वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ८/१ पृ. १४-१५
  • पुष्कळ शोमरोनी विश्‍वास धरतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पुष्कळ शोमरोनी विश्‍वास धरतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • एका शोमरोनी स्त्रीला शिकवणे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • विहिरीवर आलेली स्त्री
    बायबलमधून शिकू या!
  • एका शोमरोनी स्त्रीस शिक्षण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • कापणीच्या कार्यात तत्पर राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ८/१ पृ. १४-१५

येशूचे जीवन व उपाध्यपण

पुष्कळ शोमरोनी विश्‍वास धरतात

सुखार या शहरातून अन्‍न घेऊन परतल्यावर, शिष्य याकोबाच्या विहीरीनजिक म्हणजे जेथे त्यांनी येशूला सोडले होते तेथे त्याला पाहतात. पण तो आता एका शोमरोनी स्त्रीशी बोलत आहे. शिष्य तेथे येतात तेव्हा ती आपली आपली घागर तेथेच सोडून जाते.

येशूने सांगितलेल्या गोष्टीसंबंधी ती आस्थेने लोकांना सांगते: “चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पहा.” अशामार्गाने जिज्ञासा जागृत करून ती म्हणते: “तोच ख्रिस्त असेल काय?” हा प्रश्‍नच त्याचा उद्देश पूर्ण करतो—ते लोक स्वतः त्याला पाहावयास विहीरीजवळ येतात.

मध्यंतरी, शिष्य शहरातून आणलेले अन्‍न खावयाची येशूला विनंती करतात. पण येशू उत्तर देतो: “तुम्हास ठाऊक नाही असे अन्‍न माझ्याजवळ आहे.”

“त्याला कोणी खावयास आणले असेल काय?” असे शिष्य एकमेकास म्हणू लागतात. तेव्हा येशू स्पष्टता करतो: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धिस न्यावे हेच माझे अन्‍न आहे. अजून चार महिन्यांचा अवकाश आहे. मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही?” पण येथे येशू आध्यात्मिक कापणी संबंधीचा निर्देश करुन म्हणतो: “कापणारा मजुरी मिळवीत आहे व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करीत आहे.”

शोमरोनी स्त्रीच्या साक्षीचा भव्य परिणाम येशूला पाहावयास मिळतो—आणि तो म्हणजे तिने दिलेल्या साक्षीवर पुष्कळांनी विश्‍वास ठेवला होता. सुखारचे लोक त्याच्याकडे विहीरीजवळ येतात व त्यांच्याकडे आणखी काही दिवस राहुन अधिक शिक्षण देण्याची विनंती करतात. येशू त्यांचे आमंत्रण स्विकारतो व आणखी दोन दिवस तेथे राहतो.

येशूचे ऐकून पुष्कळ शोमरोनी त्याच्यावर विश्‍वास धरतात. ते त्या स्त्रीला म्हणतात: “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्‍वास धरितो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे.” खरोखर शोमरोनी स्त्रीने आम्हापुढे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे की जेणेकरुन आम्ही देखिल इतरांना ख्रिस्ताविषयीची साक्ष देऊन त्यांची जिज्ञासा अशी जागृत करु की ऐकणारा याचा अधिक शोध घेईल!

आपण पाहिले की कापणीला अजून चार महिने अवकाश आहे असे म्हटले गेले होते. वस्तुत: ही कापणी सातूची आहे जी पॅलेस्टाईन येथे वसंतऋतूमध्ये म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये येते. याचा अर्थ हा की इ. स. ३० च्या वल्हांडण सणानंतर येशू व त्याचे शिष्य आठ महिने तेथे, यहुदीयात शिक्षण व बाप्तिस्मा देत होते. आता ते आपल्या घरच्या परिसराकडे म्हणजे गालीलकडे जातात. तेथे त्यांच्यासाठी काय वाट पाहून होते? योहान ४:२७–४२.

◆ शोमरोनी स्त्री कोणती साक्ष देते आणि कोणत्या परिणामाद्वारे?

◆ कापणीच्या अनुषंगाने येशूचे अन्‍न कोणते आहे?

◆ इ. स. ३० च्या वल्हांडणानंतर येशूने यहुदीयात किती काळ कार्य केले हे आम्हास कसे ठरविता येते?

[१५ पानांवरील चित्र]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा