प्रकटीकरणाची श्वापदे—त्यांच्याबाबत का वाचावे?
अपोक्लीप्स! हे पवित्र शास्त्रातील शेवटच्या पुस्तकास दिलेल्या चित्तवेधक नावातील एक आहे. त्यास प्रकटीकरण म्हणूनही संबोधिले जाते. हे पुस्तक विविध शब्द चित्रणांनी भरले आहे, ज्यामधील अजगर व तीन श्वापदांचे चित्र उल्लेखनीय आहे. काहींना ही श्वापदे भयानक वाटतात. काहींजण त्यास एका वृध्द मनुष्याचे कल्पनातरंग म्हणून दुर्लक्षित करतात. मग तुम्ही प्रकटीकरणाच्या श्वापदाबाबत का वाचावे? कारण तुमचे सुख त्यात समाविष्ट आहे.
सुमारे १,९०० वर्षांपूर्वी योहानाने प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिले तेव्हा तो एक वृध्द व्यक्ति होता हे खरे आहे. मग त्याने वर्णिलेली श्वापदे ही वार्धक्य व बुध्दीचा भ्रम होती असा याचा अर्थ होतो का? नाही, योहान हा काही दृष्टांत प्राप्त झालेला पहिला वृध्द नव्हता. दानीएल नावाच्या मनुष्यानेही त्याच्या वृध्दापकाळी श्वापदाचे दृष्टांत पाहिले होते व ते दृष्टांत मानवी राजवटीतील बदलाचा अचूक भविष्यवाद म्हणून शाबीत झाले. (दानीएल अध्याय ७ व ८) शिवाय येशू ख्रिस्ताने स्वतः दानीएलास संदेष्टा संबोधून त्याचे लिखाण अवतरीत करून त्याला इश्वर प्रेरित या दृष्टीकोणातून पाहिले.
येशूने त्याच्या मृत्युनंतर त्याचे प्रेषित अधिक इश्वरी सूचना प्राप्त करतील असे निदर्शित केले. (योहान १६:१२, १३) प्रकटीकरणाच्या पुस्तकातील पुष्कळ गोष्टी उल्लेखनीयरित्या पूर्ण झाल्या आहेत हे पाहता, प्रेषित योहानास झालेले श्वापदाचे दृष्टांतही देवाने त्याला इश्वर प्रेरित केलेले आहेत याविषयी आम्ही निश्चिंत राहू शकतो.—२ तिमथ्यी ३:१६.
प्रकटीकरणाच्या पुस्तकाचे प्रास्ताविक म्हणते: “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण: जे देवाने त्यास . . . त्याचा दूत पाठवून त्याच्याद्वारे सांकेतिकरित्या त्याचा दास योहान यास सादर केले.” (प्रकटीकरण १:१) या कारणास्तव प्रकटीकरण पुस्तकातील चित्रणे ज्यात त्याच्यातील श्वापदेही समाविष्ट आहेत ती शब्दशः नसून लाक्षणिक आहेत. त्यांचे वाचन करण्यास भिण्याचे कारण नाही. ही श्वापदाची प्रतिके ख्रिश्चनास मोलवान ज्ञान पुरवितात व त्यांना देवासोबतचे त्याचे नातेसंबंध राखण्यास समर्थ करतात. अशाप्रकारे प्रेषित योहान लिहू शकला: “या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारा व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे.” होय, या प्रतिकांची तुमची समज सध्या व भवितव्यासाठी सौख्यता व धन्यता आणू शकते.—प्रकटीकरण १:३.