वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ८/१ पृ. ४-७
  • पवित्रशास्त्र—तुम्हासाठी व्यवहारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पवित्रशास्त्र—तुम्हासाठी व्यवहारी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पवित्र शास्त्र व नैतिकता
  • पवित्रशास्त्र व अर्थव्यवस्था
  • पवित्र शास्त्र व आरोग्य
  • देवाचे वचन सत्य आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • आधुनिक जीवनासाठी उपयुक्‍त पुस्तक
    सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक
  • उपयुक्‍त ठरणारी उत्तरे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • धोकेदायक जगात सुरक्षिततेचा शोध
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ८/१ पृ. ४-७

पवित्रशास्त्र—तुम्हासाठी व्यवहारी

“हेमनुष्या, त्याने बरे काय ते तुला दाखविले आहे,” हे एका देवभिरू मनुष्याने २७०० वर्षाअगोदर लिहिले. (मीखा ६:८) परंतु ते खरोखरी आजच्या आधुनिक जगात व्यवहारी आहे का?

“पवित्र शास्त्र हे कोणासही आधुनिक मानसशास्त्र व मनोविकारच्या पद्धतीतील काहीही ज्ञात नव्हते तेवढया पूर्वी लिहिले गेले,” असे डॉ. चेसेन म्हणतात. “तसेच त्याच्या लेखकांची उद्दिष्टे चांगली होती, तरी हे महत्वाचे स्वरूप त्यांना लक्षात आणता आले नसते. तरीही ते नैतिक व/किंवा आज्ञा याच्या विषयावर येते तेव्हा पवित्र शास्त्र व त्याचे स्पष्टीकरणकर्त्यांना बरेच सांगावेसे वाटते.”

हा मुद्दा, पवित्र शास्त्र, मनुष्य विचारसरणीचे उत्पादन असे असते तर ग्राह्‍य ठरला असता. तथापि, आमच्या जून १९८७ च्या अंकात दाखविल्याप्रमाणे पवित्र शास्त्र मनुष्याचा नसून देवाचा शब्द आहे. ही महत्वपूर्ण बाब दूर्लक्षिली जाऊ शकत नाही. का? कारण मानवाप्रमाणे देवाच्या ज्ञानास काळ व परिस्थितीने रोखले जाऊ शकत नाही वा बदलविले जात नाही. मानवजातीचा निर्माणकर्ता म्हणून देवास आमची घडण संपूर्णपणे ज्ञात आहे व आमच्या भल्याचे काय ते माहीत आहे. यास्तव प्रेषित अगदी उचितपणे म्हणाला: “सर्व शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिले असून सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतीशिक्षण ह्‍याकरता उपयोगी आहेत. यासाठी की देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज व्हावा.”—२तिमथ्यी ३:१६, १७.

मग जो वाड़मयीन बदल आमच्या आधुनिक जगात घडला त्याजबाबत काय? आम्ही स्वतंत्र व अधिक तेजोमय जगात रहात आहोत असे वाटत नाही का? सर्वसाधारण समाजाने सांप्रदायीक पायबंदातील पुष्कळांचे उच्चाटन केले नाही का? होय, वाढते ज्ञान व नविन प्रज्वलीत “स्वातंत्र्या” व्यतिरिक्‍त मानवाची घडण व मुलभूत गरजा बदललेल्या नाहीत. अंतस्थपणे आम्ही अजूनही तेच आहोत. आम्हा सर्वांना आमच्या पूर्वजांनी केले तसे अजूनही खाणे पिणे, झोपणे, पैदास व भक्‍ती करणे याची इच्छा आहेच. आम्हास आताही प्रेम व स्नेह याची गरज आहेच व आम्ही आनंदी असू इच्छितो. आम्हास अजूनही अर्थभरीत जीवन कंठावेसे वाटते.

पवित्र शास्त्रीय तत्वे या गरजावर वाच्यता करतात. याहून अधिक, पवित्र शास्त्रीय शिकवण आजच्या आधुनिक जगात सुद्धा आमच्या कल्याणासाठी आहे. अधिकतेत म्हणजे पवित्र शास्त्र सूचना अनुसरण्याकडून जे सर्वश्रेष्ठ परिणाम प्राप्त होतात ते इतर कशाच्या सुद्धा अवलंबनाने होत नाहीत. ते नैतिक, आर्थिक आरोग्याबाबत कसे सत्य आहे त्याचे संक्षिप्तपणे परिक्षण करू या.

पवित्र शास्त्र व नैतिकता

आमच्या आधुनिक काळातील सर्वोच्च परिवर्तन नैतिक बाबीवरील दृष्टिकोण आहे. पुर्वी निषिद्ध मानलेल्या आचारसंहिता आता स्विकृत झाल्या आहेत. विवाह बंधनाऐवजी लेकरे प्रसविणे आता समाजाच्या धिक्काराचे बनले नाही. पुरूषगामी उघडपणे त्यांच्या “हक्काची” मोहीम काढतात. आज जगभरात घोंघावणारा दृष्टिकोण हा आहे की संमतीने असलेल्या युवकात काय घडते त्याविषयी तक्रार करण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा हक्क कोणासही नाही. पवित्र शास्त्रीय दर्जे व्हिक्टोरिया राणीच्या जमान्यामधील म्हणून धिक्कारले जातात.

परंतु, पवित्र शास्त्राचे दर्जे फार पूर्वी म्हणजे इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या राज्यकीर्दीपूर्वीच १९ शतकाआधी घातले आहेत व ते मानवजातीसाठी चांगले असे शाबीत झाले. ही गोष्ट एखाद्यास “नविन नैतिकपणा” च्या हातोहात घटस्फोटाच्या प्रमाणात, असंख्य गर्भपात, बालीकांच्या गर्भवतीची साथ आणि संसर्गित लैगिंक रोगांची भव्य मालिका याचा विचार करील तेव्हा दिसून येईल. ह्‍या खर्चिक, शारिरीक कमजोरपणा आणणाऱ्‍या व तसेच जीवघेण्या समस्या आहेत. तर मग पवित्र शास्त्राची, लैंगिक शुद्धता व वैवाहिक विश्‍वासूपणा याविषयीची सूचना अवलंबन करणे अधिक व्यवहारी नाही का?—नीतीसूत्रे ५:३–११, १५–२०; मलाखी २:१३–१६; इब्रीकर १३:४; १ करिंथकर ६:९, १०.

एका रोगासंबधी हे कसे सत्य आहे त्याबाबत द न्यूयॉर्क टाइम्स मधील अहवालात जे म्हटले आहे त्याची दखल घ्या: “‘एड्‌स हा जलदाईने धोका पत्करणाऱ्‍या गटात पसरत आहे पण त्याबाहेरील लोकात नाही.’ असे डॉ. डेव्हीड जे. सेन्सर जे न्यूयॉर्क शहराचे स्वास्थ्य आयुक्‍त आहेत ते म्हणाले . . . या धोक्याच्या गटात पुरूषगामी व संभोग देणारे पुरूष, नसातून औषध घेणारे, . . . रोगपिडीत लोकांनी दिलेल्याचे रक्‍त संक्रमण करून घेणारे किंवा लैगिंक भागिदारी किंवा एड्‌स असणाऱ्‍या कडून प्रसविलेली लेकरे आहेत.”

खरोखर, कोणती गोष्ट शहाणपणाची आहे—बहुदा काळजी व भयाने युक्‍त असणारी काही मिनिटांची मौजमजा, अगर शुद्ध विवेक व स्व–आदर? कोणती चिरकालीक सौख्य व समाधान आणविते—छोटीशी गाठभेट जी दारूण परिणाम आणण्याची शक्यता असते ती किंवा पवित्र शास्त्र सांगते त्या शुद्ध विवाहाच्या भक्कम आधारावरील वचन?

पवित्रशास्त्र व अर्थव्यवस्था

थोडके लोकच पवित्र शास्त्रात आर्थिक समस्यांचा पर्याय आहे म्हणून विचार करतात. तथापि त्यात लावून देण्यात आलेल्या दर्जांचे अनुकरण केल्यामुळे तुमच्या मेजावर अधिक अन्‍न अक्षरश: येऊ शकते. हे कसे काय?

बहुदा, कोणी व्यक्‍ति पैसा मिळविते तेवढी अनावश्‍यकपणे उधळते. पवित्र शास्त्र सूचनेस बिलगून राहणे हे हा पैसा उपयुक्‍त गोष्टीच्या खर्चासाठी शिल्लक ठेवील. उदाहरणार्थ, दारिद्‌य्राकडे निरविणारी सवय बहुदा अति मद्य प्राशन आहे. करोडो लोक हातात मजुरी घेऊन बार किंवा दारूच्या दुकानाकडे धावतात. पुष्कळ प्रकरणात उधारी भागविणे किंवा त्यांच्या परिवारास पुरेसे अन्‍न पुरविण्यासाठी पुरेसा पैसा ठेवीत नाहीत. काही वेळेस जीवनावश्‍यक गोष्टी प्राप्तीकरता पैसे कर्जाऊ घ्यावे लागतात. सुज्ञपणे पवित्र शास्त्र अति मद्यपानास धिक्कारते त्याऐवजी ते प्रमाणबद्धता राखावयास सांगते.—नीतीसूत्रे २३:२०, २१, २९, ३०; १ तिमथ्यी ३:२, ३, ८.

हेच ज्यांना धुम्रपानाची अगर मादक औषधांचा दुरूपयोग करण्याची सवय जडलेली आहे त्यांबाबत सत्य आहे. या सवया केवढ्या महाग आहेत! सोडण्यास केवढ्या अवघड आहेत! मनोविकार तज्ञ जॉईस ब्रदर्स यांना लिहिलेले व न्युयॉर्क टाईम्स पोस्ट मध्ये प्रसिद्ध झालेले हे पत्र केवढे वैशिष्टयपूणे आहे ते बघा: “मी कोकाईनचा उपयोग, एक मौजमजेची गोष्ट व बहुदा माझे सर्वच मित्र सप्ताहाच्या समाप्तीस ती ओढीत म्हणून सुरूवात केली. खरेतर माझ्या जीवनातील उत्तम ते त्याने हिरावून घेतले व ती सवय सोडणे मला फारच त्रासाचे झाले. मी दोन मुलांची माता असून मी लवकरच ती सवय सोडली नाही तर त्यांना त्रास होईल यामुळे मला शहारल्यासारखे होते. मी दिवसात दोनदा कोकाईन घेते. मी अति कर्जबाजारी झाले, मी कष्टी आहे.”

मादक औषधाचा उपयोग करणाऱ्‍या आणखी एका स्त्रीने लिहिले: “मी व माझा पती आम्ही दोघे यशवंत झालेल्या व्यक्‍ति आहोत तरी पण गेली तीन वर्षे कोकाईनच्या सवयीत आहोत. सुरूवातीस ते फारच बरे वाटत होते पण आता गंभीरतेचे होऊन बसले आहे. वास्तविक ते आमच्या जीवापाड होत चालले आहे. खरे पहाता आम्ही आता कर्जबाजारी आहोत कारण आमच्या सवयीची किंमत आमची मिळकत आहे. आम्हा दोघांना याबाबत अति वाईट अनुभव आला. काही दिवस अभास कधी थांबलेच नाहीत.”

धुम्रपान करणाऱ्‍यांनाही त्यांच्या सवयीमुळे इतक्या प्रमाणात नसेल तरी आर्थिक घाटा सोसावा लागतो. अलिकडे मॉडर्न ऑफीस टेक्नोलॉजी मासीकातील अहवाल म्हणतो: “धुम्रपान न करणारे जे नोकरी शोधतात त्यांना धुम्रपान करणाऱ्‍यापेक्षा जरी ते समान पदवीधर असले तरी लवकर नोकरी मिळते हे नुकत्याच राष्ट्रीय स्थरावर घेतलेल्या पाहणीत आढळून आले. हा अभ्यासक्रम अमेरिकेतील भव्य कंपनीच्या उपाध्यक्ष व खाजगी सल्लागारांच्या मुलाखतीला अनुसरून आहे. . . . आजचे कंपनी मालक धुम्रपान न करणाऱ्‍यांना नोकरी देण्याचे पसंत करतात, हे उघड केले आहे.” का? कारण एका महासभेच्या अभ्यासाने दाखविल्याप्रमाणे, धुम्रपान राष्ट्राचे आरोग्य खात्याचा खर्च वाढविते, ज्यात औषधांचे अंदाजपत्रक व उत्पादन क्षमतेची घट समाविष्ट आहे, सुमारे ६५ दस लक्ष कोटी डॉलर दर वर्षी—हे प्रत्येक विकल्या जाणाऱ्‍या सिगारेट पॅकेटला २.१७ डॉलर समान आहे!

होय, केवळ पवित्र शास्त्राचा सल्ला अनुसरल्याने लोकांना मदत केली जाते: “आत्म्यास व शरीरास अशुद्ध करणाऱ्‍या प्रत्येक गोष्टीपासून स्वतःस शुद्ध करा” (२ करिंथ ७:१) हेच जे कोणत्याही प्रकारच्या जुगारापासून दूर राहण्याचा पवित्र शास्त्रीय तत्वाचे अनुकरण करतात त्यांच्याबाबत सत्य आहे. (यशया ६५:११, १२; लूक १२:१५) यासोबत जे पवित्र शास्त्रीय तत्वास बिलगून राहतात ते त्यांच्या प्रामाणिक, सचोटी, व उद्योगीपणाबद्दल मालकाकडून अतिप्रशंसेस पात्र होतात व ते स्विकारण्यास प्रथमचे व धिक्कारण्यास शेवटचे बनतात.—कलस्सै ३:२२, २३; इफिसकर ४:२८.

पवित्र शास्त्र व आरोग्य

आम्ही सध्या वैद्यकिय क्षेत्रात पुढारलेले असल्यामुळे पवित्र शास्त्राच्या सूचना नाकारता येतील का? बरेतर, पवित्र शास्त्र हे लोकभ्रम वाढला होता व आधुनिक वैद्यकिय बाबतीत किंवा जंतु व संसर्गिक आजाराबाबत काहीही ज्ञात नव्हते तेव्हा लिहिले असले तरी आरोग्य व औषधे यांच्या बाबत केवढे अचूक व अद्यावत आहे त्याजविषयी संशोधक अचंबीत झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

आधुनिक वैद्यकीय विज्ञान अस्तित्वात आहे तरी आरोग्य समस्या वाढतच आहेत. तथापि, पवित्र शास्त्रीय सूचना आरोग्यात उत्तम सुधारणा करतात. या अगोदरच उल्लेखल्याप्रमाणे पवित्र शास्त्रीय तत्वे पाळण्याने आम्हास आमच्या आरोग्यास नुकसान करणाऱ्‍या सवयापासून संरक्षण पुरविले जाते. त्या आमचे मानसिक बल सुधारण्यात काम करतात. पवित्र शास्त्र मनोवृत्ती व भावनांचा शरीर प्रकृतीवर केवढा परिणाम होतो ते दाखविते. (नीतीसूत्रे १४:३०) यास्तव ते आम्हास मनोवृत्ती व भावनाने नुकसान पोहंचविण्यापासून दूर राखण्यास मार्गदर्शित करते, व ते निश्‍चयी उभारणीकारक गुणवत्ता याच्याद्वारे त्याची भरपाई करण्यास आम्हास मदत करते.

इफिसकर ४:३१, ३२ मध्ये दिलेली सूचना लक्षात घ्या: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत; आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; एकमेकांना क्षमा करा.” होय पवित्र शास्त्र नाशकारक, घातक व्यक्‍तिमत्वापासून नवीन पोषक ख्रिस्ती व्यक्‍तिमत्वातील बदलावर जोर देते. (इफिसकर ४:२०–२४; कलस्सैकर ३:५–१४) ते देवाच्या आत्म्याची फलप्राप्ती दर्शविण्यास आम्हास मदत करते: “प्रीती, आनंद, शांती, सहनशिलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन.” (गलतीकर ५:२२, २३) पवित्र शास्त्र मन व अंत:करण भरविले जाऊ शकते असे व शांतीत असण्यास पोषक अन्‍न देते.—नीतीसूत्रे ३:७, ८; ४:२०–२२; फिलिप्पैकर ४:६–८.

याहून अधिक, पवित्र शास्त्र नियमांना कवटाळून असणारे, गुन्हे, दंगे, उठाव अगर शारिरीक हानी पुरविणाऱ्‍या इतर गोष्टीत सामील होत नाहीत. त्यांना चांगला विवेक, जो भव्यपणे आनंदी स्थीती व शारिरीक सुदृढता राखण्यास हातभार लावते तो मिळतो. (१ पेत्र ३:१६–१८) यापेक्षा अधिक, पवित्रशास्त्रीय सूचना पाळतात ते उबदार आनंदी कौटुंबिक जीवन, इतरासोबत शांतीदायी नातेसंबंधाचा आनंद लुटतात.

होय, पवित्र शास्त्र आमच्या दिवसासाठी व्यवहारी आहे. जे त्याची तत्वे खरोखरी अनुसरतात त्या लाखोंच्या हे जीवनात सुस्पष्ट आहे. ते तुम्हास मदत करू शकते! तुम्हास त्याची शिकवणूक तुमच्या जीवनात अनुभवण्यास आमंत्रीत केले जात आहे. यहोवाचे साक्षीदार ते कसे हे दाखविण्यात आनंदी असणार.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा