वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ८/१ पृ. ३-४
  • शांतता व निर्भयता—एक गरज

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शांतता व निर्भयता—एक गरज
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मिळती जुळती माहिती
  • अणुयुद्धाबद्दल बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
  • आण्विक धमकी कायमचीच काढण्यात आली!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • युद्धांचा शेवट करणारे युद्ध
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ८/१ पृ. ३-४

शांतता व निर्भयता—एक गरज

“विसाव्या शतकात युद्धे सात्यत्याने फारच क्रूर, अधिक नाशकारक व प्रत्येक स्वरूपात हिणकस बनली आहेत . . . हिरोशीमा व नागासकी वर टाकलेल्या बाँम्बने युद्ध थांबले. त्याने हे स्पष्ट केले की आम्ही दुसरे युद्ध कधीही लढवू नये. सर्व ठिकाणच्या मानवांनी व नेत्यांनी हा धडा शिकलाच पाहिजे, व मला विश्‍वास वाटतो की ते हे शिकतील तेव्हा त्यांना चिरकालीक शांतीचा मार्ग सापडेल. याशिवाय दुसरा पर्यायच नाही.”—हेन्री एल स्टिमसन, “द डिसिजन टू यूज द ॲटोमिक बॉम्ब,” हार्पर्स मॅगेझीन, फेब्रुवारी १९४७.

संयुक्‍त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी १९४०–४५ च्या काळातील अमेरिकेचे युद्ध सचिव मि. स्टिमसन यांनी वरील उद्‌गार काढले. वास्वविकतेत, जवळ जवळ ४० वर्षाचा समय लोटला असता मानव काही “धडा शिकू शकला” का? “चिरकालिक शांती”त जीवनाचा आनंद उपभोगण्याचा संधी संयुक्‍त राष्ट्र संघाने उपलब्ध करून दिली का? दुसऱ्‍या महायुद्धानंतर युद्धासाठी व युद्धाच्या तयारीसाठी मानवाने खर्च केलेल्या किंमतीचा अंमळ विचार करा.

मानवी किंमत: शांतता प्रस्थापित करण्याच्या युनोच्या प्रयत्नांच्या दृष्टीकोनातून पाहता दुसऱ्‍या महायुद्धातील मानवी मोल काय असेल? “दुसऱ्‍या महायुद्धाच्या भिषणतेनंतर ६६ देशात व प्रदेशात महत्वपूर्ण असे १०५ युद्धे लढली गेली. ([अनुमान काढण्यात आले] १,००० पेक्षा अधिक प्रतिवर्षी मृत्यूमुखी पडले) . . . १९४५ पासूनच्या युद्धात १६ दशलक्ष मृत्यु पावले, प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्‍या शस्त्रधारी सैनिकांपेक्षा नगरवासीय अधिक बळी पडले. (नगरवासीयांची संख्या अपूर्णच आहे; बहुतांशी युद्धांची तपशिलवार नोंद ठेवली जात नाही.)—वर्ल्ड मिलीटरी अँड सोशल एक्स्पेंडीचर १९८३ रूथ सिवर्ड द्वारा.

वस्तुतः शांतता व सुरक्षितता पुढेपुढे पलायन करीत आहे—मात्र युद्धांची सातत्याने वाढ होत आहे. सिवर्ड स्पष्ट करते: “१९५० च्या काळातील (युद्धांची संख्या) सरासरी प्रतिवर्षी ९ होती ६०च्या सुमारास प्रतिवर्षी ११; आणि ७०री च्या काळात . . . , प्रतिवर्षी १४.”

मनोवैज्ञानिक मुल्य: हिरोशिमापासून आजतागायत मनुष्य अणुयुद्धाच्या भयग्रस्त स्थितीत जगत आहे. पहा, १९४५ची अल्पसंख्याक अण्वस्त्रे १९८३ पर्यंत जगव्याप्ततेत ५०,०००नी वाढली आहेत. आजही अधिकपणे निर्माण केली जातात! सहाजिकच, अण्वस्त्राची व त्यांचा साठा बाळगणाऱ्‍या राष्ट्रांची, दोहोंची संख्या वाढत आहे, म्हणूनच अण्वस्त्र युद्धाची शक्यता जाणवते. अणुयुद्धाच्या भयाने जगणाऱ्‍यावर मनोवैज्ञानिक परिणाम काय झाले आहेत?

प्रिपेरिंग फॉर न्यूक्लर वॉर—द सायकॉलॉजीकल इफेक्ट हे पुस्तक उत्तरादाखल म्हणते: “अण्वस्त्रांच्या छायेत जगण्याचा लेकरे व प्रौंढांच्या आकांक्षा व स्वभावावरील परिणामांचे संशोधन करण्याची अत्यंत निकडीची आवश्‍यकता आहे . . . यांचा प्रचंड संभवनियतेने आमच्या समाजाचा वाढता मोबदला, पिढी प्रौढत्वाकडे प्रगमन करीत आहे तशी चित्तवेधकता ग्रासून आहे. तर मग बालकांच्या स्वप्नाचे काय होईल?”

खरोखर, सुरक्षित भवितव्याच्या आभासास विशेषतः तरूणच सामोरे जात आहेत. आस्ट्रेलियातील १० ते १२ वयोगटातील शालेय लेकरांच्या अलीकडेच केलेल्या पहाणीत पुढीलप्रमाणे उद्‌गार मिळाले: “मी मोठा झालेला असेल त्यावेळी एक युद्ध होईल व आस्ट्रेलियातील प्रत्येक जण मारला गेलेला असेल असे मला वाटते.” “जग उद्वस्त झालेले असेल—मृतावस्थेतील प्राणी सर्वत्र विखुरलेले असतील, व भूतलावरून यु.एस्‌.ए. बेचिराख केलेली असेल.” ७० टक्कयाहून अनेक लेकरांनी “अणुयुद्धाची शक्यता व्यक्‍त केली.” सामाजिक संशोधकांना याचे भय वाटते की “आजच मला जगू द्या” ही मनोवृती पुष्कळ तरूणांत वाढत आहे त्याला आजची असुरक्षितता कारणीभूत आहे व त्याचा परिणाम ‘जशास तसे’ प्रवृतीत दिसत आहे.

आर्थिक मूल्य: १९३०च्या मध्यंतरापूर्वी सैन्य बलाचा खर्च प्रतिवर्षी ४ ते ५ दशकोटी डॉलर्स (यू.एस.) एवढा होता, परंतु १९८२ मध्ये आकड ६६० दशकोटी डॉलर्स एवढयापर्यंत पोहंचला, आणि तो वाढत चालला आहे हे तुम्हास ठाऊक आहे. या किंमतीचे वास्तवतेचे चित्रण उभे करताना वर्ल्ड मिलीटरी ॲण्ड सोशल एक्स्पेंडीचर १९८३ म्हणते: “प्रतिमिनिटास अन्‍नाच्या व स्वस्तप्रकारातील लस टोचू घेण्याच्या अभावामुळे ३ लेकरे मृत्यु मुखी पडतात तर जनतेच्या आर्थिक संचया मधून सैन्य बलाचा खर्च १.३ दश लक्ष डॉलर्स एवढी रकम प्रति मिनिटास शोषून घेतो.” (तिरपे अक्षर वळण आमचे.) आता दोन वर्षात तो २ दशलक्ष डॉलर्स प्रतिमिनिट एवढा वाढला आहे.

मानवाने युद्धासाठी व युद्धाच्या तयारीसाठी मोजलेल्या अवाढव्य किंमतीचा तुम्ही विचार करता तेव्हा एक गोष्ट दिसून येते: मानवाला स्वबलावर “चिरकालिक शांतीचा” मार्ग प्राप्त झाला नाही. तथापि स्वतःस विचाराः आमच्याच हयातीत जगव्याप्ततेतील शांतता व निर्भयतेसाठी एखादा मार्ग आहे का? कोणत्या उगमापासून ती लाभेल? संयुक्‍त राष्ट्र संघटनेकडे त्या अपेक्षेने पहावे का? नाही; तर मग शांतता व निर्भयता कशी प्रस्थापित केली जाईल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा