वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ४/१ पृ. १०-१५
  • स्वतःला ‘निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत’ राखा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वतःला ‘निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत’ राखा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या लोकांसंबंधाने पवित्रता अपेक्षित आहे
  • “निष्कलंक व निर्दोष”
  • “शांतीत” असण्यासाठी कशाची जरुरी आहे?
  • यहोवाच्या मदतीवर विसंबून रहा
  • “निष्कलंक, निर्दोष व शांतीत” टिकून रहा
  • तुमची ‘वाट पाहत राहण्याची’ वृत्ती आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुम्ही कशा प्राकारचे लोक असावे बरे?
    आमची राज्य सेवा—१९९५
  • देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ति करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • ‘तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ४/१ पृ. १०-१५

स्वतःला ‘निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत’ राखा

“तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.”—२ पेत्र ३:१४.

१, २. पवित्रता म्हणजे काय?

यहोवा देव पवित्र आहे. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याने अगदी भाविकरित्या त्याला “पवित्र पित्या” असे संबोधिले. (योहान १७:१, ११) शिवाय स्वर्गातील आत्मिक प्राणी असे म्हणत असल्याचे सांगितले आहे: “पवित्र, पवित्र, पवित्र सेनाधीश यहोवा!” (यशया ६:३) पण पवित्रता म्हणजे काय?

२ “पवित्र” व “पवित्रता” या संज्ञा अशा इब्री शब्दापासून भाषांतरीत आहेत ज्याचा बहुधा मूळ अर्थ “तेजस्वी असणे,” शारीरिकदृष्ट्या “नवे किंवा ताजे, डागविरहीत वा स्वच्छ असणे” असा आहे. तथापि, शास्त्रवचनांमध्ये या शब्दांचा वापर प्रामुख्यत्वे नैतिक वा आध्यात्मिक अर्थाने केला गेला आहे. मूळचा इब्री शब्द वेगळेपणा, सर्वांगपूर्ण, किंवा पवित्र देव यहोवा याची पावित्र्यता अशाही विचाराचा अर्थ सुचवितो. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात सुध्दा वापरण्यात आलेले “पवित्र” व “पवित्रता” हे शब्द देवासाठी वेगळे करण्यात आलेले या अर्थाची माहिती देतात. शिवाय त्यांचा वापर पवित्रता या यहोवा देवाच्या गुणवत्तेस अनुलक्षून तसेच कोणा विशिष्ठाच्या व्यक्‍तिगत वागणूकीतील शुध्दता वा पूर्णता यालाही अनुसरुन आहे.

यहोवाच्या लोकांसंबंधाने पवित्रता अपेक्षित आहे

३. यहोवा शुध्द उपासनेची अपेक्षा का बाळगून आहे?

३ तर मग, “पवित्र, पवित्र, पवित्र . . . सर्वसमर्थ यहोवा देव” या स्वर्गीय घोषणेचा काय अर्थ होत होता? (प्रकटीकरण ४:८) ती देवाची पवित्रता, शुध्दता केवढ्या सर्वश्रेष्ठतेची आहे याचीच माहिती देत होती. यासाठीच “परमपवित्र” यहोवा देवाला शुध्द उपासना दिली गेली पाहिजे. (नीतीसूत्रे ९:१०) त्यामुळेच यहोवा देवाने मोशेला इस्त्राएलांना हे सांगण्याची आज्ञा दिली होती: “तुम्ही पवित्र असावे, कारण मी यहोवा तुमचा देव पवित्र आहे.”—लेवीय १९:१, २.

४. यहोवा देवाची स्विकारण्यास योग्य अशा पध्दतीने केवळ कशी उपासना करता येऊ शकते?

४ मी यहोवाची सेवा स्वीकारण्यास योग्य अशा पध्दतीने करीत आहे असा कोणाचा दावा असेल पण तोच वस्तुतः अशुध्दता आचरीत असेल तर तो देवाच्या दृष्टीने घृणित ठरतो कारण केवळ इश्‍वरी सूज्ञान व पवित्रता याच मार्गाकरवी त्याची स्वीकृत प्रकाराने उपासना होणे शक्य आहे. (नीतीसूत्रे २०:२५; २१:२७) याकारणास्तव देवाने आपल्या बंदिवान लोकांना बाबेलोनातून यरुशलेमात परतण्याचा मार्ग मोकळा करीन असे भाकित केले तेव्हा त्याने म्हटले: “त्याला पवित्र मार्ग म्हणतील, त्याने अपवित्र जन जाणार नाहीत.” (यशया ३५:८) इ. स. पूर्व ५३७ मध्ये जे अवशिष्ट लोक परतले ते पवित्र हेतूने, “परमपवित्र” देवाच्या खऱ्‍या भक्‍तिची पुनर्स्थापना करण्याच्या हेतूने परतले. देवाशी आज्ञांकित राहण्यामुळे इस्त्राएलांना पवित्र असे सिध्द करुन दाखविता आले असते. पण त्यांनी स्वतःला त्याच्या दृष्टीने पवित्र व निष्कलंक ठेवण्यात अपात्र असल्याचे दाखविले.—पडताळा याकोब १:२७.

५. आध्यात्मिक इस्त्राएलांनी देवाची उपासना पवित्रतेने केली पाहिजे हे पौलाने कसे दाखवून दिले?

५ आध्यात्मिक इस्त्राएल किंवा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी सुध्दा यहोवाची भक्‍ती पवित्रतेने करण्यास हवी. (गलतीकर ६:१६) याच्याच अनुषंगाने प्रेषित पौलाने आपल्या समविश्‍वासूंना “आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी” असे आर्जविले. हे करण्यासाठी विश्‍वास राखणाऱ्‍यांनी आपण इश्‍वरी इच्छेनुरुपचे मार्गाक्रमण करीत आहोत याची खात्री करण्यास हवी होती, कारण यासाठीच पौलाने पुढे म्हटले: “ह्‍या युगाबरोबर समरुप होऊ नका. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही समजून घ्यावे.”—रोमकर १२:१, २.

६. सर्व ख्रिश्‍चनांनी कशाबद्दल दक्ष असण्यास हवे?

६ सध्याच्या वाढीच्या काळात यहोवाच्या संस्थेकडे पुष्कळ नवे लोक झुंडीने येत आहेत. तेही यहोवाची पवित्रतेने भक्‍ति करीत आहेत. “मोठे संकट” यातून बचावण्याच्या आणि देवाच्या नीतीमान नव्या व्यवस्थेमध्ये नंदनवनमय पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचा आनंद उपभोगण्याच्या भवितव्याबद्दल त्यांना केवढा आनंद वाटतो बरे! (मत्तय २४:२१; लूक २३:४३) तथापि स्वर्गीय आशा असणाऱ्‍यांना तसेच पृथ्वीवरील भवितव्य असणाऱ्‍यांना सदाकालीन जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे तर त्यांनी अशुध्द सवया किंवा ज्या गोष्टी शास्त्रवचनीय नैतिकता आणि शिक्षण यांच्या विरुध्द आहेत त्याबद्दल दक्ष राहण्याची गरज आहे.—प्रकटीकरण ७:९, १४.

७. पेत्राने असे काय म्हटले की जे “पवित्र वर्तणूकीत” उदाहरणशील असण्याची गरज ठळकपणे मांडते?

७ आपल्या सध्याच्या काळाकडे निर्देश करुन प्रेषित पेत्राने लिहिले: “चोर येतो तसा यहोवाचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश [जागतिक सरकारे] मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्वे [जगातील प्रवृत्त्या व मार्ग] तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी [देवापासून विभक्‍त असलेला मानवी समाज] व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.” या “गोष्टी”, “आकाश” व “सृष्टितत्वे” यांच्याप्रमाणेच यहोवाच्या दिवसाच्या नाशकारक “अग्नी”मध्ये भस्म होतील. या कारणास्तव पेत्राने पुढे म्हटले: “तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणूकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्वे तप्त होऊन वितळतील.” होय, यहोवाच्या सर्व साक्षीदारांनी “पवित्र वर्तणूकीत” उदाहरणशील असले पाहिजे. जे पवित्रता राखतात केवळ तेच देवाच्या नीतीमान ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ यात सुरक्षित स्थानप्राप्तीची आशा बाळगू शकतात. (२ पेत्र ३:७, १०–१३) हे केवढे आशीर्वादित भवितव्य!

८. पवित्रतेच्या मार्गाक्रमणापासून एखादा ख्रिश्‍चन ढळला असल्यास त्याने काय करण्याची गरज आहे?

८ पण समजा, एखाद्या ख्रिश्‍चनाने यहोवाच्या सेवेत काही काळ चांगले ते केले पण नंतर घाणेरड्या सवया जोपासल्या वा पवित्र शास्त्रीय तत्वे वा नैतिकता यांच्याविरुध्द गेला, तर काय? याचा अर्थ हा होतो की तो पवित्रतेच्या मार्गाक्रमणापासून ढळला आहे व आता त्याने खरा पश्‍चाताप व्यक्‍त करुन योग्य अशी सुधारणूकीची पावले उचलण्यास हवी. पौलाने आपल्या अभिषिक्‍त सहकाऱ्‍यांना हे सांगितलेच होते: “प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुध्दतेपासून आपण स्वत:ला शुध्द करू आणि देवाचे भय बाळगून आपण पूर्णपणे पवित्र होऊ.” (२ करिंथकर ७:१) ज्या ख्रिश्‍चनाला आपले दुराचारी मार्गाक्रमण सुधारण्याची गरज दिसते त्याला प्रेमळ देखरेख्यांकरवीची शास्त्रवचनीय सूचना आशीर्वाद अशीच दिसून येईल.—नीतीसूत्रे २८:१३; याकोब ५:१३–२०.

९. दुसरे पेत्र ३:१४ च्या अनुषंगाने कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

९ धार्मिक अशा नव्या व्यवस्थेचा उल्लेख केल्यावर पेत्राने पुढे म्हटले: “प्रियजनहो, ह्‍या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले [यहोवा देवाला] आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.” (२ पेत्र ३:१४) हे शब्द अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना उद्देशून लिहिण्यात आले होते तरीपण यहोवाच्या सर्व साक्षीदारांनी ‘निष्कलंक, निर्दोष व शांतीत असलेले’ आढळले पाहिजे. तर मग आम्ही काय करण्यास हवे?

“निष्कलंक व निर्दोष”

१०. “मोठा लोकसमुदाय” गटाच्या लोकांनी आपले “झगे” येशूच्या रक्‍तात कसे शुभ्र केले आहेत?

१० “निष्कलंक व निर्दोष” राहण्यासाठी आम्ही आपल्यापरिने होईल तितके केले पाहिजे. “मोठा लोकसमुदाय” गटातील लोकांनी “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.” एकेकाळी ते या पापीष्ठ जगाचे भाग होते, त्यामुळे त्यांची ओळखरुपी वस्त्रे त्याच्याबरोबर डागली गेली होती व ती यहोवाच्या दृष्टीने मळकट झाली होती. पण मग यांनी येशू ख्रिस्त या “कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन” ती कशी शुभ्र केली? “रक्‍त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही” या तसेच येशू हा “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” आहे या गोष्टीवर आपला विश्‍वास प्रदर्शित करुन. (प्रकटीकरण ७:९, १४; इब्रीयांस ९:२२; योहान १:२९, ३६) हे त्यांनी देवास बिनशर्तीचे समर्पण करुन व पाण्यात पूर्णतयः बुडवून बाप्तिस्मा घेऊन प्रदर्शित केले. हे समर्पण येशू ख्रिस्ताद्वारे करणे व त्याच्या ओतलेल्या रक्‍तामुळेच देव आपल्या पापाची क्षमा करुन त्याच्यापुढे त्यांना ग्रहणीय करतो असा विश्‍वास ठेवणे जरुरीचे आहे.

११. पाप हे यहोवाबरोबरील आमच्या शांतीचा भंग करीत असल्यामुळे आम्ही कोणत्या स्थितीत असण्याची गरज आहे?

११ आपले “झगे” जागतिक आचारविचारांनी डागले जाऊ नये व त्याकरवी ख्रिस्ती व्यक्‍तित्व आणि यहोवाचे मान्यताप्राप्त साक्षीदार ही आपली ओळख हरपली जाऊ नये याकरता “मोठा लोकसमुदाय” याने ते शुभ्र ठेवले पाहिजेत. खरे म्हणजे, जागतिक मार्ग, हालचाल व प्रवृत्त्या यापासून सर्वच खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी स्वतःला दूर राखले पाहिजे. पाप यहोवाबरोबरील आमच्या शांतीचा भंग करीत असल्यामुळे, जेथे आमच्या पापांचे क्षालन होऊ शकेल अशा स्थितीमध्ये आपल्याला ठेवल्यामुळेच येणाऱ्‍या ‘यहोवाच्या [मोठ्या] दिवशी’ त्याच्याबरोबर शांतीत असल्याचे आढळून येईल. आम्हावर खोट्या धर्मप्रथा वा या जगाची अनैतिकता याचे कसेलही डाग दिसता कामा नये.

१२. पेत्राचे दुसरे पत्र ३:१३ चा अवलंब ख्रिस्ती मंडळीतही कसा होऊ शकतो?

१२ निष्कलंक व निर्दोष राहण्यामध्ये आम्ही स्वतःला ‘खोट्या शिक्षकां’ची वागणूक व आचारविचार यापासून विरुध्द दिशेला ठेवण्यास हवे. त्या खोट्या शिक्षकांविषयी पेत्राने लिहिले: “दिवसाढवळ्‌या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात, ते डाग व कलंक आहेत. तुम्हाबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते.” (२ पेत्र २:१, १३) होय, ख्रिस्ती मंडळीत देखील ‘दिवसाढवळ्‌या चैनबाजी करण्यात . . . सुख मानणाऱ्‍या’ खोट्या शिक्षकांविषयी आम्ही दक्षता राखली पाहिजे. दिवसाचा प्रहर जेथे की इतरांच्या आध्यात्मिक फायद्याकरता पुष्कळ काही करता येण्याजोगे असते त्यावेळी हे अनाध्यात्मिक लोक वाईट गोष्टी, मौजमजा आणि हावरेपणाने अन्‍नसेवन व मद्य प्राशन करण्यात गुंतलेले असतात. लग्नविधिच्या सामाजिक स्वागतसमारंभाच्या प्रसंगास हेच लोक वासना प्रदीप्त करणारे संगीत वाजविण्यात, कामुकतेची नृत्ये करण्यात, खादाडासारखे खात बसण्यात व मद्यार्क असणारी पेये पीत बसण्यात वळण देतात. अशा प्रकारची कोणतीही गोष्ट यहोवाच्या लोकांमध्ये घडण्याचा वाव देऊ नये.—यशया ५:११, १२; तसेच पहा दी वॉचटावर, एप्रिल १५, १९८४, पृष्ठे १६–२२.

१३. सामाजिक मेळावा आध्यात्मिक दृष्ट्या उभारणीकाराक ठरावा याकरता यजमान काय करु शकतात?

१३ सामाजिक मेळाव्यात जे काही घडते त्याला त्याचे संयोजक जबाबदार असतात. असा हा प्रसंग आध्यात्मिकदृष्ट्या उभारणीकारक ठरावा याकरता त्यात सहभागी असणाऱ्‍यांची संख्या प्रमाणित असावी आणि जे अहितकारी प्रभाव पाडतात अशांना निमंत्रित करुच नये हे बरे. प्रेषित पौलाचे २ तिमथ्यी २:२०–२२ मध्ये आढळणारे शब्द सुचवितात की मंडळीसोबत संलग्न असणारे सर्वच सदस्य इष्टमित्रासारखे असतातच असे काही नाही. याकारणास्तव ज्याच्या तोंडी फार वाचाळता आहे किंवा जो खाण्यापिण्यात अतिरेक करतो अशी ज्याबद्दलची माहिती आहे अशा कोणाला निमंत्रित करण्याचे बंधन स्वतःवर असल्याचे ख्रिस्ती यजमानाने वाटू देऊ नये. त्याला हे चांगले आठवणीत असते की, ‘आपण खातो, पितो किंवा जे काही करतो ते सर्व देवाच्या गौरवासाठी केले पाहिजे.’—१ करिंथकर १०:३१.

१४. खोट्या शिक्षकांच्या बाबतीत कोणती भूमिका धारण केली पाहिजे?

१४ आम्हासोबत सहवास राखणाऱ्‍यांपैकी ‘डाग व कलंक असणारे तसेच कपटाने वागणारे व मौजमजा करणारे’ थोडकेच असतात. तरीपण देखरेखे व मंडळीतील इतर सर्वांनी जागृत राहिले पाहिजे व आणि मंडळीत घुसून अनैतिकता आणि चुकीच्या शिक्षणाला वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या खोट्या शिक्षकांचा दृढपणे धिक्कार केला पाहिजे. (यहुदा ३, ४)देवाच्या नीतीमान दर्जांना दृढपणे धरुन राहिल्यामुळे मंडळी निष्कलंक व निर्दोष राखता येईल.

“शांतीत” असण्यासाठी कशाची जरुरी आहे?

१५. (अ) एखाद्याला देवासोबत शांती कशी मिळवता येईल? (ब) यहोवाच्या येणाऱ्‍या मोठ्या दिवसात “शांतीत” आढळून येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

१५ “शांतीत” आढळून यायचे आहे तर यहोवाच्या लोकांनी त्याच्याबरोबर शांतीसंबंध जोपासले पाहिजेत. (२ पेत्र ३:१४) आम्हाला हे स्थान येशू ख्रिस्ताच्याद्वारे लाभलेले आहे व त्याच्याविषयी पौलाने लिहिले: “त्याच्याठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्‍ताच्या द्वारे शांती करुन त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले.” (कलस्सैकर १:१९, २०) गंभीर पाप हे एखाद्या व्यक्‍तीचे देवाबरोबरील नातेसंबंध ताणते व त्याला विवेकाने डागलेला व त्रस्त स्थितीत सोडते, पण तेच शांती ही देवाच्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकणाऱ्‍यांचा ठेवा आहे. (स्तोत्रसंहिता ३८:३; यशया ४८:१८) यहोवा देवाच्या येणाऱ्‍या मोठ्या दिवसात आम्हाला “शांतीत” असलेले आढळावयाचे आहे तर आम्ही स्वतःला इश्‍वरी स्थितीत ठेवण्यास हवे की ज्यामुळे येशूने वधस्तंभावर ओतलेल्या रक्‍ताच्या आधाराने आमच्या पापाचे क्षालन केले जाईल.

१६. प्रेषित पौलाच्या मते आम्हाला समविश्‍वासूंबरोबर शांती कशी जोपासता येईल?

१६ आपल्याला यहोवाच्या इतर उपासकांसोबत सुध्दा शांतीसख्य राखले पाहिजे. पौलाने आर्जविले: “शांतीला व परस्परांच्या वृध्दीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे आपण लागावे.” संदर्भ हे दाखवितो की आम्ही आमच्या समविश्‍वासू बांधवांना खाणे, पिणे किंवा इतर कशाच्या बाबतीत देखील अडखळविले जात नाही याची काळजी घ्यावी. (रोमकर १४:१३–२३) पण याच्याही पलीकडे आणखी काही आहे जे पौलाने इफिसमधील ख्रिश्‍चनांना लिहून कळविले: “मी तुम्हाला विनवून सांगतो की, तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला; पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा.” (इफिसकर ४:१–३) शांतीचा भंग करणारे शब्द उच्चारण्याचे व कृति करण्याचे टाळून आणि यहोवाच्या सार्वभौमत्वास दृढपणे उंचावून धरुन आम्ही आपली ऐक्यता प्रदर्शित करीत राहावे हे उचित आहे.

१७. पहिले पेत्र ३:१०–१२ नुसार ‘शांतीच्या प्राप्तीस्तव झटण्यात’ काय समाविष्ट असते?

१७ ‘शांतीप्राप्त्यर्थ प्रयत्न करणे’ यासाठी आम्ही आमची उक्‍ती व कृति संभाळण्याची गरज आहे हे स्पष्ट आहे, कारण प्रेषित पेत्राने लिहिले: “जीविताची आवड धरुन चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाइटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. कारण यहोवाचे नेत्र नीतीमानावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात. तरी वाइट करणाऱ्‍यांवर यहोवाची करडी नजर आहे.” (१ पेत्र ३:१०–१२; स्तोत्रसंहिता ३४:१२–१६) अशाप्रकारे यहोवाच्या निष्ठावंत सेवकांना ‘शांतीत असलेले’ आढळून यावयाचे आहे तर विविध गोष्टीत त्यांनी ‘शांतीच्या प्राप्तीस्तव झटले’ पाहिजे.

यहोवाच्या मदतीवर विसंबून रहा

१८. जगाचे मार्ग, कृति व प्रवृफ़ा यांचे प्रलोभन आम्हास जडू लागले आहे तर आम्ही काय करावे?

१८ “यहोवाच्या दिवशी” “सृष्टीतत्वे” म्हणजे, जगाचा आत्मा वा प्रवृफ़ा व मार्ग ही “वितळतील” वा लयास जातील असे पेत्राने म्हटले. (२ पेत्र ३:७, १०) पण तेच, जगाचे मार्ग, कृति आणि प्रवृफ़ा यांचे आम्हास प्रलोभन जडले तर काय? अशावेळी आम्ही यहोवाच्या संस्थेकरवी करण्यात आलेल्या आध्यात्मिक तरतुदींचा पूर्ण रुपाने लाभ घेण्यास हवा. यात देवाचे वचन आणि “विश्‍वासू व बुध्दीमान दास” याने पुरविलेल्या ख्रिस्ती प्रकाशनांचा नियमितपणे अभ्यास करणे समाविष्ट आहे. (मत्तय २४:४५–४७) खंडणीच्या तरतुदीसंबंधाने देखील आम्ही कृतज्ञता दाखविण्याचे चालूच ठेवावे. कारण येशूचे “मोलवान रक्‍त” “निर्दोष व निष्कलंक कोकरा” याप्रमाणे आहे.—१ पेत्र १:१८, १९.

१९. जागतिक प्रवृफ़ा आम्हावर प्रभुत्व गाजवीत आहे हे दिसल्यावर प्रार्थना आम्हास कशी सहाय्यक ठरु शकते?

१९ ‘नीतीमत्वाच्या पाठीस लागावे’ याकरता आम्ही देवाकडे मदतीची प्रार्थना करावी. (१ तिमथ्यी ६:११–१४) जागतिक प्रवृफ़ा आम्हावर प्रभुत्व गाजवू पाहात आहेत हे आम्हाला कळले किंवा या गोष्टी कोणी समविश्‍वासूने प्रेमळपणे आमच्या नजरेस आणून दिल्या तर त्यावर मात करण्यासाठी यहोवाकडे मदत मागत असताना त्याबद्दल स्पष्ट प्रार्थना करा. जगाची प्रवृत्ती व मार्ग यात दिसून न येणाऱ्‍या आत्म्याच्या फलप्राप्तीस्तव व आत्म्याकरता विनवणी करणे उचित आहे. (गलतीकर ५:१६–२६; स्तोत्रसंहिता २५:४, ५; ११९:२७, ३५) यहोवा आम्हाला नीतीमान, शुध्द, सद्‌गुण आणि स्तुतीस योग्य असणाऱ्‍या गोष्टींवर आपले लक्ष एकाग्र करण्यात मदत देऊ शकतो. त्याची कळकळून विनंति करणे हे किती उचित आहे बरे की त्यामुळे अतुलनीय अशी “देवाची शांती” आमची अंत:करणे व मानसिक बळ राखून ठेवू शकेल! (फिलिप्पैकर ४:६, ७) त्यानंतर चिंता, मोहपाश इत्यादि गोष्टी ताबा राखता येणार नाही इतक्या पातळीपर्यंत पोहोचणार नाहीत. उलटपक्षी आमचे जीवन देवप्रणीत शांतीने भरलेले असेल. यहोवाचे “नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्‍यांना फार शांती असते” हे खरे आहे.—स्तोत्रसंहिता ११९:१६५.

“निष्कलंक, निर्दोष व शांतीत” टिकून रहा

२०. आध्यात्मिक दृष्ट्या निर्दोष स्थिती प्राप्त करता येणे शक्य आहे असे आम्ही का म्हणतो?

२० यहोवाच्या संस्थेत असणारे आणि येत असलेले नवीन लोक या सर्वांना देवास ग्रहणीय होता येते ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) यहोवाच्या मदतीनेच “आपण अभक्‍तीला व ऐहिक वासनांना नाकारुन” खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी ज्या पध्दतीने जीवनाक्रमण करण्यास हवे ते आचरु शकतो. (तीत २:११–१४) एकेकाळी आम्ही यहोवापासून दुरावलेले होतो व आमची मने दुष्कृत्यांवर स्थिरावलेली होती तरी येशूच्या मृत्युच्या आधारे आमचा देवाबरोबर समेट होऊ शकला. अशाप्रकारे आम्ही विश्‍वासात टिकून राहिलो आणि सुवार्तेच्या आशेपासून ढळलो नाही तर आमची स्थिती आध्यात्मिकदृष्ट्या निर्दोष राहू शकते.—कलस्सैकर १:२१–२३.

२१. आम्हाला सरतेशेवटी, “निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत” आढळलेले कसे दिसू शकेल?

२१ यहोवा देव, त्याचे वचन व त्याची संस्था यांच्या मदतीने आम्हाला या जगापासून निष्कलंक राहता येईल व त्याचे मार्ग, कृति व प्रवृफ़ा यांच्याबाबतीत निर्दोष असल्याचे दाखवता येईल. याप्रकाराने आम्हाला खरी शांती कळू शकेल. होय, यहोवा देवाच्या पवित्र उपासनेत आम्ही टिकून राहून स्वतःच्या बाबतीत “निष्कलंक, निर्दोष व शांतीत” असल्याचे आढळून येईल.

तुमचा प्रतिसाद काय आहे?

◻ यहोवाच्या लोकांच्या बाबतीत पवित्रता का अपेक्षित आहे?

◻ आम्हाला निष्कलंक व निर्दोष कसे राहता येईल?

◻ “शांतीत” राहण्याकरता कशाची गरज आहे?

◻ आम्हाला, देवाच्या मदतीसाठी विसंबून आहोत हे कोणकोणत्या मार्गी दाखवता येईल?

[१२, १३ पानांवरील चित्रं]

‘निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत’ राखण्याजोग्या गोष्टी

1 अंतःकरणपूर्वक समर्पणाने देवाची सेवा करणे

2 ख्रिस्ती व्यक्‍तिमत्वाची वाढ करणे

3 उभारणीकारक असा आध्यात्मिक सहवास राखणे

4 प्रार्थनेद्वारे देवाबरोबर शांतीसंबंध मिळविणे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा