वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ३/१ पृ. २६
  • यहोवा फिजीमध्ये ‘वाढ देतो’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा फिजीमध्ये ‘वाढ देतो’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • फिजीत देवाच्या राज्याची घोषणा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • आमच्या ख्रिस्ती सेवकपणाला भूषविणारी वर्तणूक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ३/१ पृ. २६

राज्य घोषकांचा वृत्तांत

यहोवा फिजीमध्ये ‘वाढ देतो’

फिजी या सुंदर बेटावरील विश्‍वासू राज्य घोषकांवर यहोवाचा आशीर्वाद दिसत आहे. सध्या या बेटावर १,०४९ यहोवाचे साक्षीदार आहेत. ही गत वर्षापेक्षा १० टक्के वाढ आहे. त्यांनी लाविले, पाणी घातले आणि देवाने त्यांना वाढ दिली.a—१ करिंथकर ३:६, ७.

वॉचटावर संस्थेचे शाखा दप्तर म्हणते की, “लोक आता पवित्र शास्त्र अभ्यासात अगदी अनपेक्षितपणे रस घेत आहेत असे दिसते.” एका मंडळीच्या सदस्यांनी बेटावरील एका खेड्यात पुनः कार्य केले, मागच्या वेळी त्यांना येथे अल्प प्रतिसाद मिळाला होता. पण या खेपेला मात्र खेड्यातील प्रमुखाने सर्व खेडूतांना सांगितले की त्यांनी यहोवाचे साक्षीदार भेट देतील तेव्हा आपापल्या घरी राहावे व नंतर बांधवाकरता सभागृहात स्त्रियांनी अल्पोपहाराची व्यवस्था करावी. दोन आठवड्यांनी एक नियमित पायनियर याच खेड्यात परतला त्यावेळी त्याला २८ लोक पवित्र शास्त्राचा अभ्यास घेण्यासाठी तयार आहेत असे दिसले. यानंतर दर दोन आठवड्यांनी या खेड्याला आस्थेवाईक लोकांना मदत करण्यासाठी भेट दिली जात आहे.

अलिकडच्या प्रांतिय अधिवेशनात ज्या ६८ जणांनी बाप्तिस्मा घेतला त्यापैकी एक जण नऊ वर्षे रविवारच्या शब्बाथ शाळेचा शिक्षक होता. त्याला घरोघरच्या कार्यात दोन साक्षीदारांनी भेट दिली तेव्हा “त्यांची खूप वेळ चर्चा झाली व कित्येक पुनर्भेटी झाल्या तेव्हा शेवटी पवित्र शास्त्र अभ्यास सुरु झाला.” दोन महिन्यांच्या पवित्र शास्त्र अभ्यासानंतर त्याने आपला शब्बाथ शाळा शिक्षकाचा राजीनामा दिला, सत्यासाठी खंबीर भूमिका धारण केली आणि एका वर्षांनंतर बाप्तिस्मा घेतला.

१९८४ मध्ये फिजीत प्रथमतःच दोन प्रांतिय अधिवेशने झाली. मुख्य बेटावरील बावीस वडिलांनी दुसऱ्‍या बेटावर आयोजित असलेल्या छोट्या अधिवेशनास स्वखर्चाने उपस्थित राहून तेथील कार्यक्रमास हातभार देण्याची तयारी दाखवली. शाखा दप्तराने प्रवासाची व्यवस्था करुन दिली आणि मुख्य बेटावरील ९० लोक जातील अशी अपेक्षा धरली. तरीपण, ११५ लोक खास विमानाने तर इतर ३२० लोक जहाजाद्वारे या अधिवेशनाला आले. साक्षीदारांची उत्तम वागणूक बघून एक वैमानिक म्हणाला: “हे लोक दिलेल्या सूचनेनुरुप वागतात हे बघून मला आश्‍चर्य वाटले. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे सर्वांनी खाली उतरावे असा आदेश मी केला तेव्हा सर्वजण शांतपणे खाली आले, कोणीही तक्रार किंवा कुरकुर केली नाही. विमानात परत बसताना सर्वजण मुकाट्याने, आनंदाने आत आले, कोणीही भांडण केले नाही. विमानातून प्रवास करणारे सर्व प्रवासी तुमच्या सारखेच असावे अशी माझी इच्छा आहे.”

जहाजावरील प्रमुख तंत्रज्ञाने म्हटले: “तुम्हा लोकांना प्रवासी या नात्याने घेऊन जाण्यात आम्हाला खरोखरी आनंद वाटला. तुम्ही लोक, आम्ही दुसऱ्‍या बेटावर नुकत्याच नेलेल्या ख्रिश्‍चन युवकांच्या गटापेक्षा वेगळेच आहात. . . . तुम्ही शुध्दाचरणी व समंजस लोक आहात.” एका सह प्रवाशाने म्हटले: “मला पूर्वी कधीही पहावयास मिळाले नाही अशा गोष्टीचा मला अनुभव आला. . . . जहाजाच्या वरच्या मजल्यावर आम्ही थंडीत झोपलो होतो त्यावेळी तुम्हापैकीच्या एका भगिनीने माझ्या बायकोला व मला झोपण्यास पांघरूण दिले. अशाच प्रकारच्या धर्माचा मी शोध घेत होतो.” हा माणूस अधिक शिकण्यासाठी अधिवेशनास आला.

खऱ्‍या ख्रिश्‍चनांकडून, या सर्व बांधवांनी दाखविलेली वागणूक अपेक्षित आहे. येशूने म्हटले: “प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते.” (मत्तय ७:१७) यहोवा आपल्या विश्‍वासू उपासकांना फिजीमध्ये ही वाढ देत आहे हे आनंदाचे आहे. यहोवाच्या लोकांची अशी उत्तम वागणूक बघून आणखी पुष्कळ जण सुवार्तेला उत्तम प्रतिसाद देतील असे आम्हास निःसंशये वाटते.

[तळटीपा]

a  यहोवा आणखी वाढ देईल हे अपेक्षिता येईल, कारण साक्षीदार सध्या १,१०७ पवित्र शास्त्र अभ्यास चालवीत आहेत. ही मागील वर्षापेक्षा ४२ टक्क्‌यांची वाढ आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा