‘मला ते ७० वर्षांआधी मिळावयास हवे होते असे मला वाटते’
हे उद्गार एका वयस्कर स्त्रीने युवर युथ—गेंटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट या पुस्तकाबद्दल काढले. तिने लिहिलेः “मी काही काळाआधी तुम्हाला युवर युथ—गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट या पुस्तकाची मागणी पाठविली होती, ती मला मिळाली. हे केवढे चांगले पुस्तक आहे! अशा प्रकारचे पुस्तक मला ७० वर्षांआधी जेव्हा मी मुलगी होत्ये तेव्हा मिळाले असते तर किती बरे झाले असते! त्याचा सध्या या घरी वापर होत आहे, पण मजपासून दूर राहणाऱ्या माझ्या नातवांसाठी याच पुस्तकाच्या र प्रती तुम्ही टपालाने पाठवाव्या याकरता त्याचे एकंदर मूल्य मी सोबत पाठवीत आहे.”
होय, युवकांसाठी असणारे हे महत्वपूर्ण मार्गदर्शक तुम्हाला सुध्दा प्राप्त करता येईल. याकरता खालील कूपन भरून त्याच्या मूल्यासहित आम्हाला पाठवा.
आम्हाला टपालाद्वारे १९२ पृष्ठांचे युवर युथ—गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट पुस्तक कृपया पाठवावे. त्याचे मूल्य १० रूपये आम्ही सोबत पाठवीत आहोत.