वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ६/१ पृ. ४-७
  • पवित्रशास्त्र तो देवाचा शब्द आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पवित्रशास्त्र तो देवाचा शब्द आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पवित्रशास्त्र व उच्च टिका
  • पवित्रशास्त्र व विज्ञान
  • एक सामर्थ्यशाली पुस्तक
  • पवित्रशास्त्र—मानवाचा शब्द?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • श्रेष्ठ ज्ञानाचा अप्रतिम उगम
    जीवनाचा काय उद्देश आहे?
  • देवाविषयीचे ज्ञान प्रकटविणारे पुस्तक
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • विज्ञान, धर्म व सत्याचा शोध
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ६/१ पृ. ४-७

पवित्रशास्त्र तो देवाचा शब्द आहे

विज्ञान व उच्च टीका यांच्यामध्ये पवित्रशास्त्राचे, देव वचन म्हणून असणाऱ्‍या पुर्वीच्या स्थानाला पार तडा बसला, हे खरे आहे का? एखादा सहजपणे तसा विचार करील. धार्मिक नेते लेखीरित्या असे म्हणण्यास तयार आहेत की पवित्रशास्त्र अशास्त्रीय आहे व उच्च टिका स्तुत्य असून ती वेदान्ती विद्यालयात शिकविली जाते. परंतु वस्तुस्थिती काय दाखविते?

पवित्रशास्त्र व उच्च टिका

उच्च टिकांच्या बाबत पहाता वस्तुस्थीती ही आहे की अजून ही तिच्या कल्पनासाठी भक्कम पुरावा दिला गेला नाही. पेन्टेटॉक किंवा यशयाच्या पुस्तकाबाबत त्यांना आधार देणाऱ्‍या साहीत्याचा उगमही सापडलेला नाही. दानिएलाचे पुरातन लेख, उच्च टीकाकारांनी ते केव्हा लिहीले होते याची टीका केली त्यानंतर थोडक्याच वर्षांनी सापडले जे पुस्तक स्तुतीस पात्र असल्याचे आधीच सिद्ध करतात!

एक वेदान्तीय प्राध्यापक म्हणतात: “टिकात्मक शाळात पवित्रशास्त्राची पुस्तके लबाडीने लिहीली आहेत असे म्हणतात त्यास कोणत्याही विशिष्ट गोष्टीबाबत सिद्ध करू शकत नाहीत. त्या शाळांना अशी गोष्ट ठासून सांगणे सोपे आहे पण ते सिद्ध करणे अवघड गोष्ट आहे.” (विक ब्रुमाल इन बिबलीकल क्रिटीसिझम) एक पुराणवस्तु संशोधक याला पुष्टी देतात: “प्राचीन पुर्वेकडील लिखाण किंवा वाडःमय कुभांड आहे हे स्पष्ट करण्यास आम्हाकडे किंचित ही पुरावा आहे असा कांही शक्‍तीशाली दावा करता येणार नाही.” (डब्ल्यू, एफ. अल्ब्राईट फ्रॉम द स्टोन एज टू ख्रिश्‍चानिटी) होय, उच्च टिका शाबीत झाली म्हणून नव्हे तर ती आजच्या प्रापंचित विचार सरणीत चांगलीच मिसळल्यामुळे बहरत आहे.

पवित्रशास्त्र व विज्ञान

विज्ञानाने पवित्रशास्त्रास कांही मार्गी अवमानले आहे का? बहुधा तसेच असल्याचे दिसले. उदाहरणार्थ, १८व्या शतकात पृथ्वीच्या घडणीबाबतीतील सखोल जाणण्याने हे स्पष्ट केले की आमचा ग्रह फारच पुरातन होता. त्यावेळी पुष्कळ धार्मिकजन पृथ्वी केवळ ६००० वर्षे पुरातन असल्यावर जोर देत होते यामुळे पवित्रशास्त्र शिक्षण स्पष्टपणे आमान्य झाल्याचे दिसत होते. वस्तुस्थीती ही आहे की पवित्रशास्त्र कोठेही पृथ्वी किती पुरातन आहे हे सांगतच नाही. हा त्या धार्मिक जनांचा गैरसमज होता ज्याने समस्या ओढावली.

पवित्रशास्त्राचे प्रथमचे शब्द म्हणतात: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.” (उत्पत्ती १:१) हा प्रारंभीचा वाक्य प्रयोग अलीकडील विज्ञान शास्त्रीय परिक्षणाच्या सहमतात आहे. पवित्रशास्त्रानुसार पृथ्वी ही “आकारविरिहीत” व निर्जन, लोकवस्तीस अयोग्य अशी होती. (उत्पत्ती १:२) पृथ्वीचा इतिहास काढण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या भूगर्भ शास्त्रज्ञांनी सुचविले की एके काळी पृथ्वी अशीच होती. त्यानंतर पवित्रशास्त्र, समुद्र व जमिन कशी झाली याचे वर्णन करते. वनस्पती समुद्रप्राणी, पक्षी व शेवटी भूप्राणी दिसले. सरते शेवटी मनुष्य स्वतः दृष्यात आला. हे भूगर्भ शास्त्रज्ञांनी जे कांही पृथ्वीच्या भूथरांच्या उत्खननाने व जिवन कसे आले त्याचा कालक्रम शोधून काढला त्याजसारखेच आहे.—उत्पत्ती १:१–२८.

हे असे म्हणण्यासाठी नाही की पवित्रशास्त्र पूर्णपणे विज्ञानशास्त्रीय पाठ्य पुस्तकात आढळते त्यासोबत सहमत आहे. परंतु पुष्कळ संमतीकारक मुद्दे आहेत व आम्हास यासाठी अचंबीत वाटते की: ‘त्या पुरातन पवित्रशास्त्र लेखकांना एवढे कसे माहीत होते?’ त्या प्राचीन काळच्या विज्ञानशास्त्रीय ज्ञानाच्या पातळीतून पहाता एवढेच म्हणू शकू की त्यांना कोणीतरी सांगितले—वास्तविकतेचा भक्कम आधार की पवित्रशास्त्र खरोखरी देवाचा शब्द आहे. जेथे कोठे विज्ञान शास्त्रातील कल्पना व पवित्रशास्त्रात तफावती आहेत मग हे प्रकरण पवित्रशास्त्र खोटे व शास्त्रज्ञ सांगतात ते नेहमीच खरे असे समजावे का? अशी पुष्कळ उदाहरणे सांगता येतील की वेळोवेळी विज्ञानशास्त्र चुकीच्या मार्गावर जाऊ शकते.

अर्थात उत्क्रांतीचा युक्‍तीवाद हा पवित्रशास्त्र विरोधातील अति भव्य मुद्दा सादर करतो, या युक्‍तीवादाबाबत, डार्विनने द ओरजिन ऑफ स्पेसिज नामे पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर शास्त्रज्ञामध्ये तो एवढ्या जलदाईने सर्वश्रूत कसा बनला हे मोठे चित्तवेधक आहे. या पुस्तकाचे प्रमेय किंवा अवशेष अहवालात आढळणारे त्याचे पुरावे पडताळण्या अगोदरच स्विकारला होता. का? उत्क्रांतीवादी हॉयमर व्ही. डिटफर्थ स्पष्ट करतात: “मनुष्य व निसर्ग यांच्या विषयी चमत्कारांची मदत न घेता स्पष्टीकरण कितपत करता येऊ शकते ही विज्ञानाची व्याख्या आहे.” द ओरिजीन्स ऑफ लाईफ, एच्‌. व्ही. डिटफर्थ लिखित) मग हे आश्‍चर्यकारक वाटते का की शास्त्रज्ञ उत्क्रांतीवादास उत्सुकतेने बिलगले, ज्यास शाबीत करण्यास बराच वेळ व परिश्रम खर्च करतात पण त्यात कांही तथ्य आहे का पहाण्यासाठी थोडाच प्रयत्न करतात? त्यास एकमेव पर्याय, उत्पत्ती, एक चमत्कार होईल—जो त्यांना विचारशुन्य आहे.

तथापि ज्याचे मन चमत्काराविषयी कलुषित नाही त्याच्यासाठी उत्पत्ती हा तर्कशुद्ध समजण्याचा खरोखरी मार्ग आहे. जिवनाच्या उगमाचे तत्व, विवेक, बुद्धिमत्ता व मानवाचे नैतिक स्वभाव ह्‍याचे स्पष्टीकरण करण्यास शास्त्रज्ञ हतबल झाले आहेत.

एक सामर्थ्यशाली पुस्तक

पवित्रशास्त्र स्वतःच जगापासून मिळविलेली विद्वता व पवित्रशास्त्राची शिकवण यातील संघर्षाबद्दल इशारा देते. (१ करिंथकर १:२२, २३; ३:१९) मानवी ज्ञानावर व तत्वज्ञानावर आधारलेले ज्ञान हे इतके अनिश्‍चित आहे हे पहाता, या विवादाने आम्हास अचंबीत करू नये. कांही लोकप्रिय युक्‍तीवादाने पवित्रशास्त्राविरूद्ध मत प्रतिवादन केले तर आम्ही अस्वस्थ होऊ नये. पवित्रशास्त्र स्वतःच आम्हास ते खरोखरी देवाचा शब्द असल्याचा दावा करते हे पडताळण्यास त्याचे पुरावे इतर मार्गाने पहाण्यास मार्गदर्शन करते.

उदाहरणार्थ पवित्रशास्त्र भविष्यवादीत पुस्तक असल्याचे शाबीत होत आहे. (२ पेत्र. १:१९–२१) उच्च टिकाकर दावा करतात की हे भविष्यवाद घटना घडल्या नंतर लिहीले गेले, पण पुष्कळ प्रकरणात हे अशक्य कोटीतील आहे. येशू विषयीचा भविष्यवाद त्याच्या जन्मापूर्वी करण्यात आला व नंतर शब्दशः पूर्ण झाला. (उदाहरणासाठी यशया ५३:१–१२; दानिएल ९:२४–२७ पहा.) येशूने स्वतः यरूशलेमेच्या नाशाचा भविष्यवाद वदविला तो तंतोतंतपणे पूर्ण झाला. त्याने व प्रेषित पौलाने शेवटच्या दिवसाविषयी केलेले भविष्यवाद आम्ही सकाळी वाचलेल्या वृत्तपत्राप्रमाणे वाटतात. (मत्तय २४; मार्क १३; लूक २१; २ तिमथ्यी ३:१–५) मानव भवितव्याविषयी भाकणूक करण्यात अति चूक करतात. हे पहाता पवित्रशास्त्रीय भविष्यवाद उच्च स्रोतापासून आहेत हे पटते.

अजून एक शक्‍तीशाली पुरावा त्याच्या शब्दात आढळतो: “देवाचे वचन जिवंत व शक्‍तीशाली आहे.” (इब्रीकर ४:१२) हे सामर्थ्य ज्या पुष्कळ लोकांनी पवित्रशास्त्र वाचण्याच्या किंवा त्याची वाच्यता इतराबरोबर करण्याच्या हक्कासाठी त्रास सहन केला किंवा मृत्युमुखी पडले यात दिसून येतो. इतर कोणत्याही प्रकाशनाने त्याजसारखा, जेव्हा ते सौम्य व वाजवी आत्मश्‍लाधीने वाचल्यावर लोकांच्या वर एवढा चांगला परिणाम केला असेल. हे युद्धप्रिय क्रूर लोकांना शांतीप्रिय म्हणून व व्यक्‍तीच्या व्यक्‍तीमत्वात प्रचंड परिवर्तन घडवू शकते. (मीखा ४:३, ४; इफिसकर ४:२४) पवित्रशास्त्राने लुईज बाबत काय केले त्याच्या उदाहणाचा विचार करा.

ब्राझीलच्या तुरुंगवासात लुईज अति क्रूर म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर एक यहोवाचा साक्षीदार लुईजच्या बंदीवान सोबत्याबरोबर बोलत असे व त्याला लुईज सोबत बोलण्याची संधी मिळाली. पवित्रशास्त्राच्या शब्दाचा लुईजवर एवढा परिणाम झाला की तो अल्पावधीत वेगळीच व्यक्‍ती बनला. (कलस्सैकर ३:९, १०) यापूर्वी कोणीही त्याला उलट शब्द करण्याचे धाडस करीत नव्हते, परंतु आता तो प्रत्येकास दयाळूपणे वागवित होता, तुरुंगाच्या अधिकाऱ्‍यांना योग्य आदर दाखवित होता. पवित्रशास्त्र लुईजच्या व्यक्‍तीमत्वावर परिणाम करू लागले, त्याच्या पाच वर्षानंतर तो शिकत होता तो इतरांना सांगू लागला व त्याला तुरुंगाच्या बाहेर ही प्रचार करण्याची मुभा देण्यात आली.

नंतर वेनचा विचार करा. वेन युनायटेड स्टेटस मध्ये स्वैराचाराकडे, संपूर्णतः अनैतिक व मादक औषधाच्या गैर वापरात गढून गेला होता. त्याने विवाह केला तेव्हा त्याच्या गैरवर्तनाने त्याच्या पत्नीला अनीतीकडे लावले. त्याचे कौटूंबिक जिवन त्रस्त होते. ते घटस्फोटाच्या बेतास आले असता एका यहोवाच्या साक्षीदाराला वेनला पवित्रशास्त्र कौटूंबिक जबाबदाऱ्‍या व प्रेम याविषयी काय म्हणते हे दाखविण्याची संधी लाभली. (इफिसकर ४:२२–२४; ५:२२–२८) त्याला त्याच्या समस्याचे मूळ पहाण्यास मदत केली गेली. (१ करिंथकर १५:३३ पहा.) सरतेशेवटी तो त्याची विचारसरणी बदलण्यास समर्थ झाला. याने त्याच्या पत्नीस परिवर्तन करण्यास मदत केली. आता हे तरूण दांपत्याचे कुटूंब समाधानाचा नमुना आहे. ज्याकरता पवित्रशास्त्राचे आभारी असण्यास हवे.

समाप्तीस इलेनाचे प्रकरण घ्या. ती अर्जेंटीनामधील औदासिन्याचा त्रास सोसणारी युवती होती. ती मनोविकार तज्ञाकडे मदतीसाठी गेली, त्याने तिला तिची समस्या सुटण्यासाठी लैंगिक अनीतीची गरज प्रतिपादली. ती अनीतीत दुरात्मिक व तंबाखूच्या अति सेवनात डुबून गेली. दोन वेळेस तिने गर्भपात केला होता. परंतु यहोवाच्या साक्षीदारांनी इलेना विषयी आस्था दाखविणे व तिच्या जिवनात पवित्रशास्त्र उपयोगात आणण्यास मदत करणे त्यांना शक्य झाले. हळूवारपणे पवित्रशास्त्राच्या शब्दाने तिला तिचा वाईट सराव सोडण्यास व निर्माणकर्ता यहोवा देव व त्याचा पुत्र येशु ख्रिस्त यांना ओळखण्यास समर्थ केले. आता त्या दोन व्यक्‍ती संबंधी बोलताना इलेना म्हणते: “मी त्यांच्यापासून प्राप्त होणाऱ्‍या चांगल्या गोष्टीस लायक नाही व याकारणास्तव मला त्यांची दया व आम्हावरील प्रेम याविषयी वारंवार बोलावेसे वाटते.”

ही थोडकी उदहारणे दाखवितात की पवित्रशास्त्र आमच्या जिवनात फायदेकारक गोष्टी भरू शकते. लुईज, वेन, इलेना यांना यहोवाच्या साक्षीदारांनी पवित्रशास्त्राच्या संपर्कात आणले व ते सांगते ते लागू कसे करावे हे दाखविले तेंव्हा सहाय्य मिळाले. जगामध्ये सध्या तिन दश लक्षाहून अधिक हे साक्षीदार आहेत यातील पुष्कळांना गत आयुष्यात याप्रमाणेचा अनुभव आला व त्या सर्वाच्या जिवनांत पवित्रशास्त्राने अमुलाग्र बदल करण्यास लावले. परिणाम?

या तीन दशलक्षाहून अधीकांच्या समाजात मानवजातिच्या भवितव्यास ज्या महान समस्या भेडसावतात त्या आगोदरच सोडविल्या जात आहेत. ते राष्ट्रवाद व वंशभेदाने विभागलेले नाहीत. त्याऐवजी, त्यांनी पवित्रशास्त्राच्या मदतीने वंशिक व आर्थिक कलुषितपणावर मात केली. ते शांतीत राहाण्यास शिकले हीच प्राथमिकतेत पवित्रशास्त्राच्या भविष्यवादातील एकाची अति भव्य पूर्णता आहे.—यशया ११:६–९.

अशाप्रकारच्या गटाचे अस्तित्वच पवित्रशास्त्र देवाचा खरोखरी शब्द आहे याचा पुरावा आहे. आम्ही तुम्हाला या ख्रिस्ती जनासोबत परिचित होण्याचे व तुम्ही स्वतःच हा पुरावा पडताळण्याचे आम्ही आमंत्रण देतो. तुम्हास मदत करण्यात यहोवाच्या साक्षीदारांचा आनंद गगनात मावणार नाही.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

उच्च टिकांच्या दाव्यास अक्षरशः कोणताच खंबीर पुरावा नाही

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

पवित्रशास्त्र देवाचा शब्द आहे हे शाबीत करण्यास ते आधुनिक विज्ञान किंवा तत्वज्ञानावर विसंबून राहात नाही

[७ पानांवरील चित्रं]

पवित्रशास्त्र लोकांचे परिवर्तन घडविते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा