येशूच्या चमत्कारांचे धडे
“नंतर तिसऱ्या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते . . . येशूला आणि त्याच्या शिष्यांनाहि लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” आणि ही घटना येशूच्या पहिल्या चमत्काराची पार्श्वभूमी ठरली.—योहान २:१-३.
येशूचे लक्ष वेधण्यास ही समस्या अगदी क्षुल्लक आणि सामान्य नव्हती का? एक बायबल विद्वान वर्णन करतात, “पुर्वेकडील लोकांमध्ये आदरातिथ्य ही एक पवित्र जबाबदारी होती . . . विशेषतः, लग्न समारंभाच्या वेळेस वास्तविक आदरातिथ्य दाखविण्यासाठी विपुलतेची गरज होती. लग्नाच्या मेजवानीमध्ये पुरवठा कमी पडल्यास कुटुंब आणि तरुण दांपत्य यांना संपूर्ण जीवनभर लज्जीत केले जात असे.”
यामुळे येशूने कार्यवाही केली. त्याने “तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले” पाहिले. भोजनापूर्वी विधी स्वच्छता हा यहुद्यांचा एक धार्मिक प्रघातच होता आणि त्यामुळे उपस्थितांना देण्यासाठी मोठ्याप्रमाणात पाणी लागत असे. आतिथ्यांची सेवा करणाऱ्यांना येशूने आज्ञा केली, “रांजण पाण्याने भरा.” येशू ‘भोजनकारभारी’ नव्हता; तरीदेखील तो थेटपणे आणि अधिकाराने बोलला. अहवाल म्हणतोः ‘मेजवानीच्या भोजनकारभाऱ्याने पाणी चाखले तेव्हा ते पाणी द्राक्षारसामध्ये बदलले हाते.’—योहान २:६-९; मार्क ७:३.
लग्नासारखे सामान्य ठिकाण येशूच्या पहिल्या चमत्काराची पार्श्वभूमी असावी हे विसंगतच वाटते; तरीदेखील ही घटना येशूबद्दल अधिक काही प्रगट करते. तो एक अविवाहित पुरुष होता तसेच त्याने नंतर इतर प्रसंगी त्याच्या शिष्यांसोबत सडेपणामुळे होणाऱ्या फायद्यांची चर्चा देखील केली. (मत्तय १९:१२) तथापि, लग्नाच्या मेजवानीतील त्याची उपस्थिती स्पष्ट करते, की तो विवाहाच्या विरुद्धतेत नव्हता. तो संतुलित, विवाह व्यवस्थेला पाठिंबा देणारा होता आणि देवाच्या दृष्टिने विवाह आदरणीय आहे अशी त्याची विचारधारा देखील होती.—पडताळा इब्रीयांस १३:४.
येशू एकांतवासातील सन्यासी नव्हता जसे चर्चच्या चित्रकारांनी असल्याचे नंतर त्याला दाखवले. लोकांच्या सहवासाचा त्याने आनंद लुटला आणि तो लोकांनी एकत्रित होण्याच्या विरोधात नव्हता. (पडताळा लूक ५:२९.) अशाप्रकारे त्याच्या कार्यांनी त्याच्या शिष्यांसाठी एक उदाहरण मांडले. येशूने स्वतः हे दाखवून दिले, कि त्याच्या शिष्यांनी विनाकारण गंभीर किंवा दुःखी व्हावयाचे नव्हते—कारण धार्मिकतेचा अर्थ दुःख असा झाला असता. त्याउलट, ख्रिश्चनांना त्यानंतर अशी आज्ञा देण्यात आली, “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा.” (फिलिप्पैकर ४:४) मनोरंजनाला वाजवी मर्यादेमध्ये ठेवण्यासाठी ख्रिस्तीजन आज काळजी घेतात. त्यांना त्यांचा आनंद देवाच्या सेवेमध्ये मिळतो; तरीदेखील येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याद्वारे ते काहीवेळा सामाजिक एकत्रीकरणामध्ये एकमेकांच्या सहवासाचा आनंद मिळवण्यासाठी वेळ काढतात.
येशूच्या भावनांमधील प्रेमळपणाचे परीक्षण करा. चमत्कार करण्यासाठी त्यावर कोणतेही बंधन नव्हते. या संबंधित पूर्ण व्हावयाची एकही भविष्यवाणी नव्हती. तरीदेखील त्याच्या आईच्या चिंतेमुळे आणि विवाह होणाऱ्या दांपत्याच्या दैनावस्थेमुळे येशू प्रभावित झाला. त्यांच्या भावनांची त्याने गुणग्राहकता बाळगली आणि पेचप्रसंगातून त्यांची मुक्तता करण्याची इच्छा दाखविली. यामुळे येशू तुमच्यामध्ये—किंबहुना तुमच्या दररोजच्या समस्यांमध्ये देखील खरोखरच आस्था घेतो हा तुमचा विश्वास दृढ होत नाही का?—पडताळा इब्रीयांस ४:१४-१६.
प्रत्येक रांजण “दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते” यामुळे येशूच्या चमत्कारामध्ये मोठ्याप्रमाणात—कदाचित ३९० लिटर (१०५ गॅलन) द्राक्षारसाचा समावेश होता! (योहान २:६) एवढे प्रचंड प्रमाण कशासाठी? येशू मद्यपानासक्त होण्याचे उत्तेजन देत नव्हता कारण देव या गोष्टीचा धिक्कार करतो. (इफिसकर ५:१८) त्याउलट, तो देवाप्रमाणे उदारतेचे प्रदर्शन करत होता. द्राक्षारस सामान्य पेय असल्याकारणाने उर्वरित द्राक्षारस इतर प्रसंगी वापरता येऊ शकत होता.—पडताळा मत्तय १४:१४-२०; १५:३२-३७.
आरंभीच्या ख्रिश्चनांनी येशूच्या उदारतेच्या उदाहरणाचे अनुकरण केले. (पडताळा प्रेषितांची कृत्ये ४:३४, ३५.) त्याचप्रमाणे आज देखील यहोवाच्या लोकांना ‘देत राहण्याचा सराव करण्याचे, उत्तेजन देण्यात आले आहे. (लूक ६:३८) तथापि, येशूचा पहिला चमत्कार भवितव्याबद्दल देखील सूचित करतो. तो भवितव्याकडे अंगुली दर्शवितो, जेव्हा देव उदारतेने “मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी” देईल आणि सर्वांची भूक तृप्त करील.—यशया २५:६.
शारीरिकरीत्या बरे केलेल्या येशूच्या अनेक चमत्कारांबद्दल काय? आपण त्यापासून काय शिकू शकतो?
शब्बाथाच्या दिवशी सत्कर्मे करणे
“ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” हे शब्द येशूने ३८ वर्षांपासून आजारी असलेल्या व्यक्तीला उद्देशून म्हटले. शुभवर्तमानाचा अहवाल पुढे म्हणतोः “लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला.” मनोरंजक म्हणजे, या परिस्थितीतील बदलाने सर्वांनाच आनंद झाला नाही. अहवाल म्हणतोः “ह्यामुळे यहूदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करीत असे.”—योहान ५:१-९, १६.
शब्बाथ हा विश्राम करण्यासाठी आणि सर्व गोष्टींमध्ये आनंद करण्यासाठी होता. (निर्गम २०:८-११) परंतु येशूच्या दिवसापर्यंत हा शब्बाथ गुंतागुंतीचा जुलमी आणि मानव-निर्मित नियम असा झाला. आल्फ्रेड एडरशीम या विद्वानाने शब्बाथाच्या लांबलचक नियमातील यहूदी सांप्रदायाच्या विभागांमध्ये असे लिहिले, “बाबींची महत्त्वपूर्ण धार्मिक मोलाप्रमाणे चर्चा केली जाते असे, एखादी बुद्धिमान व्यक्ती या बाबींना गंभीरपणे घेईल, असा कोणत्याही शहाण्या मनुष्याने विचार देखील केला नसता.” (येशू मशीहाचे जीवन आणि काळ, [इंग्रजी]) रब्बी या क्षुल्लक आणि जुलमी नियमांना मरण आणि जीवनाइतपत महत्त्व देत आणि वास्तविकपणे हे नियम प्रत्येक यहुद्याच्या जीवनातील क्षेत्राला नियंत्रित करत होते—अनेकदा मानवी भावनांची निर्दयीपणे अव्हेलना करण्यासाठी देखील. एका शब्बाथ नियमामध्ये असा हुकूम देण्यात आला, “एखाद्या व्यक्तीवर इमारत कोसळल्यास आणि तो तेथे आहे किंवा नाही वा तो जिवंत आहे किंवा मरण पावला आहे वा तो परदेशी किंवा इज्राएली आहे याबद्दल शंका असल्यास ते त्या व्यक्तीवरील कोसळलेले भग्नावशेष बाजूला करु शकतात. ती व्यक्ती जिवंत आढळल्यास मदत करणे कायम ठेवावे; परंतु [ती व्यक्ती] मृत आढळल्यास तिला तसेच सोडावे.”—प्रबंध योमा ८:७, हर्बर्ट डॅन्बी यांच्याद्वारे भाषांतरीत.
अशा किरकोळ बाबींवर असणाऱ्या कायदेशीर नियमांबद्दल येशूने कोणता दृष्टिकोन बाळगला? शब्बाथ दिवशी बरे केल्यामुळे त्याची टीका केल्यानंतर त्याने म्हटले: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीहि काम करीत आहे.” (योहान ५:१७) श्रीमंत होण्यासाठी येशू कोणतीही ऐहिक नोकरी करत नव्हता. त्याउलट, तो देवाची इच्छा करत होता. लेव्यांना त्यांची पवित्र सेवा शब्बाथ दिवशी कायम ठेवण्यास अनुमती होती त्याप्रमाणेच येशू देखील मशीहा या नात्याने देवाच्या नियुक्त जबाबदाऱ्या देवाच्या नियमांचा भंग न करता यथायोग्यपणे पार पाडू शकत होता.—मत्तय १२:५.
येशूच्या शब्बाथ दिवशी बरे करण्याच्या कार्यांनी देखील शास्री आणि परुशी यांना “फाजील धार्मिक”—त्यांच्या विचारसरणीमध्ये कठीण आणि असंतुलित असल्याचे उघड केले. (उपदेशक ७:१६) अर्थातच, सत्कर्मे सप्ताहामधील काही दिवसापर्यंतच मर्यादित ठेवावी अशी देवाची इच्छा नव्हती तसेच पोकळ नियम बनवणे हा शब्बाथामागील देवाचा उद्देश नव्हता. येशू मार्क २:२७ मध्ये म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही.” येशूने लोकांवर प्रेम केले, जुलमी नियमांवर नव्हे.
आज ख्रिश्चनांसाठी हे उत्तम आहे, की त्यांनी फाजील कडक होऊ नये किंवा त्यांच्या विचारसरणीमध्ये केवळ नियमांनाच प्राथमिकता देऊ नये. मंडळीमध्ये अधिकार पदावर असणारे, फाजील मानव-निर्मित नियम आणि धोरणांद्वारे इतरांवर दबाव आणण्यापासून दूर राहतात. येशूचे उदाहरणसुद्धा आपल्याला सत्कर्मे करण्यासाठी संधी शोधण्याचे उत्तेजन देते. उदाहरणार्थ, ख्रिस्ती केव्हाही अशी कारणमीमांसा करणार नाही, की बायबल सत्यांची सहभागिता केवळ तो औपचारिकरीत्या घरोघरच्या सेवेत किंवा सार्वजनिक व्यासपीठावर असताना करील. प्रेषित पेत्र म्हणतो, प्रत्येक ख्रिश्चनाने “त्याच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध” असले पाहिजे. (१ पेत्र ३:१५) सत्कर्मे करण्यास वेळेची कोणतीही मर्यादा नाही.
दयेचा धडा
आणखी एका उल्लेखनीय चमत्काराची नोंद लूक ७:११-१७ मध्ये आहे. अहवालानुसार, येशू “नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला.” आजपर्यंत, आधुनिक अरबमधील नाईन गावाच्या नैऋत्येकडे स्मशानभूमी आढळून येते. “तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला,” आणि आरडाओरडा करणारे एक दृश्य दिसले. “तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते.” एच. बी. ट्रिस्ट्रॅम यांनी अशी टिप्पणी केली की, प्राचीन काळापासून “दफन विधीच्या प्रघातामध्ये बदल झालेला नाही. तिरडीच्या पुढे चालणाऱ्या स्त्रिया मी पाहिल्या आहेत आणि पेशेवाईक शोक करणाऱ्या स्त्रियांकडून त्यांचे नेतृत्व केले जात असे. त्या रानटी पद्धतीने दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांचे हात उंचावत, त्यांचे केस ओढत आणि मृताच्या नावाने ओरडत.”—बायबलच्या पूर्वेकडील देशातील प्रघात, (इंग्रजी)
अशाप्रकारच्या गोंगाटामध्ये ही वियोगी विधवा चालत होती त्यामुळे तिला पाहणे म्हणजे प्रत्यक्ष दुःखाला पाहण्यासारखेच होते. तिचा पती अगोदरच मरण पावल्यामुळे लेखक हर्बर्ट यांच्याप्रमाणे तिच्या मुलाला “वृद्धापकाळाचा आधार आणि तिच्या एकाकीपणामध्ये सांत्वन—तिच्या घराचा आधार आणि स्तंभ” मानत होती. “तिचा एकुलता एक मुलगा देखील मरण पावल्यामुळे तिचा शेवटचा आधार गमावला होता.” (बायबलचे सर्व चमत्कार, इंग्रजी) येशूची प्रतिक्रिया काय होती? लूकच्या परिणामकारक शब्दात, “तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला रडू नको.” ‘कळवळा येणे’ ही अभिव्यक्ती अक्षरशः “आंतडी” असा अर्थ असणाऱ्या ग्रीक शब्दापासून घेतली आहे. याचा अर्थ “भावनात्मकरित्या अत्यंत प्रेरित होणे” असा आहे. (वाईन्स् एक्सपोजिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वर्डस्) होय, येशूच्या आंतरिक भावना प्रेरित झाल्या होत्या.
कदाचित, या वेळी स्वतः येशूची आई विधवा होती आणि त्यामुळे त्याचा दत्तक पिता योसेफ याला गमावल्यामुळे होणाऱ्या वियोगी दुःखाची कल्पना होती. (पडताळा योहान १९:२५-२७.) विधवेने येशूला विनवणी केली नाही. मोशेच्या नियमशास्त्रानुसार प्रेताला शिवल्यामुळे एखादी व्यक्ती अशुद्ध होते आणि असे असताना देखील स्वतः “जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला.” (गणना १९:११) येशू त्याच्या आश्चर्यकारक सामर्थ्याद्वारे अशुद्धतेच्या उगमाचेच निर्मूलन करु शकत होता! “मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो, ऊठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.”
दयेचा हा किती प्रेरणात्मक धडा! ख्रिश्चनांना या “शेवटल्या काळी” प्रगट होणाऱ्या ममताहीन आणि क्रूर मनोवृत्तीचे अनुकरण करावयाचे नाही. (२ तीमथ्य ३:१-५) त्याच्या विपरीत १ पेत्र ३:८ म्हणते, “शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा.” आपल्याला परिचित असणाऱ्या कुटुंबामध्ये कोणाचा मृत्यू होतो किंवा एखादी व्यक्ती गंभीररीत्या आजारी पडते तेव्हा आपण पुनरुत्थान किंवा आजारी असलेल्यांना बरे करु शकत नाही. परंतु कदाचित त्यांच्यासह उपस्थित राहण्याद्वारे आणि दुःख व्यक्त करण्याद्वारे आपण त्यांना व्यावहारिक मदत आणि सांत्वन देऊ शकतो.—रोमकर १२:१५.
येशूने केलेले हे नाट्यमय पुनरुत्थान भवितव्याला देखील सूचित होते—जेव्हा ‘कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि बाहेर येतील’! (योहान ५:२८, २९) संपूर्ण पृथ्वीवर मृत माता, पिता, मुले आणि मित्र कबरेतून बाहेर आल्यानंतर वियोगीजन व्यक्तिगतपणे येशूच्या दयेचा अनुभव घेतील!
चमत्कारांचे धडे
स्पष्टतः, येशूच्या चमत्कारांमध्ये चित्तथरारक सामर्थ्याच्या प्रदर्शनापेक्षा अधिक काही समाविष्ट होते. त्यांनी देवाचे गौरव केले आणि ख्रिश्चनांसाठी एक नमुना प्रस्थापित केला ज्यांना ‘देवाचे गौरव’ करण्यासाठी आर्जवले जाते. (रोमकर १५:६) या चमत्कारांनी सत्कर्मे करण्यासाठी, उदारता प्रदर्शित करण्यास आणि दया दाखविण्यासाठी उत्तेजन दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे चमत्कार ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या कारकीर्दीमध्ये होणाऱ्या महत्कृत्यांची पूर्वकल्पना होती.
येशू पृथ्वीवर असताना त्याने त्याची महत्कृत्ये तुलनात्मकदृष्ट्या मर्यादित भौगोलिक क्षेत्रापर्यंतच केली. (मत्तय १५:२४) गौरवी राजा या नात्याने संपूर्ण पृथ्वी हे त्याचे अधिकारक्षेत्र असेल! (स्तोत्र ७२:८) येशू पृथ्वीवर असताना जे चमत्कारीकरीत्या बरे झाले होते आणि ज्यांचे पुनरुत्थान झाले होते ते कालांतराने मरण पावले. त्याच्या स्वर्गीय अधिपत्यामध्ये पाप आणि मृत्यू यांचे कायमचे निर्मूलन केले जाईल आणि त्यामुळे सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा होईल. (रोमकर ६:२३; प्रकटीकरण २१:३, ४) होय, गौरवी भवितव्याकडे येशूचे चमत्कार अंगुली दर्शवतात. यहोवाच्या साक्षीदारांनी लाखोजनांना त्या भवितव्यामध्ये सहभागी होण्याच्या वास्तविक आशा विकसित करण्यासाठी मदत पुरवली आहे. तो समय येईपर्यंत, ज्या गोष्टी लवकरच घडतील त्याची किती महान पूर्वकल्पना येशू ख्रिस्ताच्या चमत्कारांद्वारे देण्यात आली आहे!
[७ पानांवरील चित्रं]
येशू पाण्याचे द्राक्षारसामध्ये रुपांतर करतो