शांतता व निर्भयता—देवाच्या राज्याकडून
“संयुक्त राष्ट्र संघनेचे उद्दिष्ट: १. आंतरराष्ट्रीय शांतता व निर्भयता प्रस्थापित करणे.”—चार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स.
बोलण्यासाठी तरी हा युक्तीवाद प्रशंसनीय आहे. तरीपण गत ४० वर्षाचा परिणाम दर्शवितो की ‘आंतरराष्ट्रीय शांतता व निर्भयता प्रस्थापण्यात’ सयुंक्त राष्ट्र संघ अपयशी ठरला आहे. तसेच त्याने १९८६ “अंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष” असे घोषित करणे कोणताही फरक पाडीत नाही.a
दीर्घकालीन शांतता व निर्भयता यांना भूतलावर आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच—येशू ख्रिस्ताच्या वर्चस्वाखालील देवाचे राज्य होय. हे स्वर्गिय सरकार खरेपणातील आहे, ज्याचे संबधी येशूने आपल्या अनुयायांना प्रार्थना करण्यास शिकविले. (मत्तय ६:९, १०) संयुक्त राष्ट्र संघ अयशस्वी ठरला असता तेच कशारितीने यशस्वी ठरेल? अगदी साधी बाब घ्या: ज्या कारणास्वत सयुंक्त राष्ट्र संघ अपयशी झाला त्याचमुळे देवराज्य यशप्राप्ती मिळवील.
मानवी सुज्ञतेपेक्षा अधीकतेची निकड
या पूर्वीच्या अंकात, सयुंक्त राष्ट्र संघ संपूर्णतः अपयशी का ठरला या संबधीचे एक कारण आम्ही शिकलो ते म्हणजे देवाने मानवास स्वतःवर वर्चस्व गाजविण्याचा अधिकार किंवा सुज्ञता दिली नाही. (यिर्मया १०:२३) यास्तव, कितीही चांगल्या उद्देशाने उभारलेली मानव–निर्मित संघटना, शांतता व निर्भयता आणण्यात यशस्वी होवू शकणार नाही.
या विरूद्धतेत, येशू ख्रिस्त, या देवराज्याच्या नेमस्त राजाने सदोदीत अतिमानवी सुज्ञतेचे प्रदर्शन घडविले. (मत्तय १३:५४) डोंगरावरील प्रवचन हे याचे एक प्रमुख उदाहरण होय. (मत्तय ५–७ अध्याय) यामध्ये त्याने खरी सौख्यता कशी प्राप्त करावी, तंटे मिटविणे, लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहणे, व सुरक्षीत भवितव्य प्राप्त करण्याविषयीचे स्पष्टीकरण पुरविले. अशाप्रकारची सुज्ञता व मानवी स्वभाव जाणणारा अधिपती शांतता व निर्भयता कशी प्रस्थापित करावी हे नक्की जाणून असणार हे यथार्थ वाटत नाही का?
याहून अधिक, येशूच्या विवेकीदृष्टीचे मोल त्याने मानवाचे अंतःकरण पडताळणे, व त्याचे हेतु व अंतस्थ भावना जाणण्याने अधिक द्विगुणीत ठरते. (मत्तय ९:४; मार्क २:८) त्याचा काय अर्थ होतो याचा विचार कराः शांती व निभर्यता प्रस्थापण्याचे मोठे अडखळण साशंकता आहे. एक दुसऱ्याचे विचार व हेतु समजत नसल्यामुळे मानव व राष्ट्र बहुदा एकमेकांविषयी साशंक बनली आहेत. साशंकता शांती मधील आडभिंत म्हणून उभी आहे. तरीपण “मानवाचे मनोगत जाणू” शकतो त्या सत्ताधिशांच्या बाबतीत कसलेही अडखळण राहत नाही.—योहान २:२५, नॉक्स.
अतिमानवी शत्रूस दूर करणे
सयुंक्त राष्ट्र संघाचे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न असफल ठरण्याचे प्रमुख कारण म्हणजे “या जगाचा अधिपती” दियाबल सैतानाचे वर्चस्व होय. (योहान १२:३१) आपला नाश होण्यापूर्वी आपणास “थोडाच काळ” उरलेला आहे हे तो व त्याचा दुरात्मिक समूह जाणून आहे. त्यांचा “पृथ्वीवर अनर्थ” आणण्याचा निश्चय असल्यामुळे त्यांनी मानवजातीला राजकीय व राष्ट्रीय दृष्ट्या विभाजित करून शांतीच्या मार्गात अडखळण उभे केले आहे.—प्रकटीकरण १२:९–१२.
युद्धास चिथावणी देणाऱ्या या अतिमानवी शक्तीस कोण दूर करू शकणार? पवित्रशास्त्र दर्शविते की: आद्य देवदूत मिखाएल, संबोधलेला येशूख्रिस्त व त्याचे दूत यांनी सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून खाली भिरकावून दिले. या संबधी आम्ही वाचतो: “मी एका देवदूताला [येशू] स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्या जवळ अगाधकूपाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल जो सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे अजगर त्यास धरिले. व . . . त्याने त्यास अगाधकूपात फेकून देऊन बंद केले व शिक्का मोर्तब केला.” (प्रकटीकरण २०:१–३) यास्तव सैतानास मार्गातून दूर केले जाईल. केवळ त्यानंतरच खऱ्या शांती व निर्भय जिवनाचा आनंद लुटता येईल.
देवाचे “मूल”
या पूर्वीच्या अंकात सयुंक्त राष्ट्र संघ कधीच शांतता निर्भयता का आणू शकणार नाही याचे तिसरे कारण देण्यात आले होते: तो या जगाचे मूल आहे व त्यामुळेच त्याजमध्ये दुष्टता आणि सदस्य राष्ट्रांची मनोवृती दर्शविणारी भ्रष्टता सामावून आहे.
याच्या अगदीच गुणवैधर्म्यात, ज्या राज्याकरवी शांतता व निर्भयता आणली जाईल त्याचे शाब्दिक चित्रण, देवाचे “मूल” या प्रकारे प्रकटीकरण १२:५ मध्ये रेखाटण्यात आले आहे. त्याचा अधिपती देवाचे गुणधर्म प्रदर्शित करतो. हा अधिपति, येशू ख्रिस्ताकरवी प्रदर्शित केले जाणारे प्रिय गणुधर्म लक्षात घ्या: स्वार्थत्यागी प्रेम, (योहान १५:१२, १३) उबदारपणा व सह भावना (मत्तय ९:१०–१३; लूक ७:३६–४८); नम्रता (योहान १३:३–५; १२–१७); दया (मार्क ६:३०–३४); सहानुभूती (इब्रीकर २:१७, १८; ४:१५); नीतिमत्वतेची चाड असलेला (यशया ११:४, ५). अशा अधिपतीच्या वर्चस्वाखाली राहण्यास आपणास सुखद वाटणार नाही का?
“नव्या पृथ्वी” मध्ये
सयुंक्त राष्ट्र संघ शांतता आणण्यात कधीच यशस्वी होणार नाही याचे शेवटचे कारण माजी पंत सचिव डॅग हॅमरस्कजोल्ड यांनी मागे १९५३ मध्ये पुढील शब्दात सूचित केले होते: “आमची सर्वात मोठा आशा ही आहे की या जुन्या पृथ्वीस वाचविण्याची परवानगी दिली जावी.” या जुन्या जगव्याप्त व्यवस्थीकरणास बचावण्याचा त्यांचा मनोदय आहे तर या “जुन्या पृथ्वीस” बचावण्याचे सर्वच प्रयत्न निष्फळ ठरणार. पण का?
पहिली गोष्ट ही “जुनी पृथ्वी” मानव–निर्मित सरकारांनी बनली आहे. वैयक्तीकरित्या सरकार राष्ट्रीयवादस प्रोत्साहन देतात, त्यामुळे मानव विभागला जातो, संघटीतरित्या सर्वच राष्ट्राचे हित साधण्याऐवजी राष्ट्रीयवाद एकाच राष्ट्राच्या लाभांशावर जोर देतो. ही स्वार्थ–वृती सयुंक्त–राष्ट्र संघटनेच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाच्या मोलास कमी करते. दी गार्डीयन या ब्रिटीश वृतपत्राच्या संपादकीय लेखात म्हटले गेले की: “कोणतेच सदस्य राष्ट्र संघटीत राष्ट्रांच्या कल्याणासाठी स्वहिताचा बळी देण्याची तयारी दर्शवित नाही हे पहाता सुधारण्याची आशा तोकडी पडते. विश्वव्याप्त जनमतांची मोजणी करणाऱ्या तपमापकाची भूमिका पार पाडणे हेच (यूनायटेड नेशन्स जनरल) सभेचे मुख्य कार्य आहे. अनेक वर्षापासून चर्चीलेले परंतु कोणत्याच निर्णयाप्रत न पोंहचलेल्या वाद विषयांनी तिचा कार्यक्रम तपशील भरला आहे.”
या “जुन्या पृथ्वी”स बचावण्यास सयुंक्त राष्ट्र संघास अपयश येण्याचे एक निराशजनक अगत्याचे कारण आहे: ते म्हणजे तो देवाच्या विरूद्ध आहे. कशाप्रकारे? देवाच्या दृष्टीने जुन्या पृथ्वीची घडी बसणारच नाही. देवाने घोषित केलेला उद्देश सफल होण्याचा समय नजीक आला आहे. प्रेषित योहानाने वर्णिल्या प्रमाणे: “मी एक नवे आकाश व एक नविन पृथ्वी पाहिली; कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी नाहीशी झाली.” (प्रकटीकरण २१:१) मानव निर्मित सरकार दूर करताना, देवराज्य विभक्तता निर्माण करणाऱ्या राष्ट्रीय वादाचे उच्चाटन करील. त्याचे ठिकाणी एकच स्वर्गीय सरकार, देवाच्या राज्य वर्चस्वाखाली नीतीमान मानवी समाज “नविन पृथ्वीत” वास करील. तद्नंतर, फक्त त्याच समयी वास्तव्यातील जगव्याप्त शांतता व निर्भयतेचा मानवजात आनंद लुटेल.
‘तरवारी मोडुन फाळ करणे’
ही खरीखुरी आशा आहे हे, संयुक्त राष्ट्र संघासमोरील भींतीवर जे पवित्र शास्त्रीय भविष्यवादाचे शब्द कोरण्यात आले त्याकरवी खात्री मिळते. त्यावर असे निवेदन आहे: “ते त्याच्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील व त्यांच्या भाल्यांच्या कोयत्या करतील: राष्ट्र राष्ट्रावर तरवार उचलणार नाही. ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—यशया २:४चे अवतरण.
नाही, राष्ट्रांचे एक दुसऱ्यावर ‘तरवार उचलणे’ यावर सयुंक्त राष्ट्र संघ निर्बंध घालण्यात यश प्राप्त करू शकला नाही. तथापि ‘आपल्या तरवारी मोडून फाळ’ बनविण्याचा जिवंत पुरावा देणारे कांही लोक आहेत. जातीयता व राष्ट्रीयत्वावर मात करील अशा ऐक्याचे त्यांनी प्रदर्शन घडविले आहे. आपल्याच सहसोबत्यावर “तरवार उचलण्यास” कसल्याही प्रकारचा दबाव या तटस्थ ख्रिश्चनांना झुकवू शकत नाही. हे आहेत तरी कोण? यहोवाचे साक्षीदार.
राष्ट्रीय दहशतवादी हिंसाचाराने व्याप्त अफ्रिकन राष्ट्रात, राष्ट्रीय युद्धात सहभागी होण्याच्या दबावास तोंड देण्याची जी खास घटना एका साक्षीदाराबाबत घडून आली त्याद्वारे साक्षीदारांच्या धोरणाविषयीची स्पष्टता मिळते.
त्यांच्या दहशतीवादी सैन्यात भरती करण्यासाठी एका दहशतवादी गटाचे लोक, लोकांना पळवून नेत व त्यांच्यापुढे एक निर्णय घेण्याची योजना ठेवीतः त्यांच्या दहशतवादी सैन्यात सामील होणे किंवा मृत्युदंड पत्करणे. एके दिवशी त्यांनी एका यहोवाच्या साक्षीदारास पळवून आणले, मद्य घेऊन मस्त झालेल्या पुढाऱ्याने त्याजपुढे प्रस्ताव मांडला. सरकार व दहशतवादी गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन बिअर बाटल्या त्याच्यापुढे ठेवून त्याकडे निर्देश करून त्यांनी म्हटले: ‘तू कोणती निवडणार?’ साक्षीदाराने क्षणभर विचार केला व जवळपासच्या बिअर बाटल्याकडे पाहून त्यातील एक उचलून दोन्हीच्या मधोमध ठेवून म्हटले: ‘हा मी येथे आहे’ व पुढे म्हणाला ‘मी देवराज्यासाठी असल्यामुळे तटस्थ आहे.’ नंतर त्यास पुष्कळ वेळेस मारहाण करण्यात आली. ते त्यास गोळी कोणत्या क्षणी घालतील किंवा नाही याची कल्पना न देता, त्यास त्यांच्या दहशतवादी गटाच्या छावणीत कठोर परिश्रम करावयास त्यांनी त्यास जखडून ठेवले. पुढे आठ महीन्याच्या कालावधीनंतर, सरकारी सैन्यांनी छावणीवर हल्ला केला त्यावेळेस तेथून त्याला बचाव मिळाला.
राष्ट्रीय युद्धांत सहभागी होण्याऐवजी यहोवाच्या साक्षीदारांनी तुरुंगवास, किंबहूना मरणही पत्करले. यास्तव नाझी–जर्मन राजवटीस पाठींबा देत नसत म्हणून त्यांचेपैकी हजारोंना संघटीत छळवादाच्या कोंडवाड्यात डांबून ठेवण्यात आले होते. कोंडवाड्यात शेकडो साक्षीदारांच्या शिरच्छेद करण्यात आला व कांही मृत्यूमुखी पडले. परंतु आता, दुराचारी नाझी सरकाराच्या अधःपतनानंतर जर्मनीत व जगभरात यहोवाच्या साक्षीदारंची वाढ होत आहे.
पण, ‘तरवारी मोडून त्यांचे फाळ’ करण्यात ते समर्थ का ठरले? या संबधीचे धागोदोरे सयुंक्त राष्ट्र संघाच्या सनदेच्या प्रास्ताविकेत सापडतात जेथे म्हटले: “मानवाच्या मनातच युद्धाची सुरवात होते. म्हणून मानवाच्या मनातच शांतीकरता असणाऱ्या प्रतिकार शक्तीची उभारणी करण्यास हवी.”
याच अनुषंगाने ‘तरवारीचे फाळ’ करणाऱ्यांसंबधी यशयाने भविष्य कथीत केले: ते “इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” यापेक्षा ते शास्त्रवचनांचा अभ्यास व अवलंबनाने ते ‘देवाचे मार्ग शिकून त्याच्या पथांनी चालतात.’ (यशया २:३, ४) त्याच्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने ते आपल्या ‘मनाचा निर्धार करून’ शांतीकारक बनतात.—रोमकर १२:८, १८.
यहोवाच्या साक्षीदारांनी ‘तरवारी मोडून फाळ’ केले आहेत हा पुरावा हे सुस्पष्ट करतो की शांततेत व निर्भयतेत राहणे शक्य आहे. त्यांचे सद्य जीवनमान, ख्रिस्ताकरवीचे देवराज्य नजीकच्या भविष्काळात जगव्याप्ततेत काय साध्य करील त्याची छोटीशी चुणूक सादर करते.
अशाप्रकारचे भवितव्य तुम्हास चेतावणी देते काय? देवराज्य लवकरच दिर्घकालीन शांतता व निर्भयता प्रस्थापित करणार याबाबतच्या पुराव्याची सहभागिता यहोवाचे साक्षीदार आपणासोबत आनंदाने करतील. स्थानिक रित्या त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा किंवा या मासिकांच्या प्रकाशकांना पत्र लिहीण्याचा प्रयत्न का करू नये? युद्धविरहीत विश्वव्यापी आनंदी जीवन जगण्याचे भवितव्य सामोरे ठेवून, ‘तरवारी मोडून फाळ’ कसे करता येईल याविषयी आताच अधिक शिकून घ्या. (w85 10/15)
[तळटीपा]
a सयुंक्त राष्ट्र संघ का सफळ झाला नाही त्याच्या संपूर्ण चर्चेसाठी कृपया टेहळणी बुरूजचा जुलै १, १९८६ चा अंक पहा.
[५ पानावरील चौकट]
संयुक्त राष्ट्र संघ का अपयशी झाला:
◻ मानवी ज्ञान फारच मर्यादीत आहे (यिर्मया १०:२३)
◻ सैतानी प्रभाव त्याची पराकाष्टा बेचीराख करतो (प्रकटीकरण १२:१२)
◻ तो या जगाचे मूल आहे व त्याच्या दुष्टतेचा वारसपणा त्याच्याठायी आहे (१ योहान ५:१९)
◻ ती “जुनी पृथ्वी” जी देवाविरूद्ध आहे तिला बचावण्याचा प्रयत्न करतो (१ योहान २:१७)
देवाचे राज्य का सफल होईल:
◻ त्याच्या अधीपतीकडे अतिमानवी सुज्ञता आहे व मानवाचे अंतःकरण जाणू शकतो. (योहान २:२५)
◻ ते युद्धामागील चिथावणी देणाऱ्या दुरात्मीक प्रभावास दूर करील. (प्रकटीकरण २०:१–३)
◻ ते देवाचे “मूल” आहे व त्याचा अधीपती देवाचे गुण प्रतिबिंबीत करतो (प्रकटीकरण १२:५)
◻ ते नितिमान “नवीन पृथ्वीस” एकाच स्वर्गिय सरकाराखाली स्थापित करील. (प्रकटीकरण २१:१)
[७ पानांवरील चित्र]
देवाचे राज्य “एक नवीन पृथ्वी” म्हणजेच नीतिमान मानवी समाज जो एकाच स्वर्गीय सत्तेखाली वास करील, ती स्थापित करील