‘कोणा माणसाला तुम्हाला तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका’
“थट्टेची लालसा धरणाऱ्या . . . व दैहिक बुध्दीने उगीचच गर्वाने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका.” —कलस्सैकर २:१८.
१, २. पुष्कळांनी आपल्या सहमानवाच्या चिरकालिक कल्याणास प्रतिकूल ठरणाऱ्या गोष्टी विषयक कसे कार्य केले व पवित्र शास्त्रातून याबद्दलची आणखी उदाहरणे तुम्हाला सांगता येतील का?
हव्वा या पहिल्या आज्ञाभंजक स्त्रीला एका युक्तिबाज व अतिमानुष आत्मिक प्राण्याने मरणाप्रत निरविले. दुसरा पापी आदाम याला मानवानेच म्हणजे त्याच्या वायकोने भुरळ घातली.—१ तिमथ्यी २:१४; उत्पत्ती ३:१७.
२ ज्यांच्या आर्जवी भाषणाकडे लक्ष दिले तर त्याचा परिणाम सह मानवाच्या चिरकालिक कल्याणास प्रतिकूल ठरला त्या मालिकेत हव्वा पहिली होती. अशा या लोकांचे जे शब्द पवित्र शास्त्रभर निनादले आहेत त्याकडे लक्ष द्या! पोटीफरची बायको योसेफाला म्हणालीः “मजपाशी नीज.” (उत्पत्ती ३९:७) इयोबाची बायको: “देवाला शाप द्या व मरा!” (इयोब २:९) इस्राएलांनी अहरोनास म्हटले: “उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनीव.” (निर्गम ३२:१) पेत्राने येशू ख्रिस्तास म्हटले: “प्रभूजी, आपणावर दया असो. असे आपल्याला होणारच नाही.”—मत्तय १६:२२.
३. कलस्सैकर २:१८ मध्ये पौलाने कोणती ताकीद दिली व यामुळे कोणते प्रश्न सामोरे येतात?
३ अशा प्रकारची आर्जवी भाषणे बहुधा कोणा एका यहोवाच्या सेवकाच्या नाशास कारणीभूत ठरली. त्यामुळेच, ख्रिश्चनांचे “झगडणे . . . आकाशातील दुरात्म्यांबरोबर” असले तरी नेहमी सहमानवच त्वरित धोका निर्माण करणारे ठरतात. (इफिसकर ६:१२) याकारणास्तव प्रेषित पौलाने ताकीद दिली: “कोणा माणसाला तुम्हाला तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका.” (कलस्सैकर २:१८) हे बक्षिस कोणते? आणि काही यहोवाचे सेवक अपूर्ण मानवाच्या प्रभावापुढे शरणागत झाल्यामुळे त्याला का मुकले? याचे उत्तर पाहण्यासाठी, ज्यामुळे पौलाला ही ताकीद द्यावी लागली त्या कलस्सैमधील परिस्थितीचे आपण परिक्षण करू या.
४, ५. (अ) कलस्सैमध्ये कोणता धार्मिक प्रभाव अस्तित्वात होता? (ब) ज्ञेयवाद काय होता आणि त्याच्या प्रभावाने कोणता घातक परिणाम घडवून आणला असता?
४ कलस्सै हे धार्मिक दृष्टया जणू उकळते भांडे होते. त्यातील फ्रुगियन रहिवासी भावनाविवश लोक होते व ते भूतविद्या आणि मूर्तिपूजक अंधश्रद्धा यात खोलवर बुडाले होते. याशिवाय शहरात यहुद्यांचीही वसाहत होती जे अद्याप यहुदी धर्माशी निगडीत होते. कलस्सै शहराची समीपता व्यापारी मार्गावर होती त्यामुळे येथे पाहुण्यांचा ओघ वाढता होता. या विदेश्यांना आपला रिकामा वेळ काहीतरी नवलाईचे सांगावे व ऐकावे यात घालविण्याची आवड होती. (पडताळा प्रे.कृत्ये १७:२१) यामुळे नव्या तत्वज्ञानाचा प्रसार झाला ज्यात ज्ञेयवादी तत्वाचा हळूवार शिरकाव झाला. आर.इ.ओ.व्हाईट हे प्रामाण्य म्हणतात: “ज्ञेयवाद हा आजच्या उत्क्रांतीवादासारखा व्याप्तरितीने पसरलेला विचार प्रवाह होता. तो पहिले शतक वा त्या आधी मशहूर झाला असावा व त्याने आपले अस्तित्व दुसऱ्या शतकापर्यंत टिकविले. त्याने तात्विक निदान, अंधश्रद्धा, अर्ध–जादुगिरी मंत्र आणि कधी कधी तर विचित्र व ओंगळ अशा साम्यतेच्या प्रकारांनाही कवटाळले.”
५ अशा या वातावरणात कलस्सैमधील धर्म हा नित्य प्रयोगाचा प्रकार झाला ज्यात यहुदी धर्म, ग्रीक तत्वज्ञान आणि मूर्तिपूजक दंतकथा यांचे संकरित मिश्रण होत राहिले. तर अशा या उकळत्या भांडयात ख्रिस्ती धर्मसुद्धा टाकला जाणार का?
‘बक्षिसास मुकणे’—कसे?
६. (अ) प्रेषित पौलाचे शब्द मूर्तिपूजक तत्वज्ञान व यहुदी धर्म यांच्या प्रभावाविरूद्ध कसा प्रतिटोला ठरणार होते? (ब) ख्रिश्चनांनी ‘लक्ष देण्याची’ का गरज होती?
६ पौलाने कलस्सैकरास लिहिलेले जोरदार पत्र, यांनी यहुदी धर्म आणि मूर्तिपूजक तत्वज्ञानाची ख्रिस्ती धर्मात सरभेसळ करण्याची इच्छा धरली त्याच्या करता जोरदार प्रतिटोला लगावणारे ठरणार होते. या पत्रात पौलाने ख्रिस्ताकडे लक्ष वेधविले. त्याने लिहिले: “त्या ख्रिस्ता मध्ये [आणि कोणा यहुद्यात वा मूर्तिपूजक वेदांत्यात नव्हे] ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधि गुप्त आहेत.” कलस्सैकरांना “त्याच्या [ख्रिस्त] मध्ये चालत राह[ण्याचे], मुळावलेले, रचले जात असलेले . . . विश्वासात दृढ होत असलेले” राहण्यासाठी आर्जविण्यात आले. तसे न झाल्यास ते वाहवले जातील. याकरतातच पौलाने ताकीद दिली: “ख्रिस्ताप्रमाणे नव्हे, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेतले जाऊ नये म्हणून लक्ष द्या.”—कलस्सैकर २:३, ६–८.
७. (अ) काही ख्रिश्चनांना मूर्तिपूजक तत्ववेत्ते व यहुदी मतप्रणाल्याचे शिक्षण का अपीलकारक वाटले असावे? (ब) त्यांचे शिक्षण पोकळ भुलथापा का होत्या?
७ येशू ख्रिस्ताच्या काही नव्या अनुयायांना तत्वज्ञानाची चेतना व गुढार्थकतेची भव्यता नाही म्हणून चुकल्या सारखे वाटले असेल. काही यहुदी ख्रिश्चनांना यहुदी धर्मातील संपूर्ण सांप्रदायिक प्रथांच्या बाबतीत लळा वाटत राहिला असावा. त्यामुळे अशा विशिष्ठांवर मूर्तिपूजक तत्वज्ञानी आणि यहुदी मताधिकारी विशिष्ठ अपील करू शकणारे होते. तथापि या खोट्या शिक्षकांची मतप्रणाली कितीही पटण्याजोगी वा भव्य वाटली तरी ते “पोकळ भुलथापा” शिवाय चांगले काहीही सादर करू शकत नव्हते. देवाच्या शुद्ध वचनाचा विस्तार वदविण्याऐवजी ते “जगाचे प्राथमिक ज्ञान”—निरर्थक तत्वज्ञान, कल्पना आणि विश्वास यांची नुसती पोपटपंची करीत होते. त्या घातकी कल्पनांना कवटाळणे ख्रिश्चनांकरता नाश ओढावून आणणार होते. याकरताच पौलाने म्हटले की, “कोणा माणसाला तुम्हाला . . . तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका.”—कलस्सैकर २:१८.
८. (अ) “बक्षिस” कोणते होते आणि तुमच्या उत्तराला कोणत्या शास्त्रवचनांचा आधार आहे? (ब) अभिषिक्त ख्रिश्चनांना ‘बक्षिसा’पासून कसे वंचित केले जाऊ शकत होते?
८ ते “बक्षिस” स्वर्गातील अमर जीवन हे होते. त्याची तुलना अखंडीतपणे पायी केलेल्या शर्यतीनंतर विजेत्यास जे बक्षिस दिले जाई त्याच्या सोबत केली आहे. (१ करिंथकर ९:२४–२७; फिलिप्पैकर ३:१४; २ तिमथ्यी ४:७, ८; प्रकटीकरण २:७) केवळ यहोवा देवच येशू ख्रिस्तामार्फत एखाद्याला जीवनाच्या शर्यतीत नालायक ठरवू शकतो. (योहान ५:२२, २३) तरीसुद्धा कोणा खोट्या शिक्षकाने एखाद्या ख्रिश्चनाला आपल्या संरक्षणाखाली घेतले तर त्याला बक्षिसापासून वंचित ठेवले जाण्याचा परिणाम घडवला जाऊ शकत होता. यात फसवला गेलेला सत्यापासून इतका दूर जाण्याची शक्यता होती की त्याला शर्यत ही मध्येच संपवावी लागणार होती!
खोट्या शिक्षकांचे व्यक्तिमत्व
९. कलस्सैमधील खोट्या शिक्षकात व्यक्तिमत्वाची कोणती चार गुणलक्षणे दिसत होती?
९ जो ‘ख्रिश्चनाला बक्षिसास मुकवू देण्याच्या’ प्रयत्नात होता अशा व्यक्तिला ओळखण्याचे काही मार्ग होते का? होय, कारण पौलाने कलस्सैकरांना खोट्या शिक्षकांच्या व्यक्तिमत्व छटा पुरवल्या. असा हा माणूस (१) ‘थट्टेची लालसा धरणारा, देवदूता सारख्या भक्तिप्रकाराची आवड धरणारा’; (२) ‘स्वतःला दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणारा’; (३) ‘दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणारा’; (४) येशू ख्रिस्त या ‘मस्ताकाला धरून न राहणारा’ असा आहे.—कलस्सैकर २:१८, १९.
१०. खोट्या शिक्षकांनी ‘थट्टेची लालसा कशी धरली?’
१० केवढा हा युक्तिबाज डावपेच! थाटामाटाचा उपवासाचा विधि न करण्याच्या येशूच्या इशाऱ्याकडे लक्ष न देता खोट्या शिक्षकाने नम्रतेची अपीलयुक्त दर्शनीबाजू सादर केली. (मत्तय ६:१६) उपवास व स्वत्यागाच्या धार्मिक लक्षणांविषियी या खोट्या शिक्षकांने ‘थट्टेची लालसा’ धरली. (कलस्सैकर २:२०–२३) खोट्या धार्मिकतेची छटा बाहेर पडू नये याकरता तो अत्यंत काळजीने मौनतेचे म्लानमुख धारण करी. खरेच, हा खोटा शिक्षक “माणसांनी पहावे या हेतूने . . . आपले धर्माचरण” करीत होता. (मत्तय ६:१) पण हे र्सव ढोंग, “थट्टा” होती. एक्स्पोझिटर्स बायबल त्याविषयी म्हणते: “स्वतःस विनयशील, आत्मसंतुष्ट समजणारा माणूस आपले डोळे खाली करून स्वतःला आरशातून प्रतिबिंबित करतो तो विनयशील नसतोच.”—तिरप्या वळणाचे अवतरण आमचे आहे.
११. (अ) दिव्यदूतांची उपासना काय होती? (ब) कलस्सैमध्ये देवदूतांच्या उपासनेचा प्रकार चालू होता याला पुरावा काय?
११ तरीसुद्धा या ढोंगी विनयशील वृत्तीने आणखी एका हास्यास्पद प्रथेला दिखाऊ मान्यता मिळवून दिली होती, ती म्हणजे: “देवदूतांची उपासना.” ही उपासना नेमकी कशा पद्धतीने आचरली जाई ते पौल विवेचीत करीत नाही. तरीपण, पुरावा दाखवितो की हा खोट्या उपासनेचा प्रकार होता जो कलस्सैच्या परिसरात शतकांपर्यंत चालत राहिला होता. चवथ्या शतकात लावदेकिया येथे जवळपास असणाऱ्या एका परिषदेला असे घोषित करणे जरूरीचे वाटले की: “ख्रिश्चनांनी देवाची मंडळी सोडता कामा नये . . . त्यांनी देवदूतांची नावे घेऊन धावा करु नये . . . कोणी जर अशा पद्धतीची खाजगी मूर्तिपूजा आचरीत असल्याचे आढळले तर तो शापित असो.” तरीपण, पाचव्या शतकातील वेदांती व प्रामाण्य थिओडोरट कळवितो की, दिव्यदूतांच्या उपासनेचा “हा प्रकार” त्याच्या काळी अद्याप प्रचलित होता . आजतागायात, कॅथोलिक चर्च “विश्वासू जणांना दिव्यदूतांवर प्रीती करणे, आदर दाखवणे व धावा करण्याचे प्रोत्साहन” देत आले आहे व या द्वारे “संरक्षक दिव्यदूतांचा सन्मान व मानमरातब” वाढीस लावत आहे.—न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडीआ, खंड १, पृष्ठ ५१५.
१२. दिव्यदूतांची भक्ति मान्यवर आहे असे खोटया शिक्षकांनी कसे प्रतिपादित केले असावे?
१२ कॅथोलिक वेदांत्यांनी आपले मतप्रतिपादन ज्या पद्धतीने केले त्याच्या आधारानेच खोट्या शिक्षकाने आपल्या काळी म्हटले असेल: “अहा! दिव्यदूतांना केवढे अप्रतिम हक्क आहेत. मोशाचे नियमशास्त्र देवदूतांकरवीच दिले गेले नव्हते का? तर मग आम्ही या समर्थांना त्यांचा योग्य सन्मान बहाल केलाच पाहिजे! असे करणे आमच्या ठायीचा खरा विनयशीलपणा प्रदर्शित करणार नाही का? खरे म्हणजे, देव अत्युच्च आहे आणि आम्ही मानव केवढया गर्तेत आहोत! तद्वत, आम्हास देवाजवळ आणण्यासाठी दिव्यदूत मध्यस्थांची भूमिका पार पाडू शकतात.’
१३. (अ) दिव्यदूतांची उपासना मान्यवर आहे का? (ब) खोट्या शिक्षकाने “स्वतःला दिलेल्या गोष्टींवर” कशी भूमिका ग्रहण केली होती?
१३ परंतु, कोणत्याहि प्रकाराने दिव्यदूतांची केलेली उपासना चुकीची आहे. (१ तिमथ्यी २:५; प्रकटीकरण १९:१०; २२:८, ९) तरीपण खोटा शिक्षक या आक्षेपाला दूर भिरकावून त्याला “स्वतःला दिलेल्या गोष्टींवर” आपली भूमिका घेत होता. द वोकॅबलरी ऑफ द ग्रीक टेस्टमेंट नुसार ही संज्ञा “गूढ धर्मात दीक्षाविधीचा कळस, जेव्हा दीक्षार्थी देवाबरोबरची सहभागिता प्राप्त करण्याच्या नव्या जीवनाचे पाऊल उचलतो” त्याला अनुलक्षून वापरली आहे. अशा या मूर्तिपूजक संज्ञेचा वापर करून पौलाने, खास दृष्टी कदाचित स्वर्गीय दृष्टांत लाभल्याचा दावा करणाऱ्या खोटया शिक्षकाच्या अहंमन्थतेचा उपहास केला.
१४. खोटे शिक्षक कसे ‘गर्वाने फुगवले’ होते?
१४ तथापि, आध्यात्मिक असल्याचा दावा करण्याद्वारे खोट्या शिक्षकाने त्याच्या दैहिक मनोवृत्तीनुरूप जी अंहमन्यता बाळगली तिचे प्रदर्शन होत होते. पापीष्ठ देहाने त्याच्या दृष्टिकोणावर व मतावर अंधार केला होता. गर्व व उद्दामपणा यांनी ‘फुगून’ त्याचे मन “दुष्कर्मे” करीत राहिले होते. (कलस्सैकर १:२१) यात सर्वात वाईट गोष्ट ही की ख्रिस्त या मस्तकाला तो धरून राहात नव्हता; याचे कारण येशूच्या शिक्षणापेक्षा जगाच्या मतप्रणालींकडे त्याचे मन अधिक झुकले होते.
अद्याप धोका?
१५. (अ) काही ख्रिश्चनांमध्ये आज कोणत्या प्रवृत्ती आढळतात? (अ) यापैकी काहींचा उगम कोठून आहे व त्यांचा पवित्र शास्त्रीय सूचनेशी कसा पडताळा होतो?
१५ सार्वकालिक जीवनाचे बक्षिस—मग ते स्वर्गातील असो वा पृथ्वीवरील नंदनवनातील अद्याप यहोवाच्या सेवकांपुढे उभे आहे. आता ज्ञेयवादी व यहुदी मत प्रसारक निघून गेल्याला बराच काळ लोटला आहे. तरीपण असेही काही विशिष्ठ आहेत जे एखाद्या ख्रिश्चनाला हे बक्षिस प्राप्त करण्यात अडथळा उपस्थित करतात. असे कदाचित ते हेतुपुरस्सर करणार नाहीत. तरीपण या लोकांनी स्वत:ला सद्य व्यवस्थीकरणाचे “प्राथमिक शिक्षण व पोकळ भुलथापा” यांनी अवास्तवतेने डागविले असल्यामुळे ते अशी काही मतप्रतिपादने पुढे मांडतील:
‘मी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न तर करतोच पण हे बघा, व्यवसाय चालवावयाचा आहे तर असे राहणे मोट्या प्रयासाचे आहे. “चोरावर मोर” असणाऱ्या या जगात साळसूद राहून चालणार नाही.’ (हा दृष्टिकोण नीतीसूत्रे ११:१ व इब्रीयांस १३:१८ सोबत पडताळून पहा.)
‘काय म्हणता, तुम्ही अजूनही “चूल व मूल संभाळता” का? काळ बदलला आहे! एखादी नोकरी करा आणि आपल्या जीवनात काहीतरी करून दाखवा!’ (पडताळा नीतीसूत्रे ३१:१०–३१.)
‘होय, मला माहीत आहे की माझ्या नोकरीमुळे माझ्या सभा चुकतात आणि प्रचार कार्यालाही तडा बसतो. पण आमच्या आजच्या जीवनमानासाठी खूप पैसा लागतो. आणि थोड्याफार चांगल्या गोष्टी घरात असल्या तर त्यात वाईट ते काय?’ (या विचारतील विरोधाभास लूक २१:३४, ३५; १ तिमथ्यी ६:६–८ मध्ये बघा.)
‘वडील व्यासपीठावरून क्षेत्रकार्याविषयीचा जो नगारा वाजवितात तो ऐकायला नकोसे झाले आहे. सबंध आठवडाभर जीव ओतून बाहेर काम करायचे तर सप्ताहाच्या सुटीच्या दिवशी आराम नको का करायला?’ (पडताळा लूक १३:२४; मार्क १२:३०)
‘पायनियरिंग ही काही प्रत्येकासाठी नाही. अहो, आजच्या आर्थिक स्थितीत तुम्हाला टिकायच आहे तर निदान विद्यालयीन शिक्षण घेतलच पाहिजे.’ (यातील विरोधाभास मत्तय ६:३३; १ करिंथकाकर १:१९,२० आणि १ तिमथ्यी ६:९–११ मध्ये बघा.)
भौतिक व दैहिक विचारधारा “या जगाचे प्राथमिक ज्ञान”—जगातील लोकांचा मूलभूत विचार व मत यांचे केद्रस्थान आहे. त्याच्यापुढे नमते घेतले तर भरून काढता येणार नाही अशी आध्यात्मिक इजा मिळेल.
१६. आज काहीजण दांभिक न्यायाधीश कसे बनतात?
१६ स्वनियुक्त न्यायधीश व शिक्षक आणखी एक धोका आणतात. कलस्सै मधील लोकांप्रमाणेच तेही व्यक्तिगत गोष्टींचा गवगवा करतात. त्यांची प्रवृती “थट्टेची लालसा” याकरवी व्यक्त होते. (कलस्सैकर २:१६–१८) त्यांची अधिक पवित्रपणाची प्रवृति इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ करण्याची चुकीची इच्छा प्रकटविते. ते “फाजील धार्मिक” असतात आणि ‘विश्वासू दासा’ ने जे म्हटले व प्रकाशित केले त्याच्याअगदी पुढे लगेच मजल मारतात. करमणूक, आरोग्याची काळजी, केशभूषा, वेशभूषा आणि मद्य असणाऱ्या पेयांचा वापर याबद्दल अनाठायी वितंडवाद निर्माण करतात. (उपदेशक ७:१६; मत्तय २४:४५–४७) त्यामुळे आध्यात्मिक गोष्टीत लावलेले लक्ष काढले जाऊन दैहिक इच्छेवर केंद्रित होते.—पडताळा १ तिमथ्यी ६:३–५.
१७, १८. (अ) व्यक्तिगत दृष्टिकोणाबाबत काहींनी कोणती भूमिका ग्रहण केली आहे व हे धोक्याचे का आहे? (ब) आमच्या पुढील अध्ययनात कशाची चर्चा होईल?
१७ शास्त्रवचनांविषयीचा व्यक्तिगत दृष्टिकोण बाळगण्याचीही आज काहींनी भूमिका ग्रहण केली आहे. त्यांना खास दृष्टी लाभलेली आहे असा त्यांचा दावा असतो. एका स्त्रीचा बाप्तिस्मा होऊन एक वर्षही झाले नव्हते तेव्हा आपण अभिषिक्तांपैकी एक आहोत असा दावा तिने केला व तिला वाटले की आपण प्रस्तुत करीत असलेल्या सूचनांमध्ये भारदस्तपणा आहे. याकरताच एखाद्या शासकीय पदावर राहून “इतरांना शिकविण्याची व प्रोत्साहन देण्याची” प्रबळ इच्छा तिजठायी भारावली. (पण पहा १ तिमथ्यी २:१२.) यहोवा देव ‘उन्मत दृष्टी व गर्व’ यांचा द्वेष करीत असल्यामुळे ख्रिश्चनांनी स्वतःच्या मतविषयीचा विनयशील दृष्टीकोन धरावा. (नीतीसूत्रे ८:१३) “दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणाऱ्या” पाशात स्वतःला अडकविण्याचे ते टाळतात. (कलस्सैकर २:१८) स्वतःच्या व्यक्तिगत कल्पनांचा प्रसार करणारे आणि ख्रिस्ताने नेमिलेल्या “विश्वासू दासा’च्या सूचनांची पायमल्ली करणारे मस्तकाला धरून चालणारे नाहीत. या कारणास्तव, यहोवाच्या निष्ठावंत साक्षीदारांनी अशा जीवनाचे बक्षिस हिरावून घेणाऱ्या अभक्त प्रभावाविरूद्ध उभे राहिले पाहिजे.
१८ अद्याप सैतान मानवाचा वापर करुन सहमानवांना जीवन प्राप्ती करून घेण्यात मागे ठेवतो. हा डावपेच वापरल्याचे सैतानाचे आणखी कोणते मार्ग आहेत? आणि कोणा यहोवाच्या साक्षीदाराला बक्षिसावरील आपली पकड कशी मजबूत धरता येईल?
तुम्हाला आठवते का?
◻ प्राचीन कलस्सैमधील ख्रिश्चनांना कोणत्या धार्मिक प्रभावांनी दहशत घातली होती?
◻ ख्रिश्चनांना ‘बक्षिसा’ पासून वंचित ठेवणाऱ्यांची काही ओळखचिन्हे कोणती होती?
◻ आपण “जगाच्या प्राथमिक शिक्षणाने” मोहित झालो आहोत हे काही ख्रिश्चन आज कसे दाखवितात?
◻ खोटे शिक्षक ख्रिश्चनांना चुकीच्या मार्गाक्रमणाकडे कसे वळवतात?
[२२ पानांवरील चित्र]
कलस्सैमधील ख्रिस्ती मंडळीला ‘देवदूताची उपासना’ याने भेडसावले होते. आजही नामधारी ख्रिश्चनात अशाच प्रकारची मूर्तिपूजा चालू आहे
[२४ पानांवरील चित्र]
जगाच्या विचाराकरवी जे तुम्हावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या पासून सावध असा!