वाचकांचे प्रश्न
शास्त्रशुद्धरीतीने पाहता “दुसरी मेंढरे” आणि “मोठा लोकसमुदाय” या बायबलच्या संज्ञांमध्ये काही फरक आहे का?
होय, तरीदेखील आपण शब्दाच्या वापरावर काटेकोरपणे लक्ष देता कामा नये किंवा एखादी व्यक्ती या संज्ञांची अदलाबदल करुन त्यांचा वापर करत असल्यास चलबिचल होता कामा नये.
या संज्ञा ज्या भागांमध्ये आढळतात त्या भागांशी बहुतेक ख्रिस्ती परिचित आहेत. त्यापैकी योहान १०:१६ एक आहे. तेथे येशूने म्हटले: “ह्या मेंढवाड्यातील नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीहि मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होइल.” प्रकटीकरण ७:९ मध्ये “मोठा लोकसमुदाय” ही दुसरी अभिव्यक्ती आढळून येते. तेथे आपण वाचतो: “ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळया घेतलेला, मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.”
आपण पहिल्यांदा योहान १०:१६ विचारात घेऊ या. ही मेंढरे कोण आहेत? येशूच्या सर्व एकनिष्ठ अनुयायांचा उल्लेख मेंढरे या नात्याने केला आहे याचे स्मरण करणे उत्तम होईल. येशूने, स्वर्गामध्ये जाणाऱ्या त्याच्या शिष्यांना लूक १२:३२ मध्ये ‘लहान कळप’ असे संबोधले. हा कळप कशाचा आहे? मेंढरांचा. ही ‘लहान कळपातील मेंढरे’ स्वर्गीय राज्याचे भाग होतील. तथापि, येशू यापेक्षा भिन्न आशा बाळगणाऱ्या इतरांना देखील मेंढरे या नात्याने पाहतो.
आपण हे योहानाच्या दहाव्या अध्यायात पाहू शकतो. स्वर्गात आमंत्रित केलेल्या त्याच्या मेंढरासमान प्रेषितांबद्दल बोलल्यानंतर येशूने वचन १६ मध्ये पुढे असे म्हटले: “ह्या मेंढवाड्यातील नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीहि मला आणली पाहिजेत.” येशू या वचनामध्ये पार्थिव जीवनाचे भवितव्य असणाऱ्या लोकांबद्दल बोलत असल्याची जाणीव यहोवाच्या साक्षीदारांना आधीच झाली आहे. ख्रिस्त-पूर्व काळातील अनेक विश्वासूजन जसे की, अब्राहाम, सारा, नोहा आणि मलाखी याच भवितव्याची आशा बाळगून होते. त्यामुळे आपण योहान १०:१६ मधील ‘दुसऱ्या मेंढरांचा’ भाग या नात्याने त्यांचा उचितपणे समावेश करु शकतो. ख्रिस्ताच्या हजार वर्षाच्या राजवटीत अशा ख्रिस्त-पूर्व विश्वासू साक्षीदारांचे पुनरुत्थान करण्यात येईल आणि त्यानंतर उत्तम मेंढपाळाची “दुसरी मेंढरे” होण्याद्वारे ते येशू ख्रिस्ताबद्दल ज्ञान मिळवून त्याचा स्वीकार करतील.
आपल्याला हे माहीत आहे की, स्वर्गीय वर्गासाठी आमंत्रण देण्याचे संपल्यापासून लाखोजण खरे ख्रिस्ती झाले आहेत. हे लाखोजण ‘लहान कळपाचे’ भाग नाहीत म्हणून त्यांना सुद्धा “दुसरी मेंढरे” ही संज्ञा योग्यपणे देण्यात आली आहे. तर आज ही दुसरी मेंढरे परादीसमय पृथ्वीमध्ये राहण्याच्या भवितव्याकडे दृष्टी लावून आहेत.
प्रकटीकरण ७:९ मध्ये उल्लेखित ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ ओळखचिन्हाबद्दल काय म्हटले जाऊ शकते? वचन १३ आणि त्यातील प्रश्न “हे कोण आहेत व कोठून आले?,” याकडे लक्ष द्या. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला प्रकटीकरण ७:१४ मध्ये मिळते: “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत.” म्हणून मोठ्या संकटातून येतात किंवा बचावतात अशा लोकांचा मिळून “मोठा लोकसमुदाय” बनलेला आहे. वचन १७ मध्ये सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवरील “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ” त्यांना नेण्यात येईल.
हे समजण्याजोगे आहे की, जवळ येऊन ठेपलेल्या मोठ्या संकटातून बचाव होण्यासाठी त्यांनी या महासंकटापूर्वी खरे उपासक होण्याद्वारे स्वतःची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुण्यास हवी होती. त्यामुळे प्रकटीकरण ७:९ मध्ये महासंकटाच्या समाप्तीनंतर या लोकसमुदायाचे वर्णन केले आहे तरीसुद्धा पार्थिव आशा बाळगणारे सर्व जे सध्या म्हणजेच खोट्या धर्मावरील राष्ट्रांच्या आक्रमणाने मोठ्या संकटाचा उद्रेक होण्याच्या समयापूर्वी, यहोवाची पवित्र सेवा करत आहेत अशांना “मोठा लोकसमुदाय” ही संज्ञा आपण देऊ शकतो.
थोडक्यात आपण हे लक्षात ठेवू शकतो की, “दुसरी मेंढरे” या विस्तृत संज्ञेमध्ये पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा बाळगणाऱ्या देवाच्या सर्व सेवकांचा समावेश होतो. त्यामध्ये आज मर्यादित गटातील अधिकांश मेंढरासमान लोकांचा समावेश होतो आणि जवळ येऊन ठेपलेल्या मोठ्या संकटातून पार होऊन अनंतकाळ जिवंत राहण्यच्या आशेसह “मोठा लोकसमुदाय” या नात्याने त्यांना गोळा केले जात आहे. आज जिवंत असलेले बहुतेक एकनिष्ठ ख्रिस्ती ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ आहेत त्याचप्रमाणे ते ‘मोठ्या लोकसमुदायाचा’ देखील भाग आहेत.
या संज्ञांमधील फरक जाणणे उत्तम आहे, हे पुन्हा एकदा सांगावयाचे आहे. कोणत्याही ख्रिश्चनाला शब्दाच्या वापराबद्दल काटेकोर असण्याची गरज नाही असे केल्यास शब्दाबद्दल टिकात्मक असणे होईल. पौलाने, ‘गर्वाने फुगलेल्या आणि शब्दयुद्धामध्ये गुंतलेल्या’ लोकांबद्दल इशारा दिला. (१ तीमथ्य ६:४) आपल्याला संज्ञांमध्ये व्यक्तिगतपणे फरक जाणवत असल्यास ते आपल्यासाठी उत्तमच आहे. तरीदेखील, एखादा बायबलच्या विशिष्ट संज्ञांचा अगदी काटेकोरपणे वापर करत नसल्यास आपल्याला अमूर्त किंवा मूर्त टीका करण्याची आवश्यकता नाही.