वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ७/१ पृ. २७
  • केवळ नऊ दिवसांत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • केवळ नऊ दिवसांत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य सभागृह बांधकाम —पवित्र सेवेचा महत्त्वपूर्ण पैलू
    आमची राज्य सेवा—२००६
  • सतत होणारी वाढ राज्य सभागृहांची गरज वाढवते
    आमची राज्य सेवा—१९९४
  • उल्लेखनीय वाढीमुळे जलद विस्ताराची आवश्‍यकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ७/१ पृ. २७

राज्य घोषकांचा वृतांत

केवळ नऊ दिवसांत

“आश्‍चर्यकारक!” हे एक शब्दाचे मुख्य शिर्षक कॅनडातील व्हॅनकूवर बेटातील १४ ऑगस्ट १९८५च्या एका वृतपत्राच्या संपादकीय लेखाचे होते. या संपादकीय लेखाने २५००० चौरस फूट (२३०० चौ.मि.) संमेलन सभागृह जे केवळ नऊ दिवसात बांधले असे त्याचे वर्णन केले.

यहोवाच्या साक्षीदारांनी स्थानिक राज्य सभागृहे झटकन उभी करण्याची कला अवगत करून दहा वर्षे लोटली आहेत. व्हॅनकूवर बेटातील हे यहोवाच्या साक्षीदारांचे संमेलन सभागृह, मंडळ्‌याच्या गटांनी सहामही विभागिय संमेलनासाठी खासकरून बांधलेले कॅनडातील दुसरे होते. हे नविन सभागृह कॅसिडी, ब्रिटीश कोलंबिया मधील आठ एकर (३ हे.) जागे मध्ये आहे. हिरवी दाट झाडे मागील भाग सुशोभित करतात तर हर्षभरित नदी इमारतीच्या अगदी मागच्या बाजूनेच वाहते. यात ९०० बैठकांचे श्रोत गृह, २५० बैठकांची सोय असलेला जेवण विभाग, उपहार गृह विभाग, बाप्तीस्मा देण्यास लहान हौद व स्थानिक मंडळीच्या उपयोगासाठीचे २०० बैठकांचे सभागृह समाविष्ट आहे. या बांधकामात सहभागी होते त्यांनीही केवळ सुरुवात केल्यापासून नऊ दिवसांत पूर्ण केले यावर विश्‍वास करणे कठीण होते असे म्हटले.

अर्थात नऊ दिवसांच्या बांधकामापूर्वी पुष्कळ पूर्व तयारी आधीच झाली होती. या जागेवरील पुर्वीची इमारत जिची पावसामुळे नासधूस झाली होती ती काढणे होते. स्वयंसेवक कार्यकर्ते मोठ्या शिताफिने, जाड असे नैसर्गिक छप्पर पाश्‍चिमात्य लाल देवदारु पासून बनविण्यासाठी देवदारू लाकडासाठी ऑक्टोबरच्या थंड वातावरणात भिजले. नळ व मोऱ्‍यांचे काम, उष्णता देणे, वातानुकूलीत, विद्युत व इतर व्यवस्था तयार करणे होते, जागा तयार करून व २५००० चौरस फूटचा काँक्रीट स्लॅब तयार करणे—हे त्यातील इतर गोष्टीत समाविष्ट होते.

सरतेशेवटी सर्व कांही तयार होते. रविवार ३ ऑगस्ट सकाळी ८:०० वाजता पवित्रशास्त्रीय वचनाच्या विचारविनिमयानंतर स्वयंसेवक हातोडे घेऊन काँक्रीट स्लॅबच्या सभोवार उभे राहीले. “बांधवानो, सुरुवात करा” हे आव्हान लाऊड स्पिकर वरून दिले गेले. पुष्कळ हातोडे खिळयावर रोखले गेले ४५०० स्वयंसेवक कामास लागले. पुष्कळसे स्वयंसेवक व त्यांचे परिवार युनायटेड स्टेट्‌स व कांही बरेच दूरवरून म्हणजे न्यू फाउन्डलॅन्ड, नॉर्वे व इंग्लंड मधून आले होते. सहानुभूती असणाऱ्‍या शेजाऱ्‍यांनी त्यांची जागा राहण्यासाठी तंबू घालण्यास ट्रक व कार उभी करण्यासाठी ३५ एकर (१४ हे.) जमीन जागे सभोवती देऊ केली.

पाहणारे फारच प्रभावित झाले. एका काँट्रॅक्टरने त्याच्या कामगारांना काम पाहण्यास व वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी आणले. दयाळू शेजाऱ्‍यांनी जेवण विभागास जो नियमितपणे कामकऱ्‍यांच्यासाठी जेवण तयार करीत असे त्यास भाजीपाला देऊ केला. कांही शेजारी अक्षरशः काम करण्यास मदत करू लागले. या जागेस भेट दिल्यानंतर एक गृहस्थ म्हणाले: “देव तुम्हासोबत आहे हे मी निश्‍चीतपणे पाहू शकतो.” हा मनुष्य साक्षीदारासोबत पवित्रशास्त्राचा अभ्यास करण्यात चांगली प्रगती करीत आहे.

द लेडीस्मिथ चेमायनस क्रॉनिकल ने संपादकीय मध्ये म्हटले: “तुमचा धर्म, पंथ किंवा गरीब असा, तुम्ही ४५०० यहोवाचे साक्षीदार ज्यांनी गेल्या सप्ताह भरात रात्रंदिवस काम केले व कॅसिडी मधील २५००० चौरस फूटाचे संमेलन सभागृह बांधले त्याजसोबत सहकार्य दिले . . . हे आनंदीपणे करण्यासाठी वादविवाद, तंटा किंवा व स्व–गौरव विरहीत होते व हे खऱ्‍या ख्रिश्‍चनत्वाचे चिन्ह आहे.”

रविवार ११ एप्रिल सायंकाळी ६:०० वाजता त्या जागेस रमणिय बनविणाऱ्‍या पूर्ण सुसज्ज सभागृहात पहीली सभा झाली.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा