वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ६/१ पृ. २१-२६
  • ख्रिस्ती योबेल हजारवर्षीय राजवटीत कळस गाठते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती योबेल हजारवर्षीय राजवटीत कळस गाठते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सर्वांसाठी यज्ञार्पण!
  • १९१९—प्राथमिक मुक्‍तता
  • लाखोंसाठी योबेल
  • ख्रिस्ती योबेलचा कळस
  • योबेलच्या हजार वर्षीय कळसानंतर
  • यहोवाचे योबेल—आम्हासाठी आनंद करण्याजोगा काळ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • यहोवा आपल्या सुटकेची योजना करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • सुटकेचं वर्ष आणि भविष्यात मिळणारी कायमची सुटका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ६/१ पृ. २१-२६

ख्रिस्ती योबेल हजारवर्षीय राजवटीत कळस गाठते

१. इस्राएल प्रजासत्ताक राष्ट्रातील यहुद्यांनी कशाच्या पुनर्स्थापनेचा प्रयत्न केला नाही व का?

इस्राएलाच्या प्रजासत्ताक राष्ट्रात (ज्याची स्थापना १९४८ मध्ये झाली), आपण अद्याप मोशेच्या नियमशास्त्राधीन आहोत असे समजणाऱ्‍या कित्येक यहुद्यांना योबेल वर्षाचा समारंभ करण्याची पुनर्स्थापना करता आली नाही. त्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात खूप अडचणी उद्‌भवतील. जमिनीचे मालकी हक्क समाविष्ठ असल्यामुळे प्रचंड आर्थिक समस्या उद्‌भवतील. प्राचीन १२ वंश ज्या प्रदेशावर आपला ताबा राखून होते तो संपूर्णपणे आज इस्राएल प्रजासत्ताकाच्या वसाहतीत नाही. शिवाय मंदिर व लेवी वंशातील प्रमुख याजकही नाही. लोकांची वंशपरत्वे ओळख आता लोपली आहे.

२. प्राचीन इस्राएलातील योबेलाची पडछाया साजरा करण्याची सुरुवात काही ख्रिश्‍चनांनी आधीच कशी केली आहे?

२ पण मग, योबेल समारंभाच्या आशीर्वादाविषयी आम्ही कोठे आहोत? आम्हाला माहीत आहे की प्राचीन योबेल हे मुक्‍ततेच्या सणाचे वर्ष होते—यात, ज्या इस्राएलांनी स्वतःला दास्यत्वात विकले होते त्यांची मुक्‍तता घडे आणि स्वमालकीच्या जमिनी मालकाला परत मिळत. (लेवीय २५:८–५४) मागील लेखात आम्हाला हे पाहायला मिळाले की मोशेच्या नियमशास्त्राशी बद्ध असणारी ही व्यवस्था इ.स. ३३ मध्ये संपुष्टात आली. (रोमकर ७:४, ६; १०:४) तेव्हा देवाने एका नव्या करारास सामोरे आणले ज्याच्या आधारे तो विश्‍वास राखणाऱ्‍यांची पापे क्षमा करू शकत होता, त्यांचा पवित्र आत्म्याने अभिषेक करून त्यांना स्वर्गीय वतन प्राप्तीसाठी दत्तक पुत्र या अथी स्विकारू शकत होता. (इब्रीयांस १०:१५–१८) या नव्या कराराच्या व्यवस्थेमुळे केवळ १,४४,०००च्या “लहान कळपास” लाभ घडू शकत होता. यांना “पृथ्वीवरून विकत घेण्यात आले आहे.” तर मग, योबेलाकरवी चित्रित असणारी मुक्‍तता इतर लाखो निष्ठावान ख्रिश्‍चनांना कशी मिळू शकते?—लूक १२:३२; प्रकटीकरण १४:१–४.

सर्वांसाठी यज्ञार्पण!

३. येशूचे यज्ञार्पण केवढे परिणामकारक व दीर्घकालीन आहे?

३ ख्रिस्तीपूर्व काळात प्रायश्‍चिताच्या वार्षिक दिनाचा लाभ केवळ एका वर्षापुरताच लागू होणार होता. प्रभु येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणाचे फायदे सतत, चिरस्थायी आहे. अशाप्रकारे प्रतिनमुनेदार महायाजक येशू याला परत मानव बनण्याची, स्वतःचे यज्ञार्पण करण्याची व मग स्वर्गात जाऊन यहोवा देवाच्या परमपवित्र स्थानी दर वर्षी आपल्या यज्ञार्पणाचे मोल सादर करण्याची गरज नाही. शास्त्रवचनांनी म्हटले त्याप्रमाणे: “मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्‍यापुढे मरण पावत नाही; त्याच्यावर ह्‍यापुढे मरणाची सत्ता चालत नाही.”—रोमकर ६:९; इब्रीयांस ९:२८.

४, ५. (अ) इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टापासून येशूच्या यज्ञार्पणाच्या अवलंबनाचा परिणाम कोणता दिसला? (ब) त्याच्या यज्ञार्पणाचा आणखी विस्तारीत अवलंब होऊ शकतो असे सूचित करणारा कोणता निर्देश आम्हापाशी आहे?

४ तद्वत, इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या वर्षापासून विश्‍वास राखणारे, वैभवी येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने जन्मलेले शिष्य बनले तेव्हा पासून त्यांनी ख्रिस्ती योबेलचा उत्सव साजरा करण्यास आरंभ केला. त्यांची “पाप व मरण ह्‍यांच्या नियमापासून मुक्‍त”ता घडल्यामुळे त्यांना चैतन्यशील स्वातंत्र्याचा अनुभव येऊ लागला. (रोमकर ८:१, २) त्यांनी ख्रिस्ती संदेशाचीही घोषणा केली की ज्यामुळे इतरांना त्यांच्या पापांची क्षमा होण्याची, अभिषिक्‍त होऊन देवाचे आध्यात्मिक पुत्र होण्याची संधि प्राप्त होऊ शकली. तर मग, याचा असा अर्थ आहे का की जो १,४४,००० च्या मर्यादित गटातील नाही त्याला सध्या आनंदी मुक्‍ततेचा अनुभव घेता येणार नाही?

५ याबाबतीत प्रेषित पौलाचे रोमकरांस पत्र ८:१९–२१ मधील शब्द खूपच अर्थसूचक आहेत. तो म्हणतो: “सृष्टि देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे, कारण सृष्टि [पापी असल्यामुळे व पापास काढून टाकण्यास असमर्थ असल्यामुळे] व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली.” यानंतर पौलाने यावर जोर देऊन म्हटले की, “सृष्टिही स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहत” आहे. या कारणास्तव ही मुक्‍तता स्वर्गातील “देवाच्या मुलां”पुरतीच मर्यादित नाही हे स्पष्ट होते. योहान ३:१६ मध्ये यासारखेच असणारे शब्द याची निश्‍चिती देतात. तसेच आधी उल्लेखिले त्या प्रमाणे अभिषिक्‍त प्रेषित योहानाने म्हटले की, ख्रिस्त हा “आपल्या पापाबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि पापाबद्दल आहे.”—१ योहान २:२.

१९१९—प्राथमिक मुक्‍तता

६, ७. १९१९ पासून कोणत्या मुक्‍ततेची घोषणा करण्यात येत आहे व तेव्हा पासून का?

६ आधुनिक काळात ख्रिस्ती योबेलचा उत्सव साजरा करणाऱ्‍या अभिषिक्‍तांनी खासपणे १९१९ पासून मुक्‍तिदायक सुवार्ता घोषित करणे चालू ठेवले आहे. “पण केवळ त्याच वर्षापासून का?” असा कदाचित, जर तुमचा जन्म अलिकडील वर्षात झाला असला तर प्रश्‍न असेल. याविषयी आपण पाहू या व ते पाहताना तुमच्या मुक्‍ततेच्या आनंदाचा विचारही सोबत ठेवू या.

७ त्या तारखेआधी कित्येक दशके यहोवाचे अभिषिक्‍त जन स्टडीज इन द स्क्रिपचर्स (१८८६–१९१७) या मालिकेत पवित्र शास्त्रीय सत्य प्रकाशित करीत होते. यासोबत त्यांनी कितीतरी माहितीयुक्‍त पुस्तिका व हस्त पत्रिकांचे वितरण केले. पहिल्या जागतिक महायुद्ध काळात विरोध, परीक्षण व चाळणी झाली व यामुळे त्यांचे काम मंदावले. पण १९१९ पासून अभिषिक्‍त शेष नव्या उत्साहाने पवित्र शास्त्रीय सत्य घोषित करण्यास पुढे सरसावले. इ.स. ३० मध्ये येशू जसे म्हणू शकला की, “धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्‌यांस पुन्हा दृष्टीचा लाभ” करून देण्यासाठी त्याचा अभिषेक केला गेला आहे त्याप्रमाणे आधुनिक काळाचे अभिषिक्‍त जनही तसेच म्हणू शकले. सप्टेंबर १–७, १९१९a मध्ये झालेल्या चैतन्यशील अधिवेशनानंतर त्यांनी अत्यंत उत्साहाने सत्याचा प्रचार आरंभिला की ज्यामुळे अगणित लोकांची मुक्‍तता घडू शकली.—लूक ४:१८.

८, ९. कोणत्या अर्थी पुष्कळांना मुक्‍तता लाभली आणि अशी मुक्‍तता घोषित करण्यासाठी कोणत्या मार्गदर्शक साहित्याचा वापर झाला?

८ उदाहरणार्थ, द हार्प ऑफ गॉड (१९२१) या पवित्र शास्त्र मार्गदर्शक साहित्याचा विचार करा, ज्यात अशी महत्वपूर्ण सत्य सादर करण्यात आली होती जी, जणू तंतुवाद्यावरील दहा तारी होत्या. या पुस्तकाने म्हटले: “न विझणारी आग व गंधक यांनी धगधगत असलेल्या नरकातील सार्वकालिक यातना वा पीडा . . . ही दुष्टाकरता शिक्षा आहे” या तत्वामुळे “पुष्कळांना पवित्र शास्त्र अभ्यास करण्याची भीती वाटून ते तो करीत नाही.” या पुस्तकाच्या वितरीत झालेल्या ६०,००,००० प्रतीच्या वाचकांना हे शिकायला मिळाले की, “निदान चार वेगवेगळया व विशिष्ट कारणास्तव (हे तत्व) खरे असू शकत नाही: (१) ते व्यवहार्य वाटत नाही; (२) ते न्यायाच्या विरूद्ध आहे; (३) ते प्रीती या तत्वाच्या विरूद्ध आहे आणि (४) ते पूर्णतयः अशास्त्रवचनीय आहे.” जे लोग नरकातील चिरकालिक यातना वा परगेटरीतील त्रास याच्या भीतीत लहानाचे मोठे झाले त्यांच्या करता हे केवढे मुक्‍तिदायक होते याचा तुम्हाला विचार करता येईल!

९ होय, त्या अभिषिक्‍तांकरवीच्या उत्साही पवित्र शास्त्रीय सत्याच्या प्रचाराने खोटे शिक्षण, अंधश्रद्धा व अशास्त्रवचनीय प्रथा (जसे, की पूर्वजांची उपासना, दुरात्म्यांचे भय आणि धार्मिक पुढाऱ्‍या मार्फत केली जाणारी आर्थिक पिळवणूक) यांना दास राहिलेल्या जगभरातील लोकांची सुटका केली. काही पवित्र शास्त्रीय मार्गदर्शक साहित्यांचे शिर्षकच या साहित्याने लाखो लोकांवर जो मुक्‍तिदायक परिणाम घडवून आणला त्याची छटा देतात.b याप्रकारे, येशूने आपले शिष्य आपल्यापेक्षा “मोठी कृत्ये करतील” असे जे म्हटले ते त्याचे शब्द खरे झाले. (योहान १४:१२) येशूने आपल्या प्रचाराद्वारे “धरून नेलेल्याची सुटका” करण्याचे जे मुलभूत कार्य केले ते पाहता देवाच्या आधुनिक सेवकांनी त्यापेक्षा अधिक—जगभरात लाखोंकडे जाण्याचे कार्य केले.

१०. एक मोठी व व्याप्त रूपाची मुक्‍तता अनुभवण्यास येईल असे आम्ही का अपेक्षू शकतो?

१० तरीपण हे लक्षात घ्या की पहिल्या शतकात इ.स. ३३ च्या पेंटेकॉस्ट समयी आणखी मुक्‍ततेचे कार्य आरंभले गेले. तेथे “लहान कळप” याकरता ख्रिस्ती योबेल सुरु झाले. येथे यांच्या पापांची क्षमा होऊन त्यांना स्वर्गातील “देवाची मुले” होण्याप्रत निरविले गेले. पण आमच्या काळाबाबत काय? लाखो अशा इतर भक्‍तिमान ख्रिश्‍चनांची पापाच्या दास्यत्वापासून सुटका होऊन यांनाही मोठ्या योबेलचा उत्सव साजरा करता येईल का? होय, हेच प्रेषित पेत्राने, “सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्टयांच्या मुखाने सांगितले त्या काळा” बद्दल जे काही म्हटले त्याकरवी सूचित केले.—प्रे. कृत्ये ३:२१.

लाखोंसाठी योबेल

११. लेवीय याचा २५वा अध्याय, आध्यात्मिक इस्राएलाच्या पुढेही असणाऱ्‍या मुक्‍ततेची आम्ही अपेक्षा धरू शकतो हे कसे सुचवितो?

११ लेवीय पुस्तकाच्या २५ व्या अध्यायात इस्राएलांना, ते यहोवाच्या दृष्टिने त्याचे “दास” असून त्यांची मिसरातून मुक्‍तता करण्यात आली हे दोनदा आवर्जून सांगण्यात आले ही चित्तवेधक गोष्ट आहे. (वचने ४२ व ५५) योबेल विषयक माहिती देणारा हाच अध्याय “उपरी” व ‘त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय’ यांचाहि उल्लेख करतो. यांची साम्यता आज “मोठा लोकसमुदाय” यात दिसते. हे आज आध्यात्मिक इस्राएलांसोबत ख्रिस्ती सुवार्ता घोषित करण्यात सहभागी होत आहेत.

१२. १९३५ पासून कोणती आनंदी हालचाल प्रगति पथावर आहे?

१२ १९३५ पासून “उत्तम मेंढपाळ” येशू ख्रिस्ताने अभिषिक्‍त शेषांच्या क्रियाशी सहवासात, त्याने ज्यांना “दुसरी मेंढरे” असे संबोधिले त्यांना आणले. यांना त्याने ‘आणले’ व त्याद्वारे “एक मेंढपाळ” वर्चस्वाखाली “एक कळप” तयार केला. (योहान १०:१६) ही “दुसरी मेंढरे” आता लाखोच्या संख्येने गोळा झाली आहेत. तुम्ही या आनंदी लोकसमुदायापैकी आहात तर देवाचा मित्र या अर्थी तुम्हाला अधीच नीतीमान धरण्यात आले आहे व मानवी निर्मितीचा भाग या नात्याने तुम्ही, या पृथ्वीवर “सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या” काळी “नश्‍वरतेच्या दास्यत्वापासून मुक्‍त होण्याची वाट पाहत’ आहात. ही चुकीची आशा नाही.—रोमकर ८:१९–२१; प्रे. कृत्ये ३:२०, २१.

१३. ‘मोठे संकट” झाल्यावर कोणता आशीर्वाद खासपणे येईल हे आम्हाला दिसेल?

१३ स्वर्गीय वतनासहित ख्रिस्ती योबेलचा अनुभव घेणाऱ्‍या १,४४,०००ना दृष्टांतात पहिल्यावर प्रेषित योहान एका “मोठ्या लोकसमुदाया”चे वर्णन करून म्हणतो: “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. ह्‍यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत. ह्‍यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत, ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात.”—प्रकटीकरण ७:१४, १५.

१४, १५. “मोठा लोकसमुदाय” गटाच्या लोकांना आता आनंद करण्याजोगे खास कारण का आहे?

१४ आताही, मोठ्या संकटाच्या आधी हे येशूने ओतलेल्या रक्‍तावर आपला विश्‍वास प्रदर्शित करीत आहेत व त्या द्वारे त्याच्या यज्ञार्पित मरणाआधारे लाभ मिळवीत आहेत. मोठी बाबेल यापासून मुक्‍तता लाभल्याचा तसेच यहोवा देवासमोर चांगला विवेकभाव प्राप्त झाल्याचा आनंद यांना होत आहे. या शिवाय मत्तय २४:१४ च्या पूर्णतेस अनुलक्षून, शेवट येण्याआधी राज्याची सुवार्ता प्रसारीत करण्याच्या विलोभनीय हक्काचाही आनंद घेत आहेत.

१५ तथापि, जन्मतः लाभलेल्या पाप व अपूर्णतेपासून मुक्‍त होण्याविषयीच्या मोठ्या लोकसमुदायाच्या भवितव्याबद्दल काय? ती वेळ जवळ आली आहे का? भाकित केलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत जी पिढी नाहीशी होणार नाही असे येशूने म्हटले त्या मानवजातीच्या पिढीतील काही लोक अद्याप जिवंत आहेत हे मानण्यास आपणापाशी कारण आहे। (मत्तय २४:३४) तद्वत, “व्यवस्थीकरणाची समाप्ती” याचा भव्य कळस हा आता हाताशी आला आहे.—मत्तय २४:३.

ख्रिस्ती योबेलचा कळस

१६. देवाच्या कार्यवाहित होणाऱ्‍या उद्देशात आपण सध्या कोठे आहोत व पुढे काय आहे?

१६ “सर्वसमर्थ देवाची त्या मोठ्या दिवसाची लढाई” वेगाने येत आहे यावेळी “लहान कळप” याचे शेष व त्यांचा विश्‍वासू निष्ठावंत साथीदार “मोठा लोकसमुदाय” यहोवा देवाला आपली सचोटी राखतील व त्याजकडील इश्‍वरी संरक्षणाची आशा धरतील. यहोवा आपल्या सर्व शत्रू सैन्यावर चिरडून टाकणारा नाश आणून स्वतःच्या बाबतीत सार्वभौम सत्ताधीश असण्याविषयीची थोरवी वाढवील अशी ते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहून आहेत. ख्रिस्ती स्वतंत्र्याचा आनंद उपभोगण्या विषयीचा हा केवढा कळस असेल!—प्रकटीकरण १६:१४; १९:१९–२१; हबक्कुक २:३.

१७. थोर योबेलात लाखोंना अद्याप मुक्‍तता कशी प्राप्त होईल?

१७ यानंतर विजयी राजा येशू ख्रिस्त याची शुद्ध केलेल्या पृथ्वीवर राज्यकीर्द सुरु होईल. ही राजवट यहोवाच्या विश्‍वव्याप्त सार्वभौमत्वाला मान्यता देईल. येशू ख्रिस्त राजांचा राजा व प्रभुंचा प्रभु या अर्थी पृथ्वीचा पुर्ण ताबा आपणाकडे घेईल. तेव्हा तो आपल्या यज्ञार्पणाचे मोल, विश्‍वास राखणाऱ्‍या आणि देव ख्रिस्ताकरवी देत असलेल्या पापांच्या क्षमेचा स्वेच्छेने स्विकार करणाऱ्‍या पुनरूत्थितांसमवेत लाखो मानवांना लागू करील. हे देव “त्यांच्या डोळ्‌यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, त्यानंतर मरण हे नाही, शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत” या गोष्टींच्या प्रत्ययात दिसेल. (प्रकटीकरण २१:३, ४) ही खरी मुक्‍तता नाही तर मग आणखी काय?

१८. प्राचीन योबेलच्या तुलनेत या पृथ्वीची दशा नव्या व्यवस्थीकरणात कशी असेल?

१८ यापुढे पृथ्वी ही लोभिष्ठ मानव, महापालिका आणि मानवी सरकार याकरवी चालविली, प्रदुषित केली आणि नासाडी केली जाणार नाही. (प्रकटीकरण ११:१८) उलटपक्षी ती खऱ्‍या उपासकांना दिली जाईल. त्यांना यशयाच्या भविष्यवादाची अक्षरशः पूर्णता करणाऱ्‍या आनंदी कामाची नियुक्‍ति मिळेल: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्याचे फळ खातील. ते घरे बांधतील व त्यात दुसरे राहतील, ते लावणी करतील व फळ दुसरे खातील असे व्हावयाचे नाही. . . . त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण यहोवाने आशीर्वाद दिलेली ती संतति आहे.” (यशया ६५:२१–२५) हजार वर्षीय राज्यकीर्दीच्या समाप्तीला अनुवंशिक पाप व अपूर्णता याचा सर्व मागमूस काढून टाकला जाईल आणि देवाचे निष्ठावंत जन या पृथ्वीवर योबेल उत्सवाचा पूर्ण कळस साजरा करतील व त्याद्वारे योबेल संपेल. अशा पद्धतीने योबेलकरवी प्रतिछायित असणारी मुक्‍तता साध्य केलेली असणार.—इफिसकर १:१०.

योबेलच्या हजार वर्षीय कळसानंतर

१९, २०. हजार वर्षीय योबेलच्या आशीर्वादात सैतान व दुरात्मे ढवळाढवळ करण्याचा कसा प्रयत्न करतील, पण शेवटी काय होणार?

१९ प्रकटीकरण २०:१–३ भाकित करते की दियाबल सैतान हा दुरात्मिक सैन्याचा अधिपती आपल्या सैन्यासमवेत ख्रिस्त मानवजातीवर राज्य करणाऱ्‍या हजार वर्षीय कारकिर्दीत दिसणार नाही. पण तेच हजार वर्षीय कारकिर्दीच्या समाप्तीला सैतान व त्याच्या दुरात्म्यांना थोड्या काळाकरता सामोरे आणण्यात येईल तेव्हा या दुरात्म्यांना, ते दृश्‍यातून नाहीसे होताना पृथ्वी जशी पाहिली होती तशी आता दिसणार नाही. तर ती आता फारच विलाभनीय व सुंदर असे जगव्याप्त उद्यान बनलेली दिसेल. ही पृथ्वी विश्‍वासू जनांच्या “मोठ्या लोकसमुदायाने” तसेच ज्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताने खंडणी यज्ञापर्णाचे मरण सोसले त्या अगणित अशा पुनरूत्थितांकरवी भरलेली दिसेल. हजार वर्षाची समाप्ती येईपर्यंत ख्रिस्ती योबेलने मानवजातीला पापाच्या सर्व परिणामांपासून पूर्णतयः मुक्‍त केलेले असणार. (रोमकर ८:२१) अशी ही सुंदर स्थिती पुन्हा विस्कळीत करणे हे किती निंद्य कृत्य असेल बरे! तरीपण सर्वसमर्थ देवाच्या अनुज्ञेने दियाबल हा विस्कळीतपणे निर्माण करण्याचा शेवटला प्रयत्न करील. तो या कामात आपली आहे नाही तितकी शक्‍ती पणाला लावील. याच्याच अनुषंगाने प्रकटीकरण २०:७–१० व १४ मध्ये असे लिखित आहे:

२० “ती हजार वर्षे संपल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्‍त करण्यात येईल, आणि तो पृथ्वीच्या चार कोपऱ्‍यातील गोग व मागोग राष्ट्रांस ठकवावयास व त्यांस लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर वेढले. तेव्हा स्वर्गातून अग्नि उतरला आणि त्याने त्यांस खाऊन टाकिले. त्यास ठकविणाऱ्‍या सैतानाला अग्निच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले.”

२१. हजार वर्षीय राजवटीच्या शेवटाबरोबर ख्रिस्ती योबेल संपुष्टात येईल तेव्हा स्वर्गीय देवपुत्रांकरवी इयोब ३८:७ ची आठवण करून देणारा कोणता प्रतिसाद दिसेल?

२१ योबेल व्यवस्थेद्वारे आणली गेलेली खरी मुक्‍तता ही सर्वत्र उपभोगण्यात येईल. सर्व प्राणिमात्र मुक्‍त असतील व ते सर्व ज्या एकाचे नाव यहोवा आहे त्याचे स्तवन व सन्मान करीत राहतील. (स्तोत्रसंहिता ८३:१८) यहोवा संबंध विश्‍वभरात आपला उद्देश पूर्ण करीत असता हेच सर्वत्र खरे असेल. पृथ्वीवर मानवजातीची वसाहत होण्याआधी तिची निर्मिती केली जात होती त्यावेळी तिची विलाभनीय स्थिती पाहून प्रभात नक्षत्रांनी मिळून गायने केले, व सर्व देव कुमारांनी जयजयकार केला.” (इयोब ३८:७) तर मग ही पृथ्वी सर्वसमर्थ देवास संपूर्णपणे समर्पित असणाऱ्‍या आणि सचोटी राखणाऱ्‍या स्त्री पुरुषांनी बहरलेली पाहून त्यांना केवढा आनंद वाटेल बरे!

२२. स्तोत्रसंहिता १५०:१–६ मध्ये जे करण्याचे आर्जविण्यात आले आहे त्यानुसार आमची मनोवृत्ति कशी असावी?

२२ शास्त्रवचनावर पाडण्यात आलेल्या प्रखर प्रकाशाच्या उजेडात सर्व गोष्टी न्याहाळल्या नंतर आमच्या तोंडून मुक्‍त व मनमोकळेपणाचा प्रतिसाद आल्यावाचून राहणार नाही व त्यामुळेच आम्हीही स्वर्गीय आसमंतासोबत मिळून “हालेलूया!” असेच म्हणू. याच आर्जवी विनंतीसोबत स्तोत्रसंहितेच्या पुस्तकाचा समारोप होतो: “हालेलूया, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा. त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा. त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा. त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा. कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा. सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा. डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा. खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा. झणझणणाऱ्‍या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्‍वराचे स्तवन करो. हालेलूया.”—स्तोत्रसंहिता १५०:१–६, तानख बायबल (१९८५), ज्युईश पब्लिकेशन सोसायटी ऑफ अमेरिका.

[तळटीपा]

a  यावेळी एका नव्या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले जे “गोंधळलेल्या अरण्यात एका वाणी प्रमाणे असेल, त्याचे ध्येय येत असलेल्या सुवर्ण युगाची घोषणा करणे हे आहे.” सध्या या मासिकाचे नाव अवेक! असे आहे.

b  मिलियन्स नाव लिव्हिंग वील नेवर डाय (१९२०); डिलिव्हरन्स (१९२६); फ्रिडम फॉर द पीपल्स (१९२७); लिबर्टी (१९३२); “द ट्रुथ शाल मेक यु फ्री” (१९४३); व्हाट डु द स्क्रिपचर्स से अबाऊट “सर्व्हायवल आफ्टर डेथ”? (१९५५); लाईफ एव्हरलास्टिंग—इन फ्रीडम ऑफ द सन्स ऑफ गॉड (१९६६); सत्य जे चिरकालिक जिवनाप्रत निरविते (१९६८); मुक्‍तिकडे निरविणारा ईश्‍वरीय सत्याचा मार्ग (१९८०).

तुम्ही काय उत्तर देणार?

◻ इ.स. ३३च्या पेंटेकॉस्ट मध्ये येशूच्या शिष्यांची कशापासून सुटका झाली व याकरवी त्याच्यासाठी कशाची सुरुवात झाली?

◻ पहिल्या शतकात घडली त्यापेक्षा मोठी मुक्‍तता घडेल असे अपेक्षिण्याचे कोणते कारण आहे?

◻ १९१९ पासून कोणत्या प्रकारचे मुक्‍ततेचे कार्य होत आहे?

◻ भव्य योबेल पासून “दूसरी मेंढरे” कसा व केव्हा लाभ मिळवितील?

◻ योबेलचा कळस गाठल्यावर ही पृथ्वी कशी दिसेल?

[२३ पानांवरील चित्रं]

१९१९ मध्ये सिडर पॉईंट येथे मुक्‍ततेविषयीची घोषणा झाली

[२४ पानांवरील चित्रं]

“दुसरी मेंढरे” हजार वर्षीय योबेलमध्ये सहभागी होतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा