साक्षीदारांचा केवढा हा भव्य मेघ!
“आपण एवढ्या मोठ्या साक्षीदारांच्या मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही . . . आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.”—इब्रीयांस पत्र १२:१.
१, २. (अ) इब्री ख्रिश्चनांना लिहीतेवेळी पौलाच्या मनात कोणती शब्दरेखा असावी? (ब) समविश्वासी इब्री बांधवांना दृढ विश्वासाची का गरज होती?
एका मोठ्या क्रिडांगणात तुम्ही शर्यतीत धावत आहात असे चित्र तुम्हापुढे उभे करा. तुम्ही आपले स्नायु ताणून आपले डोळे जिंकण्याच्या टप्प्यावर लावून मोठ्या शिकस्तीने पुढे पुढे जात आहात. आणि बघ्यांविषयी काय? येथे बघेसुद्धा विजयाकडेच धावत आहेत! ते नुसते बघे नाहीत तर उक्ती व कृति यात तेही क्रियाशील साक्षीदार आहेत.
२ इब्री ख्रिश्चनांना (सुमारे इ.स. ६१ मध्ये) लिहिताना प्रेषित पौलाच्या मनात अगदी हीच शब्दरेखा असावी. त्यांना दृढ विश्वास जरूरीचा होता. (इब्रीयांस १०:३२–३९) यरूशलेमाचा नाश (इ.स. ७० मध्ये) होण्याआधी सैन्याने त्याला (इ.स. ६६ मध्ये) वेढा घातला त्यावेळी ते येशूच्या इशाऱ्यासंबंधी विचार राखून विश्वासाने पळ काढून शकत होते. “धार्मिकतेसाठी छळ” होईल त्यावेळी विश्वासच त्यांचे रक्षण करणार होता.—मत्तय ५:१०; लूक २१:२०–२४.
३. इब्रीयांस १२:१ मध्ये उल्लेखिलेले “सहज गुंतविणारे पाप” काय आहे, आणि ख्रिश्चनांना कोणती धाव धीराने धावण्याचे प्रोत्साहन आहे?
३ पौलाने (इब्रीयांस ११ अध्यायात) विश्वासाविषयी ख्रिश्चनांपूर्वीच्या कार्याविषयीची उजळणी केल्यावर तो पुढे आर्जवितो: “आपण एवढ्या मोठ्या साक्षीदारांच्या मेघाने वेढलेलो आहोत म्हणून आपणही सर्व भार [आम्हाला आध्यात्मिकतेमध्ये शिथिल करणारा] व सहज गुंतविणारे पाप [विश्वासाची कमतरता] टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या [चिरकालिक जीवनाच्या] धावेवरून धीराने धावावे. (इब्रीयांस १२:१) पौलाने कार्यवहित विश्वासाची केलेली उजळणी आम्हा सर्वांना, मग आम्ही स्वर्गातील अमरत्व प्राप्त करण्यासाठी धावणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांपैकी असू वा नंदनवनमय पृथ्वीवर अनंतकाळच्या जीवनाचे ध्येय राखणारा “मोठा लोकसमुदाय” याचे भाग असू, फायदेकारक ठरेल. (प्रकटीकरण ७:४–१०; लूक २३:४३; रोमकर ८:१६, १७) पण विश्वास म्हणजे काय? या आध्यात्मिक रत्नाचे कोणते विशिष्ट पैलू आहेत? आम्हापाशी विश्वास असला तर आमची कृति कशी असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधीत असता तुमच्या खाजगी व मंडळीच्या अभ्यासात इब्रीयांस पत्राच्या ११ व १२व्या अध्यायातील उदृत करण्यात आलेल्या वचनांचे कृपया वाचन करा.
विश्वास काय आहे
४. विश्वास काय आहे?
४ पहिल्या प्रथम पौलाने विश्वासाची व्याख्या दिली. (वाचा इब्रीयांस ११:१–३.) थोडक्यात म्हणजे विश्वास हा “आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा” आहे. विश्वास राखणाऱ्या व्यक्तिला ही खात्री असते की देवाने वचन दिलेल्या सर्व गोष्टी निःसंशये पूर्ण होतील. विश्वास हा आणखी “न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खातरी” आहे. न दिसणाऱ्या गोष्टींविषयीचा पुरावा हा इतका प्रभावी आहे की विश्वास जणू काही दृश्यमान आहे असे वाटू लागते.
५. विश्वासाद्वारे आम्हास कशाचे आकलन होते?
५ विश्वासा द्वारे “पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती” की त्यांनी देवाला संतुष्ट केले. शिवाय “विश्वासाने आपल्याला कळते की . . . विश्वाची” म्हणजे पृथ्वी, सूर्य, चंद्र व तारे या गोष्टींची “देवाच्या शब्दाने . . . रचना झाली” त्यामुळे आम्हास “जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही.” अशाप्रकारे यहोवा देव अदृश्य आत्मा असल्यामुळे आम्ही त्याला पाहू शकत नसलो तरी तो या सर्व गोष्टीचा निर्माता आहे याची खात्री आम्हास पटते.—उत्पत्ती १:१; योहान ४:२४; रोमकर १:२०.
विश्वास व “प्राचीन जग”
६. “स्त्रीची संतति” याविषयीचे यहोवाचे भविष्यवादित शब्द नक्कीच खरे ठरणार याविषयीचा ‘भरवसा’ हाबेलला कसा मिळाला?
६ विश्वासाच्या अनेक पैलूपैकी एक आहे पापाच्या प्रायश्चितासाठी यज्ञार्पणाची गरज आहे हे ओळखण्याची रसिकता. (वाचा इब्रीयांस ११:४.) “प्राचीन जगा” त आदाम व हव्वा या पहिल्या दांपत्याच्या दुसऱ्या मुलाने रक्ताच्या यज्ञापर्णावरील आपला विश्वास व्यक्त केला. (२ पेत्र २:५) हाबेलाने स्वतःमध्ये अनुवंशिकपणे आलेल्या पापाचे मरणप्राय परिणाम निःसंशये ओळखले होते. (उत्पत्ती २:१६, १७; ३:६, ७; रोमकर ५:१२) देवाने बजावलेल्या दंडाज्ञेची पूर्णता त्याने प्रत्यक्षात आपला बाप आदाम याला घाम गाळून कष्टाने काम करण्यामध्ये आणि आई हव्वा हिला गर्भधारणेचे केवढे क्लेश होत होते त्यात पाहिले. (उत्पत्ती ३:१६–१९) या कारणास्तव हाबेलाठायी हा “भरवसा” निर्मिला गेला की यहोवाने आणखी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या खऱ्या होणार. त्यात देवाने सर्पाला बोलण्याकरवी सैतान या आद्यलबाडास जे भविष्यवादित बोल म्हटले त्यांचाहि समावेश आहे: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडिशील.”—उत्पत्ती ३:१५.
७. (अ) पापासाठी यज्ञार्पणाची गरज आहे याविषयी हाबेलाने कशी रसिकता दाखवली? (ब) देवाने कोणत्या मार्गाने ‘हाबेलाच्या दानाविषयी साक्ष दिली’?
७ हाबेलाने स्वतःच्या जीवनासाठी दृष्टांतरित्या पर्यायी ठरणारे पशूचे यज्ञार्पण देवास वाहून अभिवचन दिलेल्या संततीवर आपला विश्वास प्रकट केला. पण त्याचा विश्वासहीन वडील भाऊ काईन याने रक्तहीन फळ भाज्यांचे अर्पण दिले. यानंतर काईनाने खुनशी बनून हाबेलाचे रक्त सांडले. (उत्पत्ती ४:१–८) तरीपण हाबेल, यहोवाने आपणाला नीतीमान असे गृहीत धरले आहे याची जाण राखून वारला. “देवाने दानाच्या वेळी ती साक्ष दिली.” ते कसे काय? हाबेलाने विश्वासपूर्वक रितीने केलेल्या यज्ञाचा स्विकार करून. त्याचा विश्वास व त्याला लाभलेली इश्वरी मान्यता, ज्या विषयी प्रेरित अहवाल साक्ष देत आहे त्याच्या द्वारे ‘हाबेल मेला असला तरी अद्याप बोलत आहे.’ पापासाठी यज्ञापर्णाची गरज त्याने ओळखली. तर मग येशू ख्रिस्ताच्या अत्यंत अभूतपूर्व खंडणी यज्ञार्पणावर तुमचा विश्वास आहे का?—१ योहान २:१, २; ३:२३.
८. (अ) हनोखच्या धैर्यवान साक्षीकार्याद्वारे आम्हाला विश्वासाबद्दल काय शिकायला मिळते? (ब) हनोखला “मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून [कसे] लोकांतरी नेण्यात आले”?
८ विश्वास असला तर आम्ही देवाचा संदेश धैर्याने बोलू. (वाचा इब्रीयांस ११:५, ६.) यहोवाचा आरंभीचा साक्षीदार हनोख याने अभक्तावरील इश्वरी न्यायदंड निर्भिडपणे घोषित केला. (यहुदा १४, १५) ह्यामुळे हनोखच्या शत्रूंनी त्याला निश्चये ठार मारण्याचे योजिले पण देवाने त्याला “नेले” की ज्यामुळे त्याला मृत्युच्या वेदना मिळाल्या नाहीत. (उत्पत्ती ५:२४) तथापि, त्या आधी “त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे.” ती कशी? “हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले. [स्थलांतरित करण्यात आले.]” याचप्रकारे पौलाला स्थलांतरित करण्यात आले वा “नंदनवनात उचलून नेण्यात आले” याचा अर्थ त्याला ख्रिस्ती मंडळीचा भावी आध्यात्मिक नंदनवनाचा दृष्टांत देण्यात आला. (२ करिंथकर १२:१–४) अशाप्रकारे हनोखला यहोवाने शत्रूंच्या हातातून सुरक्षित ठेवून मरणात निजविले त्यावेळी त्याला भावी पृथ्वीवरील नंदनवनाचा दृष्टांत घडला असे दिसते. तद्वत, देवाला संतुष्ट करायचे आहे तर आम्हीही हनोखाप्रमाणे देवाचा संदेश निर्भिडपणे सांगितला पाहिजे. (प्रे. कृत्ये ४:२९–३१) आम्ही, देव अस्तित्वात आहे व “त्याचा शोध झटू करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे” असा विश्वास धरला पाहिजे.
९. देवाच्या सूचनांचे जवळून पालन करणे हा सुद्धा विश्वासाचा आणखी एक पैलू आहे हे नोहाने आपल्या मार्गाक्रमणाद्वारे कसे दाखविले?
९ देवाच्या सूचनांचे जवळून पालन करणे हे विश्वासाचा आणखी एक पैलू आहे. (वाचा इब्रीयांस ११:७.) विश्वासाने हालचाल करून नोहाने “देवाने त्याला सांगितले तेच केले.” (उत्पत्ती ६:२२, ७:१६) नोहाला “तोपर्यंत पाहण्यात आले नव्हते त्याविषयी . . . इश्वरी सूचना मिळाली” आणि एक मोठा जगव्याप्त जलप्रलय होणार या यहोवाच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला. विश्वास व देवावरील आदरयुक्त भय यामुळे नोहाने “आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी . . . तारू तयार केले.” आज्ञाधारकता व धार्मिक कृत्ये करून त्याने त्या विश्वासहीन जगाला त्याच्या अधार्मिक कृत्यांविषयी दोषी ठरविले व ते नाशास पात्र आहे हे जाहीर केले.—उत्पत्ती ६:१३–२२.
१०. नोहा तारू बांधण्याच्या कामात लागला होता तरी त्याने कोणत्या कार्यासाठी वेळ दिला?
१० नोहासुद्धा यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक होता कारण तो “धार्मिकतेचा उपदेशक” होता. (२ पेत्र २:५) तारू बांधण्याच्या कामी तो परिश्रम घेत होता तरी यहोवाचे साक्षीदार आज करतात त्या प्रमाणे त्यानेही प्रचारासाठी वेळ काढला. खरेच नोहाने त्या प्रलयकालापूर्वीच्या लोकांना देवाचा संदेश मोठ्या निर्भिडपणे सांगितला पण “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून होईपर्यंत कोणी त्याकडे लक्ष दिले नाही.”—मत्तय २४:३६–३९.
जलप्रलयानंतरच्या कुलपित्यामधील विश्वास
११. (अ) विश्वासामध्ये यहोवाच्या अभिवचनावरील पूर्ण आत्मविश्वासाचा समावेश होता हे अब्राहामाने कसे दाखविले? (ब) अब्राहाम विश्वासाने कोणत्या “नगरा”ची वाट पाहून होता?
११ विश्वासामध्ये यहोवाच्या अभिवचनांवरील पूर्ण आत्मविश्वास येतो. (वाचा इब्रीयांस ११:८–१२.) विश्वासाद्वारे अब्राहामाने (अब्राम) देवाच्या आज्ञांचे पालन केले व भौतिकदृष्ट्या पुष्कळ काही देणारे खास्द्यांचे ऊर शहर सोडले. आपल्याद्वारे “पृथ्वीवरील सर्व कुळे” आशीर्वादित होतील आणि आपल्या संतानाला एक देश मिळेल या यहोवाच्या अभिवचनावर त्याने विश्वास ठेवला. (उत्पत्ती १२:१–९; १५:१८–२१) अब्राहामाचा मुलगा इसहाक व पणतू याकोब हे “त्याच वचनाचे सहभागी वारीस” होते. विश्वासामुळेच अब्राहाम “परदेशात राहावे त्याप्रमाणे . . . वचनदत्त देशात . . . जाऊन राहिला.” “पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता.” होय. देवाच्या स्वर्गीय राज्याची अब्राहामाने प्रतिक्षा केली. या राज्यवर्चस्वाखाली पृथ्वीवर त्याला पुनरूत्थान मिळणार. तर मग हे राज्य तुमच्या जीवनात महत्वाचे स्थान राखून आहे का?—मत्तय ६:३३.
१२. यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास राखल्यामुळे सारेच्या बाबतीत काय घडले?
१२ देवभिरू कुलपित्यांच्या बायकांचाहि यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास होता. उदाहरणार्थ, अब्राहामाची बायको सारा सुमारे ९० वर्षे वाझं राहिली व “वयोमर्यादेपलिकडे” गेली होती तरी विश्वासामुळेच तिला “गर्भधारणेची शक्ती मिळाली कारण तिने वचन देणाऱ्यास [देवास] विश्वसनीय मानले.” काही काळातच सारेने इसहाकाला जन्म दिला. शंभर वर्षे वयाचा अब्राहाम वंश स्थापनेच्या बाबतीत “निर्जिव झालेला होता” तरी त्याच्या कडून “संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित संतति निर्माण झाली.”—उत्पत्ती १७:१५–१७; १८:११; २१:१–७.
१३, १४. (अ) अब्राहाम, इसहाक व याकोब यांना “वचनानुसार फलप्राप्ती झाली नाही” तरी त्यांची मनोवृत्ति कशी होती? (ब) आम्हाला यहोवाच्या अभिवचनांची त्वरित पूर्णता दिसत नसली तर कुलपित्यांनी यहोवावर दाखविलेल्या निष्ठेचा विचार केल्यामुळे आम्हाला कसा लाभ घडू शकतो?
१३ वचनाची पूर्णता तत्काळ अनुभवण्यास मिळाली नाही तरी विश्वास आम्हाला यहोवास निष्ठावंत राहण्यास मदत देईल. (वाचा इब्रीयांस ११:१३–१६.) विश्वासू कुलपिते, देवाने त्यांना दिलेल्या अभिवचनाची पूर्णता न पाहताच वारले. तरी “त्यांनी ती [अभिवचने] दुरुन पाहिली व त्यांना वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत असे पत्करले.” त्यांनी विश्वासाच्या आधारावर आपले जीवन व्यतित केले कारण बऱ्याच पिढ्यानंतर अब्राहामाच्या संतानाला वचनयुक्त देशाचा ताबा मिळाला.
१४ आपल्या आयुष्यात अभिवचनाची फलप्राप्ती पहावयास मिळाली नाही म्हणून अब्राहाम, इसहाक व याकोब नाराज झाले नाहीत व ते धर्मत्यागी बनले नाहीत. त्यांनी यहोवाचा त्याग केला नाही व ऊर देशाला परत जाऊन तेथील जगाच्या वहिवाटीत निमग्न झाले नाहीत. (पडताळा योहान १७:१६; २ तिमथ्यी ४:१०; याकोब १:२७; १ योहान २:१५–१७.) नाही, त्यांनी ऊर पेक्षा “अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची” ‘उत्कंठा धरली.’ याकारणास्तव यहोवाला “त्यांचा देव म्हणवून घ्यायला . . . लाज वाटत नाही.” मरणापर्यंत त्यांनी सर्वसमर्थ देवावर आपला विश्वास राखला. या कारणास्तव त्या “नगरा”चे म्हणजे देवाने त्यांच्यासाठी आधीच सिद्ध केलेल्या मशीही राज्याचे पृथ्वीवरील साम्राज्यात जीवनप्राप्तीसाठी त्यांचे लवकरच पुनरूत्थान करण्यात येईल. पण तुम्हाबद्दल काय? तुम्ही जरी कित्येक वर्षे ‘सत्यात चालत’ असला व यहोवाच्या सेवेत बरीच वर्षे घालविली असली तरी देवाच्या वचनयुक्त नवीन व्यवस्थीकरणावरील आपला आत्मविश्वास राखला पाहिजे. (३ योहान ४; २ पेत्र ३:११–१३) अशा या विश्वासासाठी तुम्हाला व विश्वासू कुलपित्यांना केवढे थोर प्रतिफळ मिळणार!
१५. (अ) कशामुळे अब्राहाम इसहाकाचे अर्पण करण्यास पुढे होऊ शकला? (ब) अब्राहाम व इसहाकाभोवती गुंफलेल्या घटनेने आमच्या विश्वासावर कसा परिणाम करण्यास व्हावा? (ब) त्या घटनेद्वारे भविष्यवादितपणे काय चित्रित झाले?
१५ देवाचे निःशंक आज्ञापालन हा सुद्धा विश्वासाचा महत्वपूर्ण पैलू आहे. (वाचा इब्रीयांस ११:१७–१९.) अब्राहामने निःशंकपणे यहोवाची आज्ञा मानल्यामुळेच त्याने इसहाकाचे, सारेपासून लाभलेल्या एकमेव “एकुलत्या एकाचे” अपर्ण केले. अब्राहामाला हे कसे जमले? कारण त्याच्याच द्वारे संतानाचे अभिवचन पूर्ण करायचे आहे तर जरूर भासल्यास “त्याला [इसहाक] मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे हे त्याने मानले” होते. एका क्षणातच अब्राहामाच्या हातातील सुऱ्याने इसहाकाचा बळी घेतला असता पण देवदूताच्या वाणीने त्यास थांबविले. या कारणास्तव, अब्राहामास इसहाक मृत्युच्या दाढेतून “लाक्षणिक अर्थाने . . . परत मिळाला.” याचप्रमाणे आम्हालाहि आमचे वा आमच्या मुलांचे जीवन पणाला लागले तरी देवावर विश्वास व्यक्त करण्याची चालना मिळाली पाहिजे. (१ योहान ५:३) अब्राहाम व इसहाक यांच्याबाबतीत हे भविष्यवादितरित्या लक्षवेधकपणे दिसले की यहोवा देव आपल्या एकुलत्या एका पुत्राचे, येशू ख्रिस्ताचे कसे खंडणी यज्ञार्पण पुरवील की त्याद्वारे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तारणप्राप्ती होईल.—उत्पत्ती २२:१–१९; योहान ३:१६.
१६. आमची मुले व देवाच्या अभिवचनांवीरल विश्वास यांच्याबाबतीत कुलपित्यांनी कोणते उदाहरण मांडले?
१६ आम्हाठायी विश्वास असला म्हणजे आम्ही आमच्या मुलांना देवाने भविष्याविषयी दिलेल्या अभिवचनांवर आशा ठेवण्याची मदत देऊ शकू. (वाचा इब्रीयांस ११:२०–२२.) कुलपित्यांचा विश्वास इतका दांडगा होता की, जरी यहोवाने दिलेली अभिवचने त्यांच्या जीवनमानात संपूर्णरित्या पूर्ण झाली नाहीत तरीही त्यांनी ती, जणू मोलाचा ठेवा या अर्थी आपल्या मुलांना वारशाप्रमाणे सोपवून दिली. अशा प्रकारे “इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणाऱ्या गोष्टींविषयी . . . आशीर्वाद दिला.” तसेच मरणाच्या पंथाला लागलेल्या याकोबाने योसेफाचे पुत्र एफ्राईम व मनश्शे यांना आशीर्वाद दिला. इस्राएल लोक मिसर सोडून वचनयुक्त देशात जातील हा योसेफाचा दृढ विश्वास होता त्यामुळेच त्याने आपल्या भावांकडून ही शपथ वदविली की त्यांनी त्याकडे प्रगमन करताना त्याच्या अस्थी सोबत न्याव्या. (उत्पत्ती २७:२७–२९; ३८–४०; ४८:८–२२; ५०:२४–२६) तर मग यहोवाने ज्याविषयीचे अभिवचन दिले आहे त्यावरील विश्वास वाढविण्याकरता तुम्ही तुमच्या कुटुंबास मदत देत आहात का?
देवाला प्रथम स्थानी ठेवण्यास विश्वास मदत देतो
१७. मोशेच्या पालकांनी विश्वासात कशी हालचाल केली?
१७ विश्वास आम्हाला यहोवा व त्याच्या लोकांना, जग जे देऊ इच्छिते त्या कोणत्याहि गोष्टीपेक्षा पुढे ठेवण्यास चालना देते. (वाचा इब्रीयांस ११:२३–२६.) मोशेच्या पालकांनी विश्वास प्रदर्शित केला त्यावेळी इस्राएली लोकांना मिसरी दास्यत्वातून मुक्तता प्राप्त करण्याची जरूरी होती. इब्री मुलाला जन्माच्यावेळीच ठार करण्याच्या ‘राजाच्या आज्ञेचे त्यांनी भय वाटू दिले नाही.’ उलटपक्षी त्यांनी मोशेला तीन महिने लपवून ठेवले व शेवटी त्यांनी लव्हाळ्याची पेटी तयार करून त्यात त्याला घातले व नाईल नदीकिनारी बोरूत ठेवले. फारोच्या कन्येला तो आढळल्यावर तिने त्याची ‘स्वतःचे मूल या अर्थी वाढ केली.’ तरीपण प्रथमतः मोशेची, त्याचा बाप व आई अम्राम व याखेबैद यांच्या घरी काळजी वाहिली गेली व त्याला आध्यात्मिक तालीम दिली गेली. त्यानंतर फारोच्या घरातील सदस्य म्हणून त्याला “मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले” आणि तो मानसिक व शारीरिक क्षमतेत “भाषणात व कृतीत पराक्रमी” झाला.—प्रे. कृत्ये ७:२०–२२; निर्गम २:१–१०; ६:२०.
१८. मोशाने आपल्या विश्वासामुळे यहोवाच्या भक्तीसंबंधाने कोणता पवित्रा घेतला?
१८ तरीही मिसरी शिक्षण आणि बादशाही थाटाचा भौतिक दिमाख यांना मोशेला यहोवाच्या भक्तीचा त्याग करावयास लावून धर्मत्यागी बनवता आले नाही. उलट, “मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले.” त्याचे हे मनोगत त्याने एका इब्री बंधूची बाजू घेतली त्यावेळी स्पष्ट झाले. (निर्गम २:११, १२) मोशाने “पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर [यहोवा देवाचे इस्राएली सह उपासक] दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले.” तुम्ही योग्य आध्यात्मिक तालमीचा सबळ आधार लाभलेले बाप्तिस्मा झालेले यहोवाचे सेवक आहात तर मोशाचे उदाहरण अनुसरून खऱ्या भक्तीसाठी दृढ उभे राहाल का?
१९. (अ) मोशाने यहोवा व त्याच्या लोकांनाच आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवले हे कसे दिसले? (ब) मोशाने कोणत्या प्रतिफळावर आपली दृष्टी ठेवली?
१९ मोशाने यहोवाच्या लोकांच्या समूहात स्वतःला ठेवले. “कारण ख्रिस्त असण्यासाठी सोसावी लागणारी विटंबना ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ति आहे असे त्याने गणिले.” बहुतांशी मोशाने ‘ख्रिस्ताचा किंवा देवाच्या अभिषिक्ताचा प्राचीन नमुना बनण्यासाठी मानहानी पत्करणे हे मिसरच्या संपतीपेक्षा श्रेष्ठ मानले.’ बादशाही घराण्याचा सदस्य असल्यामुळे त्याला मिसरातील संपत्ती व कीर्ति यांची लयलूट घेता आली असती. पण त्याने विश्वास राखला व ‘आपली दृष्टी प्रतिफळावर ठेवली.’ देवाच्या वचनयुक्त नव्या व्यवस्थेत पृथ्वीवर पुनरूत्थानाद्वारे मिळणारे चिरकालिक जीवन हे ते प्रतिफळ होते.
२०. मोशाच्या अनुभवाबद्दल असे काय सांगता येईल जे हे दाखविते की विश्वास आम्हाला यहोवाचे सेवक या अर्थी निर्भिड करू शकतो?
२० यहोवावर आमचा मुक्तिदाता या अर्थी आत्मविश्वास असल्यामुळे विश्वास आम्हाला निर्भिड करतो. (वाचा इब्रीयांस ११:२७–२९.) मोशाने कोणा मिसऱ्याला ठार केले आहे हे ऐकल्यावर फारोने त्याला ठार मारण्यासाठी त्याचा शोध घेतला. “पण मोशे फारोपुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहंचला.” (निर्गम २:११–१५) मिसरातून मार्गस्थ होण्याच्या विषयाचा पौल इब्रीयांस अप्रत्यक्ष उल्लेख करून देतो व म्हणतो: “त्याने [मोशाने] राज्याच्या क्रोधाला [ज्याने त्याला इस्राएलांखातर देवाचे प्रतिनिधित्व करण्याबाबत ठार करण्याची धमकी दिली] न भिता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने नेट धरला.” (निर्गम १०:२८, २९) मोशाने देवाला प्रत्यक्ष पाहिले नव्हते तरी यहोवाने त्याच्याशी राखलेले दळणवळण त्याला इतके खरे वाटले की तो, जणू “जो अदृश्य आहे त्याला पाहत” होता. (निर्गम ३३:२०) तुमचे यहोवाशी असणारे नाते इतके बळकट आहे का?—स्तोत्रसंहिता ३७:५; नीतीसूत्रे १६:३.
२१. इस्राएलांचे मिसरातून झालेल्या गमनाच्या बाबतीत “विश्वासाने” काय घडले?
२१ इस्राएलांचे मिसरातून गमन होण्याआधी “त्याने [मोशाने] वल्हांडण सण व रक्तसिंचन हे विधि विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना [इस्राएलांना] शिवू नये.” होय, वल्हांडण सण आचरण्यास व मिसऱ्यांचे प्रथम जन्मलेले ठार होत असताना इस्राएलांचे प्रथम जन्मलेले पुत्र बचावतील अशी श्रद्धा बाळगण्यास विश्वास जरूरीचा होता; व त्या विश्वासास प्रतिफळ लाभले. (निर्गम १२:१–३९) याशिवाय “जसे कोरड्या भूमीवरून तसे ते [इस्राएल लोक] विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार मेले. मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करीत असता बुडून मेले.” देव केवढा अद्र्भित मुक्तिदाता ठरला! या मुक्ततेमुळेच इस्राएल लोकांनी “यहोवाचे भय धरिले आणि यहोवावर व त्याचा सेवक मोशे याच्यावर विश्वास ठेविला.”—निर्गम १४:२१–३१.
२२. विश्वासासंबंधाने कोणत्या प्रश्नांचा अजून विचार व्हावयाचा आहे?
२२ मोशे व कुलपित्यांचा विश्वास आज यहोवाच्या साक्षीदारांसाठी एक नमुना खराच आहे. पण मग देवाने अब्राहामाच्या संतानासोबत इश्वरशासित संघटनात्मक राष्ट्र या अर्थी व्यवहार राखला तेव्हा पुढे काय घडले? प्राचीन काळी घडलेल्या विश्वासाच्या आणखी कृत्यांद्वारे आम्हाला काय शिकायला मिळते? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला पुढील अंकात मिळतील.
तुम्ही काय उत्तर देणार?
◻ विश्वास काय आहे?
◻ हनोखाचे उदाहरण आम्हाला विश्वासाबाबत काय शिकवते?
◻ विश्वासामध्ये यहोवाच्या अभिवचनांच्या बाबतीत पूर्ण आत्मविश्वास समाविष्ट असतो हे देवभिरू कुलपित्यांनी कसे दाखूवन दिले?
◻ अब्राहामाकरवीची कोणती कृति सुचविते की, देवाचे निःशंक आज्ञापालन करणे हा विश्वासाचा महत्वपूर्ण पैलू आहे?
◻ मोशाने केलेली कोणती हालचाल याचे स्पष्टीकरण देते की विश्वास याचा अर्थ यहोवा व त्याच्या लोकांना, जग जे काही देऊ करते त्या पेक्षाहि प्राधान्य देण्यास हवे, असा आहे?