वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ११/१ पृ. २६
  • प्रीती, “पूर्णता करणारे बंधन”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रीती, “पूर्णता करणारे बंधन”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे कुटुंब मौल्यवान ऐक्याचा आनंद लुटते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • एकता—खऱ्‍या उपासनेची ओळख
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील ऐक्यामुळे देवाचा गौरव होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • या शेवटल्या दिवसांमध्ये ऐक्य टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ११/१ पृ. २६

राज्य घोषकांचा वृत्तांत

प्रीती, “पूर्णता करणारे बंधन”

ख्रिश्‍चनांमधील प्रीती ही “पूर्णता करणारे बंधन” आहे व तिच्या प्रदर्शनाद्वारे जागतिक बंधुवर्गाचा परिणाम निष्पण्ण होतो. (कलस्सैकर ३:१४) आफ्रिकेतील आमचे बांधव, जीवनदाता व रक्षक यहोवा देव आणि एकमेकांवर प्रीती व्यक्‍त करून “पूर्णता करणारे बंधन” दाखवीत आहेत.—स्तोत्रसंहिता ३६:९; प्रे. कृत्ये १७:२८.

◻ झिम्बाब्वे येथे अलिकडेच तीन वर्षाच्या अवर्षणामुळे फारच हलाखीची स्थिति होती. यामुळे या विभागात राहणाऱ्‍या आमच्या बांधवांना सुद्धा याचा तडाखा जाणवला. तरीपण मदतीकरता दिलेल्या हाकेस बांधवांनी चहुकडून उत्तम प्रतिसाद दाखवला. खरे पाहता इतके कपडे अनुदान म्हणून मिळाले की सरतेशेवटी बांधवांना आता पुरे झाले, असे कळवावे लागले. हे आणि सरकारकडून लाभलेली मदत यामुळे सर्व बांधवांची आवश्‍यक ती गरज भागविली गेली. “ज्यांना अद्याप गरज आहे अशांची काळजी घेतली जात आहे” असे संस्थेचे शाखा दप्तर कळवते.

आमच्या प्रेमळ बंधूंनी पुरविलेली ही मदत नजरेआड होऊ शकली नाही. विश्‍वास न राखणारा एक पति आपल्या साक्षीदार बायकोला म्हणाला: “इतर लोक दुसऱ्‍यांकडे जे आहेत ते लुबाडून घेत आहे हे दिसते. पण तुम्ही [साक्षीदार] मात्र केवढ्या आपुलकीने सर्वांना अन्‍न वस्त्र देत आहात.” अशाच प्रकारची विवेचने दुसऱ्‍यांकडूनही मिळाली.

खरेच, यहोवाच्या साक्षीदारांमध्ये आढळून येणारे प्रेम “पूर्णता करणारे बंधन” आहे व ते खरे ख्रिस्ती आहेत अशी त्यांची ओळख देते.—योहान १३:३५.

◻ यहोवाच्या लोकातील प्रेम व ऐक्य याविषयीचे उदाहरण सिएरा लिओन मधील फ्रीटाऊन येथे भरलेल्या “राज्याची एकता” प्रांतिय अधिवेशनात दिसले. या अधिवेशनास गिनीआ, लायबेरिया आणि सिएरा लिओनच्या इतर भागातून प्रतिनिधि आले होते. एकाच वेळी, इंग्रजी व क्रिओ आणि किसी व फ्रेंच या दुहेरी माध्यमातून कार्यक्रम सादर झाला. या प्रसंगी बांधवात दिसलेल्या प्रेम व ऐक्याचा अहवाल शाखा दप्तराने कळविला. ते म्हणतात:

“किसी व फ्रेंच भाषा बोलणारे बांधव शेवटल्या गायन व प्रार्थनेकरता इंग्रजी कार्यक्रमाच्या दालनात आले तेव्हा खरोखरी रोमांचित वाटले. गीत व प्रार्थनेकरवी यहोवाची ऐक्याने उपासना करण्यासाठी ४०० पेक्षा अधिक प्रतिनिधी त्या दालनात येत आहेत हे पाहून बहुतेकांच्या डोळयांत आनंदाचे अश्रु आले.” अहवाल एका निरिक्षकाच्या अभिप्रायबद्दल सांगताना म्हणतो: “आपल्या लोकांना कसे संघटित करावे ते यहोवा जाणतो. ऐक्याचे हे केवढे प्रत्यक्ष प्रात्यक्षित!”

येथे जमलेले सर्व लोक भिन्‍न जमातीतील होते तरीही ते शांतीपूर्वकतेने एकमेकांना भेटले याचा विचार करता या ऐक्याची अधिक छाप पडते. हे साध्य करण्यासाठी यहोवाचा आत्मा जरूरीचा आहे. या ऐक्यतेचे भाकित प्रकटीकरण ७:९ मध्ये आधीच करण्यात आले होते की, “ह्‍यानंतर मी पाहिले तो पहा, सर्व राष्ट्र, वंश, लोक व निरनिराळ्‌या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्‌या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.” याच अध्यायातील प्रकटीकरण ७:१०वे वचन त्या ऐक्याचे गुपित कळवताना म्हणते: “ते उच्च स्वराने म्हणत होते: ‘राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून तारण आहे.’”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा