“त्याने माझ्या राहणीमानावर परिणाम घडवून आणला”
पश्चिम आफ्रिकेतील घाना येथील एका गृहस्थाने टेहळणी बुरुज बद्दल असे म्हटले. त्याने लिहिले: “मी हे निश्चितपणे सांगू शकतो की या मासिकाने ख्रिस्तावरील माझे अंतःकरणपूर्वक असणारे प्रेम द्विगुणित केले. ख्रिस्त व तारण या विषयी जी माहिती एखाद्याने करून घ्यायची आहे त्याबद्दल हे मला सविस्तर माहिती देते. मला माझ्या मित्राने हे मासिक पहिल्यांदा दाखविले तेव्हा मला वाटले की हे सुद्धा कंटाळविणारे मासिक असेल. पण आश्चर्य हे की मी ते वाचू लागलो तसतसे ते मला खूपच आवडू लागले. त्याने माझ्या राहणीमानावर परिणाम घडवून आणला. ते खूपच मनोरंजक व शिक्षणप्रदायक आहे असे मला आढळून आले.
“तर कृपया,” या गृहस्थाने शेवटी म्हटले, “या थोर मासिकाच्या प्रती मला महिनोंमहिने पाठवत जा.” तुम्हाला सुद्धा टेहळणी बुरुज हे मासिक तुमच्या घरी मागवता येईल. केवळ १८ रूपये पाठवा व महिन्याला एक या प्रमाणे वर्षभर ते तुम्हाला मिळेल.