पाळक चर्चला जाण्यास विसरले
केनिया या आफ्रिकन देशातील पुढील अनुभव माय बुक ऑफ बायबल स्टोरीज् या प्रकाशनाच्या शिक्षणाचे केवढे अपील आहे त्याची प्रचिती देतो:
या पुस्तकाची एक प्रत एके सकाळी एका पाळकांना त्यांच्या चर्चचा विधि सुरु होण्याच्या काही काळाआधी देण्यात आली. पुस्तक हाती घेताच त्यांनी ते उघडले व ते त्यात इतके गढून गेले की चर्चमध्ये जाऊन प्रार्थना विधि करण्यास ते पार विसरले. थोड्याच वेळात चर्चमधून दोन उपाध्याय त्यांच्या घरी बोलावण्यास आले तो त्यांना पाळक बायबल स्टोरीज् पुस्तक वाचत आहेत असे दिसले. पाळकांनी त्यांच्या घरी आलेल्या दोघांना ते पुस्तक किती सुंदर आहे याचे विवेचन करायला आरंभ केला. परिणाम असा झाला की ते दोघेही त्या पुस्तकात रमले व चर्चला परतण्याचे विसरले.
काही वेळाने चर्चमधील लोक पाळकाच्या घरी आले. यांना ते तिघे माय बुक ऑफ बायबल स्टोरीज् पुस्तकाची चर्चा करण्यात गढून गेले आहेत हे पाहून मोठे आश्चर्य वाटले. याचा परिणाम काय दिसला? त्या सकाळी चर्चचा विधि होण्याऐवजी पाळकांच्या घरीच बायबल स्टोरीज पुस्तकाविषयीची अनौपचारिक चर्चा झाली. या पुस्तकाची आपली प्रत असावी असे पुष्कळांना वाटायला लागले. त्यांनी पाळकांना अशी विनंति केली की यहोवाच्या साक्षीदारांच्या मिशनऱ्याने एक प्रत त्या प्रत्येकाला आणून द्यावी.
हे २५६ पृष्ठांचे सुंदर अशी बहुविध चित्रे असणारे पुस्तक वाचकांना पवित्र शास्त्र एकंदरीत काय आहे त्याची कल्पना देते. तुम्हाला सुद्धा एक प्रत मिळवता येइल. हे पुस्तक इंग्रजी भाषेसोबत मल्याळम व तामिळ भाषेतही उपलब्ध आहे. सोबतचे कूपन भरून व पुस्तकाचे मूल्य प्रत्येकी २५ रू. प्रमाणे आम्हाला पाठवा.
‘ते राज्य खरे असल्याचे दाखविते’
हेच, लोक, “तुझे राज्य येवो” या पुस्तकाबद्दल म्हणतात. एका रसिक पत्राने म्हटले: “ते राज्य काय आहे, ते कसे प्रस्थापिले व राखले जाते आणि ते आम्हासाठी व आमच्या पृथ्वीसाठी काय करील याचे स्पष्ट चित्र देते. ती राज्य आशा आमच्या अंतर्यामी जिवंत ठेवण्यास ते मदत देते आणि त्यावेळी ज्यांना जीवनप्राप्ती होणार त्यांच्यामध्ये असण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करण्याची आमची इच्छा तीक्ष्ण बनविते.”
होय, “तुझे राज्य येवो” हे देवाचे राज्य, जो संपूर्ण पवित्र शास्त्राचा विषय आहे तो प्रज्वलित करते व त्याची प्राप्ती तुम्हास कशी होईल त्याचे मार्गदर्शन देते. आपली एक व्यक्तिगत प्रत केवळ १० रूपयांस प्राप्त करा. त्याकरता सोबतचे कूपन भरून पुस्तकाच्या मूल्यासहित आम्हाला पाठवा.