वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ५/१ पृ. ३
  • तुम्ही सत्य हातचे जाऊ देता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही सत्य हातचे जाऊ देता का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • पिलाताकडून हेरोदाकडे आणि परत पिलाताकडे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • स्वाधीन केले व खिळण्यासाठी नेले जाते
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • गुलगुथा इथे येशूचा मृत्यू
    बायबलमधून शिकू या!
  • सत्य हातचे जाऊ देऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ५/१ पृ. ३

तुम्ही सत्य हातचे जाऊ देता का?

अमेझोन अरण्यात जबरदस्तीने उतरविल्यानंतर, बहुतेक प्रवाश्‍यांनी त्या भूप्रदेशाकडे लक्ष दिलेच नसावे. पण तेच एका शांत निरिक्षकाच्या बाबतीत तसे नव्हते! तो भूगर्भशास्त्रज्ञ होता, व त्याने ज्यावर हेलीकॅप्टर उतरले होते ती जागा एवढी वैराण कशी होती याची दखल घेतली. संधी दवडण्याऐवजी त्याने त्या निर्जन जागेवर सुक्ष्म दृष्टी टाकली. थोडक्यात वेळेत त्याने ताडले की इतरांना निर्जन वाटेल पण ती जगातील खनिज संपत्तीचा ठेवा असणारी—लोह माती, बॉक्साईट मॅगॅनीझ, तांबे व सोने यांची जिला एके दिवशी “खनिजांची खाण” म्हणून गौरविले जाईल अशी जागा होती.

संधी न दवडणारी व सत्याकडे पाठ न फिरविणारी व्यक्‍ति बहुधा दुर्मिळ असते. उदाहरणार्थ आमच्या समान शकाच्या पहील्या शतकातील पंतय पिलात विचारात घ्या. त्याच्या समोर अतुलनिय संधी ठेवली होती. यहुदी नेत्यांनी त्याच्या हाती त्यापुर्वी पृथ्वीवर कोणीही होऊन गेला नाही, त्या सत्याच्या थोर शिक्षकास, येशू ख्रिस्तास दिले होते. त्याला पिलात विचारू शकला असता त्या प्रश्‍नांचा विचार करा! चित्तवेधकपणे, प्रथम त्यांनी येशूस त्याच्या समोर “यहुद्यांचा राजा” असल्याचा दावा करतो ह्‍या आरोपाने दाखल केले, तेव्हा पिलात निदान चौकस वाटला:

“तू यहुद्यांचा राजा आहेस का?” असे पिलाताने विचारले.

त्याच्या उत्तरात येशू म्हणाला: “माझे राज्य या जगाचा भाग नाही . . . मी सत्याविषयी साक्ष देण्यासाठी जन्मलो आहे व जगात आलो आहे. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” हीच पिलातासमोरची सुवर्णसंधी होती. त्याच्यासमोर उभा होता त्याच मनुष्याचे जीवन देवाच्या सत्याच्या अभिवचनाची जिवंत ग्वाही होती. जो मनुष्य इतर कोणीही मनुष्य स्पष्ट करू शकणार नव्हता तेवढे करण्यास समर्थ व इच्छूक होता. तथापि पिलाताचे उत्तर काय होते? “सत्य काय आहे?” आणि तो अचानकपणे “यहुद्यांकडे पुन्हा बाहेर निघून गेला.”—योहान १८:३३–३८.

होय, पिलाताने सत्य हातचे जाऊ दिले. सध्याही पुष्कळ तीच चूक करतात. तुम्ही वाचत असलेले नियतकालीक, टेहळणी बुरुज हे लोकांना सत्याविषयी स्पष्टीकरण करण्यास प्रसिद्ध केले आहे. तरी ते वाचण्याचे सुद्धा पुष्कळजण नाकारतात. इतर वाचतात व लेखांचा आनंद लुटतात पण त्यापुढे कांही जात नाहीत. असे लोक पिलाताप्रमाणे सत्य हातचे जाऊ देणारे असे होऊ शकतील का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा