दुसऱ्यांचा पापकर्मात सहभागी होऊ नका
“अधम लोकात मी बसलो नाही; कपटी लोकांची संगत मी धरणार नाही.”—स्तोत्रसंहिता २६:४.
१. यहुदाने आपल्या सह ख्रिश्चनांना लिहित असलेल्या लिखाणाचाविषय का बदलला?
एकोणीस शतकांआधी शिष्य यहुदाने आपल्या समविश्वासूंना “समाईक तारणाविषयी” लिहिण्याची इच्छा धरली, पण त्याला त्यांना “एकादाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास त्याचे समर्थन करण्यासंबंधाचा बोध” लिहावा लागला. हे असे का? कारण “अभक्तीने वागणारी माणसे” मंडळीत शिरली होती व ती देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप” आणीत होती—यहुदा ३, ४.
२. तारणाविषयीची चर्चा करणे उत्साहवर्धक असले तरी देखील केव्हा केव्हा आम्ही कशाचा प्रार्थनापूर्वक विचार करण्यास हवा?
२ समाईक तारणाविषयीची चर्चा केवढी उत्साहवर्धक आहे! संदेशावर मनन करणे मोठे समाधान देते, शिवाय या तारणाच्या सर्व भव्य आशीर्वादांची अपेक्षेने वाट पाहणे देखील मोठा आनंद देते. तरीसुद्धा असेही प्रसंग कधी कधी उद्भवतात की जेव्हा तारणासंबंधीची बोलणी बाजूला ठेवून उभ्या ठाकलेल्या गंभीर प्रकरणांचा विचार करावा लागतो. यावर योग्य तो इलाज केला नाही तर त्या गोष्टी आमचा विश्वास ढासळून पाडतील व त्यामुळे जीवनाच्या शर्यतीत हार खावी लागेल. वाईट वागणूकीविषयीचा यहुदाने दिलेला इशारा जसा प्रबळ व जोरदार होता त्याप्रमाणेच ख्रिश्चनांनी अधूनमधून थेट व मुद्यास अनुलक्षून असणाऱ्या शास्त्रवचनीय सूचनांचा प्रार्थनापूर्वक रित्या विचार करण्यास हवा.
आमची स्वतःची पातके
३. आम्हाला शिस्तीची का गरज आहे व त्याचा कसा स्विकार व्हावा?
३ स्तोत्रकर्त्या दावीदाने म्हटले: “मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.” (स्तोत्रसंहिता ५१:५) आम्हा सर्वाचा जन्म पापी या नात्याने झाला. (रोमकर ५:१२) प्रेषित योहानाने लिहिले: “‘आपल्या ठायी पाप नाही’ असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो, व आपल्या ठायी सत्य नाही.” (१ योहान १:८) पापी असल्यामुळे आम्हाला आपले मार्गाक्रमण सुधारण्यासाठी वेळोवेळी शिस्तीची गरज लागेल. अशी ही शिस्त यहोवा देवाकडून त्याचे वचन पवित्र शास्त्र व त्याची संस्था याकरवी मिळते. त्याची ही शिस्त आमची सुधारणा करून त्याच्या समोर धार्मिकपणे चालण्याची मदत देते. प्रेषित पौलाला सुद्धा हेच आढळले की, “कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही. उलड खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतीमत्व हे शांतीकारक फळ देते.” (इब्रीयांस १२:११) अशा या शिस्तीकरवी शांतीच्या फळांची निर्मिती होत असल्याकारणामुळे आम्ही तिचा कृतज्ञतेने स्विकार करण्यास हवा.
४. शिस्त केव्हा दिली जाऊ शकते व तिचा काय परिणाम होतो?
४ मोठ्या पातकाप्रत निरविणाऱ्या मार्गाचा अवलंब सुरू होतो अशावेळीच कदाचित आम्हाला यहोवाकडिल शिस्त मिळू शकेल. (गलतीकर ६:१) कधी कधी ही शिस्त आम्ही चुकीच्या मार्गात पुर्णपणे गढल्यानंतर येऊ शकेल. ही नंतरची कडक प्रकारातील असू शकेल; जसे की प्रेषित पौलाने करिंथकरांना मंडळीतील जारकर्म्याविरूद्ध हालचाल करण्याची जोरदार हाक दिली होती. (१ करिंथकर ५:१–५) दोन्ही प्रकारात शिस्तीचा अवलंब, दुष्कर्म आचरणाऱ्याने पश्चातापी व्हावे, मागे फिरावे व गंभीर चुकांप्रत नेणाऱ्या पापीष्ठ वासनांविरूद्धचा मार्ग सातत्याने आचरावा याकरता केला जातो. (पडताळा प्रे. कृत्ये ३:१९) अशा या शिस्तीकरता यहोवाचे सेवक कृतज्ञ आहेत. प्राचीन करिंथमध्ये ज्या गृहस्थाचा निषेध झाला होता त्यालाही त्या शिस्तीपासून फायदा मिळाला, ज्यामुळे तो मंडळीच्या प्रेमळ सहवासात परत येऊ शकला.—२ करिंथकर २:५–८.
५. गंभीर पापात पडलेले ख्रिश्चन बहुधा काय करतात?
५ यहोवाला समर्पण केलेल्या बहुतेक सर्वांना देवासमोर धार्मिकपणे चालण्याची इच्छा व गरज वाटते. त्यांनी गंभीर पातक केलेच तर ते लगेच त्या वाईट मार्गापासनू दूर होतात आणि नियुक्त वडिलांकडे जाऊन त्यांना खऱ्या पश्चातापाचा पुरावा व्यक्त करतात. (याकोब ५:१३–१६) वस्तुतः दर वर्षी फारच थोड्या लोकांना मंडळीतून बहिष्कृत करण्यात येते ही गोष्ट, त्यांना वाईटाचा द्वेष व चांगले करण्याची इच्छा आहे याची सूचकता दर्शविते.—स्तोत्रसंहिता ३४:१४; ४५:७.
दुसऱ्यांची पापे
६, ७. दुष्कर्मे आचरणारे काही जग दुसऱ्यांवर आपला प्रभाव कसा पाडतात?
६ तरीपण, योग्य त्या गोष्टींवर प्रेम राखणाऱ्या काहींनी स्वतःला स्वतःच्या अंतःकरणाद्वारे फसवू दिले व त्यामुळेच जे वाईट त्यासंबंधीचा द्वेष त्यांच्याठायी उद्भवत नाही. (स्तोत्रसंहिता ९७:१०; आमोस ५:१५) याचा परिणाम ते पापीष्ठ कर्मे आचरीत राहतात आणि योग्य गोष्टींकरता आपली लढत चालू ठेवीत नाहीत. कधी कधी तर ते आणखी पुढे जाऊन दुसऱ्यांना सुद्धा आपल्या पापकर्मात समाविष्ठ करण्याचा प्रयत्न करतात. अशा या प्रस्तावास लगेच नाकारणे हे आम्हासाठी किती महत्वपूर्ण आहे बरे!—पडताळा नीतीसूत्रे १:१०–१५.
७ वाईटाचा द्वेष व्यक्त न करणाऱ्यांकरवी कधी कधी अशा गोड गोष्टी निघतात की त्यामुळे ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात त्या चुकीच्या कर्मात पडण्याची इच्छा निर्मिली जाते. काही अनैतिक कृत्य करण्यासाठी किंवा देवाने निषिद्ध मानलेल्या वागणुकीच्या कडेला राहून तशी हालचाल करण्यामध्ये समाविष्ट होण्याचा तो प्रस्ताव असतो. तसेच आध्यात्मिक दृष्ट्या संभाव्य धोका उपस्थित करणाऱ्या परिस्थितीत समाविष्ट होण्याची ती गळ असते. अशाप्रकारे इतरांची भुलवणूक करणाऱ्यांचा हा दावा असतो की यहोवा तर प्रेमाळू देव आहे त्यामुळेच आम्ही पाप करतो तेव्हा तो आम्हावर दया दाखवील. (यिर्मया १७:९; यहुदा ४) आम्ही, “त्याच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ” नये हे फारच बरे!—नीतीसूत्रे १:१५.
दुसऱ्यांच्या पापकर्मात सहभागी होणे
८. कोणत्या प्रश्नांचा आम्ही विचार करायला हवा?
८ आता समजा की, सुचविण्यात आलेले एखादे मार्गाक्रमण चुकीचे आहे हे आम्हाला कळते तर काय? आम्ही त्याचा नुसता त्याग करणे हे आम्हाला संबंधित प्रकरणाच्या आमच्या जबाबदारी पासून मुक्त करते का? चुकीच्या मार्गाक्रमणाचा प्रस्ताव मांडणारे त्याचे आचरण करीत आहेत हे आम्हाला ठाऊक आहे तर मग आम्ही काय करावे?
९. दुसऱ्यांची दुष्कृत्ये कळविण्यास काहीजण का माघार घेतात पण ही गंभीर गोष्ट का आहे?
९ वाईट कर्मे आचरणाऱ्यांची माहिती असणारे याबद्दल, मंडळी शुद्ध राखण्याची प्रमुख जबाबदारी असणाऱ्यांना कदाचित काहीच कळविण्याची इच्छा करीत नसतात. ते का बरे? आपण माहिती देणारे आहोत असा आपल्याविषयीचा ग्रह बनू नये असे त्यांना वाटत असते. किंवा निष्ठेविष्यीचा खोटा अर्थ गृहीत धरल्यामुळे त्यांना ती माहिती गुप्त ठेवावीशी वाटेल किंवा ती ते केवळ अशा लोकांनाच सांगतील जे त्यांना ती बाहेर न फोडण्याचे अभिवचन देतात. हे फारच गंभीर आहे. ते का बरे? कारण यामुळेच दुसऱ्यांच्यापापकर्मात सहभागी होण्याचा परिणाम निष्पण्ण होतो.
१०, ११. (अ) दुसऱ्यांच्या पाकर्मात सहभागी होण्याविषयी प्रेषित योहानाने काय म्हटले? (ब) मंडळीच्या एकासभासदाने दुष्कृत्य केल्याची माहिती आम्हाला समजली आहे तर आम्ही स्वतःला काय विचारावे?
१० दुसऱ्यांच्या पापात सहभागी होण्याची शक्यता असते हे प्रेषित योहानाने दाखवून दिले. त्याने लिहिले: “ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त . . . नाही . . . हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका. कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो.” (२ योहान ९–११) ख्रिस्ताच्या शिक्षणापासनू दुरावलेला धर्मत्यागी सहावास उपयुक्त नसतो. याकारणास्तव त्याचे स्वागत न करण्याद्वारे निष्ठावंत ख्रिश्चन त्याच्या दुष्टतेचा सहभागी होण्याचे टाळतो.
११ धर्मत्याग्याविषयीची अशी ही वस्तुस्थिती आहे तर त्यांची कृत्ये आमच्या दृष्टीला आली आहेत त्यांच्या दुष्टतेत सहभागी बनण्याची आमची इच्छा निश्चितच नसावी. तर मग, मंडळीचा कोणी सदस्य चोरी करीत असतो वा तो मद्यपि आहे हे आम्हास कळाले तर काय? आम्ही त्याला यहोवाकडिल क्षमायाचना शोधण्याचा आणि आपले पाप वडीलांपुढे कबूल करण्याचा परामर्श दिला नाही तर आम्ही पूर्णपणे निर्दोष ठरतो का? नाही, उलट आम्हावर गंभीर जबाबदारी पडते.
शुद्धता व संरक्षण महत्वपूर्ण
१२. मंडळीच आध्यात्मिक शुद्धतेबद्दल काळजी का दाखवावी?
१२ मंडळीच्या आध्यात्मिक शुद्धतेविषयी आम्ही प्रत्येकाने जातीने काळजी व्यक्त करण्यास हवी. ही गोष्ट, इ.स. पूर्वीच्या सहाव्या शतकात यहुदी बंदिवान बाबेलोन सोडण्याच्या बेतात होते तेव्हा केवढ्या जोरदारपणे दिसली! त्यांना देवाकडील ही आज्ञा होती: “निघा, निघा. तेथून निघून जा. अशुद्ध वस्तूला शिवू नका. [बाबेला] मधून निघून जा. यहोवाची पात्रे वाहणाऱ्यांनो, तुम्ही आपणास शुद्ध करा.”—यशया ५२:११.
१३. दुष्कर्म्यांपासून यहोवाच्या लोकांचे संरक्षण करण्याची काळजी आम्ही बाळगण्यास हवी हे यहुदाने कसे दाखवून दिले?
१३ यहोवाच्या लोकांचा, दुष्कृत्ये करण्याचा मोह घालणाऱ्या लोकांपासून संरक्षण करण्याची काळजीही आम्ही व्यक्त केली पाहिजे. यहुदाच्या काळातील ‘अभक्त माणसांनी’ “देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप” आणले होते पण त्या निष्ठावंत शिष्याने आपल्या सम विश्वासूंना इशारा देऊन त्याकरवी त्याचे रक्षण केले. त्याने त्यांना विश्वासहीन इस्राएली लोक, बंडखोर दूत आणि इतरांच्या इशारात्मक उदाहरणाचे स्मरण दिले. त्याचे इश्वरप्रेरित पत्र वाचा आणि पहा की मंडळीच्या शुद्धतेला बाधा आणण्याचा धोका उत्पन्न होतो. तसेच अशुद्ध वासना राखणाऱ्या अनैतिक लोकांकडून देवाच्या लोकांचे संरक्षण करण्याची गरज उद्भवते त्यावेळी निष्ठावंत ख्रिश्चनांनी आळशीपणाने बसून चालणार नाही.
१४. कोणा दुष्कर्म्याने वडीलांकडे कबूली देण्याचे टाळले तर स्तोत्रसंहिता २६:४ आम्हाला, काय करावे ते ठरविण्यात कशी मदत देते?
१४ आता समजा की आम्ही कोणा दुष्कर्मे आचरणाऱ्याला देवाकडील क्षमाप्राप्तीचा शोध घेण्यास व वडीलांना भेटून कबूली वदविण्याचे प्रोत्साहन दिले पण तो यात टाळाटाळ करीत आहे किंवा असे काही करण्याची गरज नाही असे त्याला वाटते. अशावेळी आम्ही हे प्रकरण तेथेच सोडून द्यावे का? काहींना वाटेल की यात अधिक खोलवर न जाणे बरे. पातक करणाऱ्यासोबतचे मित्रत्व गमावले जाऊ नये असे त्यांना वाटत राहाते. शिवाय वडीलांना जाऊन कळविणे म्हणजे त्या व्यक्तिचा विश्वासघात करणे असे स्वतःबाबतीत वाटले जाऊ नये असेही त्यांना वाटते. पण ही सदोष विचारसरणी आहे. स्तोत्रकर्ता दावीद म्हणाला: “अधम लोकात मी बसलो नाही. कपटी लोकांची संगत मी धरणार नाही.” (स्तोत्रसंहिता २६:४) तर मग, जे “कपटी” म्हणजे प्रत्यक्षात आहोत तसे न दाखविणाऱ्यांचे सहकर्मी बनण्याची आमची निश्चितच इच्छा नसणार.
१५. कोणा पातक्यास, त्याने वडीलांकडे जाऊन आपल्या पातकाबद्दल कळविण्यासाठी पुरेसा वेळ दिल्यानंतर लेवीय ५:१ आमची जबाबदारी कोणती असल्याचे स्पष्ट करते?
१५ तद्वत, पातक करणाऱ्या विशिष्ठाला, त्याने वडीलांची आपल्या पातकासंबंधाने भेट घ्यावी यासाठी पुरेसा वेळ दिल्यावर, आम्ही त्याच्या पापकर्मात सहभागी होऊ नये ही यहोवासमोर आमची जबाबदारी राहते. आम्ही जबाबदार वडीलांना कळविले पाहिजे कोणा विशिष्ठाने गंभीर पातक आपल्याला कळविले आहे ज्याची छाननी त्यांनी केली पाहिजे. हे लेवीय ५:१ च्या सहमतात आहे, जे म्हणते: “साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबीविषयी . . . न सांगव्याचे पातक केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.” अर्थातच, जेथे पापकर्माविषयीची निश्चितता नाही तर नुसतीच कल्पना आहे अशाबाबतीत उतावळेपणाने कृति करण्याचे आम्ही टाळले पाहिजे.
१६. आपले गंभीर पातक नियुक्त वडिलांना कळविण्याचे नाकारणाऱ्या व्यक्तिसोबतच्या निष्ठेपेक्षा अधिक महत्वाचे असे काय आहे?
१६ आजच्या जगात, दुसऱ्यांची पातके झाकून टाकणे ही सर्वसाधारण प्रथा बनली आहे. दुसऱ्यांची पातके त्यांना कळविली जाण्याची गरज आहे अशांना कळविण्याची वेळ येते तेव्हा पुष्कळ जण दगडी भिंतीप्रमाणे गप्प राहतात. तरीपण, आपल्या समविश्वासूंचे गंभीर पातक नियुक्त वडिलांना कळविण्यासाठी ख्रिस्ती व्यक्तिमत्वाचे बळ जरूरीचे आहे. आम्हाला यहोवाची कृपापसंती राखायची आहे तर कोणासोबतच्या व्यक्तिगत मैत्रीने त्या विशिष्ठाच्या पातकाकडे दुर्लक्ष करण्यासाठी आम्हास अंधळे बनवू देऊ नये. जो गंभीर पातकाचा दोषी आहे व शिवाय जो आपले प्रकरण नियुक्त वडीलांना प्रकटविण्यचे नाकारतो त्याजवरील निष्ठेपेक्षा आमचे देवाबरोबरील नातेसंबंध अधिक महत्वपूर्ण आहेत हे लक्षात घ्या.
सर्वांनी विचार करण्याजोगी समस्या
१७. दुसऱ्यांच्या पापकर्मात सहभागी न होण्याविषयी दक्ष राहाण्याचे काही युवकांनी शिकून घेण्यास हवे हे कशावरून कळते?
१७ दुसऱ्यांच्या पापकर्मात सहभागी होण्याची ही समस्या कधी कधी आमच्यातील युवकात आढळून येते. मंडळीवर घातक परिणाम ओढावून आणणारी आणि यहोवाची कृपापसंती गमाविण्यास पात्र ठरणारी कृत्ये आचरणाऱ्या विषयी ज्यांना कळविले गेले पाहिजे त्यांना ते सांगत नाहीत व त्याबाबत ते स्तब्धता राखतात. दुसऱ्यांच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालण्याची प्रथा सर्वसाधारणपणे शालेय व्यवस्थेत आढळते. पण हाच दृष्टिकोण मंडळीभर पसरला तर याकरवी पुष्कळ समस्या उद्भवतील. युवकांनी जमावाने एकत्र येऊन दुष्कृत्य आचरले आणि याविषयी गुप्तता राखली जावी आणि वडील तसेच पालकांना याबाबतीत काही ही कळवले जाऊ नये म्हणून एकमेकांपासून शपथाहि वदवून घेतल्या अशा प्रकारचे अहवाल कळले आहेत. समवयीनांच्या दबावास बळी पडणे आणि आपल्या गटात मान्यता राखून ठेवण्याची धडपथ या गोष्टी, त्यांची दुष्कृत्ये उघड झाली तेव्हा प्रत्यक्षात या युवकांना, त्यांच्या पालकांना व मंडळीतील इतरांना अंतःकरणास बरेच झोबल्यासारखे झाले. उघडे होऊ शकणार नाही असे कोणतेही गुपित राहात नाही हे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. याकरताच देवाची संस्था शुद्ध राखण्यास मदत करणे ही यहोवासमोरील आमची प्रमुख जबाबदारी आहे.—लूक ८:१७.
१८. मुलांनी चुका केल्यास त्यांच्या ख्रिस्ती पालकांनी काय केले पाहिजे?
१८ यहोवाच्या सर्वच सेवकांनी इतरांच्या पापकर्मात सहभागी होऊ नये याची दक्षता राखावी. काही पालक आपल्या मुलांच्या दुष्कृत्यांचे समर्थन करून त्यांची कास धरतात. पण आमच्या मुलांनी चूक केली म्हणजे सर्वच आमचे वैरी असा ग्रह ख्रिस्ती पालकांना करता कामा नये. उलटपक्षी, इश्वरी भक्ति आचरणाऱ्या पालकांनी आपल्या चुकलेल्या मुलांना देववचनातील आवश्यक शिस्त लागू करण्यात व ती स्विकारण्यास त्यांचे साहाय्य करावे.
१९. (अ) गंभीर पापासंबंधाने ख्रिस्ती विवाहीत दांपत्यांनी कशाबद्दल जागरूक राहावे? (ब) कोणा वडीलाने वा उपाध्य सेवकाने गंभीर पातक केले असल्यास वडीलांनी काय करावे?
१९ ख्रिस्ती विवाहीत दांपत्यांनी एकमेकांची गंभीर पातके झाकून देवाच्या नियमांचे उल्लंघन होत नाही याविषयी खबरदारी बाळगली पाहिजे. त्यांनी हनन्या व सप्पीरा यांचे प्रकरण लक्षात घ्यावे, ज्यांनी संगनमताने कट रचला खरा, पण एकमेकांचे गंभीर पातक लपवून ठेवण्यात यशस्वी होऊ शकले नाही. (प्रे. कृत्ये ५:१–११) कोणा वडीलाने किंवा उपाध्य सेवकाने बहिष्कृत होण्याजोगे गंभीर पातक केले असल्यास इतर वडीलांनी अशाचे संरक्षण करण्याची बाजू न घेण्याची दक्षता राखावी. पौलाने नमूदित केलेले तत्व त्यांनी आचरावे की, “उतावळीने कोणावर हात ठेवू नको, दुसऱ्याच्या पापात तुझे अंग असू नये. आपणाला शुद्ध राख.”—१ तिमथ्यी ५:२२.
सात्विकता राखण्यामधील सूज्ञान
२०. दुसऱ्यांच्या गंभीर पातकांवर झाकण घालणे वा त्यात सहभागी होण्यापेक्षा आम्ही काय करावे?
२० यहोवाच्या सेवकांनी या जगाच्यावाईट मार्गाची सहभागिता व अनुकरण करू नये. प्रेषित योहानाने गायसला असे लिहिले: “प्रिय बंधो, वाईटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही.” (३ योहान ११) देवाच्या खात्रीलायक वचनाकरवी मार्गदर्शित होणे व त्याकरवी चांगले तेच करीत राहणे केवढे उत्तम आहे बरे! तद्वत, दुसऱ्यांच्या गंभीर पातकांवर झाकण घालणे वा त्यात सहभागी होण्यापेक्षा सात्विक व निर्मळ राहून ज्योतिसारखे चकाकण्याचा आमचा निर्धार असावा. (फिलिप्पैकर २:१४, १५) यहोवाच्या प्रत्येक सेवकावर मंडळी शुद्ध राखण्याची व स्वतःलाही व्यक्तिगतरित्या निष्कलंक राखण्याची जबाबदारी आहे. (२ पेत्र ३:१४) दुसऱ्याने जे काही केले त्याच्या योग्यतेविषयी तुम्ही त्रस्त झाले असाल तर काय? तर वडीलांबरोबर मोकळेपणाने बोलून कोणता मार्ग अनुसरावा याबद्दल त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
२१. (अ) ख्रिस्ताने मंडळी विषयी व्यक्त केलेली प्रीती आम्हास उदाहरण अशी कशी आहे? (ब) दुसऱ्यांच्या पापकर्माविषयी आम्ही आपली कोणती जबाबदारी पूर्ण करावी?
२१ येशू ख्रिस्ताने त्याची आध्यात्मिक वधू म्हणजे मंडळी इजविषयी जे प्रेम व्यक्त केले त्याचेच अनुकरण यहोवाच्या संस्थेविषयी आम्हास वाटणाऱ्या प्रेमाने करण्यास हवे. त्याने “मंडळीवर प्रीती केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे; आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निदोष असावी.” (इफिसकर ५:२५–२७) याचप्रमाणे, यहोवाच्या संस्थेविषयी आम्हास वाटणाऱ्या प्रेमाने तिला शुद्ध ठेवण्याकरता जे काही करता येणे शक्य आहे ते करण्याची आम्हास प्रेरणा द्यावी. देव किंवा त्याच्या संस्थेचा अपमान होईल किंवा मंडळीत इतरांची दुष्कर्मे चालू राहतील असे काहीही आपणाकडून घडू नये. याउलट, दुष्कर्म्याना त्यांची वागणूक सुधारण्याचे व त्यांनी वडिलांच्या मदतीप्राप्तीचा शोध घ्यावा याकरता आपण त्यांना उत्तेजन देऊ. त्यांनी प्रमाणित वेळेपर्यंत हे केले नाही तर नियुक्त देखरेख्यांना कळविण्याची आपली जबाबदारी आपण पूर्ण करू. याकरवी आम्ही त्यांच्या पापकर्मात सहभागी होण्याचे व दुष्कृत्यांचा दोष काही अंशी आपणावर ओढून घेण्याचे टाळू शकू.
२२. (अ) तारणप्राप्ती करता आम्ही काय केले पाहिजे? (ब) कोणत्या प्रश्नांचा अद्याप विचार व्हावयाचा आहे?
२२ आम्ही स्वतःपाशी बाळगून असणारे समाईक तारण हा एक अवर्णनीय ठेवा आहे. त्याच्या प्राप्तीकरता आम्ही यहोवापुढे नित्याने सात्विक मार्गाने चालत राहिले पाहिजे. यास्तव आपण एकमेकांना मदत करू आणि दुसऱ्यांच्या दुष्कर्मात कधीही सहभाग देणार नाही. आमच्या प्रयत्नांना योग्य ती मदत लाभावी याकरता यहोवाने प्रेमळपणे आपणाला संघटनात्मक व्यवस्था लावून दिली आहे. याबाबतीत मंडळीतील नियुक्त वडील महत्वपूण भूमिका राखून आहेत. पण ते यहोवा व त्याचा उत्तम मेंढपाळ असणारा पुत्र यांचे कसे अनुकरण करतात? जीवनाच्या मार्गावर वडील आमचे कसे साहाय्य करू शकतात? काही अवधिनंतर प्रसिद्ध होणारा यासंबंधीचा लेख आम्हाला या प्रश्नांचे उत्तर देईल.
तुम्हाला आठवते का?
◻ शिस्तीविषयीचा तुमचा दृष्टीकोन कसा असावयास हवा?
◻ कोणा समविश्वासूने तुम्हाला, त्याच्या हातून गंभीर पातक घडले आहे असे कळविले तर तुम्ही त्याला काय करण्याचे सांगावे?
◻ त्या पातक्याने आपले पातक नियुक्त वडीलांना कबूल केले नाही असे समजल्यास तुम्ही काय करावे?
◻ आम्ही वडील, वैवाहिक सोबती वा मुले असलो तर आम्हाला दुसऱ्यांच्या पापकर्मात सहभागी होण्याचे कसे टाळता येईल?
[१२ पानांवरील चित्र]
दुसऱ्यांच्या पापकर्मात सहभागी न होण्याविषयीचा इशारा प्रेषित योहानाने दिला