वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१ पृ. ५-७
  • विज्ञान, धर्म व सत्याचा शोध

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विज्ञान, धर्म व सत्याचा शोध
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • धर्माने निर्मितीच्या लौकिकतेवर कलंक आणला आहे
  • शक्‍तिचा दुरुपयोग
  • खऱ्‍या धर्माचा विजय
  • अभक्‍त जगात सत्याचे समर्थन करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१ पृ. ५-७

विज्ञान, धर्म व सत्याचा शोध

“अनेक खोट्या धर्मांचा प्रसार झाला या वास्तविकतेमुळे . . . माझ्यावर प्रभाव पडला आहे.”—चार्ल्स डार्विन

१९ व्या शतकाच्या सुरवातीदरम्यान, विज्ञान आणि धर्म यात सुसंगतीचा नातेसंबंध होता. “वैज्ञानिक लिखाणांमध्ये देखील, लेखकांना स्वाभाविक आणि प्रामाणिकपणे देवाविषयी बोलण्यास संदेह वाटला नाही,” असे डार्विन: सुरवातीला व नंतर (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते.

डार्विन यांचे जातींची उत्पत्ती (इंग्रजी) या पुस्तकाने हे मत बदलण्यास हातभार लावला. विज्ञान आणि उत्क्रांती यांच्यात असा संबंध निर्माण झाला ज्यामुळे धर्म आणि देवाला पूर्णपणे बाजूला सारून टाकले गेले. “उत्क्रांतीच्या दृष्टीने विचार करताना ईश्‍वरी निर्माणकर्त्याची गरज नाही किंवा ते उचितही नाही,” असे सर  ज्युल्यन हक्सले म्हणतात.

आज, उत्क्रांतीचा सिद्धांत विज्ञानाचा अत्यावश्‍यक पाया आहे असा दावा केला जातो. या नातेसंबंधाच्या मुख्य कारणाची ओळख भौतिकशास्त्रवेत्ता फ्रेड हॉईल याप्रमाणे देतात, “कर्मठ शास्त्रज्ञ, सत्याकडे पुढे पाहण्याऐवजी, गतकाळाच्या धार्मिक अतिरेकाकडे पुन्हा वळून न जाण्याचे टाळण्याविषयी अधिक चिंतीत आहेत.” विज्ञानाला धर्माचा कोणता अतिरेकीपणा आवडलेला नाही?

धर्माने निर्मितीच्या लौकिकतेवर कलंक आणला आहे

पवित्र शास्त्राला उंचावून धरत असण्याच्या प्रयत्नात “निर्मितीवादी”—अधिक करून मूलगामी प्रोटस्टंट यांच्याशी संलग्न असलेले—असा आग्रह धरतात की, पृथ्वी आणि हे विश्‍व १०,००० वर्षांपेक्षा कमी वयोमानाचे आहेत. या अतिरेकी दृष्टिकोनाने, भूशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञांची टर उडवली आहे कारण त्यांनी लावलेल्या शोधाच्या ते अगदी विरोधात आहेत.

परंतु याविषयी पवित्र शास्त्र नक्की काय म्हणते? “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.” (उत्पत्ती १:१) यामध्ये किती काळ गोवलेला आहे त्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. सृष्टीचा “पहिला दिवस” याविषयी तर उत्पत्ती १:३-५ वचनापर्यंत काहीच उल्लेख नाही. ह्‍या पहिल्या ‘दिवसाची’ सुरवात झाली त्याआधीच “आकाश व पृथ्वी” अस्तित्वात होते. यास्तव, शास्त्रज्ञ दावा करतात त्याप्रमाणे आकाश व पृथ्वी ही लक्षावधी वर्षांपासून असतील का? कदाचित असूही शकतात. त्यामध्ये जो वेळ लागला त्याविषयीचे पवित्र शास्त्र काहीच स्पष्टीकरण देत नाही.

काही जण सृष्टीच्या सहा ‘दिवसांचे’ स्पष्टीकरण कसे देतात ही पद्धत धर्माचा आणखी एक अतिरेकीपणा आहे. काही मूलगामी असा आग्रह धरतात की, हे दिवस खरोखरचे आहेत व त्यांचा काळ १४४ तासांपर्यंतच मर्यादित ठेवतात. हे, शास्त्रज्ञांमध्ये धर्माविषयी संशय उत्तेजित करते, कारण त्यांना वाटते की हा दावा विज्ञानाच्या स्पष्ट शोधाच्या अगदी विरोधात आहे.

परंतु, पवित्र शास्त्रावरील मूलगाम्यांचे—पवित्र शास्त्राचे नव्हे तर—मत, विज्ञानाच्या सहमतात नाही. प्रत्येक सृष्टीचा “दिवस” २४ तासांच्या कालावधीचा होता असे पवित्र शास्त्र म्हणत नाही; खरे म्हणजे, ते या सर्व ‘दिवसांना,’ “यहोवा देवाने आकाश व पृथ्वी यांची उत्पत्ती” करण्यात जो मोठा दिवस घालवला त्यात समाविष्ट करून दाखवते की, पवित्र शास्त्रातील सर्वच ‘दिवस’ फक्‍त २४ तासांचे नव्हते. (उत्पत्ती २:४, NW) काही “दिवस” हजारो वर्षांच्या कालावधीचे देखील असू शकले असतील.a

अशाप्रकारे, निर्मितीवाद्यांनी आणि मूलगाम्यांनी निर्मितीच्या कल्पनेची मानहानी केली आहे. विश्‍वाचे वय आणि सृष्टीच्या ‘दिवसांच्या’ लांबीच्या शिकवणी, तर्कशुद्ध विज्ञान किंवा पवित्र शास्त्र यातील एकाबरोबरही सुसंगत नाहीत. परंतु, इतरही पुष्कळ अतिरेकीपणा आहे ज्यामुळे शास्त्रज्ञांना धर्म नापसंत आहे.

शक्‍तिचा दुरुपयोग

संपूर्ण इतिहासभरात, धर्म, घोर अन्यायाला कारणीभूत आहे. उदाहरणार्थ, मध्ययुगादरम्यान, युरोपच्या स्वयंसत्तापद्धतीच्या चर्चच्या पाठिंब्याचे समर्थन करण्यासाठी निर्मितीच्या शिकवणीचा विपर्यास केला होता. मानवांची श्रीमंत आणि गरीबीची स्थिती ईश्‍वरी हुकूमानुसार दिली आहे असा त्यातून अर्थ ध्वनित होतो. बुद्धिमान विश्‍व (इंग्रजी) हे पुस्तक पुढीलप्रमाणे विवरण देते: “श्रीमंतांच्या धाकट्या पुत्रांना असे सांगण्यात येई की, त्यांना कुटुंबाच्या संपत्तीतील थोडे किंवा काहीच मिळणार नाही ही ‘देवाची योजना’ आहे. तसेच कामगाराला, ‘देवाने त्याला जशा स्थितीत पाचारण केले’ आहे त्यातच समाधानी राहण्यास वारंवार आर्जविले जात होते.”

याच कारणास्तव, पुष्कळ जण “गतकाळातील धार्मिक अतिरेकाकडे पुन्हा” जाण्यास घाबरतात यात काही आश्‍चर्य नाही! धर्माने मानवांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याऐवजी, त्यांच्या आध्यात्मिक गरजांची अनेकदा पिळवणूक केली आहे. (यहेज्केल ३४:२) इंडिया टुडे या नियतकालिकातील अग्रलेख असे विवेचन मांडतो: “युगांमध्ये धर्माने जे नाव कमवले आहे, त्याकडे पाहिले तर, त्याने एवढी तरी विश्‍वसनीयता मिळवली आहे हे आश्‍चर्याचे आहे. . . . परात्पर सृष्टिकर्त्याच्या नावाने, . . . मानव प्राण्यांनी त्यांच्या सहमानवांविरूद्ध सर्वात निंद्य अत्याचार केला आहे.”

खोट्या धर्माच्या लांच्छनास्पद इतिहासाचा डार्विनच्या विचारशक्‍तीवर बराच प्रभाव पडला. त्याने लिहिले, “ख्रिस्ती धर्म, ईश्‍वरी प्रकटीकरण आहे असा माझा हा विश्‍वास हळूहळू कमी होत गेला. पृथ्वीच्या जास्तीत जास्त भागांमध्ये अनेक खोटे धर्म हा हा म्हणता पसरले या वस्तुस्थितीचा माझ्यावर थोडाफार परिणाम झाला.”

खऱ्‍या धर्माचा विजय

धार्मिक ढोंगीपणा या जगासाठी काही नवी गोष्ट नाही. येशूने त्याच्या दिवसातील सत्तेसाठी हपापलेल्या धार्मिक नेत्यांना म्हटले: “तुम्ही बाहेरून माणसांना न्यायी दिसता, परंतु आतून तुम्ही ढोंगाने व अन्यायाने [दुष्टपणाने] भरलेले आहा.”—मत्तय २३:२८, पं. र. भाषांतर.

परंतु खरा ख्रिस्ती विश्‍वास, ‘या जगाचा भाग नाही.’ (योहान १७:१६) त्याचे अनुयायी भ्रष्ट धर्म आणि राजकारणात भाग घेत नाहीत; किंवा सृष्टिकर्त्याचे अस्तित्व नाकारणाऱ्‍या तत्वांद्वारे त्यांची दिशाभूलही होत नाही. प्रेषित पौलाने लिहिले: “ह्‍या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे.”—१ करिंथकर ३:१९.

तथापि, याचा असा अर्थ होत नाही की खरे ख्रिस्ती वैज्ञानिकरीत्या असंस्कृत आहेत. उलटपक्षी, खऱ्‍या धर्माच्या अनुयायांना विज्ञानासाठी जिज्ञासा आहे. “आपले डोळे वर करून पाहा; ह्‍यांना कोणी उत्पन्‍न केले?” असे प्राचीन संदेष्टा यशया यास सांगण्यात आले होते. (यशया ४०:२६) त्याचप्रमाणे, सृष्टिकर्त्याबद्दलची योग्य समज प्राप्त करण्यासाठी ईयोबाला निर्सगाच्या आणि सृष्टिच्या आश्‍चर्यांचा अभ्यास करण्याचे आमंत्रण दिले होते.—ईयोब ३८-४१ अध्याय.

होय, जे लोक सृष्टिकर्त्यावर विश्‍वास ठेवतात ते सृष्टिकडे आदरयुक्‍त भयाने पाहतात. (स्तोत्र १३९:१४) त्याहूनही अधिक ते सृष्टिकर्ता, यहोवा देव भवितव्यातील आश्‍चर्यकारक आशेविषयी जे सांगतो त्यावर भरवसा ठेवतात. (प्रकटीकरण २१:१-४) पवित्र शास्त्राच्या अभ्यासाद्वारे लाखो लोक हे शिकत आहेत की, मनुष्याचा उगम किंवा भवितव्य, अंध योगायोगावर आधारित नाही. मानवाला बनवण्यात यहोवाचा एक उद्देश होता आणि तो उद्देश सर्व आज्ञाधारक मानवांसाठी आशीर्वादाकरवी पूर्ण होईल. तुम्ही याबाबतीत स्वतः बारकाईने परीक्षण करावे असे आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो.

[तळटीपा]

a अवेक! नोव्हेंबर ८, १९८२, पृष्ठ ६-९ पहा, तसेच वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट संस्थेने प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवर सूक्ष्मज्ञान (इंग्रजी), खंड १, पृष्ठ ५४५ हेही पहा. निर्मितीवाद व विज्ञान आणि पवित्र शास्त्रासोबतचा त्याचा विरोध याच्या अधिक माहितीकरीता अवेक! मार्च ८, १९८३, पृष्ठ १२-१५ तसेच मार्च २२, १९८३, पृष्ठ १२-१५ पहा.

[६ पानांवरील चौकट]

पुराव्याविषयी अज्ञानी?

“यहोवाच्या साक्षीदारांनी देखील जीवशास्त्राचा चांगलाच अभ्यास केलेला आहे,” असे नॉर्मन मॅकबेत या वकीलाने १९७१ मधील त्यांच्या डार्विनची फेरन्यायचौकशी—तर्क करण्यासाठी अपील (इंग्रजी) या पुस्तकात लिहिले. अवेक! मधील उत्क्रांतीच्या विषयावर असलेला एक लेख वाचल्यावर, मॅकबेत अशी नोंद करतात: “त्या लेखात, डार्विनवादावर काही समजण्याजोगी टीका केलेली पाहूनच मला आश्‍चर्य वाटले.” त्या विषयावर विस्तृत प्रमाणाचे संशोधन व आधारभूत ग्रंथातून घेतलेले समंजसपणाचे उतारे पाहिल्यावर, या लेखकाने असा समारोप केला: “‘जे लोक, त्याच्यावर [उत्क्रांतीवर] विश्‍वास ठेवत नाहीत ते सर्व, म्हणजे निदान प्रत्येकाला तरी, स्पष्टपणे वैज्ञानिक पुराव्याविषयी अज्ञानी आहे,’ असे सींप्सनचे बोलणे आता मुळीच योग्य नाही.”

[७ पानांवरील चित्रं]

मानवजातीचे भवितव्य अंध योगायोगावर आधारित नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा