राज्य घोषकांचा वृत्तांत
दक्षिण आफ्रिकेत वंशभेद संपुष्टात आले!
इम्बाली हे पायटरमारिटझ्बर्गच्या थोडे बाहेर, नाटल, दक्षिण आफ्रिकेतील निग्रोंचे गाव आहे. इम्बाली येथील दोन यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना थोडी जमीन अनुदान म्हणून मिळाली तेव्हा लागलेच पायटरमारिटझ्बर्ग मधील गोऱ्या व इतर मंडळ्यातील वडील एकत्र आले व त्यांनी त्याच्या निग्रो बांधवांना राज्य सभागृह शक्य तेवढ्या कमी वेळेत लवकर बांधण्यास कशी मदत करु शकतील याची योजना आखली. बांधणी काम नऊ महिने लांबले तरी अक्षरशः ते काम उरकण्यास केवळ कामाचे ४८ दिवस लागले. ते बहुदा शनिवारचे केले गेले.
इम्बाली मधील स्थानिक रहिवाश्यांना राज्य सभागृहाच्या उभारणीने त्यांनी अशक्य म्हणून विचार केला असता त्याचे प्रदर्शन केले. विचार करा गोरे व इतर तसेच ताम्रवर्णी साक्षीदार झुंडीनी पायटरमारीटझ्बर्ग व दरबान मधील भागातून आले व निग्रो आफ्रिकन मंडळ्यांच्या खांद्यास खांदा लावून काम करू लागले! (सफन्या ३:९ पडताळा.) पुरूष, स्त्रिया व लेकरे सर्व साहित्य व हत्यारे एक दुसऱ्याच्या हातात देऊन पोहचवू लागली व एकाच मेजावर जेवण खाऊ लागले. अशाप्रकारचे वंशिक ऐक्य खासकरून त्या तणावपूर्ण दिवसात आफ्रिकन गावात ऐकण्यास मिळण्यासारखे नव्हते! खात्रीने, यहोवाचे साक्षीदार ऐक्यबद्ध लोक असून एकदुसऱ्यांची खरोखर काळजी घेतात याचा हा निर्विवाद पुरावा आहे.
या ऐक्यावर अभिप्राय मांडतांना एक शेजारी म्हणाला: “गोरे, काळे, श्वेत नाहीत असे इतर व ताम्रवर्णीयांना ऐक्याने एकत्र काम करताना पाहणे आम्हास अचंबीत करते. आम्हास आमच्या चर्चमध्ये अशाचा अनुभव कधीच आला नाही.” इम्बालीचे महापौर मिस्टर पाकीज १० नोव्हेंबर १९८५ ला या सभागृहाच्या समर्पण सोहळ्यास उपस्थित होते व त्यांनी साक्षीदारांची एवढी भव्य इमारत स्वतःच बांधण्याचे ऐक्य व निश्चय यावर आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी ते कसे पूर्ण केले यावरचे त्यांचे मत असे म्हणून स्पष्ट केलेः “हे केवळ प्रीतीनेच केले जाऊ शकते.” केवढे सत्य! येशू म्हणाला नव्हता का “तुमची एकमेकावरील प्रीती पाहून लोक म्हणतील की तुम्ही माझे शिष्य आहा”?—योहान १३:३५ द जरूशलेम बायबल.
सद्य व्यवस्थिकरणाचा नाश झपाट्याने जवळ येत आहे हे पाहता, यहोवाचे साक्षीदार संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत, निग्रो नगरात व गावात शक्य तेवढ्या लवकर राज्य सभागृहे बांधण्याची गरज ओळखून आहेत. पहिले राज्य सभागृह सोवेटे मध्ये फेब्रुवारी १९८५ मध्ये समर्पित केले गेले. इतर पुष्कळ बांधण्याच्या बेतात आहेत. निग्रो विभागात ७०० मंडळ्या असून सुमारे ७० कडे त्यांची स्वतःची सभागृहे आहेत, यास्तव तेथे भरून काढण्यासारखी भव्य गरज आहे. इम्बालीचे राज्य सभागृह ती गरज भरून काढण्यास हातभार लावते. ते ४०० लोकांना आरामशीर बसून दिले जाणारे आध्यात्मिक अन्न घेऊ शकतील अशी व्यवस्था पुरविते. होय, अशा पवित्रशास्त्रीय शिक्षणाच्या केद्रांत नीतीमत्वतेवर प्रेम करणारे या सद्य व्यवस्थीकरणातून देवाचे नविन व्यवस्थीकरण प्राप्ती साठी कसे बचावून जातील जेथे मानवजातीचे सर्व वंश एक कुटुंब यानाते सदासर्वकाळ राहतील हे शिकतात.