पायनियर आत्मा फिलिपाईन्सचा हंगाम वाढवितो
तुम्ही १९३५मध्ये फिलिपाईन्स येथे असून यहोवाच्या साक्षीदारांच्या संपर्कात येण्याची इच्छा केली असती तर तुम्हास एक लहानसे अपार्टमेंट ११३४ रिझ्ल ॲव्हेन्यू शोधावे लागले असते. तेथे सुमारे २० व्यक्ति पवित्रशास्त्र अभ्यासासाठी नियमित येत होत्या. ते अपार्टमेंट हे वॉचटॉवर संस्थेचे फिलिपाईन्समधील पहिले शाखा दप्तर होते.
आज राजधानीच्या मनिला विभागात यहोवाच्या साक्षीदारांच्या १०३ मंडळ्या असून ९००० पेक्षा अधिक राज्य घोषक आहेत! या सारखेच ५० वर्षापूर्वी डिवाओ, फिलिपाईन्सच्या दक्षिणेकडील शहरात एक सुद्धा साक्षीदार नव्हता. आता या शहरात २८०० पेक्षा अधिक जन ४१ मंडळ्यात आहेत.
या दोन मोठ्या शहरातील वाढ ही सुरूवातीचे साक्षीदार त्यांच्या नावासाठी जागले याच्या पुराव्यातील भाग आहे. (यशया ४३:१०–१२) त्यांनी त्यांचे प्रचार व शिक्षणकार्य फिलिपाईन्सच्या कानाकोपऱ्यात विस्तारले. सोबतच्या तक्त्याचे परिक्षण करण्याने तुम्ही गत अर्ध्या शतकात शिष्य बनविण्याच्या कार्यातील फलप्राप्ती पाहु शकाल. कशाने फिलिपाईन्स क्षेत्राच्या वाढीस गती दिली?
पायनियर आत्म्याने वाढीकडे निरविले
सुरूवातीच्या फिलिपाईन्स साक्षीदारांच्या आवेशी पायनियर आत्म्याचा हा प्रभाव नसता तर बेटावरील हजारो रहिवाश्यांपर्यंत सुवार्ता घेऊन जाणे अशक्यच झाले असते. तो आत्मा अजून फारच ज्वलंत आहे. उदाहरणार्थ फेब्रुवारी १९८६ चा अहवाल दाखवितो की ७५८खास पायनियर्स बरोबर ९,०९० नियमित पायनियर संपूर्ण फिलीपाईन्स मध्ये काम करीत होते. ही संख्या केवळ दोन वर्षापूर्वी अहवाल देणाऱ्यांच्या दुप्पट आहे! एप्रिल १९८५ मध्ये २६,६३० जण, म्हणजे सबंध देशातील साक्षीदारांचा एक तृतीयांश भाग प्रचारकार्याच्या पूर्ण वेळेच्या सेवेतील कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सहभागी होते.
होय, फिलीपाईन्स मधील यहोवाच्या लोकांना काळाची गरज जाणवते. हे त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांना प्रचार करणे व देवाचे वचन शिकविण्यासाठी शक्य तेवढा अधिक वेळ खर्च करण्यास चालना देते. निसंशये, काहीनी पुर्णवेळच्या सेवेत उतरण्यासाठी त्यांचे वेळापत्रकात, त्यांना बदल करणे कसे शक्य झाले ते व त्यांनी लुटलेले आनंददायी अनुभव जाणण्यास तुम्ही आस्थेवाईक असणार.
पायनियर असण्यासाठी फेरफार करणे
बीनालोनान, पन्गासिनानचा फेलीप व्हेन्टुरा याने त्याच्या तारुण्यात कुटुंब वाढविण्यापूर्वी १३ वर्षे पूर्णवेळेची सेवा केली. त्याचे कुटुंब वाढू लागले तसे त्याने पायनियर कार्यात पुन्हा येण्याची मनिषा बाळगली परंतु मधुमेहामुळे एका डोळ्याने आंधळा झाला होता. त्यानंतर चार वर्षापूर्वी तो पूर्णपणे आंधळा बनला. असे असताही फेलीपला त्याच्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी लहानसा व्यापार चालविणे शक्य झाले होते व त्याची पत्नी व मुले यांच्या सहाय्याने त्यास पुन्हा एकवार १ एप्रिल १९८५ पासून पायनियर बनण्यास वेळ काढणे शक्य झाले. त्याच्या अंधत्वाखेरीजही तो घरोघरच्या उपाध्यपणात त्याच्या मुलाच्या सहाय्याने पवित्रशास्त्र वचने वाचतो. व्हेन्टुरा पुष्कळ पवित्रशास्त्र अभ्यास चालवितो व तो मंडळीत नेमणूक पावलेला एक वडील आहे. त्याच्या मुलापैकी एक मुलगा त्याजसोबत नियमित पायनियर म्हणून काम करतो व त्याची मुलगी वारंवार सहाय्यक पायनियरींग करते.
क्लोडुवाल्डो खियोहीलाग हा बायनान लगुना येथील एक वडील १९६० पर्यंत त्याच्या पत्नीस मुल होईपर्यंत पायनियर व प्रवासी देखरेखा म्हणून होता. परंतु, ते म्हणतात त्याप्रमाणे, “एकदा का तुम्ही पूर्ण वेळच्या सेवेची रूची चाखली की ती नेहमीच करण्याची तुमची इच्छा असते.” तो त्याच्या व्यापारात यशस्वी होता व त्याच्या मुली व पत्नी सोबत ऐश्वर्यात होता तरीहि त्याने त्याच्या जीवनातील खरा उद्देश म्हणून या गोष्टींना गणले नाही. तो अभिप्राय मांडतो: “पूर्णवेळच्या सेवेत पुन्हा परतण्याचे माझे दिर्घकाळचे स्वप्न साकार झाले नाही तर मी मिळविलेले हे सर्व मातीमोल आहे.” पायनियर बनण्यासाठी त्याने त्याचा व्यापार अर्ध्यावेळेवर आणून, सकाळची वेळ क्षेत्र कार्यासाठी उपयोगात आणू लागला. त्याचे स्वप्न १ ऑक्टोबर १९८४ तो नियमित पायनियर म्हणून काम करू लागला तेव्हा साकार झाले. त्याची प्राप्ती पूर्वी होती त्यापेक्षा सुमारे अर्ध्यावर आली होती तथापि त्याचा खर्च ही कमी आहे. आता त्याची पत्नी त्याला नियमित पायनियर म्हणून जुडली व त्याची मुलगी वारंवार सहाय्यक पायनियरींग करते.
अंध असूनही पूर्णवेळची सेवा
जर्मन गोवराच्या साथीने पॅन्टेलेऑन टाटोय वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अंध आहे. १९७२ मध्ये प्रथम त्याने सत्य ऐकले व सत्य जे चिरकालीक जीवनाप्रत निरविते या पुस्कातून अभ्यास करण्यास सुरुवात केली याने त्यास अल्पावधीतच तंबाखू व दारूच्या त्याच्या सवयीवर मात करण्यास मदत केली व त्याने त्याचे यहोवास केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून २९ जुलै १९७३ ला बाप्तीस्मा घेतला.
पॅन्टेलेऑनने प्रथमच त्याच्या शेजाऱ्यांना प्रचार करण्यास सुरूवात केली तेव्हा त्याच्या थोरल्या बहिणीने त्याची खरडपट्टी काढली की: “तु अंध असून व तुला पॅन्टची एकच जोड असता उपाध्याय कसा होऊ शकतोस?” परंतु याने त्यास निराश केले नाही. त्याला त्याच्या घरासभोवतालचा भाग चांगला ठाऊक असल्यामुळे तो एकटाच जाऊन त्याच्या शेजाऱ्यांना सत्याचा प्रचार करू लागला. १९८४ मध्ये त्याला त्याचा भाचा व पतण्या यांना सत्य शिकण्यास मदत करणे शक्य झाले व त्यांनी त्या वर्षी सप्टेबर मध्ये बाप्तीस्मा घेतला म्हणून तो हर्षित झाला.
पॅन्टेलेऑनला त्याच्या पुतण्या लोर्ना व लूझ ज्या जुळ्या असून बहिऱ्या व मुक्या आहेत त्यांच्यासोबत पवित्रशास्त्राभ्यास करणे शक्य झाले. हा अंध पायनियर, अशा व्यक्ति सोबत कसा अभ्यास करतो? मदतनिसाच्या सहाय्याद्वारे, तो प्रकाशनातील चित्रांचा उपयोग अधिकरितीने करतो. सत्य स्पष्ट करताना त्याचा चुलत भाऊ रोकूयना त्या जुळ्यांना चिन्हांच्या भाषेतून तो काय म्हणतो हे भाषांतरित करतो. लोर्ना व लूझचा बाप्तीस्मा त्यांच्या मोठया अडखळणा ऐवजी ही २० एप्रिल १९८५ रोजी झाला. पॅन्टेलेऑनला, एक वर्ष सहाय्यक पायनियर म्हणून सेवा केल्यावर १ मार्च १९८५ पासून नियमित पायनियर म्हणून नेमले गेले.
पूर्ण–वेळची सेवा एक जीवनाक्रमण
माध्यमिक शिक्षणाच्या पदवीदान समारंभात एका विशिष्ट विद्यार्थिनीने तिच्या वर्ग मैत्रीणीस म्हटले: “ज्या कोणा वेळी मी तुमच्या लोकांना विचारते की पदवीधर झाल्यावर तुम्ही कोणता कोर्स घेणार तेव्हा ते म्हणतात, ‘पायनियरिंग’. हा कोणत्या प्रकारचा कोर्स आहे ग?” तरूण साक्षीदारणीने पायनियरिंग काय होती ते स्पष्ट केले. सोबतीची विद्यार्थिनी आस्थेवाईक झाली व पवित्रशास्त्राभ्यास स्विकारला व तिने सुध्दा पायनियर असणे हे ध्येय ठेवले.
इतरांना महाविद्यालयीन अभ्यासक्रम एखाद्याच्या आध्यामिक गरजा तृप्त करीत नाही हे आढळले. बोहोल मधील एक बहिण तिच्या महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात होती तिला आढळून आले की तिचा अभ्यास पूर्ण करीतच पायनियरिंग करण्यास वेळ होता. नंतर ती पायनियर स्कुलला उपस्थित राहिली व अभिप्राय मांडला की महाविद्यालय हे शाळेसोबत व यहोवाच्या पूर्ण–वेळच्या सेवेचा हर्ष याबरोबर तुल्य होऊ शकत नाही. पायनियरांची भव्य निकड आहे तेथे ती सध्या पायनियर आहे.
तरूण व वृद्ध स्वईच्छेने सहभागी होतात
स्तोत्रसंहितेचे पुस्तक भाकीत करते की राज्य सत्ते खालच्या दिवसात देवाचे लोक “स्वतःस स्वईच्छेने सादर” करतील. असे ही म्हटले आहे की ‘तरूण, वृद्ध व मुले’ यहोवाच्या नामाची स्तुती करतील. (स्तोत्रसंहिता ११०:३; १४८:१२, १३) ही गोष्ट फिलीपाईन्स मधील देवाच्या लोकात खात्रीने सत्य अशी शाबीत झाली.
शेवटच्या मोजणीत फिलीपाईन्स मध्ये १,१५९नी जी नियमित पायनियरिंग केली त्यात १३ टक्के २० वर्षाच्या आतील होते. यासारखे निस्वार्थीपणे, स्वार्थी किंवा जगिक ध्येयात जाण्याऐवजी ‘तारूण्याच्या दिवसात त्यांच्या निर्माणकर्त्यास स्मर’ ताना तरूणांना पाहून केवढा आनंद होतो बरे!—उपदेशक १२:१.
काहींनी त्यांच्या तारूण्यात पूर्ण–वेळची सेवा सुरू केली होती व आता वयस्कर होत चालले आहेत परंतू सध्याही विश्वासूपणे सेवा करीत आहेत. बंधू लिओडेगॅरिओ बारलान व त्यांची पत्नी नाटीव्हिदाद यांनी १ एप्रिल १९३८ मध्ये पायनिरिंग सुरू केली. व कठीण अशा युद्ध समयातून निभावून गेले व त्यांनी अनेक सेवा हक्क बजावले ज्यात प्रवासी काम होते. आता बंधू बारलान ७२ वयाचे आहेत व अजूनही आवेशीपणे सॅन कारलीस, पान्गासिनान मध्ये त्यांच्या पफ़्सिह खास पायनियर म्हणून सेवा करतात.
इतरांनी पूर्ण–वेळेची सेवा जीवनात नंतर सुरू केली व त्यांच्या वार्ध्यक्यातही चालू ठेवली, उदाहरणार्थ लियोन साईओ साबानडालने पायनियरिंग ५२ व्या वर्षी सुरु केली व अद्यापही ९२ व्या वर्षी खास पायनियर आहेत. त्यांनी व त्यांच्या पत्निने ११८ जणांना त्यांचे जीवन यहोवास समर्पित करण्यास मदत केली. याचप्रमाणे, सायप्रियानो सेपुलव्हेडाने, पायनियरिंग ७२ वर्षाचे असताना सुरू केली व त्यांच्या वयाच्या ८८ व्या वर्षी १९८५ मध्ये मृत्युपर्यंत चालू ठेवली होती. पाऊलो माराइनो ने पायनियरिंग वयाच्या ७१ व्या वर्षी सुरू केली व सध्याही वार्धक्य असूनही ८८ व्या वर्षी त्यात आहेत. हे व इतर वृद्ध जनांचा विश्वास व निष्ठेची ही केवढी चेतनादायक उदाहरणे आहेत बरे!
प्रगतीत आनंद मानणे
गत अर्ध्या शतकात पाहता त्याच्या साक्षीदारांच्या आवेशी प्रयत्नावरील यहोवाचे आशीर्वाद अगदी स्पष्ट आहेत. १९३५ मधील बोटावर मोजण्याइतक्यापासून १९८६ फेब्रुवारी मध्ये ८८,११३ जण क्षेत्रकार्यात सहभागी झाले हे पाहणे केवढे रोमांचकारी आहे! मनिला येथील रिझल अव्हेन्यू येथील लहान एका मंडळीपासून २,४५४ मंडळ्या देशभरात १२०विभागात संघटीत आहेत.
भवितव्यात केवढी संभवनियता आहे? ४ एप्रिल १९८५ रोजी स्मारक विधीस देशभरात साक्षीदारांच्या संख्येपेक्षा तीन पटीने अधिक—२,६८,५२६ इतके उपस्थित होते हा केवढा उत्तेजनपर संकेत आहे. याहून अधिक फेब्रुवारी १९८६ मध्ये ६३,२४८ एवढे पवित्रशास्त्राभ्यास आस्थेवाईकासोबत चालविले गेले. यात तिळमात्र शंका नाही की यहोवाच्या आशीर्वादाने व संमतीने येणाऱ्या दिवसात अखंडीतपणे वाढ दिसेल.
यहोवाने त्याच्या सुरूवातीच्या अभिषिक्त साक्षीदारांनी या बेटावर ५० वर्षापूर्वी सुरू केलेल्या या कार्यास फारच फलदायी बनविले ह्यामुळे आम्ही आनंदीत आहोत. त्याचे आशीर्वाद व मार्गदर्शनाने येणाऱ्या दिवसात त्यांचे प्रचार व शिक्षणकार्य विस्तारण्याचे फिलीपाईन्स मधील त्याच्या लोकांचे ध्येय आहे.
[२८ पानांवरील तक्ता]
पन्नास वर्षातील फिलीपाईन्सची वाढ
१९३५ २०
१९४० २२२
१९५० १०,०५५
१९६० ३१,६०८
१९७० ५४,७८९
१९८० ६१,१६४
१९८६ ८८,११३
[२८ पानांवरील नकाशा]
[For fully formatted text, see publication]
सॅन कॅरलोस
मनीला
बिनान
द फिलीपाईन्स
झाम्बोन्गा
दवाओ