वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ७/१ पृ. २८-३०
  • निश्‍चयी मनोवृत्ती ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निश्‍चयी मनोवृत्ती ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मानवाच्या भयास तोंड देतो तेंव्हा
  • सेवेचे विशेष हक्क गमावले जातात तेव्हा
  • अनपेक्षीत बदल घडतात तेव्हा
  • निश्‍चयी मनोवृत्ती कशी राखावी
  • ख्रिस्ताच्या मनोवृत्तीचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • आशादायी मनोवृत्ती बाळगा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • सकारात्मक मनोवृत्ती राखा
    आमची राज्य सेवा—१९९४
  • बारा गुप्तहेर
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ७/१ पृ. २८-३०

निश्‍चयी मनोवृत्ती ठेवा

नुकताच उन्हाळा सुरु झालेली ती सकाळ होती. मध्य–पूर्वेत सुर्य चमकत होता, एका बापास दुखःद बातमी मिळाली होती. त्यांचा २२ वर्षे वयाचा ज्येष्ठ पुत्र रात्री मोटार अपघातात मृत्युमूखी पडला होता.

तुम्ही या बातमीस कसा प्रतिसाद दिला असता? कौटुंबिक सदस्यात जिव्हाळा असतो, तो मध्यपूर्वेत सुद्धा आहे, म्हणून पालक बेचैन झाले होते. या अनपेक्षित शोकांतीकेच्या प्रतिक्रियेत अति कष्टी होणे हे सुद्धा स्वाभाविक वाटले असते. तथापि, समाजास अचंबीत करून टाकणारी, निश्‍चयी मनोवृत्ती पहिल्या दिवशी सुद्धा त्यांनी दाखविली. अति दुःखी असले तरी यहोवा त्यांच्या मुलास त्याच्या नेमलेल्या वेळी पुनरुत्थीत करील या त्याच्या सामर्थ्यावर पूर्ण भरवसा राखून होते. ते देवाचे नविन व्यवस्थीकरणाचे अभिवचन जेथे “मरण असणार नाही” त्याकडे दृष्टी लावून होते. (प्रकटीकरण २१:४) आज सुद्धा, पुष्कळ वर्षानंतरही ज्या लोकांना त्या कुटुंबाची ओळख होती ते अजूनही त्या पालकांच्या उदाहरणीय विश्‍वासाबाबत बोलतात.

निश्‍चयी मनोवृती असणे याचा अर्थ काय होतो? निश्‍चयी व्यक्‍ती बदलल्या परिस्थीतीतही स्वतःचा तोल राखते. कठीण परिस्थीतीतही तो चिडलेला, नकारार्थी विचारांना वर्चस्व गाजवू देत नाही. हे कसे शक्य आहे? कांही प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी पवित्रशास्त्रातील कांही उदाहरणांचा परामर्श घेऊ या.

मानवाच्या भयास तोंड देतो तेंव्हा

इ.स.पू. १५१२ मध्ये इस्राएल राष्ट्र पारानच्या अरण्यवसात होते तेव्हा मोशेने १२ जासूद वचनयुक्‍त देश हेरण्यास पाठविले. (गणना १३:१७–२०) सर्व जासूद त्यांच्या वंशाचे सर्वप्रमुख होते—कर्तबगार पुरुष ज्यांनी उत्तम उदाहरण असणारे असावयाचे होते. (गणना १३:१, २) परंतु केवढे लज्जास्पद! ४० दिवसानंतर त्यातील दहांनी असा प्रतिकूल अहवाल दिला की इस्राएलांनी यहोवाच्या मार्गदर्शनाविरूद्ध बंड केले व मिसरास परतण्याची इच्छा केली! “त्या राष्ट्राचे रहिवासी महाबलवान आहेत” असे जासूद म्हणाले. “त्या लोकावर स्वारी करण्यास आपल्याला ताकद नाही.”—गणना १३:२८, ३१.

केवढी ही नकारार्थी मनोवृत्ती! यहोशवा व कालेब उरलेले दोन जासुद यांच्या निश्‍चयी मनोवृत्ती मध्ये केवढी तफावत होती: “जो देश हेरीत आम्ही चोहोकडे फिरलो तो अतिशय उत्तम आहे. यहोवा आम्हावर प्रसन्‍न झाला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्‍या देशांत नेऊन तो आम्हास देईल.” (गणना १४:७, ८; १३:३०) दोन्ही गटांनी देश हेरीत असता एकच गोष्ट पाहिली होती. परंतु मनोवृतीत केवढी तफावत! दहा जासूदांची नकारार्थी मनोवृत्ती सर्व राष्ट्रास भोवली व ते कुरकूर करू लागले. याचा परिणाम २० वर्षापुढील असणाऱ्‍या सर्वांचा अरण्यवासात नाश झाला. केवळ यहोशवा व कालेब यांच्या यहोवावरील निश्‍चयी भरवश्‍यामुळे त्यांना वचनयुक्‍त देशात प्रवेश करण्याचा हक्क मिळाला. (गणना १४:२२–३०) त्यांच्या उदाहरणाने आज आम्हास छळ किंवा विरोध येतो अगर वाढतो तेव्हा विश्‍वासू राहण्यास उत्तेजन दिले पाहिजे.

पुष्कळ वर्षे बंदी होती अशा देशांत एका खास पायनियरला बंदीवासात डांबून फारच क्रूर वागणूक दिली गेली होती. तो स्मरण देतो: “अधिकारी निष्ठूर बनले तेवढे अधिक यहोवाच्या निकट सान्‍निध्यात आल्याचे मला वाटले. मी राज्य गीते म्हटली. मी मला माहीत असणाऱ्‍या सर्व शास्त्रवचनांचे स्मरण केले. मी हे ताडले होते की यहोवा असे घडण्यास अनुमती देत होता तरी तो कोणत्याही क्षणी—मला बंधमुक्‍त करण्यास—समर्थ आहे. या सर्व गोष्टींनी मला निश्‍चयी मनोवृत्ती राखण्यात मदत केली. प्रेषितांच्याप्रमाणे मला यहोवाच्या सर्वसमर्थ नावासाठी मार सोसण्यात आनंद वाटला होता. मला खंबीर बनविण्यासाठी मी यहोवाकडे सतत याचना करीत होतो. तो माझ्या सहाय्यास आला त्यामुळेच केवळ पहिला आघातच दुखापत पोहंचविणारा बनला. मी प्रत्येक संधीचा फायदा इतर बंदीवानांना प्रचार करण्यास घेतला.”

त्याच्या बंधमुक्‍ततेनंतर हा ख्रिश्‍चन म्हणाला: “आम्ही आमचे जीवन यहोवास समर्पित व त्याजसोबत एकनिष्ठ राहण्याचे अभिवचन केले आहे असे पाहता आम्ही कोणत्याही त्रासामध्ये त्याची सेवा केलीच पाहीजे. तो आमची भक्‍ती व संपूर्ण उपासना स्विकारावयास योग्य आहे.”

आम्हीही भवितव्यात या सारख्याच विरोधाला सामोरे जाऊ. आम्ही सर्वजण ऐक्याने मनुष्याचे भय न राखण्याचा निर्धार करू या. निश्‍चयी मनोवृत्ती राखा म्हणजे यहोशवा व कालेब प्रमाणे पुष्कळ आशीर्वाद व बक्षिसे आम्हास दिली जातील.

सेवेचे विशेष हक्क गमावले जातात तेव्हा

मोशेने इस्राएल राष्ट्राचा नेता या नाते १२ जासूदांना पाठविले होते. त्याने राष्ट्राला मिसरातून बाहेर काढण्याचे नेतृत्व केले व निसंशये त्यांना वचनयुक्‍त देशापर्यंत निरविणारा म्हणून अपेक्षिले होते. तथापि, रागाच्या भरात यहोवाचे नाम गौरविण्यात तो अपयशी झाला त्यावेळी मोशेने तो हक्क गमावला. (गणना २०:२–१३) त्यानंतर मोशेने कशी प्रतिक्रिया दाखविली? नंतर त्याने रचलेल्या काव्यात तो म्हणतो: “मी यहोवाच्या नामाची घोषणा करीन . . . तो दुर्ग आहे; त्याची कृती अव्यंग आहे, त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत, तो सत्य देव आहे, त्याच्या ठायी अधर्म नाही तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:३, ४) त्याचा महत्वपूर्ण सेवा हक्क गमावला होता तरी मोशे केवढी निश्‍चयी मनोवृती बाळगून होता बरे!

हा मोशेचा अनुभव, आम्हास अशा अनुभवाचा कधी सामना करावा लागलाच तर आठविणे आम्हास सहाय्यक होईल. हे असे घडेल की मंडळीतील वडीलमंडळ एका वडीलाची अगर उपाध्य सेवकाची, बहुदा तो या सेवा हक्कासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या एक किंवा अधिक शास्त्रवचनीय गुणवत्तेत उणा भरला म्हणून काढून टाकण्याची शिफारस करतील. बांधवास वाटेल की त्याला काढून टाकणे न्याय नाही म्हणून निराश होऊन अनावश्‍यक गोंधळ माजवील. नकारार्थी मनोवृत्ती अंगिकारण्याने तो कदाचीत कुरकुर सूरू करील, इतरांचे दोषच काढील एवढेच काय पण अफवा पसरविल. सरतेशेवटी, तो सभांना उपस्थीत राहण्याचे व प्रचार कार्यात सहभागी होण्याचे थांबवील. केवढी ती दुर्दशा! निश्‍चयी मनोवृत्ती बाळगून व कमी करणे याजकडे शिस्त किंवा यहोवाचा चांगला सेवक बनण्याचे प्रशिक्षण म्हणून स्विकारणे केवढे बरे आहे. तो अभ्यास करून व देवाच्या वचनावर मनन करील ज्यामुळे त्याची सेवा पूर्णपणे करण्यासाठी जरूरीची गुणवत्ता पुन्हा प्राप्त करण्यासाठी या संधीचा फायदा घेईल. ज्या पुष्कळांनी हेच केले त्यांना नंतर अधिक सेवेच्या हक्काने आशीर्वादीत केले गेले.—इब्रीकर १२:११.

अनपेक्षीत बदल घडतात तेव्हा

जीवन हे अनपेक्षित घटनांनी भरून उरले आहे जे इतरांना निराश बनून नकारार्थी मनोवृतीस एखाद्यास बळी पाडते. तुम्ही अपेक्षिल्याप्रमाणे गेल्या वेळेस कांही घडले नव्हते तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती? आम्ही लहान घटनांना वर्चस्व गाजवू दिले तर त्या आम्हास नाराज करू शकतात. परंतु हे कधीही विसरू नका: निश्‍चयी मनोवृत्ती राखणे तुम्हास बदलत्या स्थीतिस चांगल्यारित्या सामना देण्यास मदत करील.

स्मरण करण्यासारखे चांगले उदाहरण रूथचे आहे. तारूण्यातच ती विधवा बनली ती तिची सासू नामी सोबत दुष्काळाने तडाका दिला त्यावेळी इस्राएलामध्ये परतली. मुलभूत गरजा पुरविणाऱ्‍या पति विरहीत रूथने निश्‍चयी मनोवृत्ती राखली. आनंदीपणे, ती कापणी करणाऱ्‍यामागे सरवा वेचण्यास गेली ज्यामुळे तिला व तिच्या सासूला खाण्यास अन्‍न मिळेल. त्या कष्टदायी कामाने तिला नाराज बनविले नाही. तिच्या पतिस गमावले व तिच्या माहेरापासून व आप्तजनापासून दूर होती असा शोक करून तिने नकारार्थी मनोवृत्ती अंगीकारली नाही. अहवाल दाखवितो त्याप्रमाणे यहोवा देवाने तिच्या उत्तम मार्गक्रमणाबद्दल समृद्धपणे आशीर्वादीत केले.—रूथ ४:१३–१७.

निश्‍चयी मनोवृत्ती कशी राखावी

कांहीना निश्‍चयी मनोवृत्ती राखणे त्रासाचे जाते. जीवनाच्या चिंता खासकरून आम्ही जीवन कंठीत असलेल्या समस्याने भरलेली स्थिती—विशेषतः त्याच समस्या सतावत राहतात तेव्हा—आमचा आनंद हिरावून घेते. तथापि प्रतिकूल परिस्थीतीतही एखादा निश्‍चयी मनोवृत्ती बाळगू शकतो. पुष्कळांनी अति त्रासदायक परिस्थीतीत ते केले. आम्हीही तेच कसे करू शकतो?

नकारार्थी गोष्टीत जखडून राहण्याचा प्रयत्न करू नका. अति कठीण स्थितीतही निश्‍चयी गोष्टी आढळू शकतात. प्रेषितांना बहूदा छळले किंवा कैदेत डांबले, तरी त्यांना यहोवाची स्तुती करणे शक्य झाले म्हणून हर्षित होते. (प्रे. कृत्ये १३:५०–५२; १४:१९–२२; १६:२२–२५) त्यांनी व यहोवाच्या इतर सेवकांनी परिक्षा समयात काय केले यावर मनन करून आमच्या जीवनासाठी धडा घेऊ शकतो. ते आनंदी व निश्‍चयी का होते? कारण त्यांचा यहोवावर विश्‍वास व पूर्ण भरवसा होता, तो पुनरूथान करून त्यांना बक्षीस देईल यावर त्यांनी आत्मविश्‍वास राखला. (प्रकटीकरण २:१०) त्याच प्रमाणे यहोवाच्या नितीमान व्यवस्थीकरणावरील तुमचा विश्‍वास दृष्टीपथात ठेवा.—इब्रीकर १२:२ पडताळा.

आम्ही स्वतःवर करडी नजर ठेवावी कारण नकारार्थी विचारसरणी हल्ला करून आमच्या अंतःकरणात मूळ घेते. मग यहोवाच्या निकट स्वतःस ठेवणे व आम्ही निरूत्साही बनतो तेव्हा त्याच्या मदतीसाठी प्रार्थना करणे केवढ्या फायद्याचे आहे बरे! (स्तोत्रसंहिता ६२:८) उभारणीकारक मदत वडीलांच्या पासून प्राप्त करू शकतो. विनम्रपणा व आज्ञाधारक आत्मा वाढवा. (स्तोत्रसंहिता ११९:६९, ७०) हिताची व गाठण्यासारखी ध्येये जीवनात ठेवा. या सर्व सूचना आम्हाला निश्‍चयी मनोवृत्ती राखण्यात व “देवाची शांति” जी ‘आमची अंतःकरणे व मन राखील’ ती प्राप्त करण्यास मदत करतील.—फिलिप्पैकर ४:६, ७.

निश्‍चयी मनोवृत्ती राखणे नेहमीच सोपे नसते हे खरे आहे. तथापि मेहनती परिश्रमाने व दृढ विश्‍वासाच्या चालनेने अशा प्रकारची मनोवृत्ती जोपासली जाऊ शकते. यास्तव, आमची परिस्थीती कोणतीही असू द्या, आम्ही सर्व जण निश्‍चयी मनोवृत्ती राखण्याचा हिय्या बांधू या. याचा अर्थ आम्हासाठी कधीही नुकसान न होण्याऐवजी आता व भवितव्यात पुष्कळ आनंददायक बक्षिसाप्रत काम करणे होईल.

[२९ पानांवरील चित्रं]

निश्‍चयी मनोवृत्ती ठेवा, पुष्कळ आशिर्वाद आणि बक्षिसे तुम्हाला मिळतील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा