तुमचे भवितव्य त्याविषयी शिकण्याचा एक उत्तम मार्ग
१९६२ मध्ये भारतीय फल–ज्योतिष्यांनी “मकरवृतावर आठ ग्रह एकत्र येतात म्हणून” जागतिक महासंकटाचे भाकीत केले होते. तथापि तसे कांही घडलेच नाही. अलीकडील काळात १९८०च्या समाप्तीस बहुतेक फ्रेंच फल–ज्योतिष्यांचा भ्रम होता की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष गिस्कार्ड डीइस्टींग दुसऱ्या वेळेस पुन्हा निवडून येणार. परंतु त्यांचा प्रतिस्पर्धी फ्रानकोईस मिटरांन्डने निवडणूक जिंकली. या प्रकारचे अपयश आम्हास याची आठवण देते की फल–ज्योतिष भवितव्य जाणण्याचा खात्रीचा मार्ग पुरवीत नाहीत.
मग दुसरा कोणता इतर मार्ग आहे का? उदाहरणार्थ, तुम्हास भविष्य उलगडण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न मदत करतील का? तर मग, १९८० दरम्यान काय घडेल याचे १९७० मध्ये मेकग्रॉव हिल या (युनायटेड स्टेट्स) इन्स्टीट्यूटने भविष्य घोषित केले ते येथे आहे: “कॅन्सरला हटविणारे औषध, मंगळ व शुक्र या ग्रहावर मानवाचे अंतराळयान जाईल, चंद्रावरील कायमस्वरूपी तळ, मोटार विद्युत शक्तीवर धावेल, सामान्य घरात संगणक, तुमच्या लेकरांसाठीची लिंग पसंती व थ्री डायमेनशन टेलीव्हीजन व चित्रपट.”
१९७० मध्ये या इन्स्टीट्यूटच्या वैज्ञानिकांनी म्हटले: “ही पद्धत [भाकितांची] तज्ञांच्या गटाची ऐक्यपूर्ण मनाने विश्वसनियरित्या भाकित केलेली ध्येय प्राप्त करण्याची आहे.” परंतु या तज्ञांनी या क्षेत्रातील व इतर अनेक बाबतीतील जसे राजकारण व अर्थशास्त्र यात केलेली त्यांची भाकिते फोल ठरलेली सिद्ध झाली आहेत.
माहितीचा एक खात्रीदायक उगम
फल–ज्योतिषी व शास्त्रज्ञ काय घडणार याचे निश्चीतपणे कांही अगोदरच पाहू शकत नाहीत तर भवितव्याबाबत विश्वसनीय माहिती प्राप्त करणे अशक्य कोटीतील आहे असा याचा अर्थ आहे का? याविषयी हताश होण्याऐवजी पवित्रशास्त्र याबाबत काय म्हणते ते आम्ही पाहिले पाहिजे. हे लक्षात असू द्या की पवित्रशास्त्राचा लेखक यहोवा, याचे वर्णन असे केले आहे की “मी आरंभीच शेवट कळवितो, होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे.”—यशया ४६:१०.
देवाचे वचन पुष्कळ भविष्यवाद सामावून आहे. त्याची भाकीते फल ज्योतिष्यापेक्षा कशी भिन्न होतात? द ग्रेट आयडीयाज या पुस्तकात दिलेले हे उत्तर आहे: ‘नाशवंत मनुष्यांच्या पूर्वज्ञानाबाबत पाहू जाता, इब्री संदेष्टे अतुलनिय वाटतात. खोटे इश्वरवादी किंवा भविष्य सांगणारे . . . ज्यांच्याजवळ इश्वरी रहस्य शोधण्याची युक्ती किंवा कसब नव्हते त्यांच्याप्रमाणे ते नव्हते. . . . त्यांच्या भविष्यवादी वक्तव्याचे बहुतेक भाग, दैवते अंगात येणाऱ्या अनिश्चीतासारखे नव्हते. कमीत कमी त्यांचे हेतु अशा प्रकरणातील देवाची योजना जी तो स्वतःहून लोकांनी इश्वरी कृपेचा मार्ग म्हणून अगोदरच पाहाण्याची इच्छा करते तो गुपित न ठेवता उघड करणे हे होते.”
याचे उदाहरण, येशू बाबतची बरीच माहिती पवित्रशास्त्रात त्याच्या जन्माच्या कैक वर्षे अगोदर कथीत होती. तो बेथलेहेम नगरात दाविदाचा बाप इशाय याच्या कुळात जन्मेल हे भाकित केले होते. (मीखा ५:२; यशया ११:१, १०) शास्त्रवचनांनी हे सुद्धा भाकित केले होते की त्यास स्तंभावर मारले जाईल पण त्याचे कोणतेही हाड मोडणार नाहीत जशी की अशाप्रकारच्या वधाची ती पद्धत होती. ही माहिती सत्य शाबीत झाली ही केवळ कांही थोडकी उदाहरणे आहेत, येशूमध्ये १२० पेक्षा अधिक भविष्यवादांची पूर्णता झाली होती अशी एक पवित्रशास्त्र विद्वानाने मोजणी केली.—स्तोत्रसंहिता २२:१६, १७; ३४:२०.
आज पूर्ण झालेले भविष्यवाद
याहून अधिक, पवित्रशास्त्र आमच्या दिवसावर दृष्टी टाकणारे भविष्यवाद राखून आहे. यातील सर्वांत महत्वाच्या एकाचा विचार करू या. तो पृथ्वीवरील गोष्टीत, देवाचे राज्य नाट्यमय हस्तक्षेप करील त्या समयास ताबडतोब चिन्हांकीत करील अशा घटनांची मालिका वर्णितो. या घटनात जागतिक युद्धे, भूकंप, रोगाच्या साथी, दुष्काळ व अधार्मिकतेची वाढ यांचा समावेश आहे. या गोष्टींची तीव्रता ही आजच्या २०व्या शतकातील जागतिक वृतांचा प्रमुख भाग बनली नाहीत का?—मत्तय २४:३, ७–१४; लूक २१:७, १०, ११; २ तीमथ्यी ३:१–५.
येशूने स्पष्ट केले की या भविष्यवादाची पूर्णता त्याच्या राज्याच्या समीपतेची, जशी झाडांची पालवी वसंतऋतुच्या आगमनाचा खात्रीने सुगावा देते त्याप्रमाणे पूर्वसूचना देतील. त्याने याकडेही निर्देश केला की ती सर्व एकाच पिढीत पूर्ण व्हावयाला पाहिजेत. चिन्हांची व वर उल्लेखलेल्या इतंभूत माहितीची सर्व स्वरूपे आमच्या डोळ्या समक्ष १९१४ पासून पूर्ण होत आहेत.a यास्तव आम्हास पूर्ण आत्मविश्वास असू शकतो की राज्य लवकरच कार्यान्वित होईल.—लूक २१:२९–३३.
या काळासाठी भाकित केलेल्या अजून एका भविष्यवादाचे स्वरूप “राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील” असा आहे. (लूक २१:२५) आता, फल–ज्योतिष व इतर भूताटकी प्रकाराबाबत आज एवढे आकर्षण तरी का? फ्रेंच वृतपत्र ले मॉन्डे डिमान्चे उत्तर देते: “पेच प्रसंगाना तोंड देताना दिलासा प्राप्त करण्यास लोक कांहीही करण्यास थांबणार नाहीत. थोड्याश्या परिश्रमासाठी मानवशास्त्र भरपूर समधान देते, अण्वस्त्र शक्ती व अनुवंशिक गुंतागुंतीच्या वा या वैज्ञानिक भय–प्रद यशप्राप्तीमुळे लोक अज्ञात, असमंजस गोष्टीकडे सुटका प्राप्तीसाठी जीवनाचा अर्थ पुनः शोधण्याचा प्रयत्न करतात.” यास्तव भूताटकी प्रकार जसे की फल–ज्योतिष्य याविषयीच्या सर्वत्र आढळणाऱ्या आस्थेने आम्हास चकित करू नये. लोक येशूच्या भविष्यवादाच्या पुर्णतेत “घाबरी” होण्याचा जो अनुभव घेतात तो एक संकेत आहे.
‘तुमची डोकी वर करा’
ख्रिश्चन या गोष्टी पहातात तेव्हा त्यांनी काय केले पाहिजे? त्याच्या सभोवताली असणाऱ्या लोकाप्रमाणे भयभित व्हावे का? येशूने पुढील सूचना सादर केली: “ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे रहा व आपली डोकी वर करा कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे.”—लूक २१:२८.
तुम्हास तुमचे भवितव्य अधिक खुलासेवार जाणायचे आहे का? तर मग, पवित्रशास्त्र व “ती प्रेरित वचने देवापासून आहेत की नाहीत” हे सखोलपणे परिक्षण्यास वेळ द्या. (१ योहान ४:१) तुम्ही हे टेहळणी बुरुज मासिकाच्या सहाय्याने करू शकता, जे नियमितपणे पवित्रशास्त्र भविष्यवादांची चर्चा करते व आमच्या दिवसासाठी त्याचा अर्थ काय हे स्पष्ट करते. अशाप्रकारे या सद्याच्या संकटग्रस्त जगाचा अंत समीप आहे हे पटले तेव्हा तुम्हास सुद्धा ‘तुमची डोकी वर करणे” शक्य होईल. तसेच तुम्ही मसीही राज्य जे लवकरच जागतिक घटनात नम्र हृदयी जनांच्या फायद्यासाठी हस्तक्षेप करील त्यातील आशिर्वादांचा आनंद लुटण्यास काय केले पाहीजे ते ही शिकाल.
[तळटीपा]
a १९१४पासून भविष्यवादांच्या पुर्णतेविषयीच्या अधिक माहिती साठी वॉचटॉवर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यू यॉर्क यांनी प्रसिद्ध केलेल्या ट्रू पीस ॲन्ड सेक्यूरिटी—हाव कॅन यू फाईन्ड इट या पुस्तकातील अध्याय ७ पहा.
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
“चिन्हे . . . खरी ठरली”
“ज्योतिष्य–सांगणाऱ्याकडे जाणे किंवा वृतपत्रातील तुमचे राशी भविष्य वाचणे यात काय चूक आहे? ही केवळ निरूपद्रवी गोष्ट नाही का?’
पवित्रशास्त्र या गोष्टीला कमी प्रतीचे म्हणून समजत नाही. वास्तविक ते आम्हास दैवज्ञ व ज्योतिषी यांच्याविरूद्ध दक्ष राहाण्यास सांगते, अनुवाद पुस्तकात यहोवा पुढील ताकीद देतो: ‘तुझ्यामध्ये कोणी संदेष्टा अथवा स्वप्न पहाणारा . . . तुला कांही चिन्ह व चमत्कार दाखविल व ते चिन्ह अथवा तो चमत्कार प्रत्ययासही आला व तो म्हणू लागला की, ‘चल अन्य देव त्यांच्यामागे जाऊ’ . . . तुम्ही त्या संदेष्ट्याचे व स्वप्न पहाणाऱ्याचे बिलकूल ऐकू नका.”—अनुवाद १३:१–३.
हे लक्षात घ्या की शास्त्रवचने दैवज्ञ व फल–ज्योतिष यांची भाकिते कदाचित खरी ठरतील याविषयी प्रश्न उभा करीत नाहीत. त्याऐवजी पवित्रशास्त्र आम्हा इशारा देते की ही भाकीते आकाशातील चिन्हावर किंवा इतर प्रकारच्या भविष्य पद्धतीवर आधारित असतील तर ते दुरात्म्याकडून येतात, फसवी आहेत, व ते लोकांना सत्य देवापासून बहकवितात.—पहा प्रे. कृत्ये १६:१६–१८.
ज्योतिषाकडे किंवा भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या इतराकडे लक्ष देणे हे अध्यात्मिक धोके ओढावून घेते व ज्याचा शेवट “स्वर्गातील ठिकाणी दुरात्मिक शक्तीचे” दास बनण्यात होतो. (इफिसकर ६:१२) अशाप्रकारे, अशा व्यक्तीसोबत सल्लामसलत करणे यास देव गंभीर पाप समजतो; जे अशा गोष्टींचा सराव करतात ते त्याच्या दृष्टीत अमंगळ आहेत व त्यांना त्याचे राज्य मिळणार नाही. —प्रकटीकरण २२:१५.
अशाप्रकारे पवित्रशास्त्र आम्हास फल–ज्योतिष व इतर सर्व भविष्य सांगण्याच्या पद्धती विरूद्ध दक्ष राहण्याचा इशारा आमच्याच भल्यासाठी देते.
[६ पानावरील चौकट]
पवित्रशास्त्राने अगोदरच भाकीत केले की:
◆ येशू बेथलहेमास जन्मास येईल.—मीखा ५:२
◆ राजा दाविदाचा बाप इशाय याच्या वंशात तो येईल.—यशया ११:१, १०
◆ त्यास स्तंभावर ठार मारले जाईल —स्तोत्रसंहिता २२:१६, १७
◆ त्याचे कोणतेही हाड मोडणार नाही.—स्तोत्रसंहिता ३४:२०.