सत्य हातचे जाऊ देऊ नका
पंतय पिलाताने सत्य स्विकारण्याचा मोबदला कांहीतरी द्यावा लागेल हे कदाचीत ताडले असावे. ख्रिस्ताचा अनुयायी बनणे याचा अर्थ त्याचा राज्याधिकार स्विकारणे व निसंशये अचानकपणे संभवनियतेनुसार स्वतःला धिक्कारणे असा झाला असता. तथापि शलमोनाने नीतीसूत्रे २३:२३ मध्ये म्हटले: “सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे विकू नको.”
तुम्ही थट्टेखोरपणे विचाराल: “सत्य व ते विकत घ्या?” होय पवित्रशास्त्र येथे एकाद्यास सत्य, सुज्ञता व समज केवळ किंमतीवरच मिळतात यास रसिकता दाखविण्याची आम्हास मदत करते. तथापि, सत्य ही कल्पनेपलीकडील मोलवान उपयुक्त गोष्ट आहे. ती तशी आहे याविषयी शलमोन उपदेश करतो, “ते विकू नको!” हे जणू, त्याच्या मोलासोबत कांहीही तुल्य होऊ शकत नाही असे म्हणण्याजोगे आहे.
‘परंतु सत्य काय आहे?’ पिलाताप्रमाणेच हाच प्रश्न पुष्कळजण विचारतात. पुष्कळासाठी “सत्य” हे न मिळणारी गोष्ट आहे. उदाहरणार्थ विचार करा एका वेळेस अल्बर्ट आइनस्टीन म्हणाले: “‘विज्ञान शास्त्रीय सत्य’ या संज्ञेला अचूक अर्थ जोडणे हे दिव्य आहे.” अशाप्रकारे ‘सत्य’ शब्दाचा अर्थ अनुभवाची वस्तुस्थीती, गणित सिद्धान्त किंवा विज्ञान शास्त्रीय सिद्धन्ता सोबत आम्ही संबंध ठेवतो तर बदलतो. ‘धार्मिक सत्य’ मला काहींच स्पष्ट करीत नाही.” (आयडीयाज ॲन्ड ओपिनिअन्स, अल्बर्ट आइनस्टीन लिखीत) सत्य आइनस्टीनला गवसले नाही याचा अर्थ ते तुम्हापासून चुकावे काय? मुळीच नाही.
येशूने स्पष्टपणे म्हटले: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.” (योहान १४:६) होय, पापी मानवजातीचा खंडणीदाता, देवाच्या राज्याचा नेमस्त राजा, महायाजक व दुष्टांचा संहारक म्हणून भविष्यवादाची पुर्णता करणारे, त्याचे यहोवा देवाच्या उद्देशातील हे स्थान हे येशू ख्रिस्ता सभोवार केंद्रीत असणारे “सत्य” आहे. (रोम १५:८; १ तिमथ्यी २:५, ६; योहान ३:१६; इफिसकर १:२०–२२; दानिएल ७:१३, १४; मत्तय ६:९, १०; इब्रीकर ४:१४; प्रकटीकरण १९:११–२१; २ थेस्सलनीकाकरास १:७–९) पण कोणी हे “सत्य” कसे “विकत” घेऊ शकतो?
“ज्ञान घेणे”
एखादा येशूने योहान १७:३ मधील शब्द: “सार्वकालीक जीवन हेच आहे की तू जो एकच सत्य देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताविषयीचे ज्ञान संपादन करणे” या वचनाच्या अनुसरणाने सत्य विकत घेण्यास सुरवात करतो. व एखाद्याने हे स्वतःच करायचे असल्यास कठीण लक्ष्य ठरेल. पहिल्या शतकात एक कुशी षंढ अथवा न्यायालयीन अधिकारी होता ज्याने हेच करण्याचा प्रयत्न केला होता. पवित्रशास्त्रीय अवघड भविष्यवादाचा अभ्यास करीत असलेल्या षंढास पाहून, सुवार्तिक फिलीप्पाने विचारले, “तुम्ही जे वाचीत आहात ते तुम्हास खरंच समजते का?” यास त्या गृहस्थाने उत्तर केले, “कोणीतरी मार्गदर्शन केल्याशिवाय ते मला कसे समजेल?” (प्रेषितांची कृत्ये ८:२८–३१) कदाचित तुम्हास ही हेच वाटेल.
यास्तव यहोवाचे साक्षीदार तुम्हास तुमच्या घरात पवित्रशास्त्र अभ्यास सादर करतात.a तो अभ्यास मोफत आहे. “तुम्हास मोफत मिळाले, मोफत द्या” असे येशू म्हणाला. (मत्तय १०:८) परंतु सत्य विकत घेणे हे तुम्हास इतर मार्गी खर्चिक पडेल—त्यास तुमचा वेळ व परिश्रम आवश्यक आहेत. हे लक्षात ठेवा की येशू ख्रिस्त—जो स्वर्गात जिवंत व क्रियाशील आहे तरी—तो तुम्हास सत्य शिकण्यास मदत करू इच्छितो. (पडताळा लूक ५:१३) त्याने त्याच्या प्रथमच्या शिष्यांना अभिवचन दिले की देवाचा आत्मा त्यांना “सर्वांना सत्यामध्ये” मार्गदर्शन करील. (योहान १६:१३) विस्तारितपणे हे तुम्हासही लागू होऊ शकते. यास्तव सत्य शिकणे फारच अवघड अशातील भाग आहे असे स्वतःस वाटू देऊ नका.
पवित्र शास्त्राचा गंभिर अभ्यास हा यहोवाच्या साक्षीदारांनी प्रसिद्ध केलेल्या पवित्रशास्त्र मार्गदर्शकांच्या सहाय्याने अगदीच सोपा करून ठेवला आहे. नमुन्यादाखल या प्रकाशनातील कांही थोडक्यांची नावे देणे सत्याच्या प्रांजळ शोधकांची क्षुधा प्रदिप्त करील: सत्य जे चिरकालीक जिवनाप्रत निरविते, यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरेडाईज ऑन अर्थ्, सर्व्हायव्हल इन टू ए न्यू अर्थ, युनायटेड इन वर्शिप ऑफ द ओन्ली ट्रू गॉड, लाईफ—हाव डीड इट गेट हिअर? बाय इव्हॉल्यूशन ऑर बाय क्रिएशन?b
प्रकाशनांचे उद्दिष्ट शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण समजेल अशा भाषाशैलीत करून केवळ तुमच्या विचारसरणीसच नव्हे तर अंतःकरणास अर्जविणे हे आहे. सत्याच्या मालिकेचा पुरावा हा त्यातील स्पष्टोक्तपणा, शोध व व्यवहारी सुचनात आहे. तुम्ही त्या प्रकाशनांच्या सहाय्याने पवित्रशास्त्रीय सत्य शिकण्यास सुरूवात कराल तेव्हा येशूने म्हटले होते: “तुम्हास सत्य समजेल व ते सत्य तुम्हास बंधमुक्त करील” याची रसिकता जाणाल. (योहान ८:३२) येथे उल्लेखलेला “सत्य” हा शब्द देवाचे सत्य लिखीत वचन—पवित्रशास्त्र यातून आताच आढळले त्या संपूर्ण ख्रिस्ती शिकवणूकीस सामावून आहे. (२ तिमथ्यी २:१५; इफिसकर १:१३) सत्याचे वचन शिकणे एवढे बंधमुक्त करणारे असे का आहे?
उदाहरणार्थ “मरणाचे भय” याने मानवजातीस “त्यांच्या संपूर्ण आयुष्यात दास करून ठेवले” याचा विचार करा. (इब्रीकर २:१५) हे यामुळेच की बहुतेक लोक मरणानंतर स्वर्गिय सुखातील आशेचा संदिग्ध दावा करतात. तथापि, पवित्रशास्त्रीय सत्य या उद्विग्न भयापासून एकाद्यास बंधमुक्त करते. “मृतास तर कशाचीही मुळीच जाणीव नसते” यावरून मृत अग्नीमय जागेत त्रास सहन करीत नाहीत हे तो शिकतो. (उपदेशक ९:५, १०; तसेच स्तोत्रसंहिता १४६:४; उपदेशक ३:१९, २० पहा) मनुष्याने मरावे व स्वर्गाकडे धूम ठोकावी ही त्याच्याठायीची उपजत भावना नाही हे सुद्धा पवित्रशास्त्र सांगते. याच्या विरोधात देवाने “मानवाच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना,” साधारण मानवाठायी चिरकालीक जिवंत राहाण्याची इच्छा रोपली आहे.—उपदेशक ३:११; तसेच रोमकर ५:१२; ६:२३ पडताळा.
ती मनिषा पवित्रशास्त्र म्हणते त्या “नविन पृथ्वीत” पूर्ण होईल. (२ पेत्र ३:१३; पडताळा मत्तय ६:९, १०.) येशूने निदर्शित केले होते की जे “नविन पृथ्वीत” जीवन प्राप्त करतील ते “नंदनवनाचा” आनंद लुटतील! (लूक २३:४३) इतर शास्त्रवचने, जग त्रास व अश्रूपासून मुक्त असेल याची रसिकता जाणण्यास आम्हास मदत करतात! (प्रकटीकरण २१:४; यशया ११:६–९) ही आशा तुमचे जीवन कसे बदलवू शकते याचा विचार करा! परंतु प्राथमिकतेत तुम्ही ज्ञान घेतले पाहिजे.
गर्वाचे बलीदान
पवित्रशास्त्र स्तोत्रसंहिता २५:९ मध्ये म्हणते: “तो नम्र जनास न्याय पथाला लावतो; तो दीनांस आपला मार्ग शिकवितो.” देव जे अहंम व गर्विष्ठ आहेत त्यांना सहजगत्या सत्य देत नाही. “देव गर्विष्ठांचा विरोध करतो तर नम्र जनावर कृपादृष्टी करतो.” (१ पेत्र ५:५) पंतय पिलात हा कमीत कमी सत्याविषयी चौकस होता. परंतु पुरातन लेखक पिलाताचे वर्णन मगरूर मनुष्य म्हणून करतात. रोमी लोक यहुदी लोकाकडे नीच, नविन धर्म म्हणून पहात व त्यांना त्यास पायदळी राखणे बरे वाटे. गर्व व राजकीय महत्वकांक्षा पिलातास अडखळण झाली.—नीतीसूत्रे १६:१८.
सध्या पुष्कळजण यहोवाचे साक्षीदार आणीत असलेल्या संदेशाबद्दल चौकस आहेत. तथापि ते याची दखल घेतील की यहोवाचे साक्षीदार बहुतेक गरीब, त्यांच्या विनयशील सभांची ठिकाणे (राज्य सभागृहे) ख्रिस्ती राष्ट्रसमुहाच्या चर्चेसच्या दिमाखापुढे फिकी आहेत, बोटावर मोजण्या एवढेच साक्षीदार प्रगत शिक्षणाची फुशारकी मारू शकतात. परंतु पवित्रशास्त्र १ करिंथकर १:२६–२९ मध्ये काय म्हणते याची दखल घ्या: “तर बंधुजनहो तुम्हास झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळजण नाहीत; तरी ज्ञान्यास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मुर्खपणाचे ते निवडले, व जे बलवान त्यांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडिले; जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरीता निवडिले की जे आहे ते त्यांनी रद्द करावे; म्हणजे देवापुढे कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये.”
अशाप्रकारच्या ‘हलक्या जना’पासून शिकण्यास तुमच्या गर्वाची किंमत मोजावी लागेल. परंतु ती सत्यासाठी दिलेली महागडी किंमत आहे का?
ज्ञान क्रियेत आणणे
केवळ माहिती—सत्य घेणे—एवढेच पुरेसे नाही. यामुळेच आम्हास ‘सुज्ञता विकत’ घेण्यास आर्जविले आहे. (नीतीसूत्रे २३:२३) ज्ञान कृतीत आणणे ही सुज्ञता आहे! वस्तुतः शलमोनाने म्हटले की “सुज्ञता सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे.” (नीतीसूत्रे ४:५–७) होय, कार्यात प्रवर्तित होत नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग तरी काय? यास्तव देवाचे मार्ग, आज्ञा, कायदा स्मरणिका व सूचना शिकल्यानंतर त्या तुमच्या जीवनात कार्यरत करा. येशू म्हणाला: “सुज्ञता आपल्या कृत्याने न्यायी ठरते.”—मत्तय ११:१९.
पंतय पिलाताने सत्य धिक्कारले. तथापि, तुम्ही ती चूक करू नका. गर्व, महत्वाकांक्षा, किंवा कांही अशास्त्रीय प्रकारावरील प्रेमामुळे सत्य हातचे जाऊ देऊ नका, ते मुर्खपणाचे ठरेल. स्तोत्रकर्त्याप्रमाणे बना, ज्याने प्रार्थिले होते: “मला समज दे म्हणजे मी वाचेन.” (स्तोत्रसंहिता ११९:१४४) होय, जो कोणी सत्य व सुज्ञता प्राप्त करण्याची किंमत देऊ इच्छितो तो “वाचेल” व जो त्यांना विकत घेईल त्याला “खात्रीने जीवन व यहोवाची दया प्राप्त होते.”—नीतीसूत्रे ८:३५.
यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्रशास्त्र अभ्यास करण्यास सुरु केलेला एक मनुष्य म्हणतो: “सत्याने आमचे जीवन बदलविले असे म्हणणे आशिर्वादाचे आहे.” ते तुमचेही बदलू शकेल. यास्तव सत्य हातचे जाऊ देऊ नका! सत्य, सुज्ञता व समज विकत घेण्याची ही अद्वितीय संधी घ्या. असे करण्याचा तुम्हास केव्हांही पस्तावा होणार नाही.
[तळटीपा]
a पवित्रशास्त्र अभ्यासाची तुम्ही इच्छा करता तर या मासिकाच्या प्रकाशकांना मनमोकळेपणाने लिहा. तुमच्या घरी भेट देण्यास प्रशिक्षित सेवकाची योजना करण्यास आम्हास आनंद वाटेल.
b वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्कने प्रसिद्ध केलेली.
[४ पानांवरील चित्रं]
गर्वाने पंतय पिलातास सत्य हातचे जाऊ देण्यात प्रवृत्त केले