सचोटी राखण्याद्वारे यहोवाचे अंतःकरण आनंदी करा!
“आपण जगलो किंवा मेलो तरी यहोवाचे आहो.”—रोमकरास १४:८.
१, २. (अ) यहोवाचे साक्षीदार देवाला आपली सचोटी राखण्याचा का निश्चय करून आहेत? (ब) कोणते प्रश्न उद्भवतात?
प्रेषित पौलाचे वर नमूद असणारे ते शब्द या विसाव्या शतकाच्या एकमेव खऱ्या सचोटी रक्षणकर्त्यांच्या भावना किती उत्तमप्रकारे व्यक्त करतात बरे! सध्याचे दुष्ट व्यवस्थीकरण आमच्या डोळ्यापुढे कोलमडून पडत आहे हे प्रत्यक्षरित्या पाहण्यास जिवंत असणे केवढ्या आनंदाचे वाटेल! पण तेच, आम्हाला देवाची सेवा करता करता मृत्यू आलाच तरीही चालेल. कोणत्याहि बाबतीत आमचा, यहोवा देवाचे निष्ठावंत साक्षीदार राहण्याचा निश्चय आहे. आम्ही आपली सचोटी राखून ठेऊ शकू. ते का बरे? कारण आम्ही जगलो काय किंवा मेलो काय, आम्ही यहोवाच्याच मालकीचे आहोत!
२ तरीपण ही सचोटी काय आहे? ती आम्हाकडून कशाची अपेक्षा धरते? आमचे सचोटी रक्षण देवाच्या बाबतीत काही फरक खराच घडवून आणू शकते का?
सचोटी व तिच्या अपेक्षा
३. पवित्र शास्त्रानुसार सचोटी राखणे म्हणजे काय?
३ देवाच्या वचनात, सचोटीचा अर्थ नैतिक एकाग्रता व पूर्णता, सात्विकता व निर्दोषता याप्रकारे दाखविण्यात आला आहे. याचा अर्थ नीतीमत्तेस दाखविण्यात येणारी अटळ श्रध्दा होय. खरे म्हणजे सचोटी त्या एकास म्हणजे प्रत्यक्षात यहोवा देवास अटळ निष्ठेची मागणी करते. होय, सचोटी राखणे म्हणजे यहोवाच्या सार्वभौम इच्छेप्रमाणे करीत राहणे.
४. पहिला सचोटी भंजक कोण होता व त्याने पहिल्या मानवी दांपत्याला काय करण्यास चिथावले?
४ पहिला सचोटी भंजक हा तो आत्मिक प्राणी होता ज्याने मूळ मानवी दांपत्याला त्यांच्या निर्माणकर्त्त्याविरूद्ध बंडखोर मार्ग धरण्यास चिथावले. ज्ञानाच्या वृक्षासंबंधाने देवाने घातलेल्या निर्बंधाचा आदर करून यहोवास आपली सचोटी व्यक्त करण्याची संधि आदाम हव्वे पुढे होती. तरीपण प्रतिस्पर्ध्याच्या स्वार्थीपणाच्या आकर्षणांना भुलून त्यांनी बंडखोरपणाला वाव दिला. त्यांचे अंतःकरण यहोवाच्या निर्बंधासंबंधाने निर्दोष राहिले नाही आणि ते त्याला आपली सचोटी राखू शकले नाही.—स्तोत्रसंहिता ११९:१, ८०.
५. सैतानाच्या बंडखोरीने कोणते वाद निर्मिले व हे सात्विक इयोबाच्या अनुभवाकरवी कसे सिद्ध झाले?
५ सैतानाच्या बंडखोरीने देवाचे त्याच्या प्राणिमात्रावरील हक्काचे सार्वभौमत्व व प्राणिमात्राकडून पूर्ण आज्ञापालन मागण्याचा यहोवाचा हक्क याविषयीचा वाद निर्मिला. याकारणास्तव देवाच्या सार्वभौमत्वास मानव खरीच सचोटी दाखवू शकेल काय हा सार्वत्रिक सार्वभौमत्वाच्या वादाचा महत्वपूर्ण प्रश्न ठरणार होता. याविषयीचा पुरावा सात्विक, सरळ आणि देवाला भिऊन वागणारा इयोब या यहोवाच्या सेवकात मिळतो. (इयाब १:१) इयोब देवाच्या सरळ मार्गापासून ढळला नाही. लैंगिक अनैतिकता त्याच्यावर आपला जम बसवू शकली नाही. न्यायदानात त्याने कधीही अन्यायीपणा केला नव्हता. शिवाय विधवा, अनाथ व गरीब यांजबद्दल त्याने कधीही निष्ठुरता प्रदर्शित केली नाही. भौतिक संपदेला आपला आत्मविश्वास बनविण्याऐवजी इयोबाने पूर्णपणे सर्वसमर्थावर आपला भाव ठेवला. (इयोब ३१: ७–४०) तरीसुद्धा, सैतानाने, इयोब निव्वळ स्वार्थी कारणास्तव देवाची सेवा करतो असा आरोप केला. यहोवाने सैतानाला इयोबाची मालमत्ता व शिवाय त्याची मुलेही नष्ट करण्याची अनुज्ञा दिली तरीही त्या आद्य कपटयाला त्या सरळ माणसाच्या सचोटीला तडा आणता आला नाही. यातनामय आजार व भिकार सांत्वनकर्त्त्यांकरवीची अपमानकारक टीकाही हतबल ठरली; कारण इयोबाने स्वतःला सचोटी रक्षणकर्ता असल्याचे सिद्ध केले होते.—इयोब १:६–२:१३; २७:५, ६; ३१:६; ४२:८, ९.
६. जे ‘यहोवाचे आहेत’ त्यांच्याबाबतीत काय अपेक्षा आहे?
६ अशाप्रकारे, देवाच्या पवित्र नामास सन्मान लाभू देण्याचा मानवाला अतुलनीय हक्क प्राप्त आहे. तो कसा? आपण यहोवाच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाला निष्ठावंतपणे पाठबळ देऊन आहोत ही सचोटी राखण्याद्वारे. तर मग, जे ‘यहोवाचे आहेत’ त्यांच्याकडून कशाची अपेक्षा आहे? आम्ही देवाची सेवा पूर्ण भक्तीने करावी आणि यहोवा “सर्वस्वाची निष्ठा अपेक्षिणारा देव” आहे हे कधीही विसरता कामा नये.—निर्गम २०:५.
आम्हाला यहोवाचे अंतःकरण आनंदी करता येईल
७, ८. (अ) आम्ही अपूर्ण असलो तरी देवाला आपली सचोटी कशी राखू शकतो? (ब) आम्ही सचोटी रक्षणकर्ते असल्यास नीतीसूत्रे २७:११ आमच्या बाबतीत कसे लागू होते?
७ आम्ही सर्वच अपूर्ण आहोत याकरता यहोवाच्या नीतीमान दर्जाला आम्ही पूर्णपणे उतरू शकणार नाही. तद्वत, आम्ही सचोटी राखणे याचा अर्थ भाष्य अथवा कृति यातील पूर्णता नव्हे, याउलट त्याचा अर्थ पूर्णहृदयी वा हृदयातील पूर्ण निष्ठा असा आहे. यामुळेच, दावीदाने गंभीर पातक केले होते तरी तो ‘अंतःकरणातील सचोटीने’ चालला. (१ राजे ९:४) वाग्दंड स्विकारून त्याने आपला मार्ग सुधारला व त्याकरवी आपले अंतःकरण यहोवावरील खऱ्या प्रीतीने केवढे ओतप्रोत भरले आहे याचा पुरावा दिला. (स्तोत्रसंहिता २६:१–१२) आम्हीही, अशाच प्रकारच्या प्रीतीचे प्रदर्शन करून ‘अंतःकरणाची सचोटी’ दाखवू शकतो.—स्तोत्रसंहिता ७८:७२.
८ आमचा यहोवा देवावर गाढ विश्वास आहे व त्यावर तसेच आमचे रक्षण करू शकणाऱ्या त्याच्या सामर्थ्यावर आमचा पूर्ण आत्मविश्वास आहे याकरता सचोटी रक्षणाचा मार्ग आम्हास शक्य आहे. (स्तोत्रसंहिता २५:२१; ४१:१२) तथापि, सचोटीचे जतन करणे तेवढे सोपे नाही कारण आमचा व यहोवाचा सर्वथोर शत्रू दियाबल सैतान विश्वास न ठवणाऱ्या लोकांची मने अंधळी करून ‘सर्व जगाला ठकवीत आहे.’ (प्रकटीकरण १२:९; २ करिंथकर ४:४) तरीपण इयोबाप्रमाणे आम्हाला सचोटी राखणारे होता येईल. याद्वारे, आम्ही अपूर्ण असलो तरी आमच्या प्रेमळ देवाचे अंतःकरण आनंदी करता येईल. नीतीसूत्रे २७:११ तेच म्हणते: “माझ्या मुला, सूज्ञ होऊन माझे अंतःकरण आनंदी कर म्हणजे माझी निंदा करणाऱ्याला प्रत्युत्तर देता येईल.” यहोवाचे निष्ठावंत सेवक या अर्थी आम्ही, देवाने त्याच्या निंद्य शत्रूला देण्याजोगे समर्पक उत्तर आनंदाने पुरवू शकतो. याकारणामुळेच आमचे सचोटी राखणे मोठा फरक घडवून आणते. सचोटी रक्षणकर्ते या अर्थी आम्ही यहोवाचे अंतःकरण आनंदी करू शकू. त्यामुळे आम्हालाही केवढा आनंद मिळणार!
सचोटी राखणाऱ्यांची मोठी मालिका
९. यहोवाच्या साक्षीदारांच्या सचोटी–रक्षक ‘मेघा’ मधील काही जण कोण आहेत व त्यांना सचोटी विषयक कोणती परिक्षा सहन करावी लागली?
९ खरे पाहता, आज यहोवाचे साक्षीदार सचोटी राखणाऱ्यांच्या मोठ्या मालिकेचे भाग बनले आहेत. ही मालिका मागे विश्वासू हाबेलापर्यंत जाते व त्यात हाबेल, हनोख, नोहा, अब्रहाम, सारा, इसहाक, याकोब, योसेफ, मोशे, रहाब, गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद व शमुवेल या सारख्या स्त्री–पुरुषाचा भरणा आहे. बाबेलोनी राजा नबुखद्रेस्सर याने स्थापिलेल्या मूर्तीस वंदन करण्याचे नाकारणारे आणि त्याद्वारे अतितण्त अशा भट्टीत टाकल्या गेलेल्या शद्रख, मेशख व अबेद्रगो या सचोटी रक्षणकर्त्यांनी उघडपणे “अग्नीची शक्ती शमविली” असे सुचविले. यहोवाच्या इतर ख्रिस्तेतर साक्षीदारांना ‘थट्टा, मारहाण, तरूंगवास, धोंडमार, मोहपाश, करवतीने चिरणे, तरवारीने वधणे’ यांचा अनुभव आला. ‘ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत, ते लाचार, पीडित व त्रासलेले होते.’ “त्यांना जग योग्य नव्हते” असे जे त्यांच्याविषयी पौलाने म्हटले त्याबाबतीत आम्ही सहमत आहोत. तर मग सचोटी–रक्षक साक्षीदारांच्या मोठ्या ‘मेघाने’ घेरलेले असणे केवढे थरारक आहे बरे!–इब्रीयांस ११:१–१२:१; तसेच दानीएल अध्याय ३ पहा.
१०. प्रेषित पौलाने यहोवाचे अंतःकरण कसे आनंदी केले?
१० देवाकडून प्राप्त झालेले धैर्य व बळ याकरवी प्रेषित पौल तुरूंगवास, मारहाण, जहाज फुटणे, मोठे धोके, निद्रारहित रात्री, भूक, तहान, थंडी, उघडावाघडेपणा आणि “मरणप्राय स्थिती” यांचा सामना केला. (२ करिंथकर ११: २३–२७) उपाध्यपणासाठी त्याने हा सर्व त्रास सहन केला आणि या सर्वात त्याने प्रबळ सचोटी–रक्षक या अर्थी यहोवाचे अंतःकरण आनंदी केले. आम्हालाही ते जमेल.
११. सचोटीच्या बाबतीत येशू ख्रिस्ताने कोणते उदाहरण मांडले?
११ सचोटी रक्षकातील उल्लेखनीय उदाहरण “आपल्या विश्वासाचा प्रमुख प्रतिनिधि व पूर्ण करणारा” येशू ख्रिस्ताचे आहे. अरण्यात दियाबलाने येशूची परिक्षा घेतली तेव्हा तो आपल्या सचोटीत टिकून राहिला व सरतेशेवटी म्हणाला: “अरे सैताना, निघून जा, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘यहोवा तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपसना कर.’” एवढा हा देव प्रणीत दृढनिश्चय बघून सैतान हताश झाला व येशूला सोडून निघून गेला. दियाबलाचा येशूवरील हा शेवटचा हल्ला नव्हता तरीपण देवाच्या पुत्राची सचोटी भंगविण्याच्या बाबतीत सैतान येथे असमर्थ बनला होता. ‘येशूने, त्याच्यापुढे जो आनंद ठेवला होता त्याकरता वधस्तंभही सहन केला;’ आणि आपली सचोटी कधीही भंगविली नाही. आपणही त्याचे उत्तम प्रतीचे उदाहरण अनुसरू आणि सचोटी रक्षक या अर्थी यहोवा अंतःकरण आनंदी करू.—इब्रीयास १२:२, ३; मत्तय ४:१–११.
१२, १३. आरंभीच्या ख्रिश्चनांनी सचोटीच्या कोणत्या परिक्षांना यशस्वीरित्या तोंड दिले?
१२ येशूने आपल्या अनुयायांना म्हटले: “माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील.” (मत्तय १०:२२) खऱ्या ख्रिश्चनांच्या बाबतीत हे केवढ्या सातत्याने खरे ठरले आहे बरे! ख्रिश्चानिटी ॲण्ड द रोमन गव्हर्न्मेंट या पुस्तकात ई.जी.हार्डी लिहितात: “प्लिनीचे पत्र व त्र्याजनचे कोरीव काम या दोन्ही गोष्टीवरून हे स्पष्ट कळते की ख्रिश्चनांचा, विशिष्ठ गुन्ह्याचा स्पष्ट तपशील वा पुरावा नसला तरी त्यांच्या ख्रिस्ती या नोमन [नावा] मुळे वा ख्रिस्ती आहोत असे म्हटल्यामुळे छळ होत होता.”
१३ या आरंभीच्या ख्रिश्चनांनी देवाकडून प्राप्त होणाऱ्या बळाकरवी सचोटीच्या किती परीक्षांना यशस्वीपणे तोंड दिले बरे! उदाहरणार्थ, त्यांच्याबद्दल म्हणण्यात आले. “कधी कधी त्यांना मारहाण करून आखाड्यात क्षुधित असणाऱ्या हिंस्त्र श्वापदापुढे, प्रेक्षकांची करमणूक करता यावी याकरता टाकले जाई.” तथापि, एवढा त्रास सहन करावा लागला तरी त्यांच्याबद्दल हे आढळले गेले की, “छळ त्यांच्या विश्वासास उभारक ठरला व त्यामुळे त्यांना आपल्या मार्गाकडे अधिक जणांना परीवर्तित करता आले.” (फ्रॉम द ओल्ड वर्ल्ड टु द न्यू युजन ए.कॉलिगन आणि मॅक्सवेल एफ. लिट्वीन द्वारा. १९३२ पृष्ठ ९०–१) हेच या २०व्या शतकातील यहोवाच्या सचोटी–रक्षक साक्षीदारांच्या बाबतीत आहे. दियाबलाच्या हस्तकांना त्यांच्यापुढे हार मानावी लागली.
१४, १५. “दोन साक्षीदार” कोण आहेत, आणि त्यांना १९१८ व १९१९ मध्ये कशाचा अनुभव आला?
१४ यहोवाच्या अभिषिक्त सेवकांच्या शत्रूंनी ‘उपद्रव योजिला’ तेव्हा या लाक्षणिक ‘दोन साक्षीदारांना’ १९१८ व १९१९ मध्ये कशाचा अनुभव आला त्याचा विचार करा. (प्रकटीकरण ११:३, ७–१०; स्तोत्रसंहिता ९४:२०) त्यावेळेच्या वॉचटॉवर संस्थेचे अध्यक्ष जे.एफ. रदरफोर्ड व त्यांच्या सात सहकाऱ्यांना अन्यायाने तुरुंगात जावे लागले. तेव्हा, या “दोन साक्षीदारांचा” त्यांच्या संदेशकथनाच्या कार्याच्या बाबतीत जणू मृत्यू घडला. त्यामुळे त्यांच्या वैऱ्यांना मोठा आनंद झाला. प्रीचर्स प्रेसेन्ट आर्म्स या पुस्तकात रे. एच. अब्राम्स यांनी परिक्षिले: “सबंध केसचे [रदरफोर्ड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या] पृथ्थकरण केल्यास हा निर्वाळा मिळतो की [पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांची] पायमल्ली करणाऱ्या सत्रात चर्च व त्यांचे पाळक मुख्यत्वे जबाबदार आहेत. . . . धार्मिक छापखान्याच्या संपादकांकडे वीस वर्षीय शिक्षेची बातमी पोहचली तेव्हा या प्रकाशनांच्या बहुतेक सर्वच छोट्या मोठयांनी याविषयी आनंद व्यक्त केला. कर्मठ अशा धार्मिक साप्ताहिकात सहानुभूतीचा एकही शब्द मला आढळला नाही.”
१५ तरीपण, काही काळातच त्या आठ पवित्र शास्त्र विद्यार्थी बंदिवानांना मोकळे करण्यात आले आणि त्यांना पुर्णतयः दोषमुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले. हे सैतान व त्याच्या ठक साथीदारांना केवढे खजील करणारे ठरले! देवाच्या आत्म्याने पुनरुज्जीवित होऊन ते “दोन साक्षीदार”, अभिषिक्त जणांचे सैन्य आपल्या पायावर देवाच्या राज्याचे घोषक या नात्याने पुनःउभे राहिले. (प्रकटीकरण ११:११) त्यानंतर या सचोटी रक्षकांशी दिलेल्या लढतीत यहोवाच्या शत्रूंना नित्याने हार पत्करावी लागली आहे.
१६. एका तरूण सचोटी रक्षकाने काय बोलून दाखविले?
१६ उदाहरणार्थ, नाझी छळग्रस्तांच्या हाती मृत्यूची वाट पाहत असता एका तरूण माणसाने आपल्या कुटुंबियांना पाठविलेल्या पत्रात जे धैर्यवान शब्द लिहिले त्याचा विचार करा. त्याने लिहिले: “आता मध्यरात्र उलटली आहे, मला अद्याप माझा निश्चय बदलण्याची संधि आहे. अहा! पण मला, आपल्या प्रभूस नाकारल्यानंतर पुनः आनंदी होता येईल का? निश्चित नाही! याच कारणास्तव मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आता या जगाचा निरोप घेत असता मी आनंदात व शांतीत आहे.” हे कोणा दुर्बळ, भेकड आणि गळीत अशा सचोटी भंग पावलेल्या माणसाचे शब्द वाटतात का? अर्थातच नाही!
१७. सोवियत युनियन येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या झालेल्या धरपकडीने त्यांच्या राज्य प्रचाराच्या कार्यावर कसा परिणाम घडवून आणला?
१७ यहोवाच्या सेवकांची सचोटी मोडण्याचे प्रयत्न चालूच राहिले. उदाहरणार्थ, रिलिजन इन द सोवियत युनियन या पुस्तकात वृत्तपत्रकार वॉल्टर कोलार्झ यांनी १९५१च्या आरंभाला यहोवाच्या साक्षीदारांची जी प्रचंड धरपकड झाली त्याविषयीची माहिती दिली व म्हटले: “साक्षीदारांनीच स्वतः हा अंदाज केला की त्यांच्या सुमारे ७,००० जणांना उरल्स, सायबेरिया, अगदी उत्तरेकडे (वोरकुटा) आणि कझाकस्तान यात स्थलांतरित करण्यात आले.” त्यानी पुढे म्हटलेः “यामुळे रशियात ‘साक्षीदारांचा’ शेवट होऊ शकला नाही, उलट त्यांच्या मतपरिवर्तनाच्या कार्याचा नवीन अध्याय उघडला गेला. दुसच्या ठिकाणी बंदिवान म्हणून नेताना ते ज्या ज्या ठिकाणी थांबले तेथे मार्गावर त्यांनी आपणाठायीच्या विश्वासाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात सोवियत सरकारने साक्षीदारांच्या विश्वासाचा प्रसार होण्यामध्ये जणू हातभार दिला. खेड्यातील एकांत जागेतून आता त्यांना व्याप्त जगात, ते जरी राजकीय बंदी व सश्रम कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या छावण्याचे होते तरी तेथे आणले गेले.” तेथे, हृदयास उबविणाऱ्या राज्य संदेशाचा स्विकार लोकांनी मोठ्या आनंदाने केला असे यहोवाच्या सेवकांना आढळून आले.—पडताळा प्र.कृत्ये ११:१९–२१.
विजयोत्सव करणाऱ्या सैन्याप्रमाणे
१८, १९. सचोटी रक्षक या नात्याने कसे विजयी होता येईल?
१८ देवाच्या लोकांचा छळ आजतागायत चालू आहे. तर मग यहोवाच्या साक्षीदारांना सचोटी रक्षक या अर्थी कसे विजयी होता येईल बरे? आम्ही देवाच्या वचनाचे पालन करतो आणि ‘आमच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे’ म्हणून आम्ही विजयी ठरू शकतो. यहोवाचे निष्ठावंत साक्षीदार असल्यामुळे आम्ही ‘या युगाबराबर समरूप होत नाही पण आमच्या मनाचे रूपांतर केले आहे.’ यहोवास संतुष्ट वाटणाऱ्या गोष्टी आम्ही आनंदाने करीत असल्यामुळे तो आमच्या दुरात्मे व मानव शत्रूंविरूद्ध आम्हास विजय मिळवून देतो.—इब्रीयांस ५:१२–१४; रोमकर १२:१, २.
१९ ‘यहोवाच्या मालकीचे असणाऱ्या’ आमची तुलना विजयोत्सव करणाऱ्या सैन्याशी करता येईल. अर्थात, आमची लढत आध्यात्मिक स्वरूपाची आहे आणि आम्ही “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत” राहतो. आम्हापाशी देवाकडिल संपूर्ण आध्यात्मिक शस्त्रसामग्री आहे व त्याचा पवित्र आत्मा आमच्या पाठीशी आहे. या कारणामुळे आम्ही “सैतानाच्या डावपेचापुढे . . . टिकाव” धरू शकतो. (इफिसकर ६:१०–२०; २ करिंथकर १०:३, ४) आणि याद्वारेच आम्हाला सचोटी राखणारे या अर्थी विजयी होत राहता येईल.
२०. आपली सचोटी राखण्याच्या परिश्रमात असता आम्हाला कोणती मदत व खात्री आहे?
२० आमचे लष्करी बळ निश्चितच अप्रतिम आहे. आम्हामध्येच “मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना सिद्ध” आहे! (स्तोत्रसंहिता ६८:११) आमचा शत्रू भीतीजनक असला तरी “त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” (२ राजे ६:१६) पृथ्वीवरील निवासियांना आम्ही सुवार्ता घोषित करतो त्या वेळी देवदूत आम्हासोबत असतात. (प्रकटीकरण १४:६) आणि सचोटी रक्षणकर्ते या अर्थी आम्हाठायी हा पुरेपूर विश्वास आहे की “आम्हावर चालविण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार चालणार नाही.”—यशया ५४:१७.
२१. छळाचा अनुभव असला तरी काय चालू आहे?
२१ निसंशये, युद्धाचा रेषा आखण्यात आल्या आहेत, सैतानाच्या समूहाचा आमचे कार्य बंद पाडण्याचा निर्धार आहे. यामुळेच, आम्ही ‘सुयुद्ध करीत राहिले’ पाहिजे. (१ तिमथ्यी १:१८) वैभवी येशू ख्रिस्त हा आमचा नेता व आदेशकर्ता आहे त्यामुळे आपणापैकी प्रत्येक जण “ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई” अशी सेवा सादर करू या. (२ तिमथ्यी २:३, ४) प्रत्येक दिशेकडून आम्हास गुद्याचा प्रहार होत असला तरी आम्ही देवाच्या विपुल दयेनेच सचोटी रक्षक या अर्थी दृढ उभे राहावयास हवे आणि राहू. वाढीमागून वाढ दृष्टोत्पत्तीस येईल तसतशी आमची मुखे उजळतील. ‘राष्ट्रातील निवडक वस्तुच्या’ अधिक संख्येचे लोक येत आहेत व ते यहोवाचे मंदिर वैभवाने भरत आहेत. (हाग्गय २:७) छळ, तरूंगवास, मारहाण, विविध देशातील कार्यावरील बंदी आणि आमचे ओठ स्तब्ध करण्यासाठी होणारा कसून प्रयत्न या गोष्ठी असल्या तरी शिष्य बनविण्याचे मोठे काम जारी आहे व ते जोर घेत आहे.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.
२२. ‘यहोवाचे आहोत’ या अर्थी आम्ही काय करीत राहिले पाहिजे?
२२ यहोवाची स्तुति करणारा आवाज दिवसेंदिवस वाढत असता ही वेळ पृथ्वीवरील प्रत्येकासाठी निर्णय करण्याची आहे. सुवार्ता प्रसारीत करण्याचा व खऱ्या उपासनेला कवटाळण्याची इच्छा धरणाऱ्यांना शिक्षण देण्याचा केवढा विलोभनीय हक्क आम्हाला आहे! तद्वत, “मोठा लोकसमुदाय” वाढत असता आपण सर्वसमर्थ देवाचे प्रबळ सेवक या अर्थी आपले कार्य करीत राहू या. (प्रकटीकरण ७:९) “आपण जगलो किंवा मेलो तरी यहोवाचे आहो.” याकरता जीवनाच्या ध्येयप्राप्तीस्तव आपण पुढे जात राहू. सचोटी राखण्याद्वारे यहोवाचे अंतःकरण आनंदी करण्याचा जो वैभवी हक्क आम्हास मिळाला त्याविषी आम्ही त्याचे उपकार मानू.
तुम्हाला उत्तर देता येईल?
◻ सचोटी म्हणजे काय?
◻ सचोटीचे रक्षण यहोवाच्या लोकांवर कोणत्या जबाबदाऱ्या आणते?
◻ आमचे सचोटी रक्षण देवाच्या बाबतीत मोठा फरक घडवून आणू शकते हे कसे दाखविता येईल?
◻ गतकाळी काहींनी कोणत्या अर्थी स्वतःला सचोटी रक्षक असल्याचे सिद्ध केले?
◻ यहोवाच्या साक्षीदारांना आज सचोटी रक्षक राहता येणे कसे शक्य आहे?
[११ पानांवरील चित्र]
आजचे यहोवाचे सेवक त्याच्या सचोटी रक्षक साक्षीदारांच्या दीर्घ मालिकेचा भाग आहेत. तुम्ही त्यापैकी एक आहात का?
हनोख
सारा
इफ्ताह
पौल