पवित्र शास्त्रीय ठळक मुद्दे स्तोत्रसंहिता ४२ ते ७२
यहोवाची वाट पाहत राहा
यहोवा देव आपल्या सेवकांचा आश्रय व मुक्तिदाता असल्यामुळे ते आपल्या विश्वासाच्या परीक्षांना सहनशीलतेने तोंड देऊ शकतात. हीच गोष्ट स्तोत्रसंहिता पुस्तकाच्या दुसऱ्या भागात केवढ्या उत्तमपणे दाखविण्यात आली आहे! होय, स्तोत्रसंहितेचा ४२ ते ७२ पर्यंत भाग सिद्ध करतो की आम्ही, यहोवाने आमच्या खातर कृति करावी या इराद्याने प्रार्थनापूर्वकरित्या वाट पाहत राहिलो तर टिकून राहू शकतो.
“देवासाठी वाट बघा”
कृपया स्तोत्रसंहिता ४२ ते ४५ वाचा. बंदिवान झालेला एक लेवी, त्याला यहोवाच्या पवित्र स्थानी जाता येत नाही म्हणून दुःखित आहे. तरी पण तो देवाने त्याचा मुक्तिदाता या अर्थी हालचाल करावी यासाठी “देवासाठी वाट बघ”ण्यामध्ये तृप्त आहे. (स्तोत्रसंहिता ४२, ४३) यानंतर, हिज्किया राजाच्याकाळी अश्शुराने यहुदावर केलेल्या चढाईमुळे राष्ट्राला जो धोका उत्पन्न झाला त्याकरता केलेली याचना येते. (स्तोत्रसंहिता ४४) यांच्यानंतर एक बादशाही लग्नाचे गीत मशीहा येशू ख्रिस्ताकडे निर्देश करते, जो “सत्यता, नम्रता व न्यायपरायणता यांच्याप्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली” होणार होता.—स्तोत्रसंहिता ४५.
◆ ४२:१—स्तोत्रकर्ता ‘पाण्यासाठी लुलपतणाऱ्या हरिणीसारखा कसा होता?
काही कारणामुळे हा लेवी बंदिवान झाला होता. यहोवाच्या पवित्र स्थानी होणाऱ्या उपासनेपासून तो एवढा वंचित झाला होता की तो तहानलेल्या मृगा सारखा किंवा उजाड व रुक्ष प्रदेशात पाण्याच्या शोधासाठी तळपणाऱ्या हरिणीसारखा झाला होता. तो यहोवा आणि त्याच्या पवित्रस्थानात देवाची भक्ति करण्याच्या हक्कासंबंधाने ‘तृषित’ बनला होता.—वचन २.
◆ ४५:१—कोणत्या “चांगल्या विचारांची उकळी” स्तोत्रकर्त्याच्या अंतःकरणात आली होती?
या स्तोत्रातील काही भागाचा अवलंब येशू ख्रिस्तास अनुलक्षून होता. (स्तोत्र ४५:६, ७; इब्रीयांस १:८, ९) याकारणास्तव, भावी घटनांमुळे—१९१४ मध्ये मशीही राज्याची प्रस्थापना—स्तोत्रकर्त्याचे अंतःकरण प्रफुल्लित झाले होते. ह्या “चांगल्या विचारांची” सुवार्ता घोषित करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार पुढे सरसावत आहेत.
आमच्यासाठी धडा: बंदिस्त स्थितीत असणाऱ्या स्तोत्रकर्त्याच्या अनुभवाने, आम्ही सध्या यहोवाच्या लोकांसोबत ज्या सहवासाचा आनंद उपभोगीत आहोत त्याविषयीची खोल रसिकता प्रदर्शित करण्यासाठी स्वतःला पुढे सरसावले पाहिजे. छळामुळे प्राप्त झालेल्या स्थितीकरवी आम्हाला त्यांच्यापासून काही काळाकरता जरी दुरावले गेले तरी पवित्र सेवेत गतकाळी मिळालेल्या आनंदाचे आपण मनन करावे आणि देवाने आपल्याला परत त्याच्या उपासकांच्या क्रियाशील सहवासामध्ये आणण्यासाठी त्याची ‘वाट पहात’ असता सहनशीलतेकरता प्रार्थना करावी.—स्तोत्रसंहिता ४२:४, ५, ११; ४३:३–५.
आमचा दयाळू आश्रय
स्तोत्रसंहिता ४६ ते ५१ वाचा. यहोवा आमचा आश्रयदाता लढाया बंद करील. (स्तोत्रसंहिता ४६) तो “सबंध पृथ्वीचा राजा आहे” आणि हा अजिंक्य संरक्षणकर्ता सदासर्वदा आमचा देव आहे. (स्तोत्रसंहिता ४७, ४८) सर्व जाचलेल्यांनी यहोवाची वाट बघावी जण जे सर्व त्यास “उपकार स्मरण रूपी यज्ञ” करतात ते “यहोवाचे तारण” पाहतील. (स्तोत्रसंहिता ४९, ५०) दावीदाने बथशेबासोबत पाप केले आणि तो पश्चातापी झाला त्याप्रमाणेच आम्ही चूक केली व पश्चातापी बनलो तर देव आमचा जीवन रक्तदोषापासून मुक्त करील. कारण ‘भग्न व चिरडलेले हृदय तो तुच्छिणार नाही.”—स्तोत्रसंहिता ५१.
◆ ४६:२—पृथ्वी “उलथीपालथी” कशी होणार?
पृथ्वीच्या भूगर्भातील घडामोडीने पर्वत सागरतळी बुडाले तरी देवावर भिस्त ठेवणाऱ्यांना त्याचे भय वाटू देऊ नये. काहीही झाले तरी त्यांना यहोवावर आपला आश्रय या अर्थी अटळ आत्मविश्वास राखता येईल.
◆ ५१:५—येथे कोणत्या पापाचा दावीद उल्लेख करीत होता?
वैवाहिक संबंध, गर्भधारणा आणि जन्म यांना तो पाप असे गृहीत धरीत नव्हता. तसेच आपल्या आईच्या कोणा विशिष्ठ पापाचा तो येथे उल्लेख करीत नव्हता. तर आदामाचा वंशज या अर्थी त्याच्या स्वतःचा पापीष्ठ स्वभाव यास तो संबोधित होता. (इयोब १४:४; रोमकर ५:१२) यहोवाने दावीदासोबत राज्याचा करार केला होता म्हणून नव्हे तर आपल्याकडे अनुवंशिक पापीष्ठ प्रवृफ़ा होत्या व योग्य असा पश्चाताप दर्शविला म्हणून त्याला दया दाखविली.—२ शमुवेल ७:१२–१६.
आमच्यासाठी धडा: यरूशलेमास अश्शुरने भेडसावले त्यावेळेच्या काळाबद्दल स्तोत्रसंहिता ४६च्या अध्यायाचा मजकूर जुळतो. ‘देव आमचा आश्रयदाता आहे व तो संकटकाळी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो’ याची जाण राखल्यामुळे हिज्कियाने यहोवाला प्रार्थना केली आणि शहराचा अद्र्भितप्रकारे बचाव झाला. (२ राजे, अध्याय १९) आम्ही संकटात असतो तेव्हा आम्हीही देवाला आपला आश्रय बनवावा. ते कसे? त्याजवर विश्वस्त राहण्याने, त्याच्या वचनास जडून राहण्याने व शिवाय त्याच्या संस्थेसोबत निकट राहण्याने.
मुक्ततेची हमी दिली गेली
स्तोत्रसंहिता ५२ ते ५७ वाचा. देव दुष्ट लोकांना ‘जीवंतांच्या भूमीतून’ उखडून टाकील व त्याच्या लोकांचा विरोध करणाऱ्या कोणाचीही ‘हाडे विखरील.’ (स्तोत्रसंहिता ५२, ५३) शौलाने दावीदाचा पिच्छा केला तेव्हा दावीद इश्वरी मुक्ततेबद्दल आत्मविश्वासू होता. एक फितुरीस पडत असलेला बळी या नात्याने त्याने आपला सर्व भार यहोवावर टाकला. (स्तोत्रसंहिता ५४, ५५) प्रतिकूल परिस्थिती नाहीश्या करण्यासाठी स्तोत्रकर्ता यहोवाची वाट पाहून होता.—स्तोत्र संहिता ५६, ५७.
◆ ५२:८—धार्मिक जैतून झाडासारखा कसा आहे?
जैतून झाड फलदायीपणा, सौंदर्य आणि दिमाखाचे प्रतीक आहे. (यिर्मया ११:१६; होशेय १४:६) दुष्ट युक्त्या करणाऱ्या दुष्टाला जो शेवट मिळणार त्याच्या विरोधात धार्मिक माणसाला संरक्षण मिळते व तो सुशोभित जैतून झाडाप्रमाणे बहरतो हे या स्तोत्रात दाखविले आहे.
◆ ५४:१—“तू आपल्या नावाने मला तार” असे दावीद का म्हणाला?
इश्वरी नाम ही काही गूढ शक्ति नाही तर ते स्वतः देवाचे प्रतिनिधित्व करते. तद्वत, आपल्या याचनेकरवी दावीदाने, यहोवा त्याच्या लोकांना सोडविण्यास समर्थ आहे हे स्पष्ट केले. (निर्गम ६:१–८) जिफी लोकांनी शौल राजाला दावीद लपून राहिलेल्या ठिकाणाची बातमी कळविली तर पलिष्टयांनी इस्राएलावर स्वारी केल्याचे ऐकून शौलाला दावीदाचा शोध मध्येच सोडून द्यावा लागला. (१ शमुवेल २३:१३–२९; स्तोत्रसंहिता ५४ चे शीर्षक) अशाप्रकारे यहोवाने दावीदास तारले.
आमच्यासाठी धडा: दावीदाच्या शत्रूंनी त्याच्यासाठी खाच खणिली होती. (स्तोत्रसंहिता ५७:६) मानवास धरण्यासाठी असणारा हा खड्डा यहोवाच्या सेवकांना घातक परिस्थिती उभी करीत होता. तरीपण देवाच्या लोकांचे विरोधक आपल्याच दुष्ट योजनेत धरले जाणार होते. यासाठीच आम्ही यहोवावर विसंबून राहिलो व दक्षता बाळगली तर आमच्या मुक्ततेची हमी राहील.—नीतीसूत्रे ११:२१; २६:२७.
“शांतपणे वाट बघणे”
स्तोत्रसंहिता ५८ ते ६४ वाचा. अन्यायाबद्दलच्या काळजीमुळे दावीदाने दुष्टांविरूद्ध इश्वरी दंड यावा याकरता प्रार्थना केली. (स्तोत्रसंहिता ५८, ५९) पराजित होण्याची भीती सामोरी आली तेव्हा दावीदाने सुटकेसाठी याचना केली. देव प्रतिस्पर्ध्यांना पराजित करील ही त्याची खात्री होती. (स्तोत्रसंहिता ६०) यहोवा दावीदासाठी आश्रयस्थान होता त्यातमुळेच तो सुटकेसाठी यहोवाची शांतपणे वाट बघणार होता. (स्तोत्रसंहिता ६१, ६२) अबशलोमाने बंड केले तेव्हा दावीदाला अरण्यवासाचा मार्ग धरावा लागला तेव्हा त्याला ‘देवाच्या पखांच्या सावलीत’ आनंद मिळाला. (स्तोत्रसंहिता ६३) स्तोत्रकर्त्याने ‘दुष्कर्म आचरणाऱ्यापासून’ संरक्षण लाभावे यासाठी प्रार्थना केली. धार्मिकाला यहोवाठायी आश्रय मिळेल हा त्याचा आत्मविश्वास होता.—स्तोत्रसंहिता ६४.
◆ ५८:३–५—दुष्ट सापाप्रमाणे कसे आहेत?
सर्पाचे विष जसे घातक असते त्याप्रमाणे दुष्टाचे खोटे व निंद्य बोलणे एखाद्याची ख्याति बदनाम करू शकतात. (स्तोत्र १४०:३; रोमकर ३:१३; याकोब ३:८) यासोबत, दुष्ट “बहिऱ्या जोगी सापासारखे’ आहेत कारण ते मार्गदर्शन ऐकण्याचे व स्विकारण्याचे टाळतात.
◆ ६३:३—देवाचे वात्सल्य “जीवनाहून उत्तम” कसे आहे?
देवाशिवाय व्यतित होणारे जीवन खऱ्या उद्देशाचा अभाव दर्शविते. तथापि, दावीदाच्या बाबतीत यहोवाने व्यक्त केलेले निष्ठावंत प्रेम त्याच्या जीवनाला अर्थ देत होते. देवाबरोबरचे सान्निध्य त्याच्या कृपापात्र सेवकांचे जीवन नेहमी अर्थभरीत करते. त्यांना ते इश्वरी मदत व मार्गदर्शनाची हमी देऊन त्यांना चिरकालिकपणे आनंद व्यतित करण्याची आशा देते.
आमच्यासाठी धडा: देवाने आपल्याखातर कृती करावी यासाठी दावीद ‘शांतपणे थांबून राहणार’ होता. (स्तोत्रसंहिता ६२:१–७) यहोवाच्या इच्छेच्या अधीन ठेवल्यामुळे त्याला सुरक्षित वाटत होते व देवावरचा आत्मविश्वास वाटत होता. आम्हाठायी असा भरवसा असला तर मग “देवाची शांती” आमची अंतःकरणे, मानसिक बळ यांचे, आम्ही शत्रू व संकटापासून इश्वरी मुक्ततेची वाट पाहू तेव्हा रक्षण करील.—फिलिप्पैकर ४:६, ७; स्तोत्रसंहिता ३३:२०.
आमच्या मुक्तीदात्याची स्तुति करा
स्तोत्रसंहिता ६५ ते ७२ वाचा. विपुल धनधान्य, भरपूर वृष्टी, हिरवीगार कुरणे व चरणारा कळप यांचा दाता म्हणून यहोवाची स्तुति केली आहे. (स्तोत्रसंहिता ६५) ‘त्याच्या नावाच्या महिम्यासाठी’ गायन गायिले पाहिजे. (स्तोत्रसंहिता ६६) ‘वाचविणारा देव’ या अर्थी त्याचे स्तवन व्हावयास हवे व होत आहे. (स्तोत्रसंहिता ६७, ६८) मशीहावर ओढावणारा त्रास भाकित आहे. आणि यहोवा “सुटका प्रदान करणारा” या अर्थी त्याची स्तुति होते. त्याच्याच मदतीकरता स्तोत्रकर्ता थांबून आहे. (स्तोत्रसंहिता ६९–७१) अशा या भरवशाला प्रतिफळ मिळणार कारण मशीहाच्या अशीर्वादित राजवटीत पृथ्वीभरातील समृद्धता व जाचापासून मुक्तता प्रत्ययास येईल.—स्तोत्रसंहिता ७२.
◆ ६८:११—स्त्रियांची “मोठी सेना” यात कोणाचा समावेश आहे?
शत्रूंचा नायनाट करण्यासाठी यहोवाने इस्राएलाच्या सैन्याचा वापर केल्यावर या विजयाची जाहीर घोषणा इस्राएली स्त्रियांनी संगीत, गायन व नृत्य याकरवी केली. (१ शमुवेल १८:६, ७; पडताळा निर्गम १५:२०, २१) देवाच्या ‘अनुज्ञे’स मानून इस्राएली पुरुषांनी वचनयुक्त देशातील शत्रूंविरूद्ध लढत दिली व त्यांना पराजित केले. याकरवीच इस्राएली स्त्रियांना या विजयोत्सवाची मंगल वार्ता प्रसिद्ध करण्याचे स्फुरण दिले. आज सुद्धा देवाच्या राज्याचे घोषक या अर्थी स्त्री सेविका महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. ते यहोवाकडिल “अनुज्ञा” जाहीर करतात. यात राष्ट्रे लवकरच मशीही राजा येशू ख्रिस्ताकरवी पादाक्रांत होतील या नोटीसीचा समावेश आहे.
◆ ६९:२३—देवाला शत्रूची कंबर का खचविण्यास सांगितले?
कंबरेचे स्नायु ताणले तर त्यात मोठी शक्ती येते पण तेच भीतीमुळे कंबर ढिली पडली तर ती शक्ती नाहीशी होते. मुक्ततेकरिता केलेल्या या याचनेत दावीदाने देवाला म्हटले की त्याने त्याच्या शत्रूची शक्ती गलित करावी.
◆ ७२:१६—ही समृद्धता कशाची सूचकता आहे?
‘लबानोनासारखी फळे’ ही भाषा धान्य विपुल व अति उंच ठिकाणापर्यंत उगवेल याची सूचकता सांगते. पर्वताच्या शिखरावर उंच व भरदार ताटे लबानोनातील प्रचंड देवदारू समान होतील. या गोष्टी मशीहाच्या कारकीर्दीतील समृद्ध हंगामास सूचित करतात. ‘नगरोनगरीचे लोग गवताप्रमाणे विपुल होवोत’ ही भाषा दाखविते की येशूची पृथ्वीवरील प्रजा अगणित असेल.
आमच्यासाठी धडा: स्तोत्रकर्त्याने प्रार्थिले: “तू मला अनेक भारी संकटे भोगावयास लाविली तरी तू [यहोवा] माझे पुनरूज्जीवन कर.” (स्तोत्रसंहिता ७१:२०) देव जरी आम्हाला संकटात टाकत नसला तरी तो आमचे परीक्षण होऊ देतो की ज्याकरवी त्याला निंदकास, दियाबलास उत्तर देता येईल. (याकोब १:१३; नीतीसूत्रे २७:११) आम्ही सहन करू शकतो त्यापेक्षा अधिक तो आमची परीक्षा होऊ देत नाही. आम्ही परीक्षेला बळकट विश्वासाद्वारे तोंड द्यावे म्हणून तो आम्हास मदत करतो. (१ करिंथकर १०:१३; १ पेत्र १:६, ७) पहिल्या महायुद्धाच्या कळसाला अभिषिक्त ख्रिश्चनांचा छळ झाला तेव्हा त्यांना “पुष्कळ त्रास व विपत्ती” पाहिल्या. पण १९१९ मध्ये यहोवाने त्यांना ‘पुनरूज्जीवित केले’ व त्यांनी राज्य सेवेत पुढे मजल मारली. त्यांना आता “मोठा लोकसमुदाय” येऊन मिळाला आहे. (प्रकटीकरण ७:९) अशा या परिणामाकरता थोर मुक्तिदात्यास स्तुती जाणे अगदीच उचित आहे.
देवाने आमच्याखातर हालचाल करावी या करता थांबून राहण्यासाठी विश्वासाची गरज आहे. आमची अडचणीची स्थिती बदलण्यासाठी आम्हाला काही एक करता येत नसल्यामुळे आम्हास शांतपणे थांबून राहण्याची गरज राहील. आम्ही यहोवावर थांबून राहण्यात तृप्त असलो तर स्तोत्रकर्त्याप्रमाणेच आम्हालाही टिकून राहता येईल.