पवित्रशास्त्र—मानवाचा शब्द?
विल्यम टिन्डेल यांनी ते सर्वांना उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आपले जीवन दिले. मार्टीन ल्युथरने ते जर्मन भाषेत भाषांतरीत करण्यास पुष्कळसे प्रयत्न केले. जॉन कॅलविनच्या अनुयायांना ते “सर्व सत्याचे नियम व सनद” होते. होय, एका काळात थोडक्या लोकांनी पवित्रशास्त्र देवाचा शब्द आहे या वस्तुस्थितीवर आक्षेप घेतला. हीच रोमन कॅथोलीक चर्चची तत्वप्रणाली होती.
तथापि सध्या परिस्थीती भिन्न आहे. पवित्रशास्त्र सर्व इतिहासात अधिक खप असणारे पुस्तक आहे, ते थोडकेच वाचतात व त्यापेक्षाही अगदी अल्प त्याचे अनुकरण करतात. लेखक जेम्स बार पुष्कळांचा आवाज उमटविताना म्हणतात: “पवित्रशास्त्राच्या सांप्रदायावरील माझ्या अहवालाची घडण ते मानवाचे म्हणून आहे. ते मानवाच्या त्याच्या विश्वासाचे लिखाण आहे . . . पवित्रशास्त्रास इस्राएलाचा शब्द, सुरवातीच्या ख्रिश्चनामधील कांही प्रमुखांचे शब्द असे नांव योग्य होईल.”—द बायबल इन टू मॉडर्न वर्ल्ड जेम्स बार लिखित.
पण हा बदल का? पवित्रशास्त्र देवाचा शब्द आहे की कांही मानवांचा शब्द? या २०व्या शतकात याची कांही वास्तविकता आहे का?
ती वास्तविकता आहे का?
शेवटचा प्रश्न प्रथम घेता होय, ती आहे असे आम्ही म्हणतो. का? पवित्रशास्त्राचे वर्णन ‘आमच्या पावलासाठी दिवा व मार्गावरील प्रकाश’ असे केले आहे. (स्तोत्रसंहिता ११९:१०५) आज, खरोखरी आम्हास तशाच प्रकाशाची गरज आहे. आमचा सुंदर ग्रह नष्ट केला जात आहे लाखो लोक भुकेले होत आहेत. थोडक्यानाच भवितव्याबाबत खात्री वाटते, व मानवाच्या अस्तित्वास धमकावले जात आहे. पवित्रशास्त्र अशा विश्वासघातकी काळातून सुरक्षित व आनंदी भवितव्याकडे आम्हास मार्गदर्शित करते. ते खरोखरी देवाचा शब्द आहे तर त्याचीच आम्हास अक्षरशः गरज आहे.
तर मग, लोक त्यावर संशय घेण्याप्रत कसे पोंहचले? या प्रश्नाचे उत्तर ते पुस्तक खरोखरी देवाचा शब्द आहे की नाही हे ठरविण्यास आम्हास मदत करील.
विश्वासा संबंधी काय झाले?
१७व्या व १८व्या शतकादरम्यान पवित्रशास्त्रावरील विश्वव्यापी विश्वास हा बदलत्या मतप्रणालीच्या चक्रीचा सावज बनला. युरोपमध्ये संशय वाद व धर्मातीत आत्म्याचे वारे वाहू लागले. सरकार, आर्थिक, नैसर्गिक, धार्मिक व्यवस्था—सर्वावर आक्षेप उठवले गेले. त्यातून पवित्रशास्त्र कांही बचावले नाही.
पुस्तकाविषयचे संशय १७व्या शतकात उघडपणे प्रतिपादित झाले; पुर्वीचा कॅथोलीक पियारे बेली ज्याने पवित्रशास्त्राचे ऐत्याहासिक मोल व कालगणने विषयी प्रश्न केला. इतर त्याच्या विचारसरणीस अनुसरले व १९व्या शतकात संशयवाद उच्च टिकास्त्र शाळातून उफाळून आला. उच्च टिकाकार पवित्रशास्त्र दिसते तसे नाही यावर चंग बांधून आहेत, त्यांच्या मतानुसार, मोशेने पेन्टेटॉक लिहीलेच नाही. त्याऐवजात त्याची जुळणी यहुदी इतिहासात नंतर विविध उगमांनी, मोशे नंतर पुष्कळ शतकांनी केली गेली. ज्या भविष्यवादाची पूर्णता झाली होती ते त्याच्या पुर्णतेनंतर लिहीले असावे. तद्वत, यशयाचे पुस्तक काही लोकांनी त्यानंतर शतक भराच्या कालावधीत लिहिले, आणि दानिएल इ.स.पू. १६५ मध्ये लिहीले गेले असे त्यांचे म्हणणे आहे.
या उच्च टिकाकारांचा परिणाम जर्मनमधील पवित्रशास्त्र विद्वान डेव्हीड फ्रेड्रीक स्टाउसच्या प्रकरणात दिसतो: “आम्ही अजूनही ख्रिश्चन आहोत का? नाही, असे स्टाउस नी म्हटले, आम्हातील जे उच्च टिकेत गुंतले आहेत, ते तर ख्रिस्ती नाहीतच, कारण आम्ही यापुढे पवित्रशास्त्रास देवाचे वचन म्हणून स्विकारीत नाही.”—रिलीजन ॲन्ड द राईज ऑफ स्केप्टीसिझम, फ्रँकलीन एल बाऊमर लिखित.
या नविन प्रापंचिक युगाने विज्ञान शास्त्रात नविन शोध लावले. यातले कांही पवित्रशास्त्रास पाठींबा देतात, पण इतर त्याच्यासोबत विरोध करतात असे दिसते. यामुळे त्याने पुष्कळांस पवित्रशास्त्रास कालबाह्य असा विश्वास ठेवण्याकडे निरविले. १९व्या शतकाच्या मध्यंतरी उत्क्रांतीवाद लोकप्रिय झाला त्यावेळेस ही मतप्रणाली पुन्हा पेरली गेली—जी उत्पत्ती अहवालचा कडवा विरोध करते. ही प्रणाली विज्ञानशास्त्रीय व उच्च टिकात्मक क्षेत्रात उत्सुकतेने स्विकारली गेली. सध्या ती पुष्कळ धर्म नेत्यांनी स्विकारली असून ती शाळांमध्ये वस्तुस्थीती म्हणून शिकविली जाते.
याचा अर्थ विज्ञानाने पवित्रशास्त्रास कसेतरी अमान्य केले असा आहे का? किंवा उच्च टिकात्मक धोरणाने पवित्रशास्त्र देवाचा शब्द नाही असे दाखविले?