यहोवाचे योबेल—आम्हासाठी आनंद करण्याजोगा काळ
“पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. ह्या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे. . . . हे तुम्हाला पवित्र असावे. . . . असे केल्याने तुम्ही देशात सुरक्षित राहाल.”—लेवीय २५:१०–१२, १८.
१. लिबर्टी बेल या घंटेवर कोणता लेख आढळतो व त्याचे शब्द कोठून घेण्यात आले आहेत?
तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही राहात असला तरी अमेरिकेतील फिलाडेल्फिया, पेन्सिल्व्हानिया येथील लिबर्टी बेल या प्रसिद्ध घंटेबद्दल ऐकलेच असेल. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडीआ म्हणते की ही घंटा “जुलै ८, १७७६ रोजी इतर चर्च घंटांसोबत स्वातंत्र्याची जाहीर घोषणा निनादविण्यासाठी वाजली. या घंटेवरील मसुदा “देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी” हा पवित्र शास्त्रामधून (लेवीय २५:१०) आहे.”
२. मुक्ततेच्या संभवनीयतेविषयी तुम्हाला कसे वाटते पण त्या संबंधाने कोणत्या समस्या उभ्या राहतात?
२ मुक्तता ही नेहमीच प्रलोभित करणारी बाब राहिली आहे, होय ना? खोटी विचारधारा, राजकीय दबाव वा जाच तसेच वार्धक्य, आजार या पासून शक्तिपात होऊन परिणामित होणारे मरण या सर्व गोष्टींपासून खऱ्या स्वरूपाची मुक्तता होऊ शकणारे भवितव्य दृष्टिपथात दिसत असल्यास तुम्ही नक्कीच आनंदून जाल. तुमची तशी आकांक्षा आहेच तर तुम्ही आनंदित असण्याचे कारण आहे, शिवाय अशी आनंदाची आणखी कारणे आहेत. “पण, हे कसे काय होणार?” असे तुम्ही विचाराल, कारण प्रत्यक्षात कोणाही सरकारने अद्याप पूर्ण स्वरूपाची मुक्तता प्रदान केली नाही. तसेच कोणा शास्त्रज्ञाला आणि वैद्याला वार्धक्य, आजार व ओघाओघाने येणारे मरण यास बांध घातला आला नाही. तरीपण, आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तुम्ही खऱ्या मुक्ततेविषयी आनंद करण्याजोगा आधार हा आहे. तो कसा याविषयीचा विचार करण्यासाठी पार्श्वभूमीत दडलेली महत्वपूर्ण माहिती विचारात घ्या ज्याकरवी तुम्ही आता व भवितव्यात होणाऱ्या घडामोडीत स्वतःला समाविष्ठ करू शकाल.
३. योबेल काय होते व त्या वर्षी काय घडे?
३ वर नमद असणाऱ्या उताऱ्यात “योबेल” हा शब्द आला आहे. योबेल हा इस्राएलांच्या प्रदेशाकरता वर्षभराचा शब्बाथ किंवा विश्रामकाल होता. तो सात शेतीविषयक विश्राम वर्षे येणाऱ्या ४९ वर्षांच्या कालावधीनंतर येत असे. हे ५० वे योबेल वर्ष, यहोवाने आपला “मित्र” आणि इस्राएलांचा पूर्वज अब्राहाम याला दिलेल्या अभिवचनास अनुसरून जो प्रदेश त्याच्या लोकांसाठी देऊ केला होता त्यास प्राप्त होणाऱ्या शब्बाथ पालनात कळस ठरत होते. (याकोब २:२३; यशया ४१:८) योबेलप्रसंगी सबंध देशभर मुक्ततेची घोषणा केली जाई. याचा अर्थ हा होई की ज्यांनी स्वतःला कर्जापायी दास किंवा गुलाम म्हणून विकले अशा सर्व इस्राएलांची त्यातून मुक्ति होत असे. योबेलचे आणखी एक वैशिष्टय असे होते की विकण्यात आलेली (बहुधा आर्थिक पेचप्रसंगामुळे) स्वत:च्या मालकीची जमीन मालकाला परत आपल्या ताब्यात मिळे.—लेवीय २५:१–५४.
४. योबेल केव्हा घोषित केले जाई व कसे?
४ ही पार्श्वभुमि तुम्हाला कळाल्यावर योबेल हे मुक्ततेच्या सणाचे वर्ष का होते त्याची अधिक आवड तुम्हाठायी निर्माण होईल. हे वर्ष प्रायश्चिताच्या दिवशी रणशिंग वाजवून घोषित केले जाई.a मोशेने लेवीय २५:९, १० मध्ये लिहिले होते: “सातव्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चिताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. ह्या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे, ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.” इ.स.पूर्वी १४७३ मध्ये यहोशवा इस्राएलांना यार्देन पार करून वचनयुक्त देशात घेऊन गेला. येथे त्यांना योबेल वर्ष पाळावयाचे होते.
प्राथमिक मुक्तता घोषित करण्यात आली
५. मुक्ततेचा कोणता प्रकार व योबेल याचा आम्ही विचार करणार आहोतः
५ वर नमूद करण्यात आलेली गोष्ट आम्हाला निव्वळ इतिहास वाटेल व ती आमच्या जीवनावर काहीच परिणाम करणार नाही असे वाटेल. शिवाय आम्ही यहुदी वंशातील नाही तर ते आम्हाला अधिकपणाने वाटेल. तरीपण येशू ख्रिस्ताने एक भव्य योबेल अपेक्षिण्याचे कारण आम्हाला दिले. यामुळेच आपल्याला मुक्तता व स्वातंत्र्याविषयी आनंद करण्याचा आधार सापडतो. त्याच्या कारणाविषयीची रसिकता प्रदर्शित करण्याआधी आपल्याला हे पाहिले पाहिजे की येशूने पहिल्या शतकात कोणत्या दोन मार्गी मुक्तता पुरविली. यानंतर आम्ही त्या दोन मुक्तता आमच्या जीवनमानात कशा लागू होतात व त्या भव्य असून त्या आम्हास आनंदाचे मोठे कारण कसे देतात ते पाहू या.
६, ७. (अ) यशया ६१:१–७ ने कोणत्या अद्र्भित घडामोडींचे भाकित केले? (ब) यशयाचा भविष्यवाद पूर्ण होत आहे हे येशूने कसे सूचित केले?
६ यशया ६१:१–७ प्राचीन योबेल वर्षाबद्दल थेट काही सांगत नसले तरी येत असलेल्या मुक्ततेविषयीचा भविष्यवादित उल्लेख त्यात करण्यात आला. यामध्ये आम्ही वाचतो: “सार्वभौम प्रभु यहोवाचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनांस शुभवृत्त सांगण्यास यहोवाने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांस मुक्तता व बंदिवानास बंधमोचन विदित करावे, यहोवाच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे, . . . म्हणून त्याने मला पाठविले आहे. . . . त्यांस सार्वकालिक आनंद प्राप्त होईल.” पण या भविष्यवादाची पूर्णता कशी व केव्हा होणार?
७ इ.स. ३० चा वल्हांडण साजरा केल्यावर येशू ख्रिस्त एका शब्बाथवारी सभास्थानात गेला. येथे त्याने यशयाच्या भविष्यवादाचा काही भाग वाचला व तो स्वतःसंबंधाने लागू केला. लूक ४:१६–२१ काही भागात म्हणते: “त्याने [ग्रंथपट] उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले होते: ‘यहोवाचा आत्मा मजवर आला आहे कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व अंधळयांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे, यहोवाच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.’ . . . मग तो त्यांस म्हणू लागला: ‘हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.’”
८. (अ) येशूने कोणती प्राथमिक मुक्तता दिली? (ब) हे योहान ९:१–३४ मध्ये कसे चित्रित करण्यात आले?
८ येशूने घोषित केलेली सुवार्ता ज्या यहुद्यांनी स्विकारली तिने त्यांना आध्यात्मिक मुक्तता दिली. खऱ्या उपासनेचा खरा अर्थ काय व त्याबद्दल कशाची अपेक्षा आहे याविषयी त्यांचे डोळे उघडले गेल्यामुळे त्यांना चुकीच्या विचारधारेपासून सुटका मिळाली. (मत्तय ५:२१–४८) या मुक्ततेचे मोल, येशूने जे शारिरीक रोग बरे केले त्या पेक्षा मोठे होते. अशाप्रकारे, येशूने एका जन्मांधाला पूर्ववत दृष्टी दिली या माणसाने येशू हा देवाकडील संदेष्टा आहे हे ओळखल्यामुळे अधिक चिरकालीन चांगले परिणाम घडले. या माणसास प्राप्त झालेली मुक्तता, संप्रदाय व चुकीचे विश्वास यांचे दास राहिलेल्या धार्मिक पुढाऱ्यांच्या परिस्थितीच्या विरूद्ध अगदी भव्य होती. (योहान ९:१–३४; अनुवाद १८:१८; मत्तय १५:१–२०) तरीपण ही प्राथमिक वा मुलभूत पूर्णता होती. त्याकाळात, पहिल्याशतकातच येशूने, प्राचीन इस्राएलांच्या योबेलाशी समांतरीत असणाऱ्या मुक्ततेच्या अनुषंगाने कार्य करायचे होते. पण असा हा निष्कर्ष काढणे का व्यवहार्य आहे?
९. आध्यात्मिकरित्या ज्यांना मुक्त करण्यात आले होते तरी कोणत्या स्वरूपाचे दास्यत्व त्यांच्यात राहिले होते?
९ येशूने त्या माजी अंधाला म्हटले: “मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो आहे; ह्यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.” यानंतर तो परूश्यांना म्हणाला: “तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते; परंतु ‘आम्हाला दिसते’ असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.” (योहान ९:३५–४१) होय, मरणास प्रवृत्त करणारे पाप ही मोठी समस्या होती, ती आजही तशीच आहे. (रोमकर ५:१२) ज्यांनी त्या प्राथमिक मुक्ततेचा म्हणजे येशूने पुरविलेल्या आध्यात्मिक मुक्ततेचा लाभ घेतला ते यहुदी व प्रेषितसुद्धा अपूर्ण मानवच राहिले. ते, पाप व त्यापासून परिणामित होणाऱ्या मरणाचे दास राहिले. ही स्थिति येशूला बदलता येऊ शकत होती का? तो ती बदलणार होता का? जर होय, तर केव्हा?
१०. येशूने, तो आणखी कोणती मुक्तता प्रदान करणार होता असे सुचविले?
१० आधी, येशूने म्हटले होते: “तुम्ही माझ्यावचनात राहिला तर खरोखरी माझे शिष्य आहा; तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील.” त्याच्या यहुदी श्रोत्यांनी त्याला म्हटले: “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता?” या वेळी येशूने उत्तर दिले: “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करितो तो पापाचा दास आहे.” दास घरात सदासर्वदा राहात नाही, तर पुत्र सदासर्वदा राहतो.” (योहान ८:३१–३६) या करताच अब्राहामापासून आलेला वंश यहुद्यांना पापापासूनची मुक्तता प्रदान करू शकला नाही. मुक्ततेविषयीचे हे ऐतिहासिक ब्रीद येशूने पुढे जे येत होते व जे इस्राएलांना कोणत्याही योबेल मध्ये अनुभवले त्यापेक्षाहि भव्य व मोठे होते त्याकडे निर्देष करण्यासाठी केला.
ख्रिस्ती योबेलचा आरंभ होतो
११. ख्रिस्ती योबेलाविषयीची आमची आस्था इ.स. ३३ वर का केंद्रित होते?
११ मोशेच्या नियमशास्त्रात असलेले योबेल हे एका मोठ्या योबेलाचे प्रतीक होते हे यहुद्यांना समजले नाही. (कलस्सैकर २:१७; इफिसकर २:१४, १५) ख्रिश्चनांसाठी असणाऱ्या या योबेलात असे “सत्य” समाविष्ठ आहे जे मानवाला बंधमुक्त करू शकते. ते सत्य पुत्र, येशू ख्रिस्त याजवर केंद्रीभूत आहे. (योहान १:१७) तर मग जे पाप व त्याच्या परिणामापासून मुक्तता देऊ शकत होते त्या मोठ्या योबेलाचा उत्सव केव्हापासून सुरु झाला? तो इ.स. ३३च्या वसंत ऋतुत, पेंटेकॉस्टपासून सुरु झाला. हे, येशूचे, यहोवा देवास त्याच्या अर्पणाचे मोल स्वर्गात देण्यासाठी स्वर्गारोहण होण्याच्या दहा दिवसांनी घडले.—इब्रीयांस ९:२४–२८.
१२, १३. येशूच्या मृत्यु नंतर असे काय घडले की त्याच्या शिष्यांना एक आगळाच अनुभव अनुभवण्यास मिळाला?
१२ येशूच्या आधी कोणाही मानव प्राण्याचे सदासर्वकाल जिवंत राहण्यासाठी मृतातून पुनरूत्थान करण्यात आले नव्हते. (रोमकर ६:९–११) उलटपक्षी सर्वच मृत्युत निद्रावश झाले आणि जोपर्यंत मानवी कुटुंबाचे पुनरूत्थान होण्याची योग्य वेळ येत नाही तोपर्यंत हे सर्व निद्रा घेत राहतील. देवाच्या सामर्थ्याकरवी येशू ख्रिस्ताचे जे पुनरूत्थान करण्यात आले त्यानुसार तो, शास्त्रवचने म्हणतात त्या प्रमाणे, “महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथमफळ असा” बनला.—१ करिंथकर १५:२०.
१३ पुनरूत्थित येशू ख्रिस्ताचे स्वर्गारोहण झाले असून तो आपल्या परिपूर्ण मानवी यज्ञापर्णाचे मोल घेऊन यहोवा देवाच्यासमोर उपस्थित झाला व ते त्याने मानवजातीकरता लागू केले आहे हे त्याच्या पुनरूत्थानाच्या पन्नास दिवसानंतर सुव्यक्त झाले. हे इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी घडले. येशूने दिलेल्या सूचनेस आज्ञाधारकता दाखवून सुमारे १२० शिष्य यरूशलेमात एकत्र झाले. त्यावेळी, योएल २:२८, २९ च्या पूर्णतेस अनुलक्षून ख्रिस्ताने या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतला. अग्निसारख्या दिसणाऱ्या जिव्हा दिसल्या व त्या त्यांच्या डोक्यावर बसल्या आणि ते, त्यांना परक्या वाटणाऱ्या भाषांत बोलू लागले. (प्रे. कृत्ये २:१६–२१, ३३) हा याचा पुरावा होता की पुनरूत्थित येशू ख्रिस्त याचे स्वर्गारोहण झाले असून त्याने मानवजातीस लागू करता येईल अशापरिपूर्ण मानवी यज्ञापर्णाचे मोल सोबत घेऊन देवाच्या सान्निध्यात प्रवेश मिळविला आहे.
१४. (अ) ख्रिस्ताच्या शिष्यांची कराराविषयीची कशी स्थिती होती? (ब) नव्या करारात कोणते अप्रतिम आशीर्वाद समाविष्ट होते?
१४ याचा शिष्यांवर कोणता परिणाम घडवला गेला? एक म्हणजे, देवाने स्वाभाविक इस्राएल राष्ट्रासोबत केलेल्या नियमशास्त्र करारापासून त्यांची सुटका घडवली गेली. तो करार आता ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळण्यात येऊन देवाने रद्द केला होता. (कलस्सैकर २:१३, १४; गलतीकर ३:१३) या कराराची जागा एका नव्या कराराने घेतली. हा नवा करार स्वाभाविक इस्राएल राष्ट्रासोबत नव्हे तर आध्यात्मिक इस्राएलांचे “राष्ट्र” याबरोबर करण्यात आला. (इब्रीयांस ८:६–१३; गलतीकर ६:१६) यिर्मया ३१:३१–३४) मध्ये भाकित असलेला हा नवा करार मोशे या प्राचीन संदेष्टयापेक्षाही मोठ्या असणाऱ्या मध्यस्थाकरवी करण्यास आला. आपल्याला मुक्ततेची आवड आहे म्हणूनच आपण या नव्या कराराची एक गोष्ट खासपणे लक्षात आणली पाहिजे. हे आम्हाला प्रेषित पौलाने लक्षात आणून देताना म्हटले: “‘त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा: . . . त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे आठवणारच नाही.’ तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हावयाचे राहिले नाही.”—इब्रीयांस १०:१६–१८.
१५. इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी ख्रिस्ती योबेलचा आरंभ झाला असे का म्हणता येते? (रोमकर ६:६, १६–१८)
१५ पापापासूनच्या अगदी याच मुक्ततेविषयीचा निर्देश येशू आपल्या भाषणात करीत होता, जेव्हा त्याने हे म्हटले की, “जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल.” (योहान ८:३६) जरा विचार करा—ख्रिस्ताच्या यज्ञापर्णाच्या आधारावर पापापासूनची मुक्ति शक्य करण्यात आली! पेंटेकॉस्टपासून पुढे देव विश्वासूजणांना नीतीमान समजतो व त्यांना त्याचे आध्यात्मिक पुत्र असे दत्तक घेतो आणि ख्रिस्ताबरोबर त्यांना स्वर्गात राज्य करण्याचे भवितव्य देतो. पौल स्पष्ट करतो: “पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही. तर . . . दत्तकपणाचा आत्मा . . . मिळाला आहे. आणि जर मुले तर वारीसही आहो, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस.” (रोमकर ८:१५–१७) तद्वत, अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी ख्रिस्ती योबेलचा आरंभ झाला होता हे निर्विवाद आहे.
१६. ख्रिस्ती योबेलचा उत्सव साजरा करणाऱ्यांना आणखी कोणते आशीर्वाद व भवितव्य होते?
१६ अशाप्रकारे इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी आध्यात्मिक इस्राएलाचे नवे राष्ट्र अस्तित्वात आले. ते अशा मानवांचे मिळून तयार झाले होते ज्यांची पापे ख्रिस्ताच्या यज्ञार्पित रक्ताच्या आधारावर क्षमा करण्यात आली होती. (रोमकर ५:१, २; इफिसकर १:७) नव्या करारात घेण्यात आलेल्या आध्यात्मिक इस्राएलांच्या पहिल्या सदस्यांना आपल्या पापांची क्षमा होण्याद्वारे अद्र्भित मुक्ततेचा अनुभव घडला हे आम्हापैकी कोणास अमान्य करता येईल बरे? त्यांचे देवाने “निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक” असे संघटन तयार केले ते अशासाठी की “ज्या [देवा]ने [त्यांना] अंधःकारातून काढून अद्र्भित प्रकाशात पाचारण केले त्याने [त्यांनी]गुण प्रसिद्ध करावे.” (१ पेत्र २:९) हे खरे की त्यांचे मांसल देह अद्याप अपूर्ण होते व काही काळातच ते मरणारही होते. तरीपण देवाने आता त्यांना नीतीमान असल्याचे घोषित केले होते व त्यांना आपले आध्यात्मिक पुत्र बनवून घेतले होते त्यामुळे त्यांना येणारे दैहिक मरण हे जणू त्यांचे “प्रयाण” घडवून आणणारे आणि खिस्ताच्या “स्वर्गीय राज्यात” त्यांचे पुनरूत्थान घडवून आणण्यास मुभा देत होते.—२ तिमथ्यी ४:६, १८.
१७, १८. येशूने जी प्राथमिक मुक्तता घोषित केली होती त्यापेक्षा ख्रिस्ती योबेलाची मुक्तता अधिक महत्वपूर्ण का होती?
१७ चुकीची विचारधारा व प्रथा यापासून विश्वास राखणाऱ्या यहुद्यांना मुक्त करण्याचे प्राथमिक वा मुळारंभीचे पाऊल महत्वपूर्ण ठरले. पण आम्ही पाहिलेच आहे की येशू ह्या आध्यात्मिक मुक्ततेच्या ही पुढे गेला. इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टपासून पुढे त्याने विश्वास राखणाऱ्या मानवांची “पाप व मरण ह्यांच्या नियमापासून” मुक्तता केली. (रोमकर ८:१, २) अशा प्रकारे अभिषिक्त ख्रिश्चनांचे योबेल सुरु झाले. ही अधिक महत्वपूर्ण मुक्तता होती कारण यात ख्रिस्तासोबत सहवारिस या अर्थी स्वर्गातील जीवन उपभोगण्याचे भवितव्य सामावलेले होते.
१८ आतापर्यंत आपण पहिल्या शतकातील दोन प्रकारातील ख्रिस्ती स्वातंत्र्याचा विचारविनिमय केला आणि या दोहोंकरवी आनंद करण्याजोगा आधार मिळाला. पहिल्या शतकातील विश्वासियांना आनंद मिळाला. (प्रे. कृत्ये १३:४४–५२; १६:३४; १ करिंथकर १३:६; फिलिप्पैकर ४:४) त्यांनी ख्रिस्ती योबेलात जे सहभागित्व मिळविले ते खासपणे आनंद देणारे होते कारण याकरवीच त्यांना स्वर्गातील सार्वकालिक आशीर्वाद प्राप्तीचा मार्ग मोकळा झाला.—१ पेत्र १:३–६; ४:१३, १४.
१९. आत्म्याने न जन्मलेल्या ख्रिश्चनांच्या बाबतीत कोणते प्रश्न राहतात, पण यांनाही इश्वरप्रणीत मुक्ततेत सहभाग मिळू शकेल हे कसे सूचित होते?
१९ पण मग, बाकीचे बहुतेक खरे ख्रिस्ती या चित्रात कोठे बसतात, कारण यांना तर जीवनाकरता नीतीमान असे घोषित केले नाही आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक ही मिळाला नाही. अशांच्या बाबतीत, ख्रिस्ती योबेलचा भाग असणारी मोठ्या प्रमाणातील मुक्तता अपेक्षिण्याचे शास्त्रवचनीय कारण आहे. प्रेषितांची कृत्ये ३:२०, २१ आठवा ज्यात म्हटले आहे: “सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्याच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे.” (पडताळा प्रे. कृत्ये १७:३१) अगदी याच आशयाने, ख्रिस्ती योबेलचा अनुभव घेणाऱ्या योहान या अभिषिक्त प्रेषिताने येशू बद्दल लिहिले “तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्या ही पापाबद्दल आहे.” (१ योहान २:२) याचा अर्थ, ज्यांना स्वर्गीय आशा नाही त्या कित्येक निष्ठावान ख्रिश्चनांना ख्रिस्ती मुक्ततेचा अनुभव घेता येऊ शकेल असा आहे का? काय हे फक्त भविष्यासाठी आहे की आमच्या जवळ पहिल्यापासून आनन्द करण्याजोगे कारण आहे? हे आपल्याला ख्रिस्ती मुक्तता व योबेल यांच्या वैशिष्ठयांचा जो खास अर्थ आजच्या खऱ्या उपासकांकरिता आहे त्याचे परिक्षण करून पाहता येईल.
[तळटीपा]
a प्रायश्चिताचा वार्षिक दिवस यहुदी कॅलेंडरच्या तिश्री या महिन्यात दहाव्या तारखेस येत असे. हा महिना सध्याच्या काळात सप्टेंबर–ऑक्टोबर काळादरम्यान येतो.
तुमचे विचार काय आहेत?
◻ प्राचीन इस्राएलामध्ये योबेलमुळे कोणते फायदे मिळत असत?
◻ येशूने प्राथमिक मुक्ततेची घोषणा कशी केली व त्यात कशाचा समावेश होता?
◻ ख्रिस्ती योबेल केव्हा सुरु झाले, व असा हा निर्णय घेण्यासाठी कोणता आधार आहे?
◻ आत्म्याने अभिषिक्त नसलेल्या लाखो ख्रिश्चनांच्या मुक्ततेकडे आशेने पाहण्याजोगे कारण आम्हापाशी का आहे?
[१६ पानांवरील संक्षिप्त आशय]
“धार्मिकाचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे.” (नीतीसूत्रे ४:१८) या तत्वाच्या अनुषंगाने हा लेख व या पुढचा लेख योबेल संबंधाने अद्यावत व विस्तारीत विवेचन सादर करील.
[१८ पानांवरील चित्रं]
येशू इ. स. ३३ मध्ये मुक्ततेची घोषणा करतो
[२१ पानांवरील चित्रं]
ख्रिस्ती योबेलाची सुरुवात इ. स. ३३ मध्ये होते