यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्यासाठी दृढनिश्चयी
“पूर्ण हृदयाने व हर्षित जिवाने त्याची सेवा कर; कारण यहोवा सर्वांची अंतःकरणे पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यास समजतात.”—१ इतिहास २८:९.
१. पहिले इतिहास २८:९ करवी कोणते प्रश्न उद्भवतात?
वर नमूद असणारे शास्त्रवचन अंतःकरणासंबंधाने काही प्रश्न उपस्थित करते. हे जर आमच्या मांसल अंतःकरणास उद्देशून आहे तर त्यात काही शारीरिक न्यूनता असली तर त्या माणसाला जिवंत तरी राहता येईल का? जसे की, अर्ध्या अंतःकरणाने किंवा हृदयाने कोणी जिवंत राहू शकेल का? आधुनिक हृदयविकार तज्ञांप्रमाणे यहोवा आमच्या मांसल हृदयाचे परीक्षण करून त्यातील बिघाड बघतो का? आमच्या विचारातील भावनांबाबत पाहता त्या अंतःकरणात असतात का? काही पवित्र शास्त्रीय संदर्भ तसे भासवतात, ते ‘अंत:करणातील विचारांच्या कल्पना’ विषयी बोलतात. (उत्पत्ती ६:५; १ इतिहास २९:१८) आमच्या विचारांचे परीक्षण करावे याकरता यहोवा आमच्या मांसल हृदयाचे पृथःकरण करून पाहतो का? तर मग, “त्याची पूर्ण अंतःकरणाने सेवा करणे” याचा खरोखरी काय अर्थ होतो?
२. प्राचीन मिसर, बाबेलोन आणि ॲरिस्टॉटल यांच्या तर्फे अंतःकरणाविषयी कोणते विश्वास राखण्यात आले?
२ अंतःकरण हे अक्कल व भावना यांचे आसन आहे असा प्राचीन मिसऱ्यांचा विश्वास होता. त्याला आपली स्वतःची इच्छा असते असेही ते मानीत. बाबेलोनी म्हणत की अंतःकरणात बुद्धी व प्रेम सामावलेले आहे. ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटलने शिकविले की हृदय इंद्रियांचे आसन व जीवाचे क्षेत्र आहे. तरीपण काळ गेला आणि ज्ञानवृद्ध झाली तसे हे सर्व दृष्टीकोण बाद झाले. सरतेशेवटी अंतःकरण आज जसे परिचित आहे त्या अर्थी ज्ञात झाले की ते शरीरभर रक्त खेळवणारा पंप आहे.
३. अंतःकरण हे कशामुळे इतके आश्चर्यावह वाटते?
३ होय, हृदय हे प्रामुख्याने एक पंप आहे पण तो किती अचंब्याचा आहे, तो आमच्या जीवनाच्या हर सेकंदाला तांबडा जीवनप्रवाह अगदी विश्वासूपणे खेळवीत राहतो! मुठीपेक्षा थोडा मोठा आकार असेलेले, एक पौंड पेक्षाही कमी वजन असलेले मानवी हृदय दर दिवशी १,००,००० वेळा ठोके देते, शरीराच्या ६०,००० मैल लांबीच्या रक्त वाहिन्यांच्या माध्यमातून दिवसाला २००० गॅलन्स तर दसपटीचे लाखो गॅलन्स रक्त उपसत व खेळवत राहते.a हृदयाचे ठोके हे त्याची गति बनविणाऱ्या पेशींच्या केंद्रीकरणामुळे ज्या विद्युत लहरी उत्पन्न होतात त्यामुळे उद्भवतात व त्या करवीच त्यांचे प्रमाणही निश्चित होते. हृदयाव्यतिरिक्त असा कोणताही स्नायु शरीरात नाही की जो त्यासारखा कष्टाळूपणे, दीर्घ व सातत्याने दशकामागून दशके काम करीत राहतो. मानसिक त्रासात किंवा उत्साही वातावरणात ते त्याचे काम पाचपटीने अधिक घडवते. आपल्या छातीतून हृदय बाहेर काढून पहा, ते त्यानंतरही काही काळ ठोके देत राहील. हृदयापासून काढलेल्या पेशींसुद्धा सुयोग्य वातावरणात हेच करीत राहतात. हृदयापेक्षा मेंदूला अधिक पोषकता व प्राणवायुची गरज असते.
४, ५. (अ) शास्त्रवचने अंतःकरणाला कोणती गुणवत्ता असल्याचे सांगतात? (ब) शास्त्रवचनांनुसार अंतःकरणात कोणत्या भावना व कल्पना वसतात?
४ देवाचे वचन अंतःकरणाबद्दल जवळ जवळ हजारो वेळा तरी बोलते. यापैकीचा थोडा संदर्भ खरोखरच्या हृदयास अनुलक्षून आहे. इतर थोडा संदर्भ एखाद्या गोष्टीचा केंद्रभाग जसे की “भर समुद्रात” आणि ‘पृथ्वीचे पोट’ यांना अनुलक्षून आहे. (यहेज्केल २७:२५–२७; मत्तय १२:४०) बाकीच्या इतर हजारो संदर्भात ते अंतःकरणाचा लाक्षणिक वापर दाखविते. किटेल यांचा थिऑलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट हा शब्दकोष “हृदय” या विषयाखाली अनेक शिर्षकामध्ये विविध शास्त्रवचने अवतरीत करतो जसे की: “अंतःकरणात भावना, कल्पना, इच्छा व वांच्छा राहतात.” “अंतःकरण हे समंजसपणाचे आसन, विचार व प्रतिबिंब यांचे उगमस्थान आहे.” “अंतःकरण हे इच्छेचे आसन व निश्चयाचा उगम आहे.” “अशाप्रकारे अंतःकरण हे मानवातील असे केंद्र आहे जेथे देव वळतो, येथेच धार्मिक जीवन मुळावते व त्याआधारे नैतिक वागणूक ठरविली जाते.”
५ या लाक्षणिक अंतःकरणात भावना व कल्पनांचे वास्तव्य असते. कित्यके शास्त्रवचनांच्या आधारे आपल्याला कळते की अंतःकरण आनंदी, उदास, काळवंडलेले, प्रज्वलित, निराश, विश्वसनीय, भोवळ आलेले, कठीण असू शकते. ते रागाने तप्त, भयाने गर्भगळीत, गर्विष्ठ व घमेंडखोर तसेच सौम्य व नम्रही असू शकते. त्याचप्रमाणे उत्कट प्रेम व्यक्त करणारे, क्रोधाने भरलेले, शुद्ध व स्वच्छ किंवा व्यभिचाराचा दोष असलेले असू शकते. ते वाईटाकडे झुकलेले आहे तरी आम्हास चांगले ते करण्यास उद्युक्त करू शकते.
दुटप्पी तसेच दुजाभाव असणाऱ्या अंतःकरणाचे असू नका
६, ७. (अ) स्तोत्रकर्त्याने कोणत्या प्रकारच्या लोकांचा द्वेष केला, आणि इस्राएल व यहुदातील कोणत्या कृतीने ही परिस्थिती स्पष्ट झाली? (ब) यहोवास दुटप्पी अंतःकरणाने केलेली सेवा ग्रहणीय वाटत नाही हे येशूने कसे चित्रित केले?
६ कार्यहालचालीसाठी संपूर्ण अंतःकरण असावयास हवे पण लाक्षणिक अंतःकरण हे विभाजित सुद्धा असू शकते. देवाच्या अंतःकरणाच्या पसंतीस उतरलेला माणूस स्तोत्रकर्ता याने प्रेरणेद्वारे हे लिहिले: “मी दुटप्पी मनुष्याचा द्वेष करतो.” (स्तोत्रसंहिता ११९:११३) काही इस्राएल लोक हे त्यापैकीचे होते ज्यांना एलीयाने आव्हान देऊन असे म्हटले: “तुम्ही दोहों मतांमध्ये कोठवर लटपटाल? यहोवा हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” (१ राजे १८:२१) दुटप्पी अंतःकरण राखून ते ‘दोन वेगवेगळ्या मतांमध्ये लटपटत राहिले.’
७ याचप्रमाणे यहुदा, यहोवाकडे अर्धवटपणे वळाल्यावर असे लिखित करण्यात आले: “तरी इस्राएल लोक अजूनही उच्च स्थानी यज्ञ करीतच असत; मात्र ते आपला देव यहोवा यालाच ते करीत.” (२ इतिहास ३३:१७) विभाजित अंतःकरण राखून ते यहोवाची सेवा करीत असल्याचा दावा करीत होते पण ती बेकायदेशीरपणे व पूर्वी त्यांनी जेथे बालाची भक्ति केली त्याच ठिकाणी ते ती सेवा करीत राहिले. येशूने म्हटले: “कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही.” (मत्तय ६:२४) त्या काळी दास ही मालमत्ता समजली जाई. त्यांना २४ तास आपल्या धन्याच्या बोलावण्याला प्रतिसाद देण्यास सिद्ध व्हावयाचे होते. त्यांचा वेळ दोन धन्यांमध्ये—अर्धा एकाला तर अर्धा दुसऱ्याला—विभागता येऊ शकत नव्हता. येशू हा मुद्दा स्पष्ट करीत होता: यहोवा देवाची सेवा दुटप्पी अंतःकरणाने करता येणार नाही!
८. लाक्षणिक अर्थी एका माणसाला दोन अंतःकरणे कशी असू शकतात व हे कोणत्या शास्त्रवचनांद्वारे दिसते?
८ प्रत्येकाच्या शरीरात केवळ एकच खरेखुरे हृदय आहे पण तेच लाक्षणिक अर्थी पाहता एखाद्या व्यक्तिला दोन अंतःकरणे असू शकतात. दावीदाने अशा लोकांना उल्लेखून हे म्हटले: “ते दुजाभाव असणाऱ्या अंतःकरणाने [दोन अंतःकरणाने, रेफरन्स बायबल, तळटीप] खुशामतीचे शब्द बोलतात.” (स्तोत्रसंहिता १२:२) यापैकी एक अंतःकरण जाहीर वक्तव्यासाठी तर दुसरे स्वार्थी फायद्यास्वत गुप्तरित्या प्रोत्साहन देणारे असते. अशाप्रकारे हे दुहेरी तोंडाचे, दुहेरी अंतःकरण शास्त्रवचनात या पद्धतीने वर्णिले आहे: “तो आपल्या अंतःकरणात घास मोजणाऱ्यासारखा आहे. तो तुला ‘खा, पी’ म्हणतो, पण त्याचे अंतःकरण तुजवर नाही.” “तो गोडगोड गोष्टी बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नको, कारण त्याच्या हृदयात सात विषें आहेत.”—नीतीसूत्रे २३:७; २६:२५; स्तोत्रसंहिता २८:३.
९. यिर्मया व येशूच्या काळी दुजाभावाच्या अंतःकरणाची उपासना होत होती हे कसे दिसते?
९ अशी ही मानवी नातेसंबंधातील दांभिकता खरीच शोचनीय आहे. हीच यहोवाच्या उपासनेत आचरल्यास त्यामुळे विपत्ती ओढावते. “‘हे यहोवाचे मंदिर, हे यहोवाचे मंदिर, हे यहोवाचे मंदिर” असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. पाहा, ज्या पासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनावर तुम्ही श्रद्धा ठेवता. हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बालाच्या मूर्तीस धूप दाखविता व ज्यास तुम्ही ओळखीत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता, आणि मग येऊन ज्या मंदिरास मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व ‘आमची मुक्ति झाली आहे’ म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करावयास आम्हास हरकत नाही, असे मनात म्हणता.” (यिर्मया ७:४, ८–१०) असा दुजाभाव राखणाऱ्या ढोंगी शास्त्री परूश्यांचा येशूने निषेध करून म्हटले: “अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला आहे की, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतःकरण मजपासून दूर आहे.’”—मत्तय १५:७, ८.
१०, ११. एखाद्या व्यक्तिचा न्याय करताना यहोवा व येशू कोठे पाहतात आणि का?
१० या सर्व गोष्टीवरून यहोवाने शमुवेलास असे का म्हटले ते स्पष्ट होते की, “मानवासारखे यहोवाचे पाहणे नसते, मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण यहोवा हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७) या कारणास्तव जेव्हा यहोवा मानवाला तोलून पाहतो तेव्हा ते वरपांगी व बाहेरून दिसणाऱ्या स्वरूपावर नसते, तो तर अगदी मुळापासून त्याचे परीक्षण करतो. आमची वागणूक चांगली आहे किंवा वाईट त्यामागील कार्यप्रवर्तक अंतःकरण हे असते असे ख्रिस्त येशूने दाखवून दिले. तो म्हणाला: “चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो; तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” तसेच, “अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात.”—लूक ६:४५; मत्तय १५:१९.
११ ख्रिस्त येशूला न्याय करण्याचे काम सोपून दिले आहे त्यामुळे तो सुद्धा यहोवा जेथे परीक्षण करतो तेथेच बघतो. “मी अंतर्याम [“अंतस्थ भावना,” रेफरन्स बायबल, तळटीप] व अंतःकरणे ह्यांची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईन.” (प्रकटीकरण २:२३) या कारणास्तव “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.”—नीतीसूत्रे ४:२३.
१२. यहोवाच्या सेवेत पूर्णहृदयी असण्यासाठी आमच्याकरवी प्रयत्नांची शिकस्त करण्याची का गरज आहे?
१२ यहोवाला आम्ही सादर करीत असलेली सेवा दुटप्पी नसावी व दुजाभाव राखणाऱ्या अंतःकरणाचीही नसावी तर ती पूर्ण हृदयाची असावी. या करता आमच्याकरवी प्रयत्नांची शिकस्त करण्याची हाक आहे. का बरे? कारण अंतःकरण हे फारच कपटी व फसवे आहे. आमच्या पतित देहास आकर्षित करणाऱ्या चुकीच्या गोष्टींच्या बाबतीत ते केवढा युक्तिबाज युक्तिवाद सांगते त्यामुळे चक्रावल्यासारखे होते. ते आम्हाला फसवून आमच्या नजरेपासून खरा हेतू लपवील तरी यहोवाला ते सारे कळतेच. यामुळेच तो आम्हाला ताकीद देतो: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रास्त आहे, त्याचा भेद कोणास कळतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी यहोवा हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखितो.”—यिर्मया १७:९, १०.
पूर्ण हृदय प्राप्त करणे
१३. येशूने त्याच्या काळातील काही धर्मियांबद्दल काय म्हटले आणि त्यांच्या तशा वागणूकीमुळे त्यांना काय परिणाम मिळाला?
१३ येशूने आपल्या काळातील धर्मियांविषयी म्हटले: “ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.” (मत्तय १३:१५) धार्मिक कल्पनाविषयीचा पूर्वग्रह त्यांनी आधीच ठरवून टाकल्यामुळे त्यांनी येशूच्या शिक्षणाच्या बाबतीत आपले डोळे व कान बंद केले व आपली अंतःकरणे कठीण केली. वाग्दंड धुडकावून त्यांनी योग्य कार्यप्रवण करणारे अंतःकरण प्राप्त करण्यात अपयश दाखविले: ‘जो वाग्दंड ऐकून घेतो तो अंतःकरण मिळवितो [“चांगला हेतु मिळवितो”, रेफरन्स बायबल, तळटीप].” (नीतीसूत्रे १५:३२) आपण देवाची भक्ति करीत आहोत असा त्यांचा दावा होता खरा पण लोकांनी पहावी या हेतूने ते त्यांची “धार्मिकता” आचरीत होते.—मत्तय ६:१, २, ५, १६.
१४. सत्य आम्हामध्ये खोलवर ज्या माध्यमाने शिरु शकते त्याची कोणती उदाहरणे दाखवता येतील?
१४ यहुदाचा राजा यहोशाफाट, ज्याने “आपले अंतःकरण खऱ्या देवाच्या भजनी लावले” त्याच्यासारखे असणे किती बरे आहे! (२ इतिहास १९:३) देवाच्या भजनी लागण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अंतःकरणपूर्वक प्रार्थना होय. जेव्हा दुःखित हन्नाने यहोवास कळकळून प्रार्थना केली तेव्हा ती “अंतःकरणातल्या अंतःकरणात बोलत होती,” आणि तिची प्रार्थना ऐकली गेली. ऐकून घेण्याची स्वेच्छा धरणे ही आणखी एक गरज आहे. येशूच्या आईने ऐकून घेतले: “त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक आपल्या अंतःकरणात ठेवल्या.” तिने “ह्या सर्व गोष्टींचे मनन” केले व ती येशूची विश्वासू शिष्या बनली. यहोवा प्रांजळ शोधकांना मदत देतो. देवभिरू लुदियाने पौलाचे ऐकले, “तिचे अंतःकरण यहोवाने प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.” तिचा बाप्तिस्मा झाला. (१ शमुवेल १:१२, १३; लूक २:१९, ५१; प्रे. कृत्ये १६:१४, १५) ते लाक्षणिक अंतःकरण—म्हणजे, संवेदना, भावना आणि चांगले हेतु—असते ज्यामुळे सत्य एखाद्या व्यक्तिमध्ये शिरून त्यात वास करू लागते.
१५. पूर्ण हृदयाची प्राप्ती करण्यासाठी आम्ही काय करण्याची तयारी ठेवावी?
१५ पूर्ण हृदयाच्या प्राप्तीस्तव आम्ही आम्हाठायी रूजविलेले पूर्वग्रह काढून टाकण्यासाठी आणि देवास खरे करण्यासाठी आम्हास प्रिय वाटणाऱ्या कल्पना वा तात्विक दृष्टीकोण जरी त्यागण्याची पाळी आली तरी त्याकरता भावनात्मक तयारी करण्याची जरूरी आहे. (रोमकर ३:४) आमची अंतःकरणे यहोवाची इच्छा व मार्ग यांना प्रतिसाद देणारी बनविण्याकरता आमच्यातील स्वार्थी हेतु पिळून टाकले पाहिजे. यहोवाने एकदा दगडी पाटयांवर आपले नियम लिहिले पण नंतर त्याने मानवी अंतःकरणांवर आपले लिखाण केले. प्रेषित पौलानेही अंतःकरणावर लिखाण केले. तुम्ही सुद्धा “दया व सत्य [ह्यांना] आपल्या हृत्पटलावर लिहून” ठेवू शकाल. —नीतीसूत्रे ३:३; इब्रीयांस १०:१६; २ करिंथकर ३:३.
१६. यहोवाकरता पूर्ण अंतःकरण राखण्यासाठी एखाद्याने जी पावले उचलण्यास हवीत त्यांचे विदारण कोणते प्रश्न करतात?
१६ यहोवाची तत्वे आणि नियम सुयोग्य रितीने लिहिली जावीत याकरता तुम्ही आपल्या अंतःकरणाचा पृष्ठभाग स्वच्छ करता का? इश्वरी सत्यास तेथे लिहिण्यासाठी जागा मिळावी याकरता आधीचे सर्व पूर्वग्रह तुम्ही पुसून टाकता का? यानंतर अभ्यास करणे, आपली मनोवृत्ती बदलणे, जुने व्यक्तित्व काढून टाकणे आणि देवाशी सदृश्य असणारे व्यक्तित्व परिधान करणे या गोष्टी तुम्ही सातत्याने करीत राहाल का? तुम्ही स्वतःच्या बाबतीत सत्याचे वचन नीट सांगणारे, लाज वाटण्यास कसलेही कारण नसणारे असे कामकरी होण्यासाठी आपली शिकस्त कराल का?—रोमकर १२:२; कलस्सैकर ३:९, १०; २ तिमथ्यी २:१५.
पूर्ण हृदयाचे जतन करणे
१७. दावीदाने आपला पुत्र शलमोन याला कोणता सल्ला दिला आणि हा सल्ला पाळून चालण्यात शलमोन का अपयशी झाला?
१७ दावीदाने शलमोनाला म्हटले: “हे माझ्या पुत्रा शलमोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि पूर्ण हृदयाने आणि हर्षित जिवाने त्याची सेवा कर; कारण यहोवा सर्वांची अंतःकरणे पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यास समजतात.” शलमोनाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात पूर्ण अंतःकरणाने यहोवाची सेवा करण्याने केली, पण काळ निघून गेला तसे त्याने त्याचे जतन केले नाही.: “शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले. त्याच बाप दावीद याचे अंतःकरण यहोवाकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे.”—१ इतिहास २८:९; १ राजे ११:४.
१८, १९. (अ) पूर्ण अंतःकरण राखण्यात तुम्हाला अपयशी करण्यासाठी सैतान कोणकोणते विविध मार्ग आजमावील? (ब) सैतानाचे ते युक्तिबाज प्रयत्न अपयशी ठरले तर त्याचा पवित्रा कसा बदलेल?
१८ शलमोन जेथे अपयशी ठरला त्याबाबतीत तुम्हाला यशस्वी होऊन दाखविता येईल का? यहोवाचे साक्षीदार या नात्याने स्वतःचे समर्पण केलेले आहे, आपल्या सेवाकार्यातील सर्व दुटप्पीपणा वा दुजाभाव यांचा त्याग केलेला आहे व शिवाय “यहोवा आपला देव यावर पूर्ण अंतःकरणाने प्रीती” करा या येशूच्या सूचनेचा अवलंब केलेला आहे तर आता आपले अंतःकरण यहोवाच्या सेवेत पूर्णपणे जडवून ठेवण्याचा तुमचा निर्धार आहे का? (मत्तय २२:३७) सैतानाला ते आवडणार नाही, तो खूपच दुष्ट प्रतिस्पर्धी आहे. त्याचे लक्ष नेहमी तुमच्या अंतःकरणावर असेल. अंतःकरणाची प्रवृत्ती पापाकडे झुकलेली असते हे त्याला ठाऊक आहे त्यामुळे तुम्ही दक्ष राहिला नाही तर तो किड्याप्रमाणे आपला मार्ग आक्रमून तुमच्या अंतःकरणात शिरेल. त्यानेच ‘येशूचा विश्वासघात करण्याचे यहुदा इस्कार्योतच्या अंतःकरणात भरविले’ नाही का? (योहान १३:२) पैसा, जडवाद, करमणूक, गर्व, प्रापंचिक ध्येये, दिखाऊपणा, शारीरिक इच्छा या गोष्टी आमची भेदनीय ठिकाणे आहे हे तो जाणतो व त्यामुळेच तो या लक्ष्यावर आपले अग्निबाण सोडतो. त्यांना विश्वासाच्या ढालीने सामना देऊन तुम्ही ते सर्व अग्निबाण विझवून टाकाल का?—इफिसकर ६:१६; १ योहान २:१५–१७.
१९ या सर्व सैतानी कुयुक्त्या अपयशी ठरल्या तरी तो माघार घेणारा नाही. तो चवताळलेल्या व गर्जणाऱ्या सिंहासारखा यहोवाच्या विश्वासू साक्षीदारांवर हिंसक जमाव, मार, तरुंगवास इतकेच काय पण मरण सुद्धा आणून त्यांना गिळण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीपण या सर्व प्रसंगातून यहोवा, ज्यांची अंतःकरणे त्याच्यासोबत पूर्ण जुळली आहेत अशांना निश्चये बळ पुरवील.—याकोब ४:७; १ पेत्र ५:८–१०; प्रकटीकरण २:१०.
२०, २१. (अ) खरोखरीच्या अंतःकरणाचे परीक्षण करण्यासाठी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? (ब) हेच प्रश्न लाक्षणिक अंतःकरणाच्या परीक्षणार्थ कसे लावून पाहता येतील?
२० खरोखरीच्या अंतःकरणाची वेळोवेळी तपासणी करणे बरे असते. त्याला योग्य मध्यंतराने पुरेश्या प्रमाणात चांगली पोषकता लाभते का? त्याचे ठोके नियमित व बळकट आहेत की मंद व दुबळे आहेत? त्याचा रक्तदाब व्यवस्थित आहे का? त्याला आवश्यक ती कसरत मिळते का? (सुदृढ असण्यासाठी हृदयाने आवेशाने रक्ताचे उत्सर्जन करणे आवश्यक आहे.) त्याची गतिमानता बदलत्या परिस्थितीसोबत जुळवून घेणारी आहे का? ते भावनात्मक वातावरणाच्या अधीन आहे का की ज्यामुळे त्याच्यावर प्रचंड भार पडतो?
२१ शारीरिक हृदयास तपासणीची गरज आहे तर ती लाक्षणिक हृदयासंबंधाने किती विशेषेरित्या असणार! यहोवा ते करतो, त्यामुळे आम्हीही करण्यास हवे. नियमित असा व्यक्तिगत अभ्यास व सभांची उपस्थिती याकरवी त्याला पुरेसे आध्यात्मिक अन्न मिळत आहे का? (स्तोत्रसंहिता १:१, २; नीतीसूत्रे १५:२८; इब्रीयांस १०:२४, २५) त्यातील सखोल भावना व विचार आपल्याला क्षेत्रकार्यात आवेशी सहभाग—वेळप्रसंगी आवेशपूर्ण सहाय्यक पायनियरींग करण्यासाठी प्रवृत्त करतात का? (यिर्मया २०:९; लूक १३:२४; १ करिंथकर ९:१६) त्याच्या सभोवतालच्या वातावरणाबद्दल काय? ते त्याच्यासारख्याच विचार व कार्यप्रवृत्तींनी एकाग्र व पूर्ण असणाऱ्या इतर अंतःकरणांनी वेढलेले आहे का?—२ राजे १०:१५, १६; स्तोत्रसंहिता ८६:११; नीतीसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३.
२२. यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्याच्या आमच्या निर्धारामधील यश कशावर निश्चित राहील?
२२ तपासणीच्या अनुषंगाने वरील सर्व प्रश्नांना तुमची उत्तरे होय, अशी असतील तर याचा अर्थ तुम्ही आपल्या लाक्षणिक अंतःकरणाचे रक्षण करीत आहात असा आहे. यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्याच्या तुमच्या निर्धारात तुम्ही इतर लाखो विश्वासू साक्षीदारांसमवेत यशस्वी व्हाल. अशा सर्वाना हे खात्रीलायक अभिवचन आहे: “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:७.
[तळटीपा]
a एक मैल=१.६ किलोमिटर
एक गॅलन=३.८ लिटर्स
तुम्हाला आठवते का?
◻ लाक्षणिक अंतःकरणाच्या कोणत्या गुणवत्ता आहेत?
◻ आम्ही दुटप्पी किंवा दुजाभाव राखणारे अंतःकरण कसे टाळू शकतो?
◻ न्याय करताना यहोवा व ख्रिस्त येशू अंतःकरण का बघतात?
आम्हाला पूर्ण अंतःकरण कसे प्राप्त करता व जतन करून ठेवता येईल?
[१० पानांवरील चित्रं]
तुम्हाला दोन चेहरे आहेत का?
[११ पानांवरील चित्रं]
लुदिया
यहोशाफाट
हन्ना
मरीया