता, यहोवाने दावीदासोबत त्याच्या घरण्याविषयी सार्वकालिक राज्याचा जो करार केला होता त्यामुळेच दाखविण्यात आली. दावीदाला यहोवासाठी मंदिर बांधण्याची परवानगी नाकारण्यत आली तरी देवाने त्याला पर्यायी आशीर्वाद देले. ते त्याने नाथान संदेष्ट्याच्या योगे बोलून दाखविले: “यहोवा तुला म्हणत आहे की, मी तुझे घराणे कायमचे स्थापीन, तुझे घराणे व तुझे राज्य ही तुजपुढे अटळ राहतील. तुझी गादी कायमची स्थापित होईल.” (२ शमुवेल ७:११, १६) हे इश्वरी अभिवचन दावीदाला एवढे तृप्तीदायक वाटले की त्याच्या वैभवी पूर्णतेकडे तो मोठ्या आशेने बघत राहिला.
३. (अ) दावीदासोबत केलेल्या कराराची पूर्णता कोणामध्ये आढळते व तो करार केवढा अद्वितीय आहे? (ब) राज्य कराराच्याबाबतीत सैतानाने आपले कोणते ध्येय बनवले?
३ दाविदासोबतच्या त्या कराराची पूर्णता त्याचा थोर पुत्र येशू ख्रिस्त, “शांतीचा अधिपति” यात आढळते. पृथ्वीच्या पाठीवरील कोणाही बादशाही घराण्याने राज्याविषयीच्या अशा कराराचा कधी आनंद लुटला नाही की ज्यामध्ये त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तरीपण या राज्य कराराने, ज्याचा अधिपति व सरदार सैतान आहे त्या जगातील सर्व राज्यांपुढे आव्हान मांडले. या कराणास्तव दियाबल व त्याच्या दुरात्म्यांनी दावीदाचे घराणे उद्ध्वस्त करून टाकावे, की ज्याद्वारे त्यातून चिरकालिक वारस सामोराच येऊ शकणार नाही, ते करण्याचे ध्येय समोर धरले. याकरता सैतानाला अरामाचा राजा रेजिन, इस्रएलाच्या दहा वंशीय राजाचा राजा पेका व अश्शुरचा राजा हे हातोहात असणारे साधन मिळाले.
राज्य कराराविरुद्ध कट
४. दावीदाबरोबर करण्यात आलेल्या राज्य कराराची कार्यसिद्धी थांबविण्यासाठी सैतानाने कोणत्या प्रयत्नाचा जोर केला?
४ दियाबलाची कोणती योजना होती? यहुदाचा राजा आहाज याला भीती घालून अश्शुरच्या राजसोबत अयोग्य स्वरूपाचे संगनमत जुळवून आणावे हा त्याचा हेतू होता. दियाबल ते कसे करू शकत होता? त्याने इस्राएलाचा राजा पेका व अरामाचा राजा रेजिन याला दावीदाच्या घराण्याविरुद्ध कट करायाला लावले. यहुदाच्या गादीवरून आहाजास पदभ्रष्ट करून त्या जागी आपल्या स्वतःचा मनुष्य ताबेलाचा मुलगा याला कळसूत्री राजा करावे असा त्यांनी कट रचला. हा ताबेलचा मुलगा कोण होता? तो दावीदाच्या राजघराण्यातील वारस नव्हता हे स्पष्ट आहे. या करणास्तव, ज्याचा द्वारे देवाचा राज्याचा करार “शांतीचा राजपुत्र” हा कायमचा वारस येईपर्यंत चालू राहू शकेल असा तो माणूस नव्हता. तो यहुदाच्या सिंहासनावरील देवाचा नव्हे, तर त्यांचा माणूस असणार होता. अशाप्रकाराने यहोवाने दावीदासोबत जो राज्य करार केला होता त्याची कार्यसिद्धी थांबवावी म्हणून सैतानाने केलेला हा प्रयत्न पवित्रशास्त्र उघड करून दाखविते.
५, ६. दावीदाच्या घराण्याविरुद्ध करण्यात आलेल्या कटाबाबत आहाज राजाने कशी प्रतिक्रिया दाखवली, आणि यहोवाने त्याला कोणता प्रोत्साहनदायक संदेश दिला?
५ या भीतीविरुद्ध आहाज राजाने कशी प्रतिक्रिया व्यक्त केली? तो व त्याचे लोक भीतीने थरथरा कापू लागले. या कारणामुळे, त्याने उदयोन्मुख जागतिक सत्ता अश्शुर याच्या राजाशी संधान बांधू नये म्हणून यहोवाने त्याला प्रोत्साहनदायक माहिती दिली. यहोवाने आपला संदेष्टा यशया याला आहाजाची भेट घ्यायला सांगितले आणि यशया ७:४-९ मधील संदेश कळविण्यास म्हटले:
६ “भिऊ नको . . . अराम, एफ्राइम [इस्राएल राज्याचा प्रमुख भाग] व रमाल्याचा पुत्र [पेका] यानी तुजविरुद्ध दुष्ट संकल्प केला आहे की, ‘आपण यहूदावर चालून जाऊन त्यांस धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलाच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू.’ प्रभु परमेश्वर म्हणतो, ‘हे सफळ व्हावयाचे नाही, हे घडावयाचे नाही . . . तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.’”
कटाच्या अपयशाचे चिन्ह
७. (अ) यशया ७:१४ मधील अप्रतिम भविष्यवाद कशामुळे उच्चारण्यात आला? (ब) इम्मानुएलचा जन्म कशाचे खात्रीलायक चिन्ह ठरणार होते आणि यशयाची मुले काय म्हणून होणार होती?
७ अशाप्रकारे यहोवाने कट करणाऱ्यांचा कशा धुव्वा उडेल त्या विषयीचे भाकित केले. अगदी याच क्षणी जगास हादरविणाऱ्या इश्वरी भविष्यवादाच्या वक्तव्याची वेळ आली; हा भविष्यवाद दावीदासोबत करण्यात आलेल्या राज्य कराराच्या बादशाही बारसाकडे निर्देश करतो. पण हा अप्रतिम भविष्यवाद कशामुळे वदविला गेला? वस्तुतः यहोवा आहाज राजाशी बोलत होता. त्याने आहाजला म्हटले की त्याला वाटते असे कसलेहि चिन्ह त्याने यहोवाकडून मागावे म्हणजे यहोवा ते चिन्ह दाखवील व त्याकरवी दावीदाच्या घराण्याविरुद्ध करण्यात आलेला कट देव कसा मोडून काढील त्याची ती निश्चित खात्री दिली जाईल. पण आहाजने कसलेही चिन्ह मागण्याचे नाकारले. तेव्हा काय घडले? यशया ७:१४ आम्हास कळविते: “यास्तव यहोवा स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल असे ठेवील.” त्या नावाचा अर्थ, “आमच्या सन्निध देव” असा होतो. हा इम्मानुएल व यशयाचे आणखी दोन पुत्र चिन्ह ठरणार होते त्यामुळेच संदेष्ट्याने यशया ८:१८ मध्ये म्हटले: “पहा, मी व यहोवाने मला दिलेली मुले या आम्हास . . . सेनाधीश यहोवाने इस्राएलात चिन्हे व उत्पात अशी ठेविली आहेत.” याप्रकारे इम्मानुएलचा जन्म हे देवाचा राज्य करार व त्याचा वारस याविरुद्ध जो कट आखण्यात येईल व ते कट रचणारे हे नष्ट होतील याचे खात्रीलायक चिन्ह होते.
८. (अ) इम्मानुएल या मुलाविषयी यशया ७:१५, १६चा भविष्यवाद काय म्हणतो, व कोणता परिणाम दिसून आला? (ब) यशयाच्या काळातील इम्मानुएल विषयीची ओळख अनिश्चित का राहिली असावी?
८ इम्मानुएल या मुलास कोणी जन्म दिला ते पवित्र शास्त्र अहवाल सांगत नाही. कदाचित ती यहुदी कुमारी असावी, जी यशया संदेष्ट्याची दुसरी बायको झाली. काहीही असले तरी, भविष्यवादाने हे वदविले की मुलाला बरे काय व वाईट काय हे समजू लागण्याच्या आधीच, दावीदाच्या घराण्याविरुद्ध कट रचणाऱ्या दोन राजांचा विनाशकारी नाश होईल. (यशया ७:१५, १६) ते तसेच घडले. यशयाच्या काळातील इम्मानुएलची ओळख आम्हाकरता अनिश्चित राहिली आहे ही वस्तुस्थिती कदाचित या कारणामुळे असावी की, नंतर काही पिढ्यांनी स्वर्गातून अद्भुत चिन्ह असा प्रकट होणारा थोर इम्मानुएल यापासून आपले लक्ष ढळले जाता कामा नये.
९. (अ) चिन्ह व राज्य कराराविरुद्ध कटाचा बिमोड यांची पूर्णता कशाची हमी देते? (ब) सर्ववेळेचा मोठा असा जागतिक कट कोणता आहे?
९ आहाजच्या काळात चिन्हाची पूर्णता तसेच देवराज्य कराराविरुद्ध जागतिक कट करणाऱ्यांचे पतन हे अर्थातच छोट्या प्रमाणात घडले. तरीपण त्या पहिल्या पूर्णतेने, चिन्ह तसेच जागतिक कट उधळून लावला जाणे याची आमच्या काळात मोठी पूर्णता होईल अशी हमी दिली. आज आपण काळाच्या सर्वथोर जागतिक कटास तोंड देऊन आहोत. ते कोणत्या अर्थी? ते या अर्थी की, राष्ट्र चिरकाल शांती आणण्याविषयी यहोवाच्या व्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आहेत व शिवाय “शांतीचा अधिपति” याच्या प्रतिनिधींचा सुद्धा विरोध करीत आहेत. तर हा कट राज्य कराराचा वारस, “शांतीचा अधिपति” यांच्या विरुद्ध खरेपणाने आहे. तर मग आता भविष्यवादाच्या संपूर्ण पुर्णतेबद्दल काय? आम्ही चिन्ह ओळखलेच तर जागतिक कटाला प्राप्त होणारी कर्मगति निःसंदेह गोष्ट आहे असे आपल्याला दिसेल.
“शांतीचा अधिपति” याचा जन्म
१०. (अ) यशया ७:१४च्या संपूर्ण पूर्णतेत चिन्ह व राज्य कराराचा वारस ठरणारे मूल कोणी निपजविले? (ब) इम्मानुएलचे चिन्ह इतिहासकार मत्तय दावीदाच्या घराण्याशी कसे जोडतो?
१० भविष्यवादाच्या संपूर्ण पूर्णतेत ज्या कुमारीने मुलास चिन्ह तसेच राज्य कराराचा वारस या अर्थी जन्म दिला ती दावीद राजाची वंशज यहुदी कुमारी मरिया ही होती. गाब्रिएल दिव्यदूताने तिला म्हटले की ती एका मुलास जन्म देणार आहे व त्याचे नाव तिने येशू ठेवावे. तो असेही म्हणाला की, यहोवा देव “त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल” आणि “त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १: २६-३३) प्रेरित इतिहासकार मत्तय इम्मानुएलचे चिन्ह दावीदाच्या घराण्यासोबत जोडतो. आम्ही मत्तय १:२०-२३ मध्ये वाचतो: “यहोवाच्या दूताने [योसेफाला] स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, ‘योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्विकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारील.” हे सर्व अशासाठी झाले की, यहोवाने संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे; ते असे ‘पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.’ ह्या नावाचा अर्थ, ‘आम्हाबरोबर देव.’”
११. इम्मानुएलचा भाकित जन्म केव्हा व कोठे झाला?
११ भाकित असलेल्या या इम्मानुएलचा जन्म कोठे झाला? सर्व यहुदी डोळे मीखा ५:२ ने दर्शविलेल्या अचूक जागी लागले होते. याचेच अवतरण मत्तय २:६ मध्ये असे आहे: “हे यहुदाच्या प्रांता, बेथलेहेमा, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस’ असे मुळीच नाही; कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल.” इ.स.पू. २ऱ्या वर्षी बेथलेहेम शहरात “शांतीचा अधिपति” याचा जन्म झाला आणि यशया ९:६, ७ च्या पूर्णतेस आरंभ झाला.
१२, १३. “शांतीचा अधिपति” याच्या जन्मामुळे कोणास मोठा बहुमान मिळाला, आणि या जन्माच्या वेळी कोणत्या अद्भुत व चकित करणाऱ्या घटना घडल्या?
१२ ज्याला नंतर “शांतीचा अधिपति” असा सन्मान मिळणार त्या मुलास जन्म देण्याचा बहुमान व आनंद आम्हापैकी कोणत्या पालकास वाटणार नाही? या कारणास्तव या अधिपतिच्या राजपित्यास मोठा बहुमान प्राप्त झाला. खरे म्हणजे हा मानवी जन्म घडून आला तेव्हा पूर्वी कधीहि घडल्या नाही अशा अद्भुत व चकित करणाऱ्या घटना घडल्या.
१३ बेथलहेमाबाहेर शेतात रात्री कळप राखणाऱ्या मेंढपाळापुढे यहोवाचा तेजस्वी दूत प्रकट झाला आणि “यहोवाचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले.” त्या दिव्यदूताने इश्वरी भविष्यवादाच्या पूर्णतेत घडलेल्या जन्माविषयीची घोषणा त्यांना असे म्हणून केली: “तुम्हासाठी आज दावीदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभु आहे.” तो दैदीप्यमानपणा जणू एवढा प्रभावीत करणारा नाही असे भासल्यामुळे आकाशात दूतांचा आणखी समूह चमकला व त्याने नवजात अर्भकाच्या पित्याची स्तुति केली व एकमुखाने म्हटले: “उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती.” होय. ज्या लोकांवर देवाचा कृपाप्रसाद झाला आहे त्या सर्व लोकांसाठी इश्वरी शांती असेल अशी घोषणा त्या दिव्यदूतांनी पूर्वभाकित असणाऱ्या ‘शांतीच्या अधिपति’च्या जन्माच्या वेळी करणे केवढे सार्थ होते बरे!—लूक २:८-१४.
१४, १५. (अ) कोणत्या घटनेस्तव स्वर्गातील देवपुत्रांनी यहोवाची स्तुती गायिली? (ब) सबंध मानवी इतिहासातील कोणताहि पुत्रजन्म याच्याशी तुल्य होऊच शकत नाही तो का?
१४ “शांतीची अधिपति” याच्या जन्माच्या बऱ्याच काळाआधी देवदूतांनी देवाची एका खासप्रसंगी स्तुति गायिली होती. ते देवाने निर्मितीकाळी पृथ्वीचा पाया घातला त्यावेळी घडले. (इयोब ३८:४) बाहेरील अंतराळातून अंतराळवीरांनी आमच्या पृथ्वीची काढलेली छायाचित्रे तुम्ही बघितली का? तर मग दिव्यदूतांनी जे पृथ्वीचे विलोभनीय दृष्य पाहिले तेच तुम्हालाही त्यात पहायला मिळाले असेल. पण त्यावेळी देवदूतांनी कोणता प्रतिसाद व्यक्त केला? इयोब ३८:७ आम्हास सांगते: “त्या समयी सर्व प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.”
१५ पृथ्वीवर घडून येणारा सर्वथोर पुत्रजन्म ही काही किरकोळ घटना नक्कीच नसणार की ज्याकरता देवाचे पुत्र आपला गायनस्वर उंचावून स्तुती गीते गातील. पृथ्वीवरील बापाचे पहिल्या पुत्रजन्माच्या वेळी जसे अभिनंदन केले जाते त्याच प्रमाणे पृथ्वीवरील घडलेल्या सर्वथोर पुत्रजन्मानिमित्त स्वर्गीय पित्याचे त्याच्या स्वर्गातील कुटुंबियांनी गीताने स्तुति गायन करावे हे योग्यच आहे. अगदी नव्या परिस्थितीत आपण प्रथमच पिता होऊ शकलो याचा आनंद त्या अत्यंत सुंदर गायनाद्वारे त्या सर्वसमर्थाला किती सातत्याने जाणवत राहिला असावा! “शांतीचा अधिपति” याचा नियोजित जन्म ज्या पद्धतीने घडला तसा कोणताही पुत्रजन्म त्यापूर्वी सार्वत्रिक इतिहासात कधीच घडला नव्हता.
“मोठ्या प्रकाशाचा” उदय होतो
१६. यशयाच्या ९व्या अध्यायाची आणखी पूर्णता कोठे व कशी झाली?
१६ येशूने आपले जाहीर उपाध्यपण आरंभिले त्यावेळी यशायाच्या ९व्या अध्यायासंबंधाने आणखी पूर्णता झाली. हे त्याच्या पहिल्या दोन वचनासंबंधाने घडले जेथे “अंधारात चालणाऱ्या” लोकांवर “मोठा प्रकाश” चकाकेल याचे भाकित केले गेले. या वचनाची पूर्णिता आम्हाला प्रेरित इतिहासकार मत्तय याने अध्याय ४ व १३ ते १७ वचनात विवेचीत केली आहे: “[येशू] नासरेथ सोडून जबुलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कफर्णहुमास जाऊन राहिला. हे अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे: ‘जबुलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्र किनाऱ्यावरचा यार्देनेपलिकडचा, परराष्ट्रीयांचा गालील यात अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्युच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योति उगवली आहे’ तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की, ‘पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’”
१७. जबुलून व नफताली येथील लोकांवर येशूने प्रकाशाचा का उदय होऊ दिला आणि अंधारात बसलेल्यांसाठी या प्रकाशाचा काय अर्थ होत होता?
१७ जबुलून व नफताली हे प्रदेश इस्राएलाच्या अगदी उत्तरेकडे आहेत व त्यात गालील प्रांतही मोडतो. नफतालीची सरहद्द गालील समुद्राच्या संपूर्ण पश्चिम किनाऱ्यावर पसरली आहे. या क्षेत्रात बराच काळ अंधारात बसलेल्या लोकांवर येशूने त्याच्या शिष्यांसोबत केलेल्या देवराज्याच्या सुवार्तेच्या प्रचारामुळे प्रकाशाचा उदय झाला. येशूने योहान ८:१२ मध्ये म्हटले: “मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील.” अशाप्रकारे “मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यां”ना येशूद्वारे “जीवनाची प्रकाश” मिळाला, कारण त्याने “बहुतांकरता खंडणी” साठी आपले जीवन दिले. तोच असा आहे ज्याचा यहोवाने प्रकाश पाडण्यासाठी वापर केला की त्याद्वारे लोकांना जीवनाची प्राप्ती घडेल.—मत्तय ४: २३; २०:२८.
१८. (अ) हा “मोठा प्रकाश” केवळ गालीलच्या लोकांपुरताच का मर्यादित ठेवता येत नव्हता? (ब) पुढल्या लेखात कशाचा विचारविनिमय केला जाईल?
१८ मृत्यु व जाच यापासून मुक्तता घडवून आणण्याचे अभिवचन देणारा हा “मोठा प्रकाश” केवळ गालीलच्या लोकांपुरता मर्यादित राहणार नव्हता. सरकारच्या सत्तावृद्धीला अंत नसणार असे यशायाने भाकित केले नव्हते का? शिवाय “शांतीचा अधिपति” याची भूमिका भव्यतेची असेल असेही यशयाने भाकित केले नव्हते का? होय, कारण यशया ९:६, ७ म्हणते, “त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.” पुढच्या लेखात येशू ख्रिस्ताची “अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता” तसेच “शांतीचा अधिपति” याविषयी असणाऱ्या भूमिकेविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
तुम्हाला आठवते का?
▫ आहाज राजाच्या कारकीर्दीत कोणता कट रचण्यात आला?
▫ यशया ७:१४ मधील चिन्हाची छोटी पूर्णता कशी झाली?
▫ त्या चिन्हाची संपूर्ण पूर्णता काय आहे?
▫ “शांतीचा अधिपती” याचा जन्म पृथ्वीवरील सर्वथोर पुत्रजन्म का होता?