पवित्रशास्त्र—आमच्या दिवसासाठी व्यवहारी का?
गत शतकात हे जग नाट्यपूर्णतेने बदललेले आहे. घोडा–गाडीचे दिवस ते आधुनिक अंतराळ युग या दरम्यान इतका कायापालट होत गेला की औद्योगिक पुस्तके छापली जातात की बहुदा ती लागलेच कालबाह्य ठरतात. विज्ञान व औद्योगिक क्षेत्रात आगेकुच सुरू आहे. गणकयंत्र १५० वर्षापूर्वी उदयास आले तर नुकतेच अलिकडील वर्षात जागतिक वापरात संगणक [काम्प्युटर] आले व ते उपग्रह व अवकाशयान यावरील नियंत्रणापासून ते थेट घरच्या अंदाज पत्रकापर्यंत सर्वावर नियंत्रण राखू लागले. ते खरोखरीच आश्चर्यकारक आहे! एखादा क्वचितच स्वतःला या प्रगतीसोबत राखील!
पुष्कळसे बदल फायदेकारक झाले आहेत. यातील कांही दळणवळण संपर्क, वाहतुक, परिश्रम कपात योजना व औषधे ही आहेत. उदाहरणार्थ, सुक्ष्मदर्शक यंत्राद्वारेची शस्त्रक्रिया, एकेकाळी निकामी ठरलेला हात किंवा बोटे आता पुन्हा उपयोगासाठी समर्थ बनवू शकते. एका दिवसात आम्ही गोलार्धाच्या एका टोकापासून दूसऱ्यापर्यंत झेपावू शकतो. ज्यामुळे महिन्यांचा प्रवास वाचविला जातो. एका शतकापूर्वीच्या तुलनेत—ज्यावेळी स्वयंचलीत वाहने, रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट, रिफ्रीजेटर, धुण्याचे यंत्र, जीवनसत्वे, सूक्ष्म जंतुनाशके, लस व सर्वसाधारण स्विकृत अशा हजारो गोष्टी नव्हत्या—खरोखरी आम्ही नवीन युगात जगत आहोत.
परंतु सर्वच काही भल्याच्या मार्गाचे ठरले नाही. अण्वस्त्र शक्तीचा उपयोग, उदाहरणार्थ, त्याने मानवजातीस युद्धाची अगर उत्सर्जनाद्वारे गंभीर धमकी भरली आहे. रसायनाचे भव्य प्रदूषण व आमच्या औद्योगिक कारखान्यांचे जोड उत्पादन त्या धमकीमध्ये भर घालते. बेकायदेशीर मादक औषधे व आधूनिक मादके यांनी पुष्कळांचे जीवन उध्वस्त केले आहे.
लोकांच्या राहणीमानातील लक्षात येण्यासारखा फरक घडला आहे. औद्योगिकीरणाने खेडी व नागरी जीवनाच्या कौटुंबिक स्थितीची छकले उडविली आहेत. कधीही नव्हते एवढे—खासपणे स्त्रिया व लेकरे यांना—मुक्त व स्वतंत्र वाटते. पुर्वीच्या बंधनकारक चालीरितीच्या जीवनापासूनच्या मुक्तीचा परिणाम नविन जीवनपद्धती व सामाजिक मोलातील बदल असा झाला. यास्तव हजारो वर्षापुर्वी जग ज्यात सुविख्यात होते त्यापासून आता कायापालट झाला.
पवित्र शास्त्र न बदललेले
मग एखाद्याने मार्गदर्शनासाठी कोठे फिरावे? कोणता उपदेश आज व्यवहारी आहे? आधुनिक शिक्षणतज्ञ आजच्या जगासोबतची गती राखण्यास क्रमिक पुस्तके व पद्धतीत नुतनीकरण करीत आहेत. धर्मगुरू व इतर व्यावसायिक लोक त्यांचा उपदेश जे काही प्रसिद्ध व सर्वसाधारण स्विकृत त्याप्रमाणे बनवितात.
उलटपक्षी पवित्रशास्त्र हजारो वर्षे न बदलणारे राहिले आहे. खरोखरी त्यात लिहिलेल्या मजकुरातून काही काढून टाकण्याचे किंवा त्यात भर टाकण्याविरूद्धचा कडक इशारा ते सामावून आहे. (नीतीसूत्रे ३०:५, ६; प्रकटीकरण २२:१८, १९) आधुनिक जगासाठी व्यवहारी मार्गदर्शक म्हणून पवित्रशास्त्र स्विकारले जाऊ शकेल का?
काही म्हणतात नाही. “कोणीही १९२४ चे रसायन शास्त्राचे पुस्तक आमच्या आधुनिक शिक्षण वर्गात क्रमिक पुस्तक म्हणून वापरण्याचा दावा करणार नाही—त्यावेळेपासून रसायन शास्त्राबद्दल पुष्कळसे शिकले गेले आहे,” डॉ. एली. एस. चेसेन त्यांच्या रिलीजन मे बी हेजारडस टू युवर हेल्थ या पुस्तकात लिहितात. ते पुढे म्हणतात: “अशाचप्रकारे समाजवाद, तत्वज्ञान, मनोविज्ञान याबाबत गत हजारो वर्षात पुष्कळसे ज्ञान अवगत झाले आहे; तथापि, पवित्रशास्त्र (जे ह्या विषयाविषयी पुष्कळसे सांगते) अधिकारयुक्तपणे उपयोगात आणिले जात आहे व त्याची क्वचितच पुनरावृत्ती करण्यात आली.”
ते म्हणतात: “कोणी जेव्हा पवित्र शास्त्र हे केवढे अनादिकाल आहे, व ते लिहिले होते त्यावेळी होते तेवढे आजही कसे अर्थभरीत आहे या ‘चमत्कारा’ विषयी चर्चा करताना मी ऐकतो तेव्हा मला अचंबा वाटतो. खगोल शास्त्राची ‘अचूकता’ एखाद्यास आश्चर्यचकीत करते त्यासारखे हे आहे. पवित्र शास्त्राने आपला एवढा जम बसविला आहे की थोडके लोक त्यास कालबाह्य मानण्यास किंवा नाकारण्यास तयार होतील.”
तथापि, खरोखर पवित्र शास्त्र आमच्या आधुनिक जगासाठी कालबाह्य झाले आहे का? किंवा ते देत असलेला उपदेश आमच्या दिवसात अजुनही व्यवहारी आहे?