वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १२/१ पृ. ३-४
  • नाताळ पौर्वात्य लोकांसाठी सणाचा काळ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नाताळ पौर्वात्य लोकांसाठी सणाचा काळ
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही नाताळ साजरा करावा का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • नाताळाचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाचे साक्षीदार नाताळ साजरा का करत नाहीत?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • आधुनिक नाताळाचा उगम
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १२/१ पृ. ३-४

नाताळ पौर्वात्य लोकांसाठी सणाचा काळ

भव्य ख्रिस्मस ट्रीज, रोशनाईचा झगमगाट जाहिरातींच्या रंगीत फीती—हे सर्व प्रत्येक खरेदी विक्री केंद्र व डिपार्टमेन्टल स्टोअर्स मध्ये दिसून येतात. लाऊड स्पिकर्सवर नाताळची भक्‍तीगीते व लोकांनी अधिक खरेदी करावी म्हणून घोषणांनी कान बेहोष होतात. सान्ता क्लॉजच्या अवतारात पुरुष व स्त्रीया रस्त्यातून रमत गमत फिरून अतिशय स्वस्त याचा आव आणून वस्तु सादर करतात. हे दृश्‍य “ख्रिस्ती” राष्ट्रातील आहे का? नाही, हे ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांचा जपानचे दृश्‍य आहे जेथे लोक संख्या एक टक्कयापेक्षा कमी आहे.

त्याचप्रमाणे जवळील बेट तायवान मध्ये “ख्रिस्ती” व ख्रिस्तेतर त्यांच्या बक्षिस देवघेवीच्या रूढीने नाताळ पाळतात. मलेशियातील चीनी समाजात “नाताळ” सणाच्या सुट्टीत फटाका नवीनच महत्व आणतात.

हे लोक नाताळ का पाळतात? ते नाताळ वर विश्‍वास ठेवतात का? किंवा ते नाताळच्या उत्सवावर विश्‍वास ठेवतात? पुरावे दाखवितात की “खा, प्या व मजा करा” हा संदेश ते नाताळपासून प्राप्त करतात. पुष्कळजण “ख्रिस्तीपणा” डिसेंबर २४ व २५ ला पाळतात परंतु दुसऱ्‍या दिवशीच ते त्यांच्या स्वमार्गाकडे—बुद्धीझम्‌, शिन्तोझम, ताओझम किंवा इतराकडे पूर्ववत वळतात. मग अशी भिन्‍न धर्मांची पार्श्‍वभूमी असणारे लोक “नाताळ” सुट्टीत कसा भाग घेतात?

जपान मधील एका लहान मुलास विचारले होते की तो सान्ता क्लॉज वर विश्‍वास ठेवतो का तेव्हा तो उत्तरला: ‘होय, तो मला खेळणी देतो म्हणून विश्‍वास ठेवतो.’ त्याचे उत्तर पुष्कळ पौर्वात्यांचे विचार प्रगट करते: ‘विशाल मनोवृतीचे असा. धर्माविषयी फारच ताठर असू नका. तुम्हाला त्यातून जी मौज मिळते ती लुटा. परंतु त्याने तुमच्या जीवनातील इतर भागावर प्रभाव पाडू नये म्हणून त्याला त्याच्या स्थानी ठेवा.’

अशा प्रकारची विचारसरणी जपान मधील प्रमुख वृतपत्राच्या पहाणीत आढळून आली. विचारलेल्या प्रश्‍नातील एक असा होता: “जपान मध्ये एकाच व्यक्‍तीने विविध धार्मिक प्रसंगात जसे की ओमीयामायरी [लेकरांच्या वाढीसंबंधाने पाळावयाचा शिन्तोंचा सण] ओहीगन [मृतासाठी पाळावयाचा बुद्ध लोकांचा अर्धवार्षिक धार्मिक संस्कार] व नाताळ पाळणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे. हे आक्षेपार्ह आहे असा तुम्ही विचार करता का?” केवळ १९ टक्के लोकांनी “आक्षेपार्ह” हे उत्तर दिले. ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांपैकी ६० टक्के लोकांना वाटले की विविध धर्माचे सण पाळणे यात वावगे असे कांही नाही.

या मनोवृतीचा परिणाम विशिष्ट धर्म तत्वज्ञानात झाला. पुष्कळजण एका पेक्षा अधिक धर्माचे भोक्‍ते असल्याचा दावा करतात. एजन्सी ऑफ कल्चरल ॲफेर्सच्यानुसार जपान मधील धार्मिक गटांच्या सभासदांची एकूण संख्या १९८२च्या शेवटास २०,७०,८०,००० एवढी होती तेच जपानची १९८२ मधील लोकसंख्या सुमारे ११,८६,००,००० एवढीच केवळ होती. याचा अर्थ हा होतो की जपान मधील धार्मिक सदस्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १७० टक्के होती!

“अशक्य!” पुष्कळ देवांना मानणारे कदाचित असेच उद्‌गार काढतील. परंतु हीच परस्पर विरोधी धार्मिक मनोवृती पाश्‍चिमात्य देशात ज्या पद्धतीने नाताळ पाळला जातो त्यात दिसते. हे कसे शक्य आहे? हे असे आहे तर तुम्ही नाताळ साजरा करावा का?

[३ पानांवरील चित्रं]

जपान मधील धार्मिक सदस्यांची एकूण संख्या: २०,७०,८०,०००

एकूण जपानची लोकसंख्या: ११,८६,००,०००

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा