वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ७/१ पृ. १४-१९
  • सचोटी राखणाऱ्‍यांसाठी सांत्वन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सचोटी राखणाऱ्‍यांसाठी सांत्वन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कारण कोण व आश्रयदाता कोण ते लक्षात घ्या
  • सचोटी रक्षकांकरवीचे आम्हाला प्रोत्साहन
  • उपयशी न ठरणारे सांत्वन
  • देवाच्या वचनाकडून सांत्वन मिळविणे
  • सांत्वनदात्या देवावर आत्मविश्‍वास ठेवा
  • सचोटी राखण्याद्वारे यहोवाचे अंतःकरण आनंदी करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • तुम्ही तुमची सचोटी जपाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • आपली सचोटी कायम का राखावी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • आपण तर यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ७/१ पृ. १४-१९

सचोटी राखणाऱ्‍यांसाठी सांत्वन

“मला तर, तू माझ्या सचोटीत स्थिर राखले आहे.”—स्तोत्रसंहिता ४१:१२.

१. यहोवाच्या लोकांना सांत्वनाची का गरज आहे?

यहोवाचे सचोटी रक्षक साक्षीदार छळाचे लक्ष्य असल्यामुळे त्यांना सांत्वनाची गरज आहे. अर्थात, त्यांनी अशा परिक्षांची अपेक्षा धरलीच पहिजे, कारण येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना म्हटलेच होतेः “दास धन्यापेक्षा मोठा नाही हे जें वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील.” (योहान १५:२०) खासपणे आज यहोवाच्या लोकांना सांत्वनाची मोठी गरज आहे. ते का बरे? कारण मूळचा सचोटी भंजक दियाबल सैतान याला खाली पृथ्वीच्या परिसरात टाकण्यात आले असून त्याचा फारच थोडा काळ राहिला आहे. या कारणास्तव तो देव आणि त्याचे सेवक यांच्याशी लढत देण्यात आपली शेवटली शर्थ करीत आहे.—प्रकटीकरण १२:७–९, १०.

२. समविश्‍वासूंच्या त्रासाबद्दल ख्रिश्‍चनांना कसे वाटते?

२ बंदिसत्राखाली राहून कार्य करणाऱ्‍या तसेच छळकर्त्यांकरवी दहशती व वाईट वागणूकीचा सामना करणाऱ्‍या आमच्या बंधूभगिनींसाठी आम्ही यहोवाचे सेवक या अर्थी कळकळीची प्रार्थना करतो. (प्रे. कृत्ये १२:१; २ थेस्सलनीकाकर १:४) धर्मत्यागी व इतर लोकांकरवीच्या निंदेत विश्‍वासूपणे टिकून राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांचे आम्ही अभिनंदन करतो. (मत्तय ५:११) शिवाय नातेवाईकाकडून वा धार्मिक बाबतीत विभाजित घरात राहणाऱ्‍यांकडून उभ्दवणाऱ्‍या विरोधाला तोंड देणाऱ्‍या आमच्या समविश्‍वासू बांधवाबद्दल आम्हाला प्रेमळ कळकळ वाटते. (मत्तय १०:३४–३६) अशाच प्रकारे, अपंगत्व आणि दीर्घकाळ आजाराशी सामना देत आपली सचोटी राखणाऱ्‍यांबद्दलही आम्हाला बरेच उचंबळून येते. खरेच, एवढा हा त्रास का? आणि सचोटीच्या स्त्री पुरुषांसाठी कोणते सांत्वन आहे?

कारण कोण व आश्रयदाता कोण ते लक्षात घ्या

३. सैतान छळाचा वापर काय करण्यासाठी करीत असतो?

३ माध्यम मानवी असो की दुरात्मिक, त्याद्वारे दियाबल ख्रिश्‍चनांना ‘गिळण्याच्या’ प्रयत्नात असतो. (१ पेत्र ५:८) होय, सैतान छळ व इतर अडचणींद्वारे आमचे यहोवा देवाबरोबरील नाते भंगविण्याच्या व आम्हास बेईमान असे सचोटी भंजक असणारे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. पण मग, या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला काहीही संरक्षण नाही का? मुळीच नाही!

४. छळ व इतर प्रतिकूल परिस्थितींचा सामना करतेवेळी सचोटी रक्षकांना कशाची खात्री बाळगता येईल?

४ आम्ही यहोवाकडे प्रार्थनापूर्वक त्याच्या मदतीचा शोध घेतला तर तो आमचा आश्रयदाता होईल. छळ व इतर प्रतिकूल परिस्थितींनी आम्ही घेरले जाऊ त्यावेळी स्तोत्रकर्त्या दावीदाप्रमाणेच आम्हाला त्याला याचना करता येईल: “हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. माझा जीव तुझा आश्रय करतो. ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन.” (स्तोत्रसंहिता ५७:१) सचोटी रक्षक या अर्थी आम्हाला खात्री राहील की आमचा आश्रयदाता यहोवा याच्याकडून मुक्‍तता ही नियुक्‍त वेळी येईल. शिवाय दावीदाने देवास प्रार्थना केली तेव्हा तो जसा आत्मविश्‍वासू बनला त्याप्रमाणेच आम्हाला होता येईल. कारण तो म्हणाला: “मला तर, तू माझ्या सचोटीत स्थिर राखले आहे.”—स्तोत्र संहिता ४१:१२.

५. छळग्रस्त ख्रिश्‍चनांना कोणत्या गुणाची आवश्‍यकता आहे व आम्हा सर्वांनाच कोणती आशा आहे?

५ तथापि, छळ हा काही काळ टिकणारा असतो म्हणून आम्हाला सहनशीलतेची वाढ करण्याची गरज आहे. प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना आर्जविले की त्यांनी “पूर्व काळचे दिवस आठवा[वे], त्यामध्ये . . . [त्यांनी] दु:खाबरोबर फार धीराने झोंबी केली” होती. त्याने पुढे लिहिले: “तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती मिळवून घ्यावी म्हणून तुम्हाला सहनतेचे अगत्य आहे.” (इब्रीयांस १०:३२–३६) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी देवाच्या वचना नुसारची फलप्राप्ती स्वर्गातील अमर जीवन प्रदान करील. पण “मोठ्या लोक समुदाया” साठी हे प्रतिफळ पृथ्वीवरील नंदनवनातील चिरकालिक जीवनाचे भवितव्य आहे. (प्रकटीकरण ७:९; लूक २३:४३) जे शेवटपर्यंत सचोटी रक्षक या नात्याने आपली सहनशीलता दाखवितात अशा सर्वांनाच चिरकालिक जीवनाची तारण प्राप्ती खरेपणाने शक्य आहे.—मार्क १३:१३.

६. यहोवाच्या साक्षीदारांपैकी काहींना सहनतेचे खास अगत्य का आहे आणि त्यांना कोणती मदत आहे?

६ काही देशातील यहोवाच्या साक्षीदारांना खासपणे ‘सहनतेच्या अगत्या’ ची काही दशके जरूरी भासली. ते का? कारण त्यांच्यापैकी काहींना आपली पवित्र सेवा कठीण क्षेत्रे वा विविध अडचणी आणि सरकारी बंदिसत्रात चालू ठेवावी लागली. कदाचित तुम्हालाही प्रत्याक्षात ढासळलेले आरोग्य किंवा तुमच्या ख्रिस्ती कर्तव्यास होत असणारा कुटुंबाचा विरोध यांचा सामना करावा लागला असेल. मानवी बळावर विसंबून राहणाऱ्‍यांना अशा परिक्षांनी नक्कीच स्तब्ध केले असते पण त्या यहोवाच्या साक्षीदारांस थांबवू शकत नाहीत, कारण “आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो यहोवा त्याच्यापासून [त्यांना] साहाय्य येते.”—स्तोत्रसंहिता १२१:१–३.

७. (अ) सतत चालू असणाऱ्‍या परिक्षा आम्हाला कोणत्या सुसंधि देतात? (ब) पौलाने फिलिप्पैकर ४:१३ मध्ये जे म्हटले त्यावर आम्ही का विश्‍वास ठेवू शकतो?

७ काही प्रकरणात ही सहनता या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीपर्यंत टिकवावी लागेल. तरीपण सातत्याने येत राहणाऱ्‍या परीक्षा आमची देवास असणारी सचोटी सिद्ध करण्याच्या व त्याचे अंतःकरण आनंदी करण्याच्या सुसंधि देत राहतात. (नीतीसूत्रे २७:११) याच वेळी विश्‍वासूपणे सहन करीत राहण्यासाठी आवश्‍यक असणारे बळ यहोवा देतो. प्रेषित पौलाने लिहिले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) या खात्रीदायक शब्दावर तुम्हाला विश्‍वास ठेवता येईल कारण ते “जगातील तुमच्या सर्व बंधुवर्गा”च्या बाबतीत सत्य होत आहेत.—१ पेत्र ५:९, १०.

सचोटी रक्षकांकरवीचे आम्हाला प्रोत्साहन

८. विभाजित घरातील सचोटी रक्षकांना कसा आशीर्वाद मिळतो ते विवेचीत करा.

८ ‘जगातील आमच्या सर्व बंधुवर्गाकरवी’ सचोटी राखली जात आहे हे पाहणे आमच्या साठी मोठ्या उत्तेजनाचा उगम ठरते. विभाजित घरात यहोवास आपली सचोटी प्रदर्शित केल्यामुळे काहींना समृद्धपणे आशीर्वाद मिळाला. उदाहरणार्थ, आयर्लंडमध्ये एका कॅथोलिक स्त्री सोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करण्यात आला त्या वेळी तिच्या पतीने फारच कटु विरोध दर्शविला आणि तिला सुटपत्र देण्याची धमकीही दिली. तरीसुद्धा तिने आपला अभ्यास जारी ठेवला आणि एके दिवशी तिने आपल्या पतीला यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ्‌ हे पुस्तक दिले. या पुस्तकातील स्पष्टता, स्पष्टवक्‍तेपणा आणि सुंदर चित्रे पाहून तो भारावला गेला. लवकरच त्यानेही या पुस्तकाच्या मदतीने पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला. त्याने धुम्रपान सोडून दिले व काही अवधीतच त्या जोडप्याने कॅथोलिक चर्चला राजीनामा दिला आणि आपल्या घरातील तथाकथित पवित्र चित्रे काढून टाकली. यानंतर लगेचच त्या स्त्रीने बप्तिस्मा घेतला व ती साहाय्यक पायनियरींगच्या कार्यात सहभागी झाली. तिचा पतीही उपाध्यपणात सुंदर प्रगति करीत राहिला. असे अनुभव विभाजित घरात सचोटी रक्षक अर्थी टिकून राहणाऱ्‍यांकरता खऱ्‍या उत्तेजनाचे ठरतात.—१ करिंथकर ७:१२–१६.

९. अपंग सचोटी रक्षक इतरांना कशी मदत करू शकतात?

९ अपंगत्व असले तरी सचोटी रक्षक विश्‍वासू असल्याचे सिद्ध झाले. ब्रिटनमध्ये चाकाच्या गाडीचा सर्वदा आश्रय घ्याव्या लागणाऱ्‍या एका अपंग ख्रिश्‍चनास आपल्या उपाध्यपणात समाधान मिळत आहे. त्याने लिहिले: “१९४१ पासून मी प्रापंचिकरित्या बेकार राहिलो तरी यहोवाला आतापर्यंत माझा वापर करून घेण्यात संतोष वाटला. त्यामुळेच वर्षे जणू भरकन्‌ निघून गेली. मला शिकण्यास मिळाले की अपंगाचाही दुसऱ्‍याच्या कामी मोठा उपयोग होऊ शकतो. मी व माझी बायको मंडळीत पुष्कळांसाठी नांगरासारखे आहोत. आमच्या सद्य स्थितीमुळे आम्ही नेहमीच तयार, नेहमीच उपलब्ध असतो.” होय, कोणा अपंग ख्रिश्‍चानाने निराश होऊ नये कारण तो किंवा ती दुसऱ्‍यांना उत्तेजनाचा उगम ठरू शकतो.

१०. छळात हार न मानल्यामुळे सचोटी रक्षक आपल्या समविश्‍वासूंना कशी मदत देतात?

१० सचोटी रक्षक छळापुढे नमत नाहीत. ख्रिस्ती तटस्थता राखल्यामुळे तुरुंगवास भोगणाऱ्‍या एका बांधवाने म्हटले: “मारहाण . . . माझ्या जीवनाचा नित्याचा भाग बनला. मारहाणीचा प्रकार खूप कडक बनला व मारांची संख्याही वाढली. मला कधी कधी आहारापासून वंचित राहावे लागले त्यामुळे मी दिवसेंदिवस अशक्‍त होत होतो. मी यहोवाला नित्य प्रार्थना करीत राहिलो आणि मी म्हणू शकतो की त्याने मला कधीही एकटे सोडले नाही. जितके अधिक ते मला मारीत तितकी मला कमी संवेदना वाटत होती.” (यशया २:२–४; योहान १५:१९) अशा प्रकारच्या अनेक सचोटी रक्षकांनी अशीच भूमिका घेतली. असे हे सचोटी रक्षण खरोखर प्रोत्साहनयुक्‍त उदाहरण आहे व ते विश्‍वासूंना विश्‍वास राखण्याची चालना देते.

उपयशी न ठरणारे सांत्वन

११. सांत्वनाबाबतीत कोणती शास्त्रीय अभिवचने ख्रिश्‍चनांना आहेत?

११ वर नूमद असणारे अनुभव हे त्या अगणित अनुभवातील आहेत जे यहोवा आपल्या विश्‍वासू लोकांसोबत असतो हे सिद्ध करतात. तो “करूणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव . . . सर्व संकटात आमचे सांत्वन करतो.” (२ करिंथकर १:३, ४) होय, “देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.” (स्तोत्रसंहिता ४६:१–३) आम्हाला तसेच आमच्या सम विश्‍वासू बांधवांना आमच्या सर्व संकटात तो साहाय्य करील हे जाणणे केवढे सांत्वनकारक आहे बरे!

१२. पौलाचा सचोटी रक्षणाचा मार्ग सह ख्रिश्‍चनांसाठी कसा परिणामकारक ठरला?

१२ यहोवाची भक्‍ती करणारे आमचे सह उपासक निष्ठावंत ख्रिस्ती या नात्याने विविध त्रासात टिकून आहेत हे पाहून आम्हाला धैर्य मिळते. प्रेषित पौलाचा विश्‍वासूपणा निरखून इतरांच्या बाबतीत अगदी हेच घडले. त्याने लिहिले: “मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनी भूत झाल्या . . . सर्व जणात माझी बंधने . . . प्रसिद्ध झाली; आणि त्यांची खातरी पटून बहूतेक बंधूनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठायी देवाचे वचन निर्भयपणे सांगवयास अधिक धाडस केले.”—फिलिप्पैकर १:१२–१४.

१३. आमचे स्वतःचे सचोटी रक्षण कोणता परिणाम घडवते?

१३ होय, यहोवा देवाचे इतर साक्षीदार छळामध्ये त्याला आपली सचोटी दाखवून आहेत असे कळते तेव्हा आम्हालाही विश्‍वासू राहण्यास बळ मिळते. उलटपक्षी, आम्ही स्वत: परीक्षेत आपली सचोटी टिकवितो तेव्हा आम्ही इतरांना देवाचे वचन निर्भयपणे सांगण्याचे प्रोत्साहन देतो. आमचा विश्‍वासूपणा इतरांच्या प्रोत्साहन व आशीर्वादाला कारणीभूत होत आहे हे जाणणे आम्हाला खरी तृप्ती देते.

१४. कोणत्या दोन मार्गाद्वारे यहोवा आमचे सांत्वन करतो?

१४ यहोवा आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला टिकवून ठेवतो. खरे पाहता, पेत्राने लिहिले: ‘ख्रिस्ताच्या नामामुळे आमची निंदा होत असल्यास आम्ही धन्य आहो. कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा आम्हावर येऊन राहिला आहे.’ (१ पेत्र ४:१२–१६) आमच्या व आमच्या त्रासलेल्या समविश्‍वासूंच्या प्रार्थनांना उत्तर देऊन यहोवा देव सांत्वन देतो. “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका” असे पौलाने लिहिले: “तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंति करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) “प्रार्थना एकणाऱ्‍या” वर तुमची अशीच श्रद्धा आहे का?—स्तोत्रसंहिता ६५:२.

देवाच्या वचनाकडून सांत्वन मिळविणे

१५. रोमकरास १५:४ ची सत्यता तुम्ही कशी विदारीत करू शकाल?

१५ देवाचे पवित्र वचन हे सुद्ध सांत्वनाचा मोठा उगम आहे. प्रेषित पौलाने म्हटले होते: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या सांत्वनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले.” (रोमकर १५:४) उदाहरणार्थ, इस्राएल लोकांची मिसरातून जी अद्‌र्भित मुक्‍तता झाली तसेच एस्तेर राणीच्या काळी यहुद्यांना कसे संरक्षण मिळाले त्याबद्दल आम्ही वाचन करतो तेव्हा यहोवा हा अतुलनीय मुक्‍तिदाता आहे असा आमचा आत्मविश्‍वास बळावत नाही का? मोठ्या संकट प्रसंगी इयोबाने जे आपले सचोटी रखण केले त्या अहवालाबाबत काय? याद्वारे हेच चित्रित होते की देव जे बळ देतो त्याकरवी त्याचे आधुनिक काळचे सेवक त्रासात टिकून राहू शकतात. “शास्त्रापासून मिळणाऱ्‍या सांत्वनाच्या योगे” सचोटी रक्षक आशा व धैर्याने खरेच भारावले जावू शकतात.

१६. पहिले पेत्र ५:६, ७ व १ करिंथकर १०:१३ कोणती सांत्वनदायक अभिवचने देतात?

१६ पण तेच आमची समस्या आम्हाला खिन्‍न करीत असेल तर काय? शास्त्रवचनातील सांत्वनदायक अभिवचने आम्हाला यहोवाच्या काळजीत सुरक्षित ठेवून आमच्या खिन्‍नतेवर मात करण्यास मदत देतात. प्रेषित पेत्राने लीहिले: “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्‍यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी वाहतो.” (१ पेत्र ५:६, ७) होय, यहोवा “तुमची काळजी वाहतो.” केवढा सांत्वनदायक विचार! त्याला दिसू शकत नाही वा त्याच्या आवाक्याबाहेर आहे असे काहीही घडू शकत नाही. याशिवाय पौलाने ही आणखी हमी दिली: “देव विश्‍वसनीय आहे. तो तुमची परिक्षा तुमच्या शक्‍तिपलीकडे होऊ देणार नाही तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील; ह्‍यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” (१ करिंथकर १०:१३) सचोटी रक्षणाचा निश्‍चय राखला तर या अनुभवाकरवी बरेच काही शिकता येईल.

१७. आम्हास सांत्वन देणाऱ्‍या आणखी कोणत्या तरतूदी आहेत?

१७ देववचन आणि “विश्‍वासू व बुद्धीमान दास” याद्वारे पुरविण्यात आलेली ख्रिस्ती प्रकाशने यांचे प्रार्थनापूर्वक मननशील वाचन संकटकाळी आम्हास सांत्वन देऊ शकेल. (मत्तय २४:४५–४७; स्तोत्रसंहिता ११९:१०५) याचप्रमाणे मंडळीतील वडिलांकरवीचा दयाशील शास्त्रवचनीय उपदेश सांत्वनदायक ठरू शकतो. त्यांना “खिन्‍न जणांचे सांत्वन करा, अशक्‍तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा” अशी हाक आहे.—१ थेस्सलनीकाकर ५:१४.

१८. आम्हापाशी भौतिक सधनता अल्पप्रमाणात असली तर आम्हाला कोणते सांत्वन मिळणार?

१८ आमच्यापाशी भौतिक सधनता नाही तर आम्हास काय सांत्वन मिळणार? देवाच्या नवीन व्यवस्थीकरणात चांगली घरे, मुबलक अन्‍नसाठा आणि इतर भौतिक आशीर्वाद मिळणार हे जाणणे खरेच सांत्वनदायक आहे. (स्तोत्रसंहिता ७२:१६; २ पेत्र ३:१३; पडताळा यशया ६५:१७–२५.) तरीपण आत्ताचे ख्रिस्ती रहाणीमान घातक धुम्रपान, मद्यप्राशनाचा अतिरेक, जुगार इ. गोष्टीत पैसा उधळण्यास बांध घालते. याकरवी वाचविण्यात आलेला पैसा कुटुंबाच्या फायद्यास्तव वापरला जाऊ शकतो. देवाच्या वचनाचा अवलंब केल्यास अल्पा अशा भौतिक गोष्टीत तृप्ती राखण्यास मदत मिळते. पौल तसा होता, म्हणूनच तो म्हणाला: “चित्तसमाधानासह इश्‍वरी भक्‍ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणिले नाही; आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढयात तृप्त असावे.” (१ तिमथ्यी ६:६–८; फिलिप्पैकर ४:११, १२) यहोवाच्या सेवेत आम्हास प्राप्त असणाऱ्‍या हक्कावर आपली एकग्रता राखल्यास असे कित्येक आशीर्वाद मिळतात जे आम्हाला खरेच समृद्ध करतात.—नीतीसूत्रे १०:२२.

१९. दीर्घ आजारात कसे टिकून राहता येईल?

१९ तथापि, आम्ही दीर्घकाळापासून आजारी आहोत तर काय? यहोवाच्या मदतीने व त्याच्या वचनाकरवी मिळणाऱ्‍या सांत्वनाद्वारे ते सहन करता येते. उदाहरणार्थ, स्तोत्रकर्त्या दावीदाने म्हटले: “जो दिनांची चिंता वाहतो, तो धन्य! . . . तो रोगाने अंथरूणास खिळला असता यहोवा त्याला संभाळील.” (स्तोत्रसंहिता ४१:१–३) हा, अद्‌र्भित मार्गी बरे होण्याचा काळ नव्हे. पण यहोवा त्याच्या राज्याची आस्था प्रधान स्थानी ठेवणाऱ्‍या आजारी ख्रिश्‍चनांना त्यांच्या आजाराशी सामना करण्यासाठी आवश्‍यक सूज्ञान व बळ देतो.—मत्तय ६:३३; २ करिंथकर १२:७–१०.

२०. प्रियजन निवर्ततो त्यावेळी उद्‌भवणाऱ्‍या दुःखाशी आम्हाला कसा सामना करता येईल?

२० कोणी प्रियजन निवर्ततो त्यावेळी उद्‌भवणाऱ्‍या दुःखाशी आम्हाला कसा सामना देता येईल? पवित्र शास्त्रातील पुनरूत्थानाच्या आशेकरवी सांत्वन मिळू शकते. (योहान ५:२८, २९; प्रे. कृत्ये २४:१५) अशाप्रकारे, प्रियजनाच्या मृत्यूमुळे दुःखीत असलो तरी आम्ही “ज्यांना आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा . . . खेद” करीत नाही. (१ थेस्सलनीकाकर ४:१३) सचोटी रक्षकांना पुनरुत्थानाची आशा केवढे सांत्वन देते बरे!

सांत्वनदात्या देवावर आत्मविश्‍वास ठेवा

२१. छळामध्ये सहनता दाखवणे बहुधा कोणता परिणाम घडवते?

२१ “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा आपल्या समर्पित व निष्ठावंत लोकांना कधीही त्यागणार नाही याची खात्री असू द्या. (२ करिंथकर १:३; स्तोत्रसंहिता ९४:१४) ख्रिश्‍चनांनी छळामध्ये टिकून राहणे देवाचा सन्मान व गौरव करते हे आठवणीत ठेवणेही लाभदायक आहे. ही वागणूक लोकांचे लक्ष त्यांच्याकडे व ते करीत असलेल्या राज्यप्रचाराकडे वेधविते व बहुधा याचा परिणाम यहोवाच्या स्तुतिपाठकांच्या संख्येत मोठी वाढ होण्यात दिसून येतो.—पडताळा प्र. कृत्ये ८:४–८; ११:१९–२१.

२२. सचोटीच्या बाबतीत आमचा निर्धार काय असावा?

२२ यास्तव, आमची सचोटी भंगविण्याच्या सैतानाच्या योजनांपुढे नमते न घेण्याचा आमचा निर्धार देवाच्या मदतीनेच आपण पूरा करू या. विश्‍वास राखून यहोवावर भिस्त ठेवू या. तो आम्हाला आपले सेवक या अर्थी जे आशीर्वाद देतो, उंचावतो व सांत्वन देतो त्याकडे आम्ही कधीही दुर्लक्ष होऊ देऊ नये. त्याच्या सार्वभौमत्वास उंचावून धरून आपण त्याला व त्याच्या नीतीमान तत्वांना आपली निष्ठा व्यक्‍त करू या. शिवाय ही व्यक्‍तिगत बाब आहे हेही लक्षात ठेवा. आजच्या महत्वपूर्ण काळात यहोवाच्या संस्थेसोबत स्वतः कार्य करीत राहून इश्‍वरी इच्छेची परिपूर्ती करा. त्याला विश्‍वासू राहून यहोवाचे अंतःकरण आनंदी करण्याच्या तुमच्या हक्काचा आनंद माना; शिवाय हे कधीही विसरू नका की सर्व सचोटी रक्षकांना तो अपयशी न ठरणारे सांत्वन देत राहतो.

तुमचे उत्तर काय आहे?

◻ यहोवाच्या सेवकांना सांत्वनाची खास गरज का आहे?

◻ सैतान ख्रिश्‍चनांविरूद्ध छळाचा वापर का करतो?

◻ सचोटी रक्षक आम्हास कसे उत्तेजन देऊ शकतात?

◻ देवाच्या वचनातून आम्हाला कसे सांत्वन मिळवता येईल?

◻ १ पेत्र ५:६, ७ व १ करिंथकर १०:१३ मध्ये कशाची हमी आहे?

[१५ पानांवरील चित्र]

सैतान यहोवाच्या सेवकांना गिळण्यास बघतो, पण आम्ही संरक्षणाविना नाहीत

[१७ पानांवरील चित्र]

यहोवा सचोटी रक्षकांच्या प्रार्थनांना उत्तर देतो. तुम्ही नियमितरित्या प्रार्थना करता का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा