प्रकटीकरणाची श्वापदे—त्यांचा काय अर्थ होतो?
जून १५, १९८५ च्या शनिवारी दुपारी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या इमारतीवर सूर्य चमकत होता. नेहमीप्रमाणेच भेटी देणाऱ्यांची झुंड त्या दिमाखी इमारतीस भेट देण्यास आली होती व पुष्कळजण त्यांनी पाहिलेल्या सर्व गोष्टींबद्दलचे त्यांचे औत्सुक्य काबूत ठेऊ शकले नाहीत.
तथापि आतापर्यंत संयुक्त राष्ट्र संघ राष्ट्रांना संयुक्त करण्यापासून फारच दूर पल्ल्यावर राहिलेला वाटतो. त्या दुपारी एक अधिकृत मार्गदर्शक म्हणाला: “दुसऱ्या महायुध्दापासून १५० युध्दे झाली व २० दशलक्ष लोक मारले गेले. अजूनही जागतिक सरकार येऊ शकले नाही. कदाचित ही त्याची निकटवर्तीय गोष्ट आहे.” मग जागतिक सरकार हे अशक्यप्राय स्वप्न आहे का? यावर विश्वास ठेवा अगर नाही, याचे उत्तर प्रकटीकरणाच्या श्वापदांच्या परिक्षणाने सापडू शकते.
पवित्र शास्त्राच्या काही टिकाकारांना प्रकटीकरण पुस्तकातील श्वापदांमध्ये भविष्यवादित अर्थ आहे असे वाटत नाही. याऐवजी, ते प्रेषित योहान जिवंत होता तेव्हा घडलेल्या गोष्टीसोबत त्यास लागू करतात. उदाहरणार्थ, द कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ प्रकटीकरणाच्या श्वापदाच्या त्याच्या चर्चेत म्हणतो: “त्यांचे दृष्टांत भविष्यवादित रुपात सादर करायचे व अगोदर सांगितलेल्या गोष्टींना भाकितांचे स्वरुप द्यावयाचे . . . ही प्रकटीकरण लेखकाची पध्दत होती.”
परंतु प्रेषित योहानाने घोषित केले: “प्रभुच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो.” (प्रकटीकरण १:१०) होय, प्रकटीकरणाचे पुस्तक गत काळातील इतिहासावर नव्हे तर भविष्यातील “दिवस” जेव्हा की प्रभु येशू ख्रिस्त स्वर्गातून त्याची राज्यसत्ता सुरू करील यावर प्रकाश टाकते. प्रकटीकरणाच्या ६ व्या अध्यायानुसार “प्रभुचा दिवस” जागतिक युध्दे, विस्तीर्ण स्वरुपातील अन्नटंचाई व मृतप्राय आजार यांनी चिन्हांकित आहे. या २० व्या शतकादरम्यान घडलेल्या गोष्टी, आम्ही १९१४ पासून “प्रभुच्या दिवसात” जगत आहोत याचा पटण्यासारखा पुरावा देतात.—प्रकटीकरण ६:१–८.a
त्या ऐतिहासिक वर्षी, येशू ख्रिस्ताने त्याचा राज्याधिकार सुरू केला. (प्रकटीकरण ११:१५, १८) त्यामुळे प्रकटीकरणाचे श्वापद हे त्या वर्षानंतर प्रामुख्यत्वे दिसावयास हवे. खरोखरी, ही श्वापदे देवाच्या शत्रूस चित्रीत करतात जी देवाचे राज्य हाच मानवाच्या शांतीच्या इच्छेचे समाधान करणारी एकमेव व्यवस्था या दृष्टीने पाहण्यास लोकांना अडखळण करतात. या शत्रूंत अजगर व तीन श्वापदे समाविष्ट आहेत. त्यांचे त्यांच्या क्रमाने आपण परिक्षण करू या.
मोठा अजगर
“पहा!” असे योहान उद्गारला, “एक मोठा अग्नीवर्ण अजगर. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती.” हा मोठा अजगर कशास चित्रीत करतो? योहान स्वतःच स्पष्टीकरण करतो की तो दियाबल सैतानाशिवाय इतर कशाचेही प्रतिनिधित्व करीत नाही. योहानाच्या दृष्टांतानुसार ह्या अजगराने १९१४ मध्ये जन्मलेल्या देवाच्या स्वर्गीय राज्यास कडा विरोध केला. याचा परिणाम? “मोठा अजगर खाली टाकण्यात आला, सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप ह्याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याबरोबर त्याच्या दुतांस टाकण्यात आले.”—प्रकटीकरण १२:३, ७–९.
योहान दाखवितो की याचा मानवजातीवर अनर्थकारक परिणाम होणार होता. “पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे, कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान ऊतरून तुम्हाकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) पृथ्वीच्या आसमंतात कोंडमारा झालेल्या स्थितीत असला तरी सैतानाने अजुनही देवाच्या स्थापित राज्याबरोबर लुडबुडण्याचा चंग बांधला आहे. तो हे तीन श्वापदांचा उपयोग करून मानवजातीस बहकविण्याने करतो. त्यातील पहिल्याबाबतच्या योहानाच्या वर्णनाचा विचार करू या.
समुद्र श्वापद
“मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला दहा शिंगे व सात डोकी असून त्याच्या शिंगावर दहा मुगूट व त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावे होती, जे श्वापद मी पाहिले ते चित्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते; त्याला अजगराने आपली शक्ति, आपले आसन व मोठा अधिकार दिला.”—प्रकटीकरण १३:१, २.
हा अक्राळविक्राळ प्राणी काय चित्रित करतो? प्रेरणेखाली योहान महत्वपूर्ण सुगावा पुरवितो: “सर्व वंश, लोक, भाषा व राष्ट्रे यावर त्याला अधिकार दिला होता.” (प्रकटीकरण १३:७) पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत व्यक्तिवर काय अधिकार चालविते? केवळ एकच गोष्ट: जागतिक राजकारणी राज्यव्यवस्था. या व्यवस्थेस “अजगर” सैतानापासून खराच अधिकार प्राप्त झाला का? पवित्र शास्त्र होय, असे उत्तर देते. उदाहरणार्थ प्रेषित योहान म्हणाला: “सर्व जग त्या दुष्टाच्या अधीन आहे.” यात मुळीच आश्चर्य नाही की त्याने येशूची अरण्यात परिक्षा घेताना “पृथ्वीवरील सर्व राज्ये” यावरील अधिकार बहाल केला व दावा केला: “[हा अधिकार] मला सोपवून दिला आहे.”—१ योहान ५:१९; लूक ४:५, ६.
मग, ती सात डोकी कशाचे चित्रण करतात? योहानास आणखीन एक अक्राळविक्राळ श्वापद दाखविले होते जे याची प्रतिमा असे होते. यास सुध्दा सात डोकी होती. या प्रतिमेची डोकी “सात राजांना” किंवा जागतिक साम्राज्यांना, ज्यातील “पाच पडले आहेत, एक आहे व एक अद्याप आले नाही” याचे प्रतिनिधित्व करतात असे स्पष्टीकरण केले होते. (प्रकटीकरण १७:९, १०) पवित्र शास्त्र इतिहासात, योहानापूर्वी पाच जागतिक सत्ता उदय पावल्या होत्या: मिसर, अश्शुर, बाबेलोन, मेद–पारस व ग्रीस. योहान जिवंत होता तेव्हा रोम ही सहावी सत्तेवर होती.
पण सातवे डोके काय होते? हा दृष्टांत “प्रभुच्या दिवसा” सोबत संबंध राखून होता तर या डोक्याने रोमच्या स्थानावर या शेवटच्या दिवसात म्हणजेच १९१४ पासून स्थानापन्न आहे त्या जागतिक सत्तेस संदर्भित केलेच पाहिजे. इतिहास उघड करतो की ती जागतिक सत्ता ब्रिटन व युनायटेड स्टेट्स् ऑफ अमेरिकेची संयुक्त सत्ता आहे. १९१४ पूर्वी ब्रिटनने, जगाने त्यापूर्वी कधीही पाहिले नव्हते एवढे महान साम्राज्य उभारले. १९ व्या शतकादरम्यान त्याने युनायटेड स्टेट्स् सोबत परराष्ट्रीय व्यापार संबंध दृढपणे स्थापले. ही दोन्ही राष्ट्रे पहिल्या व दुसऱ्या महायुध्दात खांद्यास खांदा लावून लढली व त्यांचे खास संबंध आजपावेतो पुढे चालू आहेत. १९८२ मध्ये युनायटेड स्टेट्स्चे राष्ट्रपति रेगन ब्रिटीश लोकसभेत “आमची दोन राष्ट्रे, आमची उल्लेखनीय मैत्री” याबाबत बोलले. अलिकडेच फेब्रुवारी १९८५ मध्ये ब्रिटीश पंतप्रधान युनायटेड स्टेट्स्च्या काँग्रेसच्या दोन्ही सभागृहास म्हणाले: “. . . दृढ उद्देश, विश्वासाची भागीदारी करीत, . . . आमची एका वंशाची दोन्ही राष्ट्रे, आम्ही ख्रिस्ती युगाच्या तिसऱ्या हजार वर्षीय सत्तेकडे जात असता ऐक्याने पुढे जावोत.”
जागतिक घडामोडीवरील तिच्या महान प्रभावामुळे अँग्लो–अमेरिकन दोन्ही राष्ट्राच्या संयुक्त जागतिक सत्तेचे चित्रण वेगळे असे प्रकटीकरण पुस्तकात केले आहे. ते कसे? प्रकटीकरणाच्या दुसऱ्या श्वापदाद्वारे.
जमिनीवरील श्वापद
“मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले; त्याला कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती; ते अजगराप्रमाणेच बोलत होते” असे योहान लिहितो. ख्रिस्ती असल्याचा व आक्रमक नसल्याचा दावा करण्याने अँग्लो–अमेरिकन जागतिक सत्ता स्वतःला कोकऱ्यासमान असल्याचे भासविते. परंतु खरे म्हणजे ती जणू काय अजगराप्रमाणे वागली आहे. ते कसे? पुष्कळ राष्ट्रां
ना वसाहतींत एकत्र करून व पृथ्वीच्या उगमांचा लोभीपणे अयोग्य फायदा घेऊन. तसेच, ती “ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वी व तिजवर राहणाऱ्या जणांनी नमन करावे असे करते, व ती . . . श्वापदाप्रीत्यर्थ मूर्ती करावयास पृथ्वीवरील राहणाऱ्या जनांस सांगते.” (प्रकटीकरण १३:३, ११–१५) याची पूर्णता कशी झाली?
सैतानाच्या जागतिक राजकारणी व्यवस्थेस पहिल्या महायुध्दा दरम्यान “प्राणघातक घाव” सहन करावा लागला. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, ब्रिटन व अमेरिकेने राजकारणी व्यवस्थेची “भक्ती” वाढविली. हे त्यांनी राष्ट्रां
ना “श्वापदाची एक मूर्ती बनविण्या”साठी एकत्र करण्याने केले. हे कसे घडले?
पहिल्या महायुध्दाच्या समाप्तीस युनायटेड स्टेट्स्चे राष्ट्रपती विल्सन यांनी नवीनच योजित लीग ऑफ नेशन्सच्या मर्जीसाठी जोरदार चळवळ सुरू केली. याकरता १९१९ मध्ये पॅरीस पीस कॉन्फरन्सच्या उपस्थितांना त्यांनी सांगितले: “युनायटेड स्टेट्स्चे प्रतिनिधी लीग ऑफ नेशन्सच्या भव्य योजनेस पाठिंबा देतात. आम्ही तिजकडे या युध्दात आमच्या उद्देशित पूर्ण योजनांची वक्तव्य करणारी कोनशिला म्हणून पाहतो. . . . आम्ही येथे, लवकरच या युध्दाचा पाया धुऊन काढलेला असे पाहण्यास जमलो आहोत.”
राष्ट्रपती विल्सननी त्यांचे भाषण संपविल्यावर ब्रिटीश पंतप्रधान लॉयड जॉर्जशिवाय कोणीही बोलले नाही. ते म्हणाले: “मी या प्रस्तावाचे अनुमोदन करण्यास उभा आहे. युनायटेड स्टेट्स्च्या राष्ट्रपतींच्या उदात्त भाषणानंतर या मेळाव्यामध्ये या प्रस्तावाची स्तुति करण्यास काही निरिक्षण करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही, व मी . . . ब्रिटीश साम्राज्याचे लोक या योजनेमागे किती आवेशाने आहेत हेच सांगतो.”
त्या वर्षानंतर लंडनमध्ये लिग ऑफ नेशन्सच्या मंजुरीस पाठिंबा देण्यासाठीच्या सभेत ग्रेट ब्रिटनच्या राजाचे पत्र वाचले गेले: “आम्ही युध्द जिंकले आहे. ती थोर साध्यता आहे. परंतु ती पुरेशी नाही. आम्ही चिरस्थाई शांतीसाठी लढलो व हे आमचे कर्तव्य आहे की ती सुरक्षित राखण्यासाठी होईल ते सर्व करावे. यासाठी लीग ऑफ नेशन्स चिरकाल व भक्कम करण्यापेक्षा इतर मोठे कोणतेच आवश्यक काम नाही. . . . मी राज्यातील सर्व नागरिकांसमोर याची प्रशंसा करतो ज्यामुळे इतर सदेच्छु मानवांच्या मदतीने, आधाराने शांतीची खात्रीदायक सुरक्षितता देवाच्या गौरवासाठी स्थापिली जाईल.”
१६ जानेवारी १९२० रोजी ४२ राष्ट्रांच्या सभासदत्वाने लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली. १९३४ पर्यंत तिला ५८ राष्ट्रे मिळाली. जमिनीवरील दोन शिंगे असणारे श्वापद जगास “श्वापदाची मूर्ति बनविण्यास” एकत्र करण्यात यशवंत झाले. ही मूर्ति अथवा सैतानाच्या जागतिक राजकारणी व्यवस्थेचे प्रतीक हे प्रकटीकरणाच्या शेवटच्या श्वापदात चित्रित केले आहे.
किरमिजी श्वापद
योहानाचे अंतिम श्वापदाचे वर्णन असे आहे: “देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या, सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाचे श्वापद.” या श्वापदाबाबतीत योहानास सांगितले होते की: “जे श्वापद तू पाहिले ते होते व नाही; ते अगाधकूपातून वर येणार आहे व नाशात जाणार आहे. . . . ते स्वत: आठवा राजा आहे.” (प्रकटीकरण १७:३, ८, ११) या वर्णनानुरूप लीग ऑफ नेशन्स जगाच्या आसमंतात जागतिक सत्ता असल्यासारखा प्रयत्न करू लागली. तथापि, ती दुसऱ्या महायुध्दास, जे १९३९ मध्ये सुरू झाले, त्याला रोखू शकली नाही. यामुळेच श्वापद असून नसल्यासारखेच ती अगाधकूपात नाहीशी झाली.
दुसऱ्या महायुध्दा दरम्यान अँग्लो–अमेरिकन जागतिक सत्तेने आंतरराष्ट्रीय संस्थेचे पुनरूज्जीवन करण्यात फार परिश्रम घेतले. १९४१ मध्ये ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चील यांनी युनायटेड स्टेट्स्चे राष्ट्रपती फ्रँकलिन रुझवेल्ट सोबत अटलांटिक समुद्रात जहाजावर गुप्त बोलणी केली. त्यांनी “त्यांची जगाच्या चांगल्या भवितव्याची आशा” व “सर्वसाधारण विस्तीर्ण व टिकाऊ सुरक्षिततेच्या स्थापनेची” घोषणा संयुक्तपणे केली. पुढील वर्षी वॉशिंग्टन डी. सी. येथे २६ राष्ट्रां
नी अँग्लो–अमेरिकन प्रस्ताव ज्यास “संयुक्त राष्ट्र संघ घोषणा” संबोधिले होते त्यास पुष्टी जोडली. या गोष्टीने २४ ऑक्टोबर १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्मितीकडे निरविले. ते किरमिजी रंगाचे श्वापद या नव्या नावाने उदय पावले. सध्या १५९ राष्ट्रे या संघासोबत एकजीव झाली आहे, ज्यांना आशा वाटते की ती सध्या अस्तित्वात असणारी मानवी राजकारणी सत्तेची व्यवस्था चिरकाल टिकवील.
तथापि हे सर्व १९१४ मध्ये स्वर्गात स्थापित देवाच्या मसीही राज्यास दृष्यातून डावलते. पृथ्वीवरील प्रत्येक मानवाने मानवी सत्ता की देवाची सत्ता यातून निवड केलीच पाहिजे. लवकरच मानवी सरकारासोबत किरमिजी श्वापद, देवाचा अधिष्ठित राजा येशू ख्रिस्त यासोबतच्या युध्दात गढेल. याची निष्पत्ती? तो “प्रभुंचा प्रभु व राजांचा राजा असल्यामुळे कोकरा (येशू ख्रिस्त) त्यांना जिंकील.” होय, किरमिजी रंगाचे श्वापद संपूर्ण मानवी राजकीय व्यवस्थेसोबत “नाशास” जाईल.—प्रकटीकरण १७:११, १४; तसेच दानीएल २:४४ पहा.
अजगर व त्याची तीन श्वापदे यांच्याकडून बहकविले गेले नाही म्हणून तेव्हा केवढ्या आशीर्वादाचे वाटेल बरे! ज्यांनी स्वत:स देवाच्या राज्याचे निष्ठावंत प्रजाजन शाबीत केले ते “नवीन पृथ्वीचा” भाग बनण्यासाठी बचावतील. देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत कारण पहिले होऊन गेले.” (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) या कारणास्तव तुम्हास परिणामकारी एकमेव सरकार देव राज्य याच्या अधीन करा. मग तुम्ही सुध्दा या चिरकालिक आशीर्वादांचा आनंद लुटणाऱ्यांच्या सोबत याल.
[तळटीपा]
a हा मुद्दा विस्तीर्ण स्वरुपात जानेवारी व फेब्रुवारी १९८७ च्या टेहळणी बुरुज अंकात चर्चिला होता.