वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ३/१ पृ. २१-२५
  • तुमची दृष्टी “सरळ” आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची दृष्टी “सरळ” आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “डोळा शरीराचा दिवा आहे”
  • डोळ्‌याचा प्रभाव
  • दृष्टी “सरळ” ठेवणे, “सदोष” नव्हे
  • दृष्टी “सरळ” ठेवण्यामुळे मिळणारे आशीर्वाद
  • “डोळ्याबद्दल डोळा” या नियमाचा काय अर्थ होता?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • आपला डोळा निर्दोष ठेवा
    आमची राज्य सेवा—२००४
  • तुमचा डोळा निर्दोष आहे का?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • खास संमेलन दिवसाची उजळणी
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ३/१ पृ. २१-२५

तुमची दृष्टी “सरळ” आहे का?

“तुझी दृष्टी सरळ असली तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल.”—मत्तय ६:२२.

१. डोळा ही अप्रतिम बुध्दीमानी निर्मिती आहे असे का म्हटले जाऊ शकते?

दृष्टी, साधारणपणे खूपच बहुमोल व महत्वपूर्ण इंद्रिय समजले जाते. ज्यांना दृष्टी नाही त्यांना ती फारच मोलाची वाटते. शास्त्रज्ञ म्हणतात की दर सेकंदाला आमच्या डोळ्‌याच्या बाहुलीतून सहस्त्र दशकोटी प्रकाशाचे घटक जात असतात. ते डोळ्‌यातील पडद्याकडे आल्यावर तेथील लाखो पेशींमध्ये त्यांचा बटवडा होतो. प्रकाशाद्वारे प्रज्वलित होऊन या पेशी मेंदूकडे संवेदनाशील संदेश पाठवितात. तेथील लक्षावधी न्यूट्रॉन्स आत्ताच प्राप्त झालेल्या सांकेतिक चिन्हांचा अर्थ लावतात व कोणता प्रतिसाद द्यावा ते ठरवितात. हे सारे काही एका सेकंदाच्या एका घटकाच्या आत घडते. खरेच, डोळा हा ज्ञानवंत निर्मितीच्या अद्‌भूतातील एक अप्रतिम आश्‍चर्य आहे.—स्तोत्रसंहिता १३९:१४.

२. दृष्टीसंबंधाचा अद्याप कोणता भाग शास्त्रज्ञांना गोंधळून टाकणारा आहे?

२ डोळा व मेंदू यांच्यामधील कार्यप्रवणाबद्दल शास्त्रज्ञ बरेच काही जाणून असले तरी आम्ही जे पाहतो त्याविषयी आम्ही जी प्रतिक्रिया दर्शवितो ती तशी का घडते याबद्दल त्यांना अद्याप खूपच कमी कळाले आहे. उदाहरणार्थ, एखाद्याला निळ्‌यापेक्षा तांबडा रंग का आवडतो, पण तेच दुसऱ्‍याला तांबड्यापेक्षा निळा रंग का आवडतो आणि वेगवेगळे रंग आम्हावर वेगवेगळा परिणाम का करतात हे पूर्णतयः समजू शकले नाही. दृष्टी व प्रतिक्रिया यांच्यामधील संबंध अद्याप कोडे आहे. तरीपण डोळ्‌याचा निर्माता यहोवा देव व त्याचा सहकारी येशू ख्रिस्त यांना शारिरीक डोळ्‌यातील गुंतागुंत माहीत आहे तसेच डोळा आमची कृति व जीवन यावर कसा परिणाम करतो याचीही त्यांना माहिती आहे.

“डोळा शरीराचा दिवा आहे”

३. डोळा हा “शरीराचा दिवा” कोणत्या अर्थी आहे?

३ येशूने म्हटले की, “डोळा शरीराचा दिवा आहे.” (मत्तय ६:२२) दिवा आपल्याला अंधाऱ्‍या जागी प्रकाश देतो व त्यामुळे कोणत्या दिशेने जायचे, कसे जायचे इत्यादि गोष्टी आपल्याला कळतात. आमचे शरीर प्रकाशमय ठेवल्यामुळे आमचे डोळेसुध्दा दिव्याप्रमाणेच काम करू लागतात. याकरवी आमची जगात सर्वत्र नजर राहते व त्यामुळे आमचे अडखळणे, धडपडणे होऊन इजा न होता आम्ही सामोऱ्‍या आलेल्या गोष्टींना बुध्दीने विशिष्ट प्रतिक्रिया दर्शवू शकतो.

४. डोळ्‌याच्या स्थितीद्वारे आम्हावर कसा परिणाम होत असतो?

४ तथापि, डोळ्‌याने आमच्या शरीराला दिवा या अर्थी कार्य द्यायचे आहे तर ते बहुतांशी डोळ्‌याच्या स्थितीवर अवलंबून आहे. याच कारणास्तव येशूने पुढे म्हटले: “यास्तव, तुझी दृष्टी सरळ असली तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा!” (मत्तय ६:२२, २३) याद्वारे हे दिसून येते की आमचा डोळा आमच्या सबंध जीवनाक्रमणावर प्रचंड प्रभुत्व राखून आहे. त्याचा परिणाम एकतर चांगला किंवा वाईट होत असतो.

डोळ्‌याचा प्रभाव

५. सैतानाने हव्वेची जी फसवणूक केली होती त्यामध्ये डोळा कितपत समाविष्ट होता?

५ पहिली स्त्री हव्वा हिच्या प्रकरणाचा विचार करा. डोळा हा कृतीवर कसे प्रभूत्व राखीत असतो हे पवित्र शास्त्रात तिचा दियाबल सैतानाबरोबर आलेल्या संपर्काबद्दल जी घटना नमूद आहे त्यावरून कळते. (२ करिंथकर ११:३; १ तिमथ्यी २:१४) सैतानाने तिला प्रस्ताव मांडला की तिने देवाची आज्ञा थोडीशी नजरेआड केली आणि “बऱ्‍या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ” घेऊन खाल्ले तर “तिचे डोळे उघडतील.” याविषयी तिने कोणता प्रतिसाद दर्शविला? पवित्र शास्त्र आम्हास सांगते: “त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले.” तिला मनाई केली होती त्या गोष्टीवर तिने आपले डोळे लावले. हा डोळ्‌यांचा हेतूपुरस्सर गैरवापर होता. याचा परिणाम काय झाला? “तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले.”—उत्पत्ती २:१७; ३:४–६.

६. डोळे आमच्या कृतीवर कसा प्रभाव पाडतात?

६ अर्थातच हव्वेने ते “बऱ्‍या वाइटाचे ज्ञान करुन देणारे झाड” त्यावेळी पहिल्यांदाच बघितले नव्हते. पण आता वेगळेच काही घडत होते. या खेपेला त्या वृक्षाचे फळ “दिसण्यात मनोहर”, “इष्ट” असे वाटू लागले होते. इष्टपणा व इच्छा या गोष्टी डोळ्‌याचे नव्हे तर हृदयाचे गुण आहेत. पण डोळे जे पाहतात त्यामुळे हृदयाच्या इच्छा व वांच्छा प्रदीप्त बनतात व त्याद्वारे कृति परिणामित होते. हव्वेच्या प्रकरणात ही कृति, तिच्या स्वतःसाठी, तिच्या पतीसाठी व आज आमचा ज्यामध्ये समावेश आहे त्या त्यांच्या सर्व भावी संतानाकरता बाधक व नाशकारक ठरली.—रोमकर ५:१२; याकोब १:१४, १५.

७. येशूला फसविण्यासाठी सैतानाने केलेल्या तिसऱ्‍या प्रयत्नात डोळा कसा समाविष्ट होता, पण याचा कोणता परिणाम दिसला?

७ परंतु, डोळ्‌याद्वारे वाईट गोष्टी करण्याचा जो प्रभाव निर्माण होत असतो त्याचा प्रतिकार करता येणे शक्य आहे हे दाखवता यावे याकरता आम्हाला येशू ख्रिस्ताचे उदाहरण लक्षात घेता येईल. येथेही तोच परीक्षक समाविष्ठ होता. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यापासून येशूला परावृत्त करता यावे याकरताच्या आपल्या तिसऱ्‍या प्रयत्नात “सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व वैभव दाखविले.” याकडे लक्ष द्या की नमन करण्याची कृति घडवून आणावी म्हणून सैतानाने येशूला नुसत्या शब्दाद्वारे जगातील सर्व साम्राज्ये व त्यांचे वैभव सादर केले नाही. त्याने डोळ्‌याच्या सामर्थ्यकारी प्रभावाचा दुरुपयोग करण्यासाठी त्या सर्व गोष्टी त्याला ‘दाखविल्या.’ तथापि, येशूचे डोळे त्याचा स्वर्गीय पिता यहोवा याजसोबतच्या नातेसंबंधावर स्थिरावले होते त्यामुळे ते सैतानाच्या मोहिनीयुक्‍त सादरतेमुळे विचलीत होऊ शकले नाहीत व म्हणून त्याला सैतानाच्या युक्‍तिबाज योजनांना धुडकावून लावण्यात यश आले.—मत्तय ४:८–१०.

८. हव्वा व येशू यांच्या उदाहरणावरून आम्ही काय धडा शिकू शकतो?

८ वरील उदाहरणांवरून आम्हाला काय शिकायला मिळते? पहिली गोष्ट ही की ज्यावर आम्ही आमचे डोळे लावतो त्याचा परिणाम आमच्या अंतःकरणावर एकतर चांगल्यासाठी वा वाईटासाठी होत असतो. दुसरी गोष्ट ही की डोळा हे सैतानाचे आवडते साधन आहे ज्याकरवी तो आपल्या सावजाला फसविण्यासाठी पुढे सरसावतो. ज्या सर्व “युक्त्यां”द्वारे सैतान मानवजातीला फसवितो त्यामध्ये डोळ्‌यांना प्रलोभन देणे हे त्याचे अधिक जोरदार माध्यम दिसते.—२ करिंथकर २:११.

९. सैतान आज “डोळ्‌याची वासना” कशी वाढवतो?

९ आज सैतान लोकांना देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी अद्याप त्याच युक्त्यांचा वापर करीत आहे. जगातील झगमगाट व मोहकता याकरवी सैतान, “देहाची वासना, डोळ्‌याची वासना व संसाराची फुशारकी” या गोष्टींना वाढीस लावीत आहे. (१ योहान २:१६) हे, व्यापारी जगताकरवी ज्या जाहिरातींच्या योजना सामोऱ्‍या आणल्या जातात त्यामध्ये स्पष्ट दिसते. जी आपली नजर खेचून घेते व मोहकता भारावते त्याच जाहिराती यशस्वी ठरत असतात हे सहसा दिसत नाही का? रस्त्यावरील रंगभरीत जाहिराती, रंगीत दिव्यांच्या जाहिराती, मासिके व वर्तमानपत्रातील तकतकीत चित्रे, दुरदर्शनवरील लक्ष खेचून घेणारी छायाचित्रे—व शिवाय त्यांच्या निर्मितीसाठी होऊ घातलेला अमाप खर्च—या सर्व गोष्टी याची साक्ष देतात की, जाहिरातीमागील एकंदरीत उद्देश ग्राहकाच्या “डोळ्‌यांची वासना” प्रदीप्त करावी हा असतो.

१०. व्यापारी जगताकरवी खरेपणाने कशाची वाढ केली जाते?

१० या जाहिराती आपल्याला जादा काही विचार करायला लावीत नसल्या तरी त्यामागील चाणाक्ष गोष्ट ही असते की या जाहिराती ग्राहकांच्या चीजवस्तुंची वाढ करीत असतात एवढेच नाही तर त्यांचे राहणीमान सुध्दा परिणामित करीत असतात. जाहिरातीतील उत्पादन हे अधिक प्रतिष्ठित, भारदस्त, आनंदी व रुपवान लोकांकरवी वापरले जाते अशी छटा त्यात दाखविली जाते. त्यात हा संदेश अंतर्भूत असतो की ग्राहकाने या उत्पादनाचा वापर केल्यास त्याची “संसाराविषयीची फुशारकी” ही आपोआपच त्या गटापैकीची एक होईल. जाहिरातदारांना याची कल्पना आहे की कोणी एखाद्याने एकदा का विशिष्ट जीवनमानाची पध्दत स्विकारली तर त्याजशी संबंधित असणारा माल वा उत्पादने स्विकारावी याची विशेष गळ घालावी लागत नाही. याच्या दृष्टीकोणातून पाहू जाता, समर्पित ख्रिश्‍चनांनी इब्रीयांस पत्र १३:५ मधील सूचना लक्षपूर्वक ऐकणे किती सूज्ञतेचे ठरेल बरे! तेथे आम्ही वाचतो: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे.”

दृष्टी “सरळ” ठेवणे, “सदोष” नव्हे

११. येशूने दृष्टीविषयी जे विधान केले त्यातील “सरळ” व “सदोष” या सज्ञांचा अर्थ सांगा.

११ डोळ्‌यांस प्रलोभित करणाऱ्‍या विचलीत गोष्टींचा मारा दैनंदिनी आम्हावर होत असल्याने, आमची दृष्टी आम्ही “सदोष” न ठेवता “सरळ” ठेवावी असे येशू ख्रिस्ताने का म्हटले त्याची रसिकता अधिकपणे आपल्याला होऊ शकेल. (मत्तय ६:२२, २३) याचा काय अर्थ होतो? “सरळ” हा शब्द हा.प्लौस’ या ग्रीक शब्दापासून भाषांतरित आहे ज्याचा मुलभूत अर्थ आहे, मनाची एकाग्रता वा ध्येयनिष्ठा. उलटपक्षी, “सदोष” या विषयीचा मूळ ग्रीक शब्द आहे, पो.ने.रॉस’ व त्याचा अर्थ वाईट, निकामी, दुष्ट असा आहे. अशाप्रकारे ‘सरळ दृष्टी’ ही जे काही चालले आहे त्याद्वारे विचलीत होऊन मार्गभ्रष्ट न होता एकाच गोष्टीवर आपले लक्ष एकाग्र करते. विरूध्दपक्षी, ‘सदोष दृष्टी’ लबाड, कावेबाज व लोभिष्ट असते व ती अंधाऱ्‍या व लुच्चेगिरीच्या गोष्टींकडे वळत असते.

१२. येशूच्या चर्चेच्या संदर्भाची उजळणी व विवेचन करा.

१२ पण, डोळ्‌याने आपले लक्ष कशावर केंद्रिभूत करावे ज्याकरवी “संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल”? संदर्भाचा विचार लक्षात घेतल्यास याचे उत्तर आपल्याला मिळू शकेल. मागील काही वचनात येशू “पृथ्वीवरील संपत्ती” आणि “स्वर्गातील संपत्ती” याविषयी भाष्य करताना आपल्याला दिसते. त्याने म्हटले की, “जेथे तुझे धन आहे तेथे तुझे अंतःकरणही लागेल.” यानंतर डोळा या दृष्टीविषयीची चर्चा केल्यावर त्याने पुन्हा उद्देशाच्या एकाग्रतेविषयी ठासून सांगितले: “कोणीही दोन धन्याची [म्हणजे देवाची व धनाची] चाकरी करू शकत नाही.” यानंतरच्या वचनात त्याने दैनंदिन गरजेविषयी आपला दृष्टीकोण कसा रहावा याविषयीचा सल्ला दिला व सोबत ही सूचना दिली: “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतीमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‌याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:१९–३४.

१३. आम्ही आपली दृष्टी कशावर केंद्रित करावी की ज्यामुळे “आमचे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल”? का?

१३ या सर्वांपासून आम्हाला काय दिसते? येशू येथे जीवनातील ध्येयाबाबत बोलत होता, तो भौतिक गोष्टींच्या पाठलागातील व्यर्थता आणि आध्यात्मिक गोष्टीतील आस्था जोपासत राहिल्यामुळे मिळणारे फायदे याकडे निर्देश करीत होता. यामुळे हे स्पष्ट आहे की आपण आपली दृष्टी राज्य आस्थेवर एकाग्र ठेवली तर आमचे “संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल.” ते का? कारण आम्ही आमच्या जीवनात देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याचे ध्येय निवडून घेतले तर वैभवी सुवार्तेचे प्रतिबिंब आमच्या जीवनाच्या हर गोष्टीत पाडले जाईल. आमच्यापुढे तेजोमय भवितव्याची आशा सतत उभी असेल एवढेच नाही तर स्वार्थी ध्येयपूर्तीस बध्द असणाऱ्‍या जीवनामुळे निर्मिल्या जाणाऱ्‍या अंधाऱ्‍या व गुप्त गोष्टींपासून आपल्याला सुटका मिळू शकेल.—२ करिंथकर ४:१–६.

१४. आपली दृष्टी भौतिक गोष्टीवर केंद्रित केल्यास त्याचा परिणाम “अंधारात” कसा होतो?

१४ प्रेषित पौलाने येशूच्या शब्दांवर अधिक भर दिला होता कारण त्याने म्हटले: “जे धनवान होऊ पाहतात ते परिक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात.” (१ तिमथ्यी ६:९) या शब्दांना खराच अर्थ आहे! वर्तमानपत्रातील बातम्या कायदेमंडळाचे सदस्य, महापौर, न्यायाधीश, पतपेढी चालक, पालिका वरिष्ठ यांच्याकरवीच्या मध्यमवर्गीय गुन्ह्‌यांनी महामूर आहेत. एका अहवालाच्या मते अमेरिकेत “दरवर्षी कमीतकमी २०० अब्ज डॉलर्स दंड वसूल होतो.” श्रीमंत बनण्याचा “मोह व पाश” याने कितीतरी सभ्य गृहस्थांना अपराधी व गुन्हेगार होण्यास प्रवृत्त केले. यास्तव, आम्ही “नाश व विध्वंसात बुडविले जाऊन” येशूने म्हटलेल्या “अंधारात” चाचपडत राहण्याचे टाळले पाहिजे.—पहा नीतीसूत्रे २३:४, ५.

१५, १६. (अ) आम्ही आणखी कोणती “डोळ्‌याची वासना” टाळली पाहिजे? (ब) आमच्या चर्चेला तुम्ही नीतीसूत्रे २७:२० च्या सूचनेचा अवलंब कसा जोडाल?

१५ पण जे आपली दृष्टी धनवान होण्याकडे लावतात त्यांनाच अंधारामध्ये चालण्याचा धोका उद्‌भवत असतो का? नाही, कारण “डोळ्‌यांची वासना” यात आणखी पुष्कळ गोष्टींचा समावेश आहे. येशूचे मत्तय ५:२८ मधील शब्द आठवा: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केला आहे.” हा इशारा, निषिध्द वासना व इच्छा प्रदीप्त करण्यासाठी रचलेल्या साहित्यावर आपली दृष्टी राहू देण्याच्या बाबतीत सुध्दा लागू होतो.

१६ याशिवाय येशूने ज्याविषयी बोलणी केली ती अन्‍न, पेय व वस्त्र याविषयी वाटणारी चिंता ही सुध्दा आणखी एक गोष्ट आहे. (मत्तय ६:२५–३२) या गोष्टी आवश्‍यक असल्या तरी अत्याधुनिक, अतिशय महाग व त्याच्याच मागे सतत लागून राहण्याची अवास्तव ओढ ही मन व अंत:करण यांना दास करू शकते. (रोमकर १६:१८; फिलिप्पैकर ३:१९) याशिवाय करमणूक, छंद, क्रिडा, शारिरीक कसरत इत्यादि गोष्टींच्या बाबतीत जगाच्या लहरीप्रमाणे व त्यात स्वतःला गुंतविण्याचे टाळणे याबद्दल योग्य तोल साधला पाहिजे. या सर्व प्रकारांच्या बाबतीत आम्ही नीतीसूत्रे २७:२० मधील सूज्ञ बोल लक्षात ठेवणे चांगले ठरेल की, “अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत.” होय, आम्ही आत्मसंयम राखला पाहिजे जेणेकरुन आमच्या नेत्राची तृप्तता करीत असता आम्ही स्वतःला आध्यात्मिक धोक्यात लोटणार नाही.

दृष्टी “सरळ” ठेवण्यामुळे मिळणारे आशीर्वाद

१७. दृष्टी “सरळ” ठेवल्यामुळे काहींना राज्याची आस्था जोपासण्याची कशी संधि मिळाली?

१७ ज्यांनी आपली दृष्टी “सरळ” ठेवली आणि देवाच्या राज्याच्या अभिवचनांकडे ती केंद्रित केली अशांना यहोवाकडून पुष्कळ आशीर्वाद प्राप्त झाले. हे जगभरात विविध ठिकाणी राहणाऱ्‍या व जीवनाच्या विविध प्रकारात असणाऱ्‍या लोकांच्या अनुभवावरून अगदी उत्तमरित्या विवेचीत करता येते. या उदाहरणांना विचारात घ्या:

“दक्षिण अमेरिकेत कोलंबिया येथे जेथे गरज आहे त्या ठिकाणी कार्य करीत असताना मला दरमहा साधारण १०० डॉलर्स एवढ्या आर्थिक प्राप्तीवर जीवन कंठावे लागले. मी पायनियरींग सुरू केली व त्याच महिन्यात मी पडलो व माझा पायाचा घोटा मोडला. औषधोपचार इलाजात माझा सर्व पैसा संपला व आता पुढल्या महिन्याची अर्थप्राप्ती होण्याकडे डोळे लावीत बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मजपाशी राज्य सभागृहाचे भाडे भरण्याचे पैसे मी ठेवले होते आणि भाडे दिले तर मला पुढल्या आठवड्याच्या बाजार खर्चासाठी पैसे राहणार नव्हते. काय करावे याचा मी दोन दिवस विचार केला व शेवटी ठरविले की राज्य सभागृहाचे भाडे दिलेच पाहिजे. त्यामुळे मी ते देऊन टाकले. पण दुसऱ्‍या दिवशी सकाळीच मला अमेरिकेतून एका बहिणीकडून पत्र आले. या बहिणीने मला कोलंबिया येथे भेट दिली होती. तिने पाठविलेल्या या पत्रात तिच्या कोलंबिया येथील भेटीतून राहिलेले पैसे पाठविले होते. ती रक्कम, मी भाड्यासाठी जी रक्कम दिली होती नेमकी तितकीच होती.”

कोरिया येथे टाचन या शहरी की, हा गृहस्थ रुग्णाचे चिकित्सालय चालवीत होता. एके दिवशी कडक दुपारी त्याच्या तीन साथीदार मित्रांनी त्याला म्हटले की, दुपारीच जाऊन बीचवर बसू. ही कल्पना मोहक होती, पण की ने विचार केला की तो बीचवर गेल्यास त्या दिवशी सायंकाळी होणाऱ्‍या मंडळीच्या पुस्तक अभ्यासास त्याला जाता येणे जमणार नाही. त्यामुळे ते आमंत्रण त्याने नाकारले. काही वेळातच त्या तिघा साथीदारांना परत चिकित्सालयात आणले गेले—मृतावस्थेत! या तिघांचा चिकित्सालय सोडल्यावर लगेच भयंकर अपघात झाला होता. कीला या घटनेबद्दल खूप वाईट वाटले, पण दुसऱ्‍या बाजूला, त्याने आपली कित्येक वर्षांची अभ्यासाला जाण्याची जी सवय स्वतःला लावली होती ती न मोडल्यामुळे आता त्याचे जे जीवन वाचले होते त्यामुळे त्याला आनंद वाटत होता.—इब्रीयांस १०:२४, २५.

१८. लहान मुलांना आपली दृष्टी “सरळ” ठेवण्याचे कसे शिकविले जाऊ शकते?

१८ लहान मुलांनाही त्यांची दृष्टी राज्य आस्थेवर केंद्रित करण्याचे शिकविता येईल. पुढील अनुभव त्याचे विदारण करतो:

“आम्हाकडे आलेल्या पाहुण्यांकडून आम्हाला कळाले की फिलिपाइन्स येथे तीन मंडळ्‌यांचे आगीत नुकसान झाले होते व आता त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांना प्रत्येकी १,००० डॉलर्स एवढा खर्च येणार होता. मी व माझ्या पतीने काही अनुदान देण्याचे ठरवले. पण आमच्या, चार महिने ते सहा वर्षे वय असणाऱ्‍या चार मुलांच्या बाबतीत काय? दर आठवडी माझ्या पतीस पगार मिळे तेव्हा ते प्रत्येक मुलासाठी एक चांदीचा डॉलर आणीत असत. हे नाणे ते चार मुलात विभागून देत, त्यामुळे प्रत्येक मुलाला हे पाहण्याची संधि मिळाली की त्याच्यापाशी किती पैसे गोळा झाले. या पैशाकरवी त्यांना काय घ्यायचे आहे असे आम्ही त्यांना विचारले तेव्हा त्यांचे उत्तर नेहमीच हे होते की ते पैसे त्यांना बांधवांना पाठवावयाचे आहेत.” त्यांनी जमवलेल्या ९९ डॉलर्ससोबत मुलांनी एक साधे पत्रही पाठविले. हे प्रेम व औदार्य याजमुळे फिलिपाइन्सचे बंधूजन इतके भारावले की, जेव्हा मुलांचे पत्र वाचले गेले तेव्हा त्यांच्या डोळ्‌यातून अश्रू ओघळले.

१९. आम्ही आमची दृष्टी कशावर ठेवली तर तेजोमय भवितव्याची खात्री आहे?

१९ “तुझे डोळे नीट पुढे पाहो, तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.” (नीतीसूत्रे ४:२५) या सूचनेकडे लक्ष देणे व आमचे डोळे इतरत्र भिरभिरत राहून आम्ही मार्गभ्रष्ट होऊ नये म्हणून ते ऐकणे केवढे सूज्ञतेचे आहे! “तुम्ही अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या,” असे पौल म्हणतो, “संधि साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत.” तो असेही आर्जवितो: “यहोवाची इच्छा काय आहे हे समजून घ्या.” (इफिसकर ५:१५–१७) असे केल्यामुळे आमची दृष्टी “सरळ” राहील आणि आम्ही एका तेजोमय भवितव्याकडे—देवाने वचन दिलेल्या नव्या व्यवस्थीकरणातील सार्वकालिक जीवन—याकडे आत्मविश्‍वासाने पाहत राहू.—पडताळा २ करिंथकर ४:१७, १८.

तुम्हाला विवेचीत करता येईल का की

◻ डोळा “शरीराचा दिवा” कसा आहे?

◻ हव्वा व येशू यांच्या उदाहरणांच्या द्वारे, आमचा डोळा आमच्या हालचालीवर प्रभुत्व राखून आहे हे कसे स्पष्ट करता येईल?

◻ आज सैतान कोणकोणत्या मार्गाने “डोळ्‌यांची वासना” प्रलोभित करतो?

◻ आमची दृष्टी “सरळ” ठेवावी याकरता आम्ही काय केले पाहिजे?

◻ आता आम्ही आपले डोळे कोठे लावावेत?

[२३ पानांवरील चित्रं]

आम्ही ज्या गोष्टीवर आपले डोळे लावतो ती आमच्या हृदयातील इच्छा प्रदीप्त करू शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा