वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ४/१ पृ. २८-३१
  • तुम्हाला नेहमी मुद्दा कळतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला नेहमी मुद्दा कळतो का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नम्रता साहाय्यक ठरते
  • “ऐकावयास शीघ्र . . . असा”
  • अप्रत्यक्षरित्या दिलेला सल्ला ओळखा
  • सल्ला ऐकल्याने लाभ मिळतो
  • “बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • कुशल सल्लागार—आपल्या बंधुंसाठी आशीर्वाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • तुम्ही दिलेला सल्ला इतरांना स्वीकारायला सोपा जातो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • तुम्ही दिलेला सल्ला लोक स्वीकारतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ४/१ पृ. २८-३१

तुम्हाला नेहमी मुद्दा कळतो का?

थोरला भाऊ अत्यंत क्रोधाविष्ट झाला. तो आपल्या धाकट्या भावावर रागावला होता. कारण? त्याच्या भावाला अशी मान्यता लाभली जी त्याला मिळाली नाही. त्याचा राग वाढतच होता तेव्हा एका समंजस सल्लागाराने स्वतःवर नियंत्रण राखण्यास त्याला सांगितले. अन्यथा वाईट परिणाम घडून येणार होता. तरीहि त्या थोरल्या भावाने हा चांगला सल्ला दुर्लक्षिला. त्याने सरतेशेवटी धाकट्या भावाची हत्या केली!

हत्या करणारा भाऊ आदाम व हव्वा या आमच्या पहिल्या पालकांचा ज्येष्ठ मुलगा होता. यहोवाने हाबेलच्या अर्पणाचा स्विकार केला व काईनाचे नाकारले तेव्हा काईनाने या आपल्या धाकट्या भावाचा वध केला. तो समंजस सल्लागार यहोवा देवाशिवाय दुसरा कोणीहि नव्हता; त्यानेच काईनाला प्रेमळ सल्ला दिला. पण त्याने तो नाकारला. याचा परिणाम नुकत्याच बहरू लागलेल्या कुटुंबात रक्‍तपात शिरला व काईनाला त्याचे उर्वरित मोठे आयुष्य धिक्कारलेला हद्दपार या अर्थी घालवावे लागले. सल्ल्याचा मुद्दा समजण्यात अपयशी ठरल्यामुळे हा किती दुःखद परिणाम घडला!—उत्पत्ती ४:३–१६.

काईनच्या नंतर कित्येक शतकांनी इस्राएलाचा राजा दावीद याने उरीया हित्ती याची बायको बथशेबा हिच्या सोबत व्यभिचार केला व ती स्त्री गर्भवती राहिली. या समस्येची हाताळणी करण्यामध्ये दावीदाने प्रथमतः उरीयाला आपल्या घरी बायकोकडे जाण्याची गळ घातली. पण जेव्हा त्याने नाकारले तेव्हा त्याने त्याला युद्धाच्या तोंडी ठेवून ठार मारले व नंतर बथशेबासोबत विवाह केला की ज्याकरवी तिला व्यभिचाराच्या कारणामुळे मृत्युदंड मिळू नये. देवाचा एक संदेष्टा दावीदाकडे आला व त्याने त्याला, त्याने जे केले त्याची गंभीरता लक्षात आणून दिली. दावीदाने त्या सल्ल्यामागील मुद्दा लगेच ओळखला. अशाप्रकारे त्याला त्याच्या उरलेल्या आयुष्यभर या गुन्ह्याचे परिणाम भोगत राहावे लागले तरी त्याच्या अंतःकरणपूर्वक पश्‍चातापाचा यहोवाने स्वीकार केला.—२ शमुवेल ११:१–१२:१४.

हे दोन्ही ऐतिहासिक अहवाल सल्ला ऐकण्याच्या महत्वपूर्णतेचे विदारण करतात. त्यामुळे यश–अपयश आनंद–दुःख एवढेच काय पण जीवन व मरण यातील अंतराचा परिणाम घडू शकतो. “मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सूज्ञ असतो तो उपदेश ऐकतो.” असे जे पवित्र शास्त्र म्हणते त्यात आश्‍चर्य असे काही नाही. (नीतीसूत्रे १२:१५) तरीपण सल्ला ऐकणे हे सोपे नसते. हे असे का? याबाबतीत दावीद राजाच्या उत्तम प्रवृत्तिचे आचरण कसे करता येईल आणि काइनाचे वाईट उदाहरण कसे टाळता येईल?

नम्रता साहाय्यक ठरते

सल्ला ऐकण्यास लोकांना बहुधा जड वाटतो कारण आपल्याला मदतीची गरज असते या गोष्टीचा ते स्विकार करीत नाही; आणि त्यांनी तो केलाच तरी हा सल्ला याच व्यक्‍तिकडून का स्विकारावा हे त्यांना दिसत नाही. खरे म्हणजे हा गर्व असतो त्यामुळे थोडासा विचारविनिमय त्याच्यावर मात करण्यास मदत देतो. उदाहरणार्थ, पौलाने म्हटले: “सर्वांनी पाप केले आहे व सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आहेत.” (रोमकर ३:२३) याद्वारे, प्रत्येकाला वेळोवेळी सल्ला जरूरीचा असतो हे समजते. ते वचन हे सुद्धा सांगते सल्ला देणाऱ्‍याठायीही उणीवा आहेत. यापासून कोणीही अपवाद नाही. या कारणास्तव जो मदत देण्याच्या स्थानावर आहे त्याचा स्विकार करणे, त्या माणसाच्या उणीवाबद्दलचा कल्पित विचार राखून, टाळू नका.

गर्वाविरूद्ध लढत देण्याची कवेढी गरज आहे हे येशूनेही आपल्या अनुयायांना या प्रकारे सांगितले: “तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.” (मत्तय १८:३) पालक लहान मुलांना सल्ला व मार्गदार्शन देतात त्यावेळी त्यांना सुरक्षिततेची जाणीव होते. जेव्हा कोणी तुम्हाला सल्ला देतो त्यावेळी तुम्हास असेच वाटते का? तुमच्या विषयी सल्ला देणाऱ्‍याचे प्रेम व कळकळ किती आहे ते तुम्हाला कळते का? (इब्रीयांस १२:६) ज्याने नम्रतेने व स्वच्छेने सल्ला स्विकारला की ज्यामुळे यहोवाला त्याचा पश्‍चाताप स्विकारण्याचा मार्ग खुला झाला त्या राजा दावीदाने भारावून असे लिहिले: “नीतीमान मला ताडन करो, तो मला बोल लावो तरी ती दयाच होईल. असे ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही.”—स्तोत्रसंहिता १४१:५.

ज्याविषयीचे विशिष्ट नियम नाही अशा क्षेत्राविषयी सल्ला दिला जातो त्यावेळी लीन प्रवृत्तीच तो स्विकारावयास आम्हाला सहाय्य करू शकते. उदाहरणार्थ, आमची केशभूषा किंवा पेहराव मंडळीतील काहींना अडखळविणारा आहे असा सल्ला मिळाल्यास त्यामागील मुद्दा समजण्यास खरी नम्रता लागते. तरीपण असे केल्यामुळे प्रेषित पौलाची ही सूचना अनुसरल्यासारखे ठरेल: “कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्‍यांचे हित पहावे.”—१ करिंथकर १०:२४.

हे आनंदाचे आहे की यहोवाने आपल्याला पवित्र शास्त्र दिले आहे ज्यात सर्वोत्तम प्रकारातील सल्ला नमूद आहे. खरे म्हणजे “सल्ला” हा शब्द विविध रूपात १७० वेळा त्यात आढळतो. याशिवाय हा सल्ला अवलंबविण्यात मदत व्हावी म्हणून त्याने प्रेमळ मेंढपाळाची योजना केली आहे. कौटुंबिक व्यवस्था ही आणखी एक यहावाकडिल तरतूद आहे जेथे जाणकार पालक आपल्या जबाबदारीस अनुसरून सल्ल्याच्या रूपात कुटुंबियांना प्रेमळ साहाय्य देतात. अशा या सल्ल्यास आपण नम्रतेने स्वीकारु या.

“ऐकावयास शीघ्र . . . असा”

याकोबाचे पत्र १:१९ सल्ला देते: “प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश, रागास मंद असा असावा.” हे, आम्हाला सल्ला मिळतो त्यावेळी खासपणे लागू होते. का बरे? एक गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्या कमतरता माहीत असतात त्यामुळेच कोणी कळकळ राखणारा मित्र त्या आम्हाला दाखवितो व सल्ला देतो त्यावेळी ते आपल्याला अगदीच आश्‍चर्याचे वाटत नाही हे खरे नाही का? त्यामुळेच तो जे काही म्हणतो ते लगेच ओळखून त्याजकडील मदत नम्रपणे स्विकारल्यास ते त्याला अगदी सोपे जाईल.

कोणी मित्र आम्हाला सल्ला देण्यास येतो त्यावेळी प्रथमतः तो किंवा ती साधारण विचलीत असते हे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. सल्ला देणे ही सोपी गोष्ट नाही. त्या सल्लागाराने कोणत्या पवित्र्याने समोर यावे व काय बोलावे याविषयी आधी खूप विचार केला असेल. कोणी वडील कदाचित प्रथमतः युक्‍तिबाजपणे वा थेटपणे बोलण्यापेक्षा अप्रत्यक्ष रीतिने बोलणे करील. अशावेळी आम्ही लगेच त्यांचा मुद्दा सूज्ञपणे ओळखल्यास सल्लागाराला आपले काम उरकण्यास मदत मिळेल व भावना दुखविल्या जाणार नाही.

आमच्या लक्षात मुद्दा यावा याकरता सल्लागार कदाचित एखादे उदाहरण वा दृष्टांत वापरील. एक युवक गंभीर पापाकडे वळला नव्हता पण तेच तो वाहवत जाण्याच्या बेतात होता. त्याच्यासोबत विचारविनियम करताना एका वयस्कर ख्रिश्‍चनाने बाकावर पडलेली एक पट्टी उचलली. ती आपल्या दोन्ही हातात धरून थोडीशी वाकडी करून त्यांनी विचारले: “मी ही अशी वाकडी केली तर मला सरळ रेघ ओढता येईल का?” त्या युवकाला त्या मागील मुद्दा लगेच कळला. तो आतापर्यंत नियमांना वाकवून आपल्या इच्छांची परिपूर्ति करू पाहत होता. परंतु सांगितलेल्या उदाहरणामुळे त्याला नीतीसूत्रे १९:२० मधील हा सल्ला अनुसरण्याची मदत मिळाली: “सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार.’

अप्रत्यक्षरित्या दिलेला सल्ला ओळखा

असा हा समंजसपणा आम्हाला इतर कोणाचाहि मध्ये अडथळा न होता अप्रत्यक्षरित्या दिलेल्या सल्ल्यामुळे फायदा घडवितो. हे पोर्तुगालमधील एका युवकाच्या बाबतीत घडले. तो पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत होता. त्याने युवर युथ—गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट हे पुस्तक घेतले. काही दिवसातच त्याने म्हटले की ते पुस्तक त्याने तीनदा वाचले व त्याला त्याकडून भरपूर फायदा मिळाला. तो कसा? तोच युवक असे म्हणतो:

“मला भवितव्याबाबत कसलीच आशा नव्हती, पण अध्याय २ ने [“तुम्ही भवितव्याकडे आत्मविश्‍वासाने का पाहू शकता”] माझ्या जीवनाला अर्थ दिला. याशिवाय मी कित्येक वर्षे हस्तमैथुनाचा प्रकार आचरीत होतो पण हे देवाला असंतुष्ट करणारे आहे आणि मलाही इजा देणारे आहे हे मला कोणीही सांगितले नाही. पण अध्याय ५ [“हस्तमैथुन व पुरूषगमन”] वाचल्यावर ही प्रथा थांबविण्याचा मी निश्‍चय केला. अध्याय ७ ने [“तुमचे कपडे व स्वरूप तुम्हाविषयी बोलतात”] मला माझ्या व्यक्‍तिमत्वाचे मोल जाणण्यास मदत दिली आणि मी माझे केस कापले आहेत हे तुम्हाला दिसते आहेच.”

तो पुढे म्हणतो: “कित्येक वर्षे मी धुम्रपान करीत होतो. अध्याय १५ [“मादक औषधे—खऱ्‍या जीवनाची गरुकिल्ली?] ने मला समज बुद्धी दिली. मी यहोवाला प्रार्थना केली व आता रविवार पासून मी सिगारेट ओढत नाही. मी काही काळापासून माझ्या मैत्रिणीसोबत लैंगिक समागम करीत होतो पण १८व्या अध्यायाने [“लैंगिक नैतिकता काही अर्थ राखते का?”] मला या विषयाबद्दल देवाचा दृष्टीकोन समजावून दिला. मी याबद्दल तिच्याशी आधीच बोललो व तिनेही हा नातेसंबंध तोडण्याचे ठरविले.”

एक युवकाच्या जीवनात इतक्या अल्प काळात एवढे बदल घडू शकले हे किती आनंदाचे आहे! पण हे कसे शक्य झाले? वस्तुतः त्याने ज्याचे वाचन केले ते त्याने आपल्या स्वतःसाठी सल्ला आहे असे समजून तो लागू केला.

सल्ला ऐकल्याने लाभ मिळतो

सल्ला—मग तो पवित्र शास्त्र व पवित्र शास्त्रीय प्रकाशनामार्फत अप्रत्यक्षरित्या मिळाला वा कोणा मित्राने थेटपणे दिला तरी—लाभदायक ठरतो. हे, एका बापाने आपल्या १८ वर्षे वयाच्या मुलाने शिस्त लावण्याच्या प्रकारास योग्य तो प्रतिसाद दाखविला नाही म्हणून मंडळीतील आध्यात्मिक वडील जनांचा परामर्श घेतला त्याच्या अनुभवावरून स्पष्ट होते. ख्रिस्ती वडीलांनी बापासोबत प्रेमळपणे विचार विनिमय केला व त्याला हे स्पष्ट केले की देवाची सेवा करण्याचा आवेश त्याच्याठायी आहे हे खरे तरीपण त्याने आपल्या कुटुंबासोबतच्या व्यवहारात अधिक समतोल साधला पाहिजे.

त्याला पौलाचे शब्द वाचून दाखविण्यात आले: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडवू नका. तर यहोवाचे शिक्षण व बोध यांच्या योगे त्यांचा प्रतिपाल करा.” (इफिसकर ६:४) बापाला या गोष्टीवर विचार करायला लावले. त्याने ज्या पद्धतीने आपल्या मुलास वागविले त्याचा हेतु सरळ होता तरी त्यामुळेच मुलाला चिडल्यासारखे वाटत होते का? ख्रिस्ती सभांना हजर राहणे व कार्याला येणे याविषयीचे प्रेम आपल्या अंतःकरणात न मुळावता त्याला बापाच्या ओवशासारखेच अनुक्रमण करण्याची अपेक्षा केली जात होती का? त्याने आपल्या मुलाला ‘यहोवा त्याचा देव याचे भय बाळगण्यास शिकविले’ होते का?—अनुवाद ३१:१२, १३.

बापाने सल्ला ऐकला व तो अवलंबिला. याचा परिणाम काय दिसला? त्याचा तो १८ वर्षे वयाचा मुलगा आता सभांना उपस्थित राहू लागला आहे व बाप त्याचा दर आठवड्याला पवित्र शास्त्राचा अभ्यास घेत आहे. बाप म्हणतो: “आता आम्हा पिता–पुत्रातील नाते चांगले झाले आहे.” होय, बाप व मुलगा या दोघांनीही सल्ल्यातील मुद्दा हेरला.

यात काहीही संशय नाही की आम्ही सर्वजण चुका करतो आणि वेळोवेळी आम्हाला सल्ल्याची गरज लागते. (नीतीसूत्रे २४:६) आम्ही मुद्दा लक्षात आणला व सूज्ञ सल्ला ऐकला तर कित्येक आशीर्वादांचा लाभ आम्हाला मिळेल. यात सर्वात मोठा व महत्वपूर्ण आशीर्वाद आहे: आमचा प्रेमळ स्वर्गीय पिता यहोवा याजबरोबर व्यक्‍तिगत असे अर्थभरीत नातेसंबंध राखणे व जोपासणे. त्याद्वारे आम्हाला दाविद राजाचे हे शब्द प्रतिध्वनित करता येईल: “यहोवाने मला बोध केला आहे त्याचा मी धन्यवाद करतो.”—स्तोत्रसंहिता १६:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा