वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ३/१ पृ. ३-४
  • भविष्य सांगणे—अजूनही लोकप्रिय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भविष्य सांगणे—अजूनही लोकप्रिय
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कोण त्यांच्या सोबत मसलत करतात—व का?
  • ज्योतिषशास्त्र आणि भविष्य पाहणं—हे भविष्य जाणण्याचे मार्ग आहेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • फलज्योतिष तुमच्या भविष्याचा अंदाज बांधू शकते का?
    सावध राहा!—२००५
  • ताऱ्‍यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • तुमचे भवितव्य त्याविषयी शिकण्याचा एक उत्तम मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ३/१ पृ. ३-४

भविष्य सांगणे—अजूनही लोकप्रिय

“या विस्तीर्ण सूज्ञान व शैक्षणिक दिवसात एखादा जाणेल की जादूगिरी व दैव यावर आधारित विश्‍वासावर विसंबणे अनावश्‍यक ठरेल.” हा, १८६ महशूर शास्त्रज्ञ ज्यात १८ नोबेल पारितोषक विजेते आहेत त्यांनी स्वाक्षऱ्‍या केलेल्या निवेदनाचा भाग होता. ते कशाविषयी भाष्य करीत होते? फल–ज्योतिष, नक्षत्रांचा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे “सामान्य समाजाला व्यापून आहेत” त्याचा उपयोग करून भविष्य सांगणे हा प्रचलीत प्रकार आहे. तुम्ही वैयक्‍तीकपणे भविष्य सांगण्याच्या कोणत्यातरी प्रकारावर विश्‍वास ठेवता का? किंवा तुम्ही कदाचीत संशयी अगर या शास्त्रज्ञाप्रमाणे निकराने विरोध करणारे आहात? या गोष्टी संबधीचा तुमचा दृष्टीकोन महत्वाचा आहे. का ते पाहू या.

हा प्रकार अधिक फैलावलेला आहे. भविष्य सांगणाऱ्‍यांच्या पॅरिस मधील काँग्रेसच्या प्रवक्त्यानुसार, “४ दशलक्ष फ्रेंच [लोक] प्रत्येक सहा महिन्यात परलोक विद्या जोपासणाऱ्‍याकडे जातात.” युनायटेड स्टेटस मध्ये अंदाजे १,७५,००० अर्धवेळ तर १०,००० पूर्णवेळ राशी भविष्य सांगणारे आहेत. ग्रेट ब्रिटन मध्येही ते पुष्कळ आहेत जेथे त्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत. फ्रेंच मासिक ला–मीन्टरिज (चित्तवेधक) अभिप्राय देते: “सर्वत्र, अधिक करून सुशिक्षीत समाजात आम्हास हीच आकडेवारी मिळते. आमच्या शतकाच्या अंतिम पर्वात परलोक विद्या असणारे झपाट्याने वाढत आहेत.”

कोण त्यांच्या सोबत मसलत करतात—व का?

कांहीचा असा समज असेल की केवळ कमी शिक्षण असलेले, मागासलेले या गूढ “विज्ञानात” म्हणजेच फल—ज्योतिष जो बहुदा सर्वत्र पसरलेला आहे त्यात आस्थेवाईक आहेत. परंतु मॅडॅम सोलाइल या विख्यात फ्रेंच फल–ज्योतिष्यींनी उघड केले: “ते सर्व मजकडे मग ते उच्च किंवा कनिष्ट, सर्व प्रकारचे राज्यकर्ते राज्यातील विदेशी प्रमुख येतात. माझ्याकडे पुजारी व नास्तिकवादी सुद्धा येतात.” याच्या अनुषंगाने फ्रेडरिक डायडोनी मृत्यु पावला तेव्हा ले फिगारो जे प्रांजळ फ्रेंच दैनिक वृतपत्र त्यात लेख आला त्यात याची स्मृती दिली की त्याने “उच्चतम पारशी व्यक्‍तींना, मंत्री, उच्च अधिकारी, लेखक व अभिनेते” यांना आकर्षित केले होते.

जुगाऱ्‍यांनी फल–ज्योतिषाकडे येऊन त्यांचे पैसे कसे लावावेत हे शिकून घेण्यास मसलत घेतली. व्यापारी त्यांचे पैसे कसे गुंतवावे हे पहाण्यास त्यांच्याकडे धावतात. फल–ज्येतिषी तुम्हाला सहलीला केव्हा निघावे किंवा काय शिजवावे हे ही सांगण्यास तयार असतात. भविष्य सांगण्याने इतर क्षेत्रांनाही काबीज केले, विविध देशातील पोलीस खाते गुन्हेगारास किंवा चुकलेल्या व्यक्‍तीस कसे शोधावे याचा द्रष्टा म्हणून जातात. ले फिगारो मासिक फ्रेंच साप्ताहिकानुसार “द्रष्टे दृष्टी असणाऱ्‍या ३४ व्यक्‍तींना पेन्टॅगनने, यु.एस्‌.एस्‌.आर. च्या गुप्त लष्करी ठाण्यात काय चालले आहे त्याची इतंभूत माहीती पुरविण्यास ठेवले.” तेच मासिक अहवाल देते की यु.एस. काँग्रेसजन चार्ल्स रोसनी म्हटले की रशियन्स ही अशा मांत्रिक शक्‍तीचा आश्रय घेतात.

फल–ज्योतिष अजूनही एवढे लोकप्रिय का? ते निरूपद्रवी करमणूक किंवा मौज आहे का? भवितव्य काय राखून आहे ते जाणण्याचा तो उत्तम मार्ग आहे का—किंवा अजून ही उत्तम मार्ग आहे? या महत्वाच्या प्रश्‍नाची उत्तरे आम्हास मिळू शकतात का ते पाहू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा