वाचकांचे प्रश्न
◼ प्रेषित पौल हा ख्रिस्ती नियमन मंडळाचा सदस्य होता का?
होय, पहिल्या शतकात प्रेषित पौल हा ख्रिस्ती नियमन मंडळाचा सदस्य होता हा निर्वाळा व्यवहार्यतेचा वाटतो.
पवित्र शास्त्र आरंभीच्या नियमन मंडळात कोणाचा समावेश होता याची माहिती अगदी मर्यादितपणे देते जी सर्वतोपरी प्रे. कृत्याच्या १५व्या अध्यायात आढळते. तो अहवाल दाखवितो की, इ. स. ४९ मध्ये नियमन मंडळात “यरूशलेमातील प्रेषित व वडील वर्ग” यांचा समावेश होता. पण ते कोण होते?—प्रे. कृत्ये १५:२, ४, ६.
ख्रिस्ती धर्मात परीवर्तित झालेल्या विदेश्यांनी नियमशास्त्राचे पालन करावे का व सुंता करून घ्यावी का या प्रश्नाविषयीची चर्चा करण्यासाठी भरलेल्या सभेचे अध्यक्षपद येशूचा दुधभाऊ याकोब याने चालविले. त्या चर्चेत प्रेषित पेत्राने सहभाग घेतला. अहवाल आम्हाला “बंधुजनातील प्रमुख” या अर्थी बर्शब्बा म्हटलेला यहुदा व सीला यांची माहिती कळवतो पण हे दोघे नियमन मंडळाचे सदस्य होते असे थेटपणे सांगत नाही. (प्रे. कृत्ये १५:७, १३, २२) हे सांगण्याचा मुद्दा असा की नियमन मंडळात कोणकोण होते त्याची पूर्ण यादी पवित्र शास्त्र देत नाही. काहींची अशी धारणा आहे की पौल हा स्वतः फिरता सुवार्तिक होता व त्यानेच सिरीयातील अंत्युखियाच्या मंडळीतून तो वादग्रस्त प्रश्न आणल्यामुळे तो त्या नियमन मंडळाचा सदस्य नसावा.
हे खरे की पौल हा, जे येशू ख्रिस्तासोबत राहिले होते त्या “बाराजणातील” नव्हता आणि यहुदा इस्कार्योतच्या जागी मत्थियाची निवड करण्यात आली होती.a याच प्रमाणे शिष्य याकोब सुद्धा त्यात नव्हता तरीपण त्याला नियमन मंडळाचा सदस्य या अर्थी स्पष्टरित्या दाखवले गेले आहे. (प्रे. कृत्ये ६:२; १:१५–२६) पौलाबाबत आणखी पाहता, येशूने त्याला दर्शन दिले व त्याची ‘परराष्ट्रीयांकडे त्याचे नाव घेऊन जाणारे निवडलेले पात्र’ या अर्थी नेमणूक केली. याद्वारे पौल “मनुष्यांडून नव्हे किंवा माणसाच्या द्वारेही नव्हे तर येशू ख्रिस्त व . . . देवपिता ह्यांच्या द्वारे प्रेषित” झाला. त्याने स्वतःला “परराष्ट्रीयांचा प्रेषित” असे संबोधिले.—प्रे. कृत्ये ९:३–६, १५; गलतीकर १:१; रोमकर ११:१३; १ करिंथकर ९:१; १५:७, ८.
पौल हा मंडळयांना मार्गदर्शन देणाऱ्या “प्रेषित व वडीलवर्ग” याचा सदस्य बनला याच्या आणखी माहितीसाठी त्याने देवाच्या सामर्थ्याद्वारे कोणते कार्य केले ते विचारात घ्या. पौलाने ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनातील १४ पुस्तके लिहिली. पेत्र “आपला प्रिय बंधु पौल” याच्या लिखाणाची बरोबरी “इतर शास्त्रलेखा” सोबत करतो. (२ पेत्र ३:१५, १६) पौलाने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यात भव्य पुढाकार घेतला व त्याने मंडळयांना मुबलक मार्गदर्शन दिले. पौलाची प्रेरित लिखाणे दाखवितात की त्यानेच स्वतः काही वादविषयांचे निरसन केले. नियमन मंडळाच्या एका सदस्या बाबतीत असे अपेक्षिणे त्या काळी सार्थच होते कारण तो स्वतः केंद्रिय मंदळाकडून बराच दूर होता व तेव्हा दळणवळणाचे माध्यमही बरेच धिमे होते. (१ करिंथकर ५:११–१३; ७:१०, १७) पण इतर वेळी मात्र त्याने संबंधित प्रकरण संबंध मंडळापुढे आणले ज्याची स्पष्टता प्रे. कृत्ये याच्या १५व्या अध्यायाच्या अहवालामुळे मिळते.
“येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल ह्याच्या कडून” तीतास लिहिले गेले: “मी तुला क्रेतात यासाठी ठेवून आलो की तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील वर्गाची नियुक्ती करावी.” (तीत १:१, ५) अशा प्रकारे प्रवासात पौल निश्चये केंद्रिय नियमन मंडळाच्या वतीने बोलत होता.—प्रे. कृत्ये १६:४, ५.
अशाप्रकारे पौलाला प्रभुकडून खूप प्रवास करण्याची नेमणूक लाभली होती व यामुळे केंद्रिय नियमन मंडळाच्या कित्येक सभांना तो अनुपस्थित होता तरी पण त्याचा देव व ख्रिस्तद्वारे ज्या पद्धतीने वापर केला गेला तो पुरवा हे दाखवितो की पौल त्या वर्गाचा सदस्य होता.
[तळटीपा]
a त्या वेळी प्रेषित याकोबाला सुद्धा मारले गेले.—प्रे. कृत्ये १२:२.